आधी अंडे की आधी कोंबडी ?

Submitted by अभय आर्वीकर on 12 January, 2010 - 04:28

चर्चेदरम्यान एक प्रश्न आला आहे.
आधी अंडे की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? असा प्रश्न विचारला आहे.
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडे की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
(या संदर्भात शेवटचे प्रतिसाद वाचावेत.)
...................................................................................

कोंबडी, अंडी आणि प्रजासत्ताकदिन

आधी काय निर्माण झाले असावे.?
कोंबडी की अंडी ?
अनेकदा अशा तर्‍हेच्या प्रश्नामध्ये आपण पुरते गुरफटुन जात असतो.
उत्तर मिळविण्याच्या प्रयत्नात उत्तर मिळण्याऐवजी नव्याने नवेनवे प्रश्नच निर्माण होत जातात.
गुंता सुटण्याऐवजी गुंतागुंत वाढतच जाते.वैताग येतो.आणि जाऊ दे, काय करायचे आपल्याला असे म्हणुन विषय सोडुन देतो.
.............
प्रश्नांची उकल करणे खरेच कठीन असते ?.
ज्याला उत्तर नाही असा प्रश्न असु शकतो ?
'आधी कोंबडी की आधी अंडी' या प्रश्नाचेच बघा.
विचार करता करता थोडा शास्त्रिय आधार घेतला की निर्विवाद आणि बिनतोड उत्तर मिळुन जाते.कळुन चुकते की पृथ्वीतलावर आधी अंडीचे आगमन झाले नंतर अंडीपासुन कोंबडी जन्माला आली. गुंतागुंत दुर होते आणि लक्षात येते की महाकठीन वाटणारे उत्तर एवढे सोपे होते?
.........................
आज हा विषय चघळण्याचे कारण ?
२६ जानेवारी - गणराज्य-प्रजासत्ताक दिन येतोय.
या निमित्ताने देशभर चर्चेला पाय फुटणार. स्वातंत्र्योत्तर काळात
'काय मिळवले काय गमविले'
'देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही'.
'देशाला प्रगतीपथावर नेण्यास कोणी किती योगदान दिल्रे'.
त्यासोबतच दबक्या आवाजात का होईना पण हाही एक विषय चर्चिला जाणार.
देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?
राजा की प्रजा ? नेते मंडळी की जनता जनार्दन ?
अर्थातच कोंबडी की अंडी ?
नुसतीच चर्चा...... उत्तर नसलेली.
उत्तर शोधायचा प्रामाणिक प्रयत्न न झालेली.
२७ तारिख उजाडली की आमची नित्याची दिनचर्या सुरु.
हे असे रहाटगाडगे...........पुन्हा त्या चर्चेला एक वर्षाची विश्रांती.....!!
याला म्हणायचे प्रजासत्ताक.....!!
जोरसे बोलो....
प्रजासत्ताक दिन चिरायु होवो....!!!!!!!!!!!!!!!
..
गंगाधर मुटे

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चंपक, 'तेथे पाहिजे जातीचे, येर्‍यागबाळ्याचे काम नोहे'
आम्ही येरे गबाळे.. तुम्ही पडा.. आम्ही आहोत तुमच्या पाठिशी!
(तुम लढो, हम कपडा संभालता है :P)
विनोदाचा भाग सोडून द्या.. पण मी ऑफिसातही त्या भानगडीत पडत नाही अन त्याचे परिणाम भोगायची माझी तयारी असते. (नाही जमत एखाद्याला - ज्याला जमत आणि ज्याची इच्छा असेल त्यानं पडावं)

सगळ्याच क्षेत्रात भ्रष्टाचार हा नॉर्म झाला आहे. बॅ. नाथ पै, मधु दंडवते यांच्यासारखे नेते आता ईतिहासजमा झाले आहेत. IAS/IPS अधिकारीही याला अपवाद नाहीत. चांगले ध्येय घेउन शिरणारा, भ्रष्टाचाराशी लढण्याची शपथ घेतलेला IAS/IPS अधिकारी सुद्धा सिस्ट्म ला बळी पडतो. राजकारणी तर "तेरी भी चुप, मेरी भी चुप" हे तत्व अंगिकारतात आणि फक्त एका विशिष्ट पातळी पर्यंतच आपापल्या विरोधकांचा पिच्छा पुरवताना दिसतात. आठवतंय, नारायण राणेंनी २६/११ च्या हल्ल्यानंतर जाहीरपणे म्हटलं होतं की या हल्ल्याचे सुत्रधार त्यांना माहीत आहेत आणि वेळ आल्यावर ती नावं ते बाहेर काढ्तील. ती वेळ आतापर्यंत तरी आली नाही. याउप्पर, एकाही पुढार्‍याला, राण्यांना याचा जाब विचारावा किंवा पाठपुरावा करावा असं वाटलं नाही. कां? कारण राणेंना सगळ्यांची चिल्ली-पिल्ली ठाउक आहेत. Happy

सुदैवाने भारतीय सेना (लीडरशीप) या सगळ्यांपासुन दुर राहीली आहे, नाहीतर आतापर्यंत पाकिस्तानप्रमाणे मिलिटरी कू झाले असते.

सिस्ट्म किंवा व्यवस्थापरिवर्तन आवश्यक आहे.
स्वतः राजकारणात समिल झाल्याने स्वतःच्या मालमत्तेत सुधारणा होते.
व्यवस्था परिवर्तन मात्र होत नाही.
त्यासाठी सत्तेच्या / राजकारनाच्या बाहेरच्या मंडळींनी दबावगट निर्माण करणे हा एक उपाय असु शकतो.

सिस्ट्म किंवा व्यवस्थापरिवर्तन आवश्यक आहे.>>
दोन मार्ग आहेतः
१)व्यवस्थेत घुसा : राजकीय नेते व्हा-सत्ता मिळवा/- सरकारी नोकरी- वरिष्ठ पातळीवर- युपीएससी/ एम्पीएससी
२)व्यवस्थेला आव्हान द्या- नक्षलवादी बना/शस्त्र हाती घ्या.

पहिला योग्य वाटतो.

सिस्ट्म किंवा व्यवस्थापरिवर्तन करण्यासाठी हे दोन्ही मार्ग चुकीचे असल्याचे इतिहास सांगतो.
याही पेक्षा वेगळा मार्ग निघायला हवा.

निवडनुकित पैशाचा पुर वाहतो हे खरं आहे, पण राजु शेट्टी व दिपक आत्राम सारखे काहि अपवादहि आहेत. हा संकेत आहे परिवर्तनाचा, Wait and Watch........
प्रत्येक गोष्ट घडण्यासाठी एक ठराविक कालावधी लागतो, आणी तो लागलाच पाहीजे.
आणी हि गोष्ट जर माणवी वर्तनासंबधित असेल तर आधी अंदाज बांधणे अवघड जाते.

बदल होईल, नक्की होईल. केंव्हा ? ......... कोई न जाने...........

व्यवस्थेला चक्क कँसर झालाय. कँसरच्या रोग्याला पॅरॅसिटॉमल दिल्याने आपले तात्पुरते समाधान होते.
आता या प्रस्थापित व्यवस्थेचे ऑपरेशनच व्हायला पाहीजे.
आणि ते एक दिवस होणारच...... फक्त टाईमटेबलचा प्रश्न आहे.
तसेही क्रांती,उत्क्रांती,उलथापालथ हा निसर्ग नियमच आहे.

आणी हि गोष्ट जर माणवी वर्तनासंबधित असेल तर आधी अंदाज बांधणे अवघड जाते.
दुर्दैवाने तसेच आहे. आधी सज्जन असलेले लोक एकदा यंत्रणेत शिरले की ती यंत्रणाच त्यांना भ्रष्टाचारी बनवते, त्यांच्याभोवती आपल्या वाईट माणसांचे जाळे पसरून त्यांना सत्य परिस्थिती कळू देत नाहीत, पैशाची लाच घेतली नाही तर गुंडगिरी करून त्यांना नको त्या गोष्टी करायला लावतात.

हे इथल्या राजकारणातले. भारतात कदाचित् असे होत नसेल, पण आहे का कुणाला माहित?

अहो झक्की, कुठे आहात तुम्ही?
आमची ही सारी चर्चा 'मेरा भारत महान' साठीच चाललीय...
आमचा भारत जागतिक महासत्ता केव्हा होईल हे नाही सांगता येत...
पण भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणुन लवकरच उदयास येईल याची खात्री आहे.

कशात का असेना नंबर वन पाहिजे......
मप्ला बा म्हणायचा.... पोरगं गुंडा जरी झालं तरी चालल पण ते नंबर एक च गुंडाड असलं पाहिजे!

मागे - मागे राहाण्यात पुढे - पुढे आहोतच की आपण.
पुत्र व्हावा ऐसा गुंडा- ज्याचा तिन्ही लोकी झेंडा.असेच ना?

पण भ्रष्टाचाराचा महामेरू म्हणुन लवकरच उदयास येईल याची खात्री आहे.

अशक्य. भारतापेक्षा किती तरी पटीने या क्षेत्रात इतर देश पुढे आहेत. शिवाय भारतात उच्चशिक्षित लोक खूप आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार वाईट कसा हे त्यांना समजते. ते लोक भ्रष्टाचार कमीच करतील, वाढू देणार नाहीत.
सिस्ट्म किंवा व्यवस्थापरिवर्तन आवश्यक आहे

त्याला System of checks and balances या पद्धतीचा उपयोग होऊ शकेल. निदान मी तरी या चा भरपूर अभ्यास केला आहे, अणि बरीच वर्षे या क्षेत्रात काम केले आहे. माझी खात्री आहे, ही पद्धत भारतात उपयोगी पडेल. त्याची काही उदाहरणे मी देऊ शकेन. पण 'भारतात हे असे चालत नाही हो'
असे सांगून लोकांनी उडवून लावले मला!

अशक्य. शिवाय भारतात उच्चशिक्षित लोक खूप आहेत, त्यामुळे भ्रष्टाचार वाईट कसा हे त्यांना समजते. ते लोक भ्रष्टाचार कमीच करतील, वाढू देणार नाहीत.
......
आता बोंबला...अहो झक्कीजी, उच्चशिक्षित लोकांचाच भ्रष्टाचार हा आवडता धंदा आहे.अशिक्षीत,गावंढळ,अडाणी माणसाला भ्रष्टाचार या शब्दाचा उच्चार देखिल करता येत नाही हो.तो बिचारा टेंप्ररी या शब्दाला टेंपरवारी म्हणतो.
तो केल्याच तर चोर्‍या,दरोडे वगैरे करतो.प्रसंगी पैशासाठी खुन देखील.पण भ्रष्टाचार नाही करत.
भ्रष्टाचार या क्षेत्रात उच्चशिक्षितांची मोनोपली आहे साहेब.
"जेवढा जास्त उच्चशिक्षित तेवढा जास्त भ्रष्टाचारी" असे समिकरण झालय या देशात.
...........
भारतापेक्षा किती तरी पटीने या क्षेत्रात इतर देश पुढे आहेत.
म्हणजे आपणच काही नालायक नाहीत, आपल्यापेक्षाही जास्त नालायक आहेत म्हणायचे.मग त्यांच्या तुलनेने आपण सज्जनच की.

भारतिय लोकशाहीवरुन अरण्यरुदन करणे हे शहरी उच्चवर्णिय मध्यमवर्गियांचे व्यवच्छेदक लक्षण आहे. यातले बहुतांश मतदानालाही बाहेर पडत नाही. यांच्या आवडत्या 'प्रखर राष्ट्र्वादी' पक्षाला सत्ता मिळाली नाही की लोक मूर्ख,पैशाने विकले जाणारे आडाणी इ.इ. लॉजिक सुरु होते.राजकारण व त्याला जोडून असलेले समाजकारण,पॉलिसी मेकींग यात आपल्याला काडीचाही 'से' नाही याचा राग सिस्टीमच कशी बोगस आहे हे सांगण्यात काढला जातो.देशाने काही प्रगती केलीच नाही,चीन बघा,अमुक बघा हा यांचा नेहमीचा ताल.देशाची जी काही प्रगती झाली आहे त्याचा सगळ्यात मोठा लाभार्थी हाच वर्ग आहे तरीही हे तुणतुणं वाजतचं राहतं.एक लक्षात घ्या,democracy is system of counting the heads,it is not efficient,but it is much better than cutting the heads.
'देश जगात महाशक्ती म्हणुन उदयास येणार की नाही'.>>> ही महाशक्ती नेमकी काय भानगड आहे मला कोणी समजावेल काय?

भारतीय लोकशाहीविषयी कुणाचे काय मत आहे ते मला माहीत नाही.पण माझे मत अगदीच स्पष्ट आहे.
राष्ट्रवादी,प्रखर राष्ट्रवादी,डावे,ऊजवे,मंडलवादी, कंमडलवादी,साम्यवादी,समाजवादी सर्वच्या सर्व हे सत्तावादीच आहेत,एकाच माळेचे मणी आहेत. यांच्यामध्ये गुणात्मक फरक असा फारसा काही दिसतच नाही.खुर्चीवर कुणी बसायचे यासाठी सारी स्पर्धा आहे.यांच्यामध्ये गुणात्मक बदल होणे गरजेचे आहे,एवढेच मला वाटते.
सत्तेवर कोण असावे या पेक्षा सत्ता कशी असावी यावर विचार होने गरजेचे आहे.
व्यवस्था परिवर्तन व्हायला पाहीजे असे जर कुणी मत मांडले तर तो व्यक्ती लोकशाहीविरोधी आणि हुकुमशाही समर्थक आहे असा अर्थ घेउन कांगावा करण्याचेही प्रयोजन दिसत नाही.

मग त्यांच्या तुलनेने आपण सज्जनच की.

आहोतच. म्हणून तर आशा आहे, की लोक भ्रष्टाचार कसा थांबवावा याबद्दल काहीतरी मार्ग शोधून काढतील. नि मग भारत महाशक्ति होईल.

जे खरेच सज्जन आहेत ते सुद्धा अधिक सज्जन कसे होता येईल यासाठी प्रयत्न करतात.
आपण तर इतरांच्या तुलनेने सज्जन आहोत. त्यातच समाधान मानायचे ?

आगाऊ अगदी बरोबर. ज्याना भारतातल्या लोकशाही बद्दल बोम्बलायचे असेल त्यानी आधी कॅ. शाम चव्हाण यांचे 'वॉलाँग' हे पुस्तक वाचावे मगच बत्तीशी उखळावी. अगदी अमेरिकेतल्या' भ्रष्टाचार निर्मूलन समितीच्या' ढुढ्ढाचार्यानी देखील!

अहो, इथे सगळे लोकशाही प्रेमीच आहे कोणीच लोकशाहीविरोधी नाही.
आणि इथे जे बोम्बलने,केकाटणे चालले ना ते लोकशाहीविरोधी नसुन लोकशाहीची ज्या महाभागांनी विटंबना चालविली त्यांच्या विरोधात.
आणि हो गोरगरिबांच्या जिवनात धड दोन वेळचे जेवन मिळ्ण्याची गरज आहे, पुस्तक कितिही चांगले असेल तरी उपाशी माणसाच्या नजरेत ते रद्दीमोलाचेच. पोट भरुन झाल्यावर पुस्तके वाचायची असतात,उपाशीपोटी नाही.

मुटेसाहेब मी तुमच्या इथल्या सगळ्या प्रतिक्रिया व माबोवरचे इतर बहुतेक लेख वाचले.तुम्ही ज्या प्रश्नांना वाचा फोडत आहात ते नवे नसले तरी अत्यंत महत्वाचे आहेत यात शंका नाही.पण प्रत्येकवेळा त्यावर चर्चा करताना त्या प्रश्नांचे विश्लेषण करायला तुम्ही राजी नसता असे जाणवते. केवळ हवेतली प्रचारकी वाक्ये टाकून कशात कात बदल होणार आहे? उदा. <<व्यवस्थेला चक्क कँसर झालाय. कँसरच्या रोग्याला पॅरॅसिटॉमल दिल्याने आपले तात्पुरते समाधान होते.आता या प्रस्थापित व्यवस्थेचे ऑपरेशनच व्हायला पाहीजे.आणि ते एक दिवस होणारच...... फक्त टाईमटेबलचा प्रश्न आहे.>> असल्या विधानांनी एक कॅथार्सिस होण्यापलीकडे अजून काही साध्य होते असे मला वाटत नाही.
आता कोणी उपाय सुचवले असता किंवा तुमची सर्वसाधारण प्रतिक्रिया- त्यांची चर्चा करण्यापेक्षा
<<याही पेक्षा वेगळा मार्ग निघायला हवा.>> ही असते.पण तो मार्ग कोणता यावर तुमचे मत कळत नाही.
<<सर्वच्या सर्व हे सत्तावादीच आहेत,एकाच माळेचे मणी आहेत. यांच्यामध्ये गुणात्मक फरक असा फारसा काही दिसतच नाही.खुर्चीवर कुणी बसायचे यासाठी सारी स्पर्धा आहे.यांच्यामध्ये गुणात्मक बदल होणे गरजेचे आहे,एवढेच मला वाटते.सत्तेवर कोण असावे या पेक्षा सत्ता कशी असावी यावर विचार होने गरजेचे आहे.>>> कोणत्याही शहराच्या 'सुशिक्षित' कट्ट्यावर बोलली जाणारी ही सिनीकल वाक्ये आहेत त्याने ना व्यवस्थेत बदल होतो ना लोकांमधे. सत्ताकारण हे लोकशाहीचे न टाळता येणारे वैशिष्ठ्य आहे ते 'घाण'तेवढे नको बाकी लोकशाहीत मिळणारी स्वातंत्र्ये हवीत असे कसे शक्य आहे?

आगाऊ साहेब,
तुम्ही अगदी सुरुवातीपासुन चर्चेत लक्ष घालुन आहात हे मी जाणतो. तुम्ही म्हणता हे बर्‍याच अंशी खरे आहे,दुमत नाही.पण माझी भुमीका आणि मर्यादा मी जाणुन आहे.म्हणुन त्यामर्यादेपलीकडे मी जाण्याचा प्रयत्नही करित नाही.
उघड्या डोळ्यांनी दिसणारे जनमानसाचे प्रश्न,व्यथा मी मांडू शकतो.आणि त्या कोणी नाकारीतही नाही.प्रश्न आहे त्यावर इलाज काय ? त्यावर जे इलाज मला दिसतात ते कुणी पटवुन घ्यायला तयार नाही.पटवुन घेतलेच तर त्यावर अमलबजावणी होण्याची शक्यता शुन्य.
मग काही विचारवंताकडुन उपाय सुचविले जातात त्याचे स्वरुप कॅन्सरच्या रोगावर पॅरॅसिटॉमलच्या गोळ्या खाव्यात याच स्वरुपाचे असते. इलाज सुचविण्यार्‍याला जरी कॅन्सरच्या रोगावर पॅरॅसिटॉमलच जालीम औषध आहे असा विश्वास असला तरी जर मला ते पटत नसेल तर मी का स्विकारावे?
म्हणुन मी समस्या मांडणे आणि इतरांचे लक्ष त्या समस्यांकडे वेधणे एवढेच करु शकतो.
यातुनच कधितरी,काहीतरी मार्ग निघेल ही आशा.
........

<< आधी अंडं की आधी कोंबडी ?
याला पण उत्तर आहे काय? >>
हा प्रश्न राहुनच गेला. काय आले असेल आधी.... आधी अंडं की आधी कोंबडी ?
माझ्याजवळ पण याविषयी एक तर्क आहे.
जाणकारांनी याबाबत उत्तरे किंवा तर्क द्यावेत.
अंदाज व्यक्त करायल्ला हरकत नाही.

आता शोधत बसायचे दिवस संपवायचे, आता दिवस आणायचे आपणच राज्यकर्ते व्हायचे... नाहीतर हे प्रश्न कधीच सुटणार नाही.
साधना जी , हे बरोबर आणि शक्य देखिल आहे, सगळेच राजकारणी गुंड ,एकसारखे आहेत असं म्हंणण, हे खूप चुकीचं आणि मागासलेपणाचं होईल ...अजुन ही काही सज्जन,प्रामाणिक आणि चारित्रवान नेते आपल्या महाराष्ट्रात नक्किच आहेत, त्यात राजु शेट्टी हे तर आदर्श आहेत ...म्हणुन त्यांनी म्हटलयं , "सज्जनांनो नेभळटपणा सोडा आणि राजकारणात या, तरच राजकारण्यांची ही "गटारगंगा" साफ होईल .."

लोकं या असल्या फालतु चर्चा करतील, पण "राजकारणासारखा" (मतदानासारखा) विषय म्हंटल की,लगेच नाक मुरडतील,या अश्या मुळेच तर सगळी वाट लागली आहे ...

अनिलजी,
राजकारणावर चर्चा करणे हा खरच त्रासाचा आणि वादाचा विषय आहे.कारण लोकशाहीत जगणार्‍या प्रत्येक माणसाचे स्वतःचे एक ठाम मत असते. आणि सहसा न बदलणारे असते.याशिवाय राजकारणाशी प्रत्येकाचे हितसंबधही गुंतले असु शकतात.
"राजकारणासारख्या" विषयावर "मायबोलीवर" चर्चा फारशी संयुक्तीक आणि उपयोगाची ठरेल असे मला वाटत नाही.
हे गणराज्य की धनराज्य ?

देशाच्या दुरावस्थेला जबाबदार कोण?

मुटे जी, मला वाटतं याला जनताच जबाबदार आहे ..प्रत्येक वेळी देशाचा विचार न करता, स्वःताचा विचार करणारी,जे चांगल आहे त्याला चांगल म्हणायच धाडस न दाखवणारी,संकुचीत विचारसरणी असणारी,प्रांतवादात अडकलेली वर आणि सगळं बदललं पहिजे असं नुसती बडबड करणारी जनता ..

Pages