मुळ्याचा चटका

Submitted by तृप्ती आवटी on 30 December, 2009 - 14:12
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
१५ मिनिटे
लागणारे जिन्नस: 

अर्धा मुळा, अर्धी वाटी भिजवलेली हरभरा डाळ, २ टे स्पून दही, ३-४ हिरव्या मिरच्या, कोथिंबीर, मीठ, फोडणीसाठी- १ टे स्पून तेल, हिंग, हळद, मोहरी.

क्रमवार पाककृती: 

मुळा किसुन घ्यावा. ह. डाळ, मिरच्या एकत्र जरा भरड वाटुन घ्यावे. हिंग/हळद/मोहोरीची फोडणी करावी. मुळ्यातले पाणी घट्ट पिळुन त्यात वाटलेली डाळ, दही, फोडणी, चवीप्रमाणे मीठ, बारीक चिरलेली कोथिंबीर घालुन नीट मिसळुन घ्यावे. आवडत असल्यास चिमुटभर साखर घालावी. आमटी/भात किंवा पोळी बरोबर खावे Happy

वाढणी/प्रमाण: 
चार मोठे (इतर भाज्या/आमट्या जेवणात असतील तर)
अधिक टिपा: 

_दही आवडत नसल्यास लिंबाचा रस घालावा.
_मुळ्याच्या कोशिंबीरीच्या इतर कृती इथे आहेत.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सिंडी मस्तच आहे,ही कृती ,
माझी पण एक कृती,
घट्ट दह्यात, मुळ्याचा किस,दाण्याच कुट्,चवीप्रमाणे मीठ साखर घालुन ठेवाव, दोन मिरचा गॅस वर भाजुन नंतर मिठ लाऊन चुरडुन टाकाव्यात, तुपाची जिर घालुन फोडणी (हळद,तिखट न घालता )घालायची वरन आणि मस्त पैकी मिक्स करायच , नंतर कोथींबीर घालायची, भाजुन चुरडलेल्या मिरची चा स्वाद मस्त लागतो, फोडणी ऑप्शनल आहे, घातली नाही तरी छान लागतो चटका.

मस्त Happy

आश्वे Proud खरच ग खरच !!
तरी कोकणातल्या घरी आजी चुलीवर मिरच्या भाजायची तो स्वाद अजुन आठवतोय