फणसाची भाजी

Submitted by सायो on 29 October, 2009 - 13:36
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

Chaokoh ब्रँडचा फणसाचा एक कॅन, भिजवलेली चवळी-अर्धी ते एक वाटी, हिंग, हळद, मोहरी, कढिपत्ता, लाल तिखट, मीठ, गूळ- चवीप्रमाणे, खवलेलं ओलं खोबरं, कोथिंबीर- अर्धी वाटी, सुक्या लाल मिरच्या.

क्रमवार पाककृती: 

कॅनमधून फणस काढून त्याचे चौकोनी तुकडे करावेत. कुकरच्या भांड्यात हे तुकडे , भिजवलेली चवळी घालून थोडे पाणी घालून कुकरला ३ शिट्ट्या करुन घ्याव्यात.
पातेल्यात तेलाची मोहरी, हिंग, हळद, कढिपत्ता घालून फोडणी करुन घ्यावी. त्यावर शिजवलेला फणस, चवळी घालून झाकण घालून एक वाफ काढावी. नंतर त्यात गूळ, लाल तिखट, मीठ घालून नीट मिक्स करावे. वर तेलाची लाल सुक्या मिरच्यांची फोडणी घालावी. वाढताना खोबरं, कोथिंबीर घालून वाढावं.

वाढणी/प्रमाण: 
३ ते ४ जणं
अधिक टिपा: 

चाओको ब्रँडचे २ कॅन इं.ग्रो. च्या दुकानात मिळतात. त्यातला हिरवा कॅन घ्यावा.

माहितीचा स्रोत: 
आई
पाककृती प्रकार: 
प्रादेशिक: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

माझ्या आईच्या कानावर घातलं पाहिजे की फणसाला शाकाहारी मटण म्हणतात ते. बहुतेक भाजी करणं, खाणं सोडून देईल. Wink

मस्त कृती. यात आमच्याकडे बदल म्हणजे चवळीऐवजी शेंगदाणे. ओला नारळ, कोथिंबीर हवीच. आणि थोडी कोरडी करायची. बाकी कृती सायोच्या कृतीप्रमाणेच. आलं, लसूण वगैरे 'मटण वाटण' नाही Happy

कोणी चिरून दिला, तरच केली जाते मात्र Wink

बीने विचारलं म्हणून परतून करायच्या भाजीची कृती सविस्तर लिहीत आहे :

कॅन्ड फणस वर लिहिल्याप्रमाणे कुकरमधे उकडून घ्यायचा. कॅन्ड फोडी मोठ्या असतात म्हणून थोड्या बारीक करून घ्यायच्या. आर्चने सांगितल्याप्रमाणे त्या थोड्या चेचायच्या म्हणजे आठळ्या सुट्या होतात. नेहमीप्रमाणे तेलात मोहरी, हिंग, हळद (आवडत असल्यास जिरं) घालून फोडणी करायची. त्यात उडदाची डाळ आणि सुकी लाल मिरची घालायची. डाळ तांबूस झाली की फणसाच्या फोडी घालून परतायचं. चवीप्रमाणे मीठ आणि (आधी मिरची घालूनसुद्धा शिवाय लागलं तर) लाल तिखट घालायचं. खोबरं आणि कोथिंबीर घालायची. चांगली परतून झाकण ठेवून एखादी वाफ आणायची. फणस शिजलेलाच असल्यामुळे जास्त वेळ लागत नाही. मिळून आली की झाली भाजी.

फणस चिरण खरच जिकरीच काम.. पण त्यात माझ्या आईची आयडीया.. फणसाच्या विळीला तेल लाउन मोठ्या मोठ्या फोडी कापायच्या.. त्या फोडी कुकरला लावायच्या आणि मग शिजलेल्या फणसाच्या मोठ्या फोडींची साल काढणे आणि मग त्याचे छोटे तुकडे करण खूपच सोप जात..
सासरी हि पद्धत चालत नाही.. कारण तशी साल काढताना थोडा फणस पण वाया जातो न Wink

सासरी हरभरे, पावटे किंवा शेंगदाणे घालुन फणसाची भाजी करतात.. कृती सायो सारखीच..
मला मात्र काही न टाकताच आवडते. भरपूर तेल, लाल मिरच्यांची फोडणी आणि खोबर मस्ट.

त्याला नीरफणस (भारतात विलायती फणस म्हणून मिळतो कधीकधी) म्हणतात माझ्या माहितीनुसार. त्यात चिरायच्या खटपटीच्या मानाने विशेष काही निघत नाही असं ऐकून आहे.

(मग तो कोण विकत घेतं आणि त्याचं काय करतात हे मला माहीत नाही.) Happy

इथे फोटो सापडला.

या फणसाची भाजी मी हल्लीच लिहिली होती. फणसाची कुयरी ( म्हणजे छोटा फणस ) छोटेखानीच बघून आणावी. तीन ते चार इंच व्यास आणि आठ ते दहा इंच लांबी. हा अख्खा फणस न कापता कूकरमधे ठेवायचा व प्रेशर आले कि दहा ते पंधरा मिनिटे शिजवायचा. नंतर थंड झाल्यावर कापायचा. अजिबात त्रास होत नाही कापायचा.

इथे दुरियन आणि फणस दोन्ही मिळतात आणि दोन्ही सारखे दिसतात म्हणून माझा नेहमी गोंधळ होतो की हा फणस की दुरियन. इथे झाडेही किती दिसतात फणसाची!!!!!!! घरापाठीच आहे एक झाड आणि वर स्वातीनी जसे दाखवले आहे चित्रात तशीच फळेही आलेली आहेत.

दुरियनचे काटे टोकदार असतात तसेच ते फळ आकाराने मोठे असते. विलायती फणसाचे काटे बोथट असतात आणि ते फळ आकाराने छोटे असते. दुरियनची पाने छोटी असतात, आणि विलायती फणसाची फुटभर लांबरुंद असतात ( त्यांचा असा एक खास आकार असतो ) माझ्या माहितीप्रमाणे कुठल्याही सार्वजनिक वाहनातून दूरियन नेता येत नाही, तसे काही विलायती फणसाबाबत नाही.

Pages