हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुराष्ट्र आणि स्वातंत्र्यवीर सावरकर !

Submitted by विशाल कुलकर्णी on 12 October, 2009 - 07:16

स्वा. सावरकरांचे आजवर वाचलेले साहित्य, आंतरजालावर उपलब्ध माहिती आणि इतरही काही संदर्भ वापरुन हा लेख संकलीत केला होता. अर्थात त्यामुळे हा लेख मी लिहीलाय असे म्हणता येइल की नाही कुणास ठाऊक. पण स्वातंत्र्यवीरांचे विचार संकलित करण्याची मेहनत मी जरुर घेतली आहे. हा लेख माबोच्या दिवाळी अंकासाठीदेखील पाठवला होता. पण कुठल्याशा कारणाने (नियमात बसत नसल्याने असेल कदाचित) तो तिथुन साभार परत आला. तेव्हा तो इथे टाकत आहे. धन्यवाद.

..............................................................................................................................................

"आसिंधु सिंधु पर्यन्ता, यस्य भारतभूमिका ।
पितृभू: पुण्यभूश्चैव स वै हिंदुरिति स्मृत: I I "

सिंधुस्थान ही ज्याची केवळ पितृभूमी नव्हे, तर पुण्यभूमीही आहे तो हिंदू! सिंधुपासुन सिंधुपर्यंत, अर्थात सिंधुनदीपासुन ते सिंधु म्हणजे सागरापर्यंत पसरलेली ही भुमी म्हणजे हिंदुभुमी आहे आणि प्रत्येक व्यक्ती ,जो कुणी या भुमीला केवळ आपली पितृभुमीच नव्हे तर पुण्यभुमीही मानतो तो हिंदु!मग तो कुठल्याही जाती धर्माचा असेना का! मुळात हिंदु हा केवळ एक धर्म नाहीच आहे, तर ती एक जिवनप्रणाली आहे. 'हिंदुधर्म' हे नाव कोणत्याही एका विशिष्ट धर्माचे वा पंथाचे विशेष नि अनन्य नाव नसून ज्या अनेक धर्मांची नि पंथांची ही भारतभूमी हीच पितृभूमी नि पुण्यभूमी आहे त्या सार्‍यांना समावेशिणार्‍या धर्मसंघाचे हिंदुधर्म हे सामुदायिक अभिधान आहे.!

हे आमचे एकजीवन आज ज्या एकाच शब्दात नवीन व्याख्येप्रमाणे व्यक्तविता येते तो अनन्य शब्द आहे 'हिंदू' ! या शब्दाच्या 'हिंदू' या दोन अक्षरांत अगस्तीच्या अंजलीत महासागर तसे तीस कोटी लोकांचे राष्ट्रचे राष्ट्र सामावलेले आहे.किती सार्थ आणि योग्य शब्दात स्वातंत्र्यवीर सावरकरांनी हिंदु या शब्दाची महती, त्याचा योग्य अर्थ सांगितला आहे. हिंदु या संकल्पनेची व्यापकता, तिचा विस्तार केवढ्या समर्पक शब्दात मांडले गेल आहे इथे.

स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या मते आपल्या वंशाच्या मूळ पुरुषांनी आपल्या राष्ट्राला व आपल्या लोकांना देण्याकरिता जे पहिले आणि जवळ जवळ पाळण्यातले नाव निवडले ते सप्तसिंधू अथवा हप्त हिंधू आहे. सिधु नदीच्या समृद्ध खोर्‍यात राहणारे ते सिंधू. आणि इतर जगातील जवळ जवळ सर्व राष्ट्रे आपणांस ह्याच सिंधू किंवा हिंदू याच नावाने ओळखत असत. बर्‍याचदा असे म्हणले जाते की हिंदु हे नाव किंवा हा शब्द आपल्याला अरबांकडुन मिळाला. पण सावरकरांच्या मते हिंदू हा शब्द आपणांस अरबांनी दिलेला नाही. प्रेषित महंमदाच्या जन्मापूर्वी, नव्हे अरब हे एक 'लोक' म्हणून ओळखले जाण्यापूर्वीदेखील हे प्राचीन राष्ट्र आपणांकडून व इतरांकडून सिंधू वा हिंदू ह्या स्वाभिमानी नावाने ओळखले जात होते. अरबांनी सिंधू नदीचा शोध लावला हे म्हणणे जितके खरे तितके अरबांनी ह्या शब्दाचा शोध लावला हे म्हणणे आहे

हिंदुत्व, हिंदुधर्म, हिंदुजगत्

हिंदू चळवळीची विचारप्रणाली समजण्याकरिता ह्या तीन शब्दांचा अर्थ नीट समजावून घेणे अत्यावश्यक आहे. हिंदू या शब्दापासून इंग्रजीमध्ये 'हिंदुइझम' (हिंदुधर्म) हा शब्द बनविला आहे. त्याचा अर्थ हिंदू लोक ज्या धर्ममतांना वा मार्गांना अनुसरतात ती धर्ममते वा मार्ग. दुसरा शब्द हिंदुत्व हा त्यापेक्षा अधिक संग्राहक शब्द आहे. हिंदुधर्म ह्या शब्दाप्रमाणे हिंदूंच्या केवळ धार्मिक अंगाचा त्यात समावेश होत नसून त्यात हिंदूंच्या सांस्कृतिक, भाषिक, सामाजिक व राजकीय अंगांचाही समावेश होतो. 'Hindu Polity' ह्या इंग्रजी शब्दाशी तो जवळ जवळ समानार्थी शब्द आहे. त्याचे जवळ जवळ तंतोतंत भाषांतर Hinduness ह्या शब्दाने करता येईल. हिंदू जगत् Hindudom ह्या तिसर्‍या शब्दाचा अर्थ संकलितपणे हिंदू म्हणून संबोधिले जाणारे सर्व लोक. ज्याप्रमाणे इस्लामने मुसलमानी जगताचा किंवा ख्रिश्चनडम ह्या शब्दाने ख्रिस्ती जगताचा बोध होतो त्याप्रमाणे ह्या शब्दाने हिंदुजगताचा सामुदायिक बोध होतो.

स्वातंत्र्यवीर अगदी ठामपणे प्रतिपादन करतात की हिंदुत्व हा केवळ एक शब्द नव्हे, तर तो इतिहास आहे. ते मनापासुन समग्र हिंदु बांधवाना आवाहन करतात की अग्निहोत्री ब्राह्मण ज्याप्रमाणे यज्ञकुंडात अग्नी प्रज्वलित ठेवतो त्याप्रमाणे तुम्ही हिंदुत्वाच्या भावनेचे स्फुल्लिंग जतन करुन ठेवा. योग्य वेळ येताच त्याला फुंकर घालून भरतखंडभर हिंदुत्वाचा डोंब उसळून दिला की काश्मीरपासून कन्याकुमारीपर्यंत हिंदुत्वाच्या भावनेने जनता भारली जाईल

हिंदुत्व का हवे? त्याचा आपल्याला काय फायदा होवु शकेल हे विषद करताना स्वातंत्र्यवीर सावरकर सांगतात कीं असा एक दिवस जरुर उगवेल किं समग्र मनुष्यजातीस ह्या शक्तीस (हिंदुत्व) तोंड द्यावे लागेल .हिंदुस्थानाला पितृभूमी व पुण्यभूमी मानणारे, असा इतिहास असणारे व समान रक्त व संस्कृती ह्यांनी बांधलेले कोट्यावधी लोक सर्व जगाला आपले म्हणणे अधिकारवाणीने सांगू शकतील. स्वातंत्र्यवीर एका आंतरिक अभिमानाने सांगतात की ज्यावेळी हिंदू लोक जगाला काही सांगण्याच्या स्थितीत असतात तेव्हा त्यांचे सांगणे गीतेच्या वा बुध्दाच्या उपदेशाहून फार वेगळे असत नाही हेही तितकेच खरे आहे. हिंदू जेव्हा हिंदू राहत नाही तेव्हा तो अत्यंत उत्कटपणे हिंदू असतो व शंकराप्रमाणे सर्व पृथ्वी वाराणसी मानतो. वाराणसी मेदिनी ! मानतो किंवा तुकारामाप्रमाणे 'आमुचा स्वदेश ! भुवनत्रयामध्ये वास ! ' असे उद्गारतो. हे बंधूंनो ! विश्वाच्या मर्यादा - तेथे माझ्या देशाच्या सीमा आहेत !

हिंदुस्थानात सुखाने नांदत असणार्‍या अनेक - नानाविध धर्मांविषयी बोलताना सावरकरांचा कंठ भरुन येत असे. त्यावेळी त्यांच्या चेहर्‍यावर एक अलौकीक असे तेज, एक समाधान पाहायला मिळे. विश्व हिंदु परिषदेच्या एका सभेत बोलताना स्वातंत्र्यवीर म्हणाले होते.

"बहुसंख्य हिंदूंच्या धर्माला सनातन धर्म किंवा श्रुति-स्मृति-पुराणोक्त धर्म अथवा वैदिक धर्म ह्या प्राचीन व मान्य संज्ञांनी संबोधिता येते. इतर हिंदूंच्या धर्मांना त्यांच्या त्यांच्या मान्य नावांनी जसे शीख धर्म किंवा आर्यधर्म किंवा जैन धर्म किंवा बुध्द धर्म संबोधिता येईल. जेव्हा ह्या सर्व धर्मांना एकत्रित नाव देण्याची आवश्यकता येईल तेव्हा हिंदुधर्म असे व्यापक नाव देणे उचित होईल. ह्यामुळे अर्थहानी होणार नाहीच, परंतु तो अधिक अचूक व नि:संदिग्ध होईल व आपल्या लहान समाजातील संशय व मोठया समाजातील राग दूर करुन आपला समान वंश व समान संस्कृती दर्शविणार्‍या आपल्या प्राचीन ध्वजाखाली पुन्हा एकदा सर्व हिंदूंना एकत्र करील..

इतर धर्मांप्रमाणे (उदा. मुस्लिम - कुराण, ईसाई- बायबल) हिंदुधर्माचे एक धर्मपुस्तक नाही हे चांगलेच आहे. कारण यामुळे आपला धर्मविकास थांबला नाही. आमचे धर्मतत्वही कोणत्या पुस्तकाच्या दोन पुठ्ठयात सामावू शकणार नाही. ह्या विश्वाच्या दोन पुठ्ठयांमध्ये जितके सत्य नि ज्ञान विस्तृत पसरलेले आहे तितके आमचे धर्मपुस्तक विस्तृत होईल.

हिंदुधर्म क्लैब्याची गाथा नाही. हिंदुधर्म नि:संशय सात्विक, क्षमाशील आहे. हिंदुधर्म क्रोधशीलही आहे. 'क्लैब्यं मा स्म गम: पार्थ' ही हिंदुधर्माची गर्जना आहे. 'अहिंसा परम धर्म:' ही ज्या हिंदुधर्माची व्याख्या आहे त्याच हिंदुधर्माची अगत्याची व तेजस्वी आज्ञा आहे की 'आततायिनमायान्तं हन्यादेवाविचारयन्' आणि त्या दोन्ही आज्ञांचा समन्वय, हिंदुधर्मच उत्तम प्रकारे लावू शकतो काही झाले तरी बुध्दिवादाच्या दृष्टीनेही एकंदरीत पाहता धर्मांत ग्राह्यतम धर्म असेल तर तो हिंदुधर्म होय !"

आपल्या हिंदुत्वाच्या कल्पनेबाबतीत सावरकर अतिशय स्पष्ट आहेत. योग्य ते बदल स्विकारण्याची त्यांची तयारी आहे. त्यासाठी प्रसंगी आपली रुढी-परंपरा यांच्या चौकटी मोडायला देखील ते तयार असत हे त्यांच्या आचार विचारातुन ठामपणे स्पष्ट होत असे. रत्नागिरीतील पतित पावन मंदीर हे याचे स्पष्ट उदाहरण आहे. मानवाच्या, मानव्याच्या भल्यासाठी आपल्या रुढी परंपरा मोडायची, चौकटी तोडायची त्यांची नेहेमीच तयारी असे. धर्म आणि राष्ट्रधर्म या संकल्पना स्पष्ट करताना सावरकर सांगतात किं हिंदीधर्म हा कुठल्याही रुढी परंपरांमध्ये, तथाकथीत चौकटीत अडकुन राहणारा नाही. बदलत्या समाजाला पोषक होइल अशा पद्धतीने आपले स्वरुप बदलत राहणे हा हिंदुधर्माचा स्वभावच आहे. पण फक्त तुम्ही आमच्याकडुनच जर बदलण्याची अपेक्षा करत असाल तर ते सर्वस्वी चुकीचे आहे. जर मुस्लिम , ख्रिश्चन वा इतर बांधव त्यांची मुसलमानत्व, ख्रिश्चनत्व इत्यादी 'त्वे' सोडीत असतील तर माझे हिंदुत्वही मानुषकेत विलय पावेल.
अगदी याच पद्धतीने माझे राष्ट्रीयत्वही - हिंदीपणही मानवराष्ट्रात तेव्हा विलय पावेल जेव्हा इंग्लिशपण, जर्मनपण इत्यादीपणा लुप्त होऊन फक्त मानवता, मनुष्यपणा तेवढा जगात, मनुष्यमात्रात सुखेनैव नांदू लागेल ! आज देखील जो खरा मनुष्यवादी (humanitarian) असेल त्याच्यापुरते त्याच्याशी देखील मी सर्व भेदभाव सोडून वागेन.

स्वातंत्रवीर सावरकरांनी भविष्यकाळाचाही विचार करुन ठेवलेला आहे. ते म्हणतात कि एखाद्या भविष्यकाळी हिंदू हा शब्द केवळ हिंदुस्थानचा नागरिक वाचक होऊ शकेल. जेव्हा सर्व सांस्कृतिक व धार्मिक दुराग्रह आक्रमक गर्विष्ठपणाशी वचनबध्द असलेल्या शक्तीचे विसर्जन करतील व धर्म 'वाद' म्हणून न राहता ज्या समान पायावर मानवी राज्य ऐश्वर्याने व दृढपणे उभे राहील अशा पायाच्या मुळाशी असलेल्या चिरंतन तत्वांचा केवळ समान संचय म्हणून राहतील, तेव्हा हा दिवस उगवेल. भक्तिभावाने इच्छा करावी अशा ह्या सिध्दीची पहिली रेखासुध्दा क्षितिजावर दिसत नसताना कठोर वस्तुस्थितीकडे दुर्लक्ष करणे मूर्खपणाचे ठरेल. जोपर्यंत धोकादायक युध्दघोषणांकडे झुकणार्‍या मतांचा त्याग इतर प्रत्येक वादाने केलेला नाही तोपर्यंत एकजीवता व सामर्थ्य निर्माण करणारी बंधने विशेषत: समान नाव व समान ध्वज ही बंधने शिथिल करणे कोणत्याही सांस्कृतिक वा राष्ट्रीय एकांकाला परवडणार नाही.

"हिंदुस्थान" या नावाबद्दल स्वातंत्र्यवीर सावरकरांना अतिव आदर, अभिमान होता. ते अभिमानाने सांगत की आपल्या देशाचे सर्वात प्राचीन नाव, ज्याविषयी आपणापाशी आधार आहे, ते सप्तसिंधू वा सिंधू आहे. भारतवर्ष हे नावसुध्दा नंतरचे अभिधान आहे. आणि त्याचे आवाहन व्यक्तिविषयक आहे. मनुष्य कितीही महान् असो, जसजसा काळ जातो तसतसा त्याचा गौरव कमी कमी होत जातो.संस्कृतमधील सिंधू शब्दाने सिंधू नदीचाच नव्हे तर समुद्राचाही ,दक्षिण द्वीपकल्पाला परिवेष्टणार्‍या समुद्ररशनेचा बोध होत असल्यामुळे हा एक शब्द आपल्या देशाच्या जवळ जवळ सर्व सीमा दर्शवितो. हिंदुस्थान ह्या शब्दाने मुख्य राजकीय व सांस्कृतिक विधेय जितके वक्तृत्वपूर्णपणे प्रकट होते तितके आर्यावर्त, दक्षिणापथ, जंबुद्वीप आणि भारतवर्ष ह्या शब्दांनी होऊ शकत नव्हते.

आपल्या या पितृभुमीबद्दल सावरकर अतिव श्रद्धेने, आदराने स्पष्ट करतात की हिंदुस्थान आमची पितृभुमीच नव्हे तर पुण्यभूमी आहे. ही परम पावन भारतभूमी, हे सिंधुस्थान, सिंधूपासून सिंधूपर्यंतची ही भूमी आमची पुण्यभूमी आहे. ह्या भूमीत आमच्या धर्मविचारांच्या संस्थापकांना व ऋषींना वेदांचा साक्षात्कार झाला; वैदिक ऋषींपासून ते दयानंदापर्यंत, जिनापासून महावीरापर्यंत, बुध्दापासून नागसेनापर्यंत, नानकापासून गोविंदापर्यंत, बंदापासून बसवापर्यंत, चक्रधरापासून चैतन्यापर्यंत, रामदासापासून राममोहनापर्यंत आमच्या गुरुंनी व धार्मिक पुरुषांनी जन्म घेतला व ते वाढले. तिच्या मार्गातील धुळीत आमच्या प्रेषितांचे व गुरुंचे पदरव ऐकू येतात. तिच्या नद्या व तिची उपवने पवित्र आहेत. कारण चंद्रप्रकाशात त्यांच्या घाटावर किंवा सायंकाळच्या छायेत बुध्दाने किंवा शंकराने जीवन, मनुष्य, आत्मा, ईश्वर, ब्रह्म आणि माया ह्यांच्या गहन प्रश्नांवर वाद व चर्चा केली. प्रत्येक डोंगर व प्रत्येक वृक्षाच्छादित खोरे कपिलाच्या, व्यासाच्या, शंकराच्या व रामदासाच्या स्मृतीने भरलेले आहे. येथे भगीरथ राज्य करतो, येथे कुरुक्षेत्र आहे. वनवासाला जाताना रामचंद्राने पहिला विश्राम येथेच घेतला. तेथेच जानकीने सोनेरी हरिण पाहिला व त्याला मारण्याचा आपल्या प्रियकराशी प्रेमाने हट्ट घरला. ज्या बासरीने गोकुळातील प्रत्येक हृदय मोहनिद्रेत असल्याप्रमाणे एका लयीत नाचू लागेल अशी बासरी त्या दैवी गुराख्याने वाजविली. येथे बोधिवृक्ष आहे व येथे मृगवन आहे. येथेच महावीराला निर्वाण प्राप्त झाले. येथेच भक्तांच्या मेळाव्यात बसून 'गगन थाल रविचंद्र दीपक बने' ही नानकाने आपली आरती म्हटली. येथे गोपीचंद राजाने गोपीचंदजोगी होण्याची प्रतिज्ञा केली व भिक्षापात्र घेऊन मूठभर भिक्षेकरिता आपल्या बहिणीचे दार ठोठावले. येथेच हिंदू म्हणून मरण्याच्या अपराधाकरिता बंदा बहादुराच्या मुलाचे वडिलांच्या डोळयांसमोर तुकडे तुकडे करण्यात येऊन त्याचे हृदय वडीलांच्या तोंडात कोंबण्यात आले. येथील प्रत्येक दगड हौतात्म्याची कथा सांगू शकेल. हे माते ! तुझ्या भूमीचा प्रत्येक तसू यज्ञभूमी आहे. जेथे कृष्णसार सापडले तेथेच नव्हे तर काश्मीर ते सिंहल ही ज्ञानयज्ञाने पवित्र झालेली यज्ञीयभूमी आहे. म्हणून प्रत्येक हिंदूला, मग तो साधू असो वा संताळ ही भारतभूमी, हे हिंदुस्थान पितृभू आणि पुण्यभू आहे.

आपली हिंदुत्वाची व्यापक संकल्पना मांडल्यावर ते ठामपणे सांगतात की हिंदुस्थान हा हिंदूंचाच देश आहे. वस्तुत: जो समाज देशात बहुसंख्य असतो त्यांचाच तो देश मानला जाण्याची प्रथा सर्व जगात आहे. या नात्याने तर हिंदुस्थान हिंदूंचा आहेच; पण त्याशिवायही तो हिंदूंचा असल्याचे आणखी एक निश्चित गमक सांगता येईल. ते म्हणजे हिंदुस्थानच्या उध्दाराचा प्रयत्न कोणी केला ते पाहणे, हे होय. या देशाच्या स्वातंत्र्याच्या १८५७ पासून सुरु झालेल्या लढयात कोणी खरा त्याग केला ? - हिंदूंनी का मुसलमानांनी ?

ते पुढे स्पष्ट करतात की हिंदुस्थान ह्या नावाने अहिंदू बांधवांची मानहानी होत नाही, काही नुकसान होत नाही. चीनमध्ये कोटयावधी मुसलमान आहेत. ग्रीस, पॅलेस्टाईन इतकेच काय पण हंगेरी, पोलंडमध्येही त्यांच्या राष्ट्रघटकांत हजारो मुसलमान आहेत पण तेथे ते अल्पसंख्य, केवळ एक जाती आहेत. आणि त्या देशांना त्यांतील मोठया बहुसंख्येने असलेल्या वंशाची वसाहतस्थाने म्हणून रुढ असलेली प्राचीन नावे बदलण्यासाठी तेथे कोणी अल्पसंख्य जातीच्या अस्तित्वाचे कारण पुढे करीत नाही. तेथील मुसलमानांनी ही नावे विकृत केली नाहीत वा करण्यास धजले नाहीत. प्रसंग येताच पोलिश मुसलमान, ग्रीक मुसलमान , किंवा चिनी मुसलमान अशा नावांनी संबोधिले जाण्यात समाधान मानतात. त्याचप्रमाणे आपल्या मुसलमान देशबंधूंनी राष्ट्रीय किंवा प्रादेशिक दृष्टया आपला निर्देश करताना हिंदुस्थानी मुसलमान म्हणून करावा. तसे करण्यात त्यांच्या धार्मिक वा सांस्कृतिक स्वतंत्र अस्तित्वास बाधा येत नाही.

हिंदुस्थान ह्या आपल्या मातृभूमीच्या रुढ नावाने ऋग्वेद काळातील सिंधूपासून आपल्या पिढीतील हिंदू शब्दापर्यंत जी अखंड परंपरा व्यक्त होते तिचा उच्छेद वा तिच्याशी प्रतारणा हिंदूंनी करु नये. जर्मनांचा देश जसा जर्मनी, इंग्रजांचा इंग्लंड, तुर्कांचा तुर्कस्थान नि अफगाणांचा अफगाणिस्थान, त्याचप्रमाणे हिंदूंचा देश म्हणून हिंदुस्थान ह्या नावानेच आपले स्थान जगाच्या नकाशात चिरंतन खोदून ठेविले पाहिजे

आपल्या साहित्यातुन स्वातंत्र्यवीर सावरकरांनी "राष्ट्र आणि हिंदुराष्ट्र" याबद्दलचे आपले विचारही खुप समर्पकपणे आणि पर्खडपणे मांडले आहेत. ते म्हणतात....

"जगातील मानवांनी एक व्हावे हीच आमची सदिच्छा आहे. जगातील मानवांनी एक होऊन त्यांचे एक मानवी राष्ट्र व्हावे असे आम्हांसही वाटते. आमचा वेदान्त तर याही पुढे जाऊन दगड नि मनुष्य हे सारखेच असल्याचे सांगतो. पण आपण परिस्थितीनुरुप व्यवहार केला पाहिजे. राष्ट्रवाद कालबाह्य नाही ,राष्ट्रवाद पाचशे वर्षे तरी जिवंत राहणार आहे. त्यानंतर काय होईल ते सांगता येत नाही. त्यानंतर पृथ्वी एक राष्ट्र होऊन मंगळ हे दुसरे राष्ट्र होईल. सिंधू ह्या शब्दाने व्यक्त होणारी कल्पना राष्ट्रवाचक आहे, केवळ भौगोलिक नाही

'हिंदू'शब्द मूलत: देशवाचक, राष्ट्रवाचक आहे. याचे मुख्य अधिष्ठान आसिंधु सिंधू अशी ही भारतभूमिका आहे. 'आसिंधु सिंधू' अशा त्या भारतभूमिकेत अत्यंत प्राचीन काळापासून ज्यांचे पूर्वज परंपरेने निवसत आले, ज्या राष्ट्रात प्रचलित असलेली सांघिक संस्कृती, घडलेला इतिहास, बोललेल्या भाषा, अनुसरलेले धर्म; ज्यांचे संस्कृती, इतिहास, भाषा, धर्म आहेत ते सारे हिंदु होत. त्या हिंदुराष्ट्राचे घटक होत. -

हिंदू हे केवळ एक राष्ट्र नसून ती एक जाती आहे. उत्पत्ती करणे ह्या अर्थाच्या जन धातूपासून जाती हा शब्द सिध्द झाला असून त्याचा अर्थ बंधुभाव, समान रक्त अंगात खेळत असलेला, एक उगम असलेला वंश असा होतो सप्तसिंधूतील लोक जसजसे हिंदुस्थानभर पसरत गेले तसतसे त्यांच्यात विविध वंशाचे मिश्रण, अनुलोम-प्रतिलोम विवाह इत्यादीमुळे झाले. जाती हा शब्द ह्या अर्थी वापरलेला आहे.राष्ट्रीय व वांशिक दृष्टिकोनातून पाहिले तर आपली तीर्थे सर्व हिंदू जातीचा समान वारसा आहे आपले सण, उत्सव, संस्कार व आचार समान असहेत. हिंदु कोठेही असो मग तो शीख, जैन, ब्राह्मण वा पंचम असे तो दसरा, दिवाळी, रक्षाबंधन आणि होळी ह्यांचे स्वागत करतो.ज्या तीर्थांचे, पर्वतांचे, नगरांचे व नद्यांचे स्मरण हिंदू करतात ती कोणाही एक प्रांतातील नाहीत. तर ती अखिल हिंदुस्थानातील आहेत.शीखांचे अमृतसर, वैदिकांची काशी, बौध्दांची गया ही सारी आम्ही हिंदूंची सामायिक नि सारखीच पुण्यक्षेत्रे होत कलाकृती वा वास्तू, मग त्या वैदिक वा अवैदिक विचारांच्या प्रतिनिधी असोत, आपल्या वंशाचा समान वारसा आहे हिंदू निर्बंध व त्यांची आधारभूत तत्वे ह्यांतील तपशिलांत वा आदेशांत काही ठिकाणी परस्पर विरोध भासत असले तरी त्यांचा इतका एकावयवी विकास झालेला आहे की काल व देश ह्या स्थितीतून ही त्यांची वैशिष्टये टिकून राहिली आहेत

हिंदु धर्मामधील विविध समाजरचना, तसेच वैचित्र्यांबद्दल बोलताना ते विशद करतात......

कोणताही समाज वा राष्ट्र एकजीव होऊन जे जगते आणि त्यांच्याव्यतिरिक्त एतर समाजांशी होणार्‍या संघर्षातुनही तग धरते त्या लोकांमध्ये आपसात वैषम्य असे मुळीच नसते म्हणून नव्हे. कारण कुटुंब म्हटले की कुटुंबात व्यक्तिवैचित्र्य नि मतभिन्नता असतेच. मग कोटी कोटी व्यक्तींच्या एकजीवी समाजाची वा राष्ट्राची गोष्टच बोलणे नको. एका साच्यात पाडलेल्या गणपतीच्या मूर्तीप्रमाणे त्या कोटी कोटी व्यक्ती एकसाची असणे अशक्यच. परंतु त्या समाजातील पक्षोपक्षांची ही अंतर्गत विषमता इतर कोणत्याही समाजाशी असलेल्या त्यांच्या विषमतेहून अगदी कमी असते. आणि त्या समाजातील अनेक पक्षांना एकजीव करणारी महत्वाची बंधने दुसर्‍या समाजाशी असणार्‍या त्यांच्या संबंधांपेक्षा आत्यंतिक आकर्षक नि बळकट असतात म्हणून ते समाज वा राष्ट्र तसे पृथक नि एकजीव राहू शकते.

हिंदुराष्ट्रातील विविध विभागांचे परस्पर धोरण काय असावे ? यावरही सावरकरांची मते खुप उद्बोधक आणि क्रांतिकारक आहेत.

संख्येचे, भौगोलिक किंवा वांशिक लाभ निसर्गत: व ऐतिहासिक दृष्टया ज्यांना लाभलेले नाहीत असे लोक इतरांबरोबर देवाण घेवाण करण्याचे प्रयत्न करीत आहेत. जन्मसिध्द अधिकारांनी प्राप्त झालेले लाभ ज्यांना माहीत नाहीत व त्याहूनही वाईट म्हणजे त्यांचाच तिरस्कार करतात अशांचा सत्यानाश होवो ! कागदाच्या कपटयांतून किंवा अडचणीत उत्पन्न झालेल्या बंधंनांनी नव्हे तर रक्ताच्या, जातीच्या, संस्कृतीच्या बंधनांनी झालेल्या प्राचीन, नैसर्गिक व एकजीवी एकीकरणापासून फुटणे व त्यालाच नाशिणे हे तुमच्यापैकी जैन समाजी, सनातनी , शीख वा कोणत्याही उपविभागाला परवडणार आहे का? असलेले बंध दृढ करा. ज्या भिंतीची उपयुक्ततता संपली आहे अशा भिंती, जाती, रुढी, विभाग मोडून टाका.आमच्या वैदिक, जैन, बुध्द, शीख, लिंगायत प्रभृती यच्चयावत् हिंदू बंधूंनी आपले मतभेद धार्मिक क्षेत्रापुरते काय ते ठेवून आपणा सर्वांना जी अनेकविध सामाजिक जीवनाची प्रिय बंधने आणि नात्यागोत्याचे स्नेहसंबंध आज शतकोशतके एकजीवी असे एक महान् राष्ट्र बनवीत आले आहेत, त्या स्नेहसंबंधांनाच शक्यतो जोपासीत राहावे, यातच आपल्या सगळयांचे कल्याण आहे

त्यांच्यामते हिंदुस्थानात हिंदू ही 'जात' होऊ शकत नाही. हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

वैदिक काळापासून निदान पाच सहस्त्र वर्षे तरी आपले पूर्वज आपल्या लोकांचा धार्मिक, वांशिक, सांस्कृतिक नि राजकीय दृष्टया एकात्म असा गट घडवून आणीत होते. त्या क्रियेला स्वाभाविकपणे विकास पावता जे फळ आले ते म्हणजेच वैदिक काळातील त्या सिंधूचेच आज सबंध हिंदुस्थानभर पसरलेले आणि हिंदुस्थानालाच आपली एकमेव पितृभू नि पुण्यभू मानीत असलेले असे हिंदुराष्ट्र होय. कदाचित चिनी राष्ट्र वर्ज्य केल्यास जगातील दुसर्‍या कोणत्याही राष्ट्राला आपल्या हिंदुराष्ट्रासारख्या आपल्या जीवनाच्या नि विकासाच्या अखंड सातत्यावर अधिकार सांगता येणार नाही. हिंदुराष्ट्र हे काही पावसाळयातल्या कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे उगवलेले नाही. ते एखाद्या तहातून उत्पन्न झालेले नाही. ते निव्वळ कागदी खेळणे नाही. किंवा ते एखाद्या मागणीप्रमाणे घडविलेले नाही. अथवा ती एखादी चालचलाऊ सोय नाही. ते ह्याच भूमीतून वर आलेले आहे नि ह्या भूमीतच त्याची मुळे खोल नि दूरवर पसरलेली आहेत. मुसलमानांचा किंवा जगातील अन्य कोणाचा द्वेष करण्याकरिता म्हणून काही तरी लावलेला शोध नाही. तर आपली उत्तर सीमा सांभाळणार्‍या हिमालयाप्रमाणे ते एक भक्कम आणि प्रचंड सत्य आहे.

आपल्या आचारातुन, विचारातुन आपल्या साहित्यातुन स्वा. विनायक दामोदर सावरकर सर्वे हिंदुस्थानवासीयांना एक हृद्य आवाहन करतात.....

"आपल्या पितामहांनी मराठा व शीख हिंदु साम्राज्याच्या पतनाच्या वेळी जो तेथेच सोडून दिला तो आपल्या राष्ट्रीय जीवनाचा धागा आपण हिंदूंनी पुन्हा उचलून हाती धरावा. आत्मविस्मृतीमुळे क्षय झालेल्या आपल्या हिंदुराष्ट्राच्या जीवनाचे आणि विकासाचे आपण पुनरुज्जीवन केले पाहिजे, त्याला समाधीतून पुन्हा उठविले पाहिजे प्रामाणिक व भोळसट अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरते.

राष्ट्राचा मोठेपणा त्याच्या ध्येयातून व्यक्त होतो. राष्ट्राचे स्वरुप त्याने आपल्यापुढे ठेवलेल्या ध्येयावर अवलंबून असते. संकुचित ध्येयाच्या राष्ट्रांनी भूतकाळात चिरंतन मोठेपणा प्राप्त केलेला नाही. राष्ट्राला महानता व वैभव प्राप्त करुन देण्याकरिता उदात्त ध्येय असणे आवश्यक आहे...

माझा हा वारसा मी तुम्हांस देत आहे

वटवृक्षाचे बीज मोहरीहून लहान असते पण त्या बीजात जी स्फूर्ती असते, जी वल्गना असते ती वाढता वाढता तिचा प्रचंड वटवृक्ष बनून त्याखाली गाईची खिल्लारे विसावा घेतात, उन्हाने श्रांत झालेल्यांना तो वटवृक्ष सावली देतो.

मलाही वल्गना करु द्या ! माझे गाणे मला गाऊ द्या !

या जगात आपणाला जर हिंदुत्वाचे मानाचे राष्ट्र म्हणून जगावयाचे असेल तर तसा आपला अधिकार आहे आणि ते राष्ट्र हिंदुध्वजाखालीच स्थापन झाले पाहिजे. या नाही तरी पुढल्या पिढीत ही वल्गना खरी ठरेल.

माझी वल्गना खोटी ठरली तर मी वेडा ठरेन. माझी ही वल्गना खरी ठरली तर मी प्रॉफेट ठरेन. माझा हा वारसा मी तुम्हाला देत आहे!

त्या महान द्वेष्ट्या समाजसुधारकाला, महान तत्वचिंतकाला, हिंदुत्वाचा खरा खुरा अर्थ समजलेल्या त्या महान देशभक्ताला माझे लाखो प्रणाम!

जय हिंद !

विशाल कुलकर्णी

संदर्भ : १. सहा सोनेरी पाने : स्वा. सावरकर
२. हिंदुत्व : स्वा. सावरकर
३. Savarkar & Hindutva : The Godse Connection by A.G. Durrani
४. www.savarkar.org

Groups audience: 
Group content visibility: 
Private - accessible only to group members

साकेत,

शुद्ध हिंदू धर्म अजूनही व्यवस्थित जिवंत आहे. जे लोक स्वत:ला हिंदू समजतात, पण वैदिक धर्माचं पालन करीत नाहीत ते मृतवत आहेत. हिंदू धर्म मृत नाही. हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची चळवळ जोरात चालू आहे. मात्र त्यासाठी डोळे उघडून बघायला लागेल.

असो.

जामोप्या,

>> हिंदु राजे, पेशवे हे सगळे मस्तान्या वासनापूर्तीसाठी नाचवत नव्हते तर प्लेटॉनिक लव म्हणून नाचवत होते
>> का?

राजकारणासाठी तवायफी नाचवाव्या लागतात. शहाजीमहाराजांनी अंगवस्त्रे ठेवली होती. शिवाजीमहाराजांना दोन उपस्त्रिया होत्या. मात्र या राजांची आणि पेशव्यांची नावं बाया नाचवण्यासाठी प्रसिद्ध नाहीत.

तुम्ही दिल्ली शहरातल्या मीनाबाजारचं नाव कधी ऐकलंय? अकबराचा खास रंडीखाना भरत असे तिथे.

>> गांधीहत्येनंतर हिंदुत्वाचा झेंडा मोडला.. त्याचं भागवं कापड मराठ्यानी पळवलं आणि काठीचं दांडकं
>> बहुजन समाजाने घेऊन ब्राह्मणाना झोडपायचा उद्योग चालू केला.. फिदीफिदी असल्या मोडक्या झेंड्याखाली
>> कोण येणार?

त्याची चिंता आपल्याला नको. नरेंद्र मोदींनी करायचं ते करून दाखवलंय.आपण गुजराती जनतेला हा प्रश्न करू शकता. बघा काय उतर येतंय ते.

>> सावरकरांच्या व्याख्यएशी सुसंगत राहील, असा समाज आज राहिलेला नाही.

अहो, कितीदा सांगितलं की हिंदूराष्ट्रात अहिंदू देखील हिंदूंच्यासोबत गुण्यागोविंद्याने राहू शकतात. मग सावरकरांच्या व्याख्येशी सुसंगत समाज नाहीये म्हणून ओरड कशासाठी?

आ.न.,
-गा.पै.

राजकारणासाठी तवायफी नाचवाव्या लागतात.

होय.. म्हणजे मुसलमानानी बाया नाचवल्या तर ते वासनेसाठी आणि हिंदुनी नाचवल्या तर ते राजकारणासाठी.. चांगले आहे.. चालू द्या... Proud

हिंदुस्थानात आम्हांस एक जाती म्हणणे मूर्खपणाचे आहे. जर्मनीत 'जर्मन' हे राष्ट्र आहे आणि ज्यू एक जात आहे. तुर्कस्थानात तुर्क हे एक राष्ट्र आहे. व अरब वा आर्मेनियन अल्पसंख्य जाती आहेत. त्याचप्रमाणे हिंदुस्थानात हिंदू एक राष्ट्र आहेत व अल्पसंख्य मुसलमान वा ख्रिश्चन या एक जाती आहेत

बकवास आहे... भारत हा एक देश आहे आणि इथे अनेक धर्म आहेत.. कोणताही एक धर्म म्हणजे राष्ट्र आणि इतर सर्व जाती असे इथे नाही....

दैवायत्तं कुले मदायत्तं तु पौरुषम असा काहीतरी एक श्लोक हिंदुत्ववाल्यांच्या पवित्र ग्रंथात महाभारतात कर्णाच्या तोंडात आहे.. कर्ण म्हणतो.. जन्म कुठे व्हावा हे आपल्या हातात नाही, आपले कर्तूत्व महत्वाचे. त्याचप्रमाणे माणूस कोणत्या धर्मात जन्मला हे महत्वाचे नाही, त्याचे एक भारतीय म्हणून योगदन महत्वाचे आहे....

एरवी संस्कृत श्लोक म्हणजे जीव की प्राण असणारे हिंदुत्ववाले आपल्याला अडचणीत आणणारे श्लोक मात्र कसे नेमके विसरातत नै !! Proud

( चला, आता जोधा अकबर मधली गाणी ऐकायची आहेत..) Proud

अशा हिंदूंच्या हे स्पष्ट ध्यानात आले पाहिजे की सर्वसामान्य राष्ट्रीय जीवनाशी मुसलमानांनी समरस होण्याचे नाकारले म्हणजे नकारात्मक दृष्टीने सुध्दा हिंदूंचे एक राष्ट्र उरत

मुसलमानांना वगळून स्वतःच हिंदुत्वाची आणि हिंदुरष्ट्राची व्याख्या करायची आणि वर मुसलमानच समरस होत नाहीत म्हणून बोंबही मारायची ... हिंदुत्ववाले कवा सुधारणार हायेत कुनास ठाऊक. Proud मुसलामान, ख्रिश्चन, हिंदु, बौद्ध सगळेच या देशाचे कायदे पाळतात... उगाचच कोण समरस होत नाही, म्हणून फुकाचा आरडाओरडा कशाला करायचा?

हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची चळवळ जोरात चालू आहे.

होय.. पुनरुत्थान या धर्माला नवीन नाही.. Proud ५००-१००० वर्षे गेली की हा धर्म कोलमडतोच.. कधी बौद्ध, कधी मुसलमान, कधी ख्रिश्चन... काही ना काही कारण असतेच...! Proud मग पुन्हा पुनरुत्थान !! दुसर्‍या कुठल्या तरी धर्माच्या नावानं बोंब मारल्याशिवाय हिंदुत्वाचं सहस्त्रक साजरंच होत नाही.

शुद्ध हिंदू धर्म अजूनही व्यवस्थित जिवंत आहे. जे लोक स्वत:ला हिंदू समजतात, पण वैदिक धर्माचं पालन करीत नाहीत ते मृतवत आहेत. हिंदू धर्म मृत नाही. हिंदू धर्माच्या पुनरुत्थानाची चळवळ जोरात चालू आहे. मात्र त्यासाठी डोळे उघडून बघायला लागेल.

अनुमोदन.
सध्या हिंदू धर्माला शिव्या देणे फॅशनेबल आहे, बुद्धिप्रामाण्यवादी समजले जाते. म्हणजे जेव्हढी आपली बुद्धि, तिला जे कळते ते खरे बाकीचे खोटे. मग असेच होणार.

अनेक वर्षांच्या सामाजिक, धार्मिक नियम नि बंधनांचा कंटाळा येऊन आता भारतीयांची प्रकृति जरा चैन, स्वैराचार करण्याकडे झाली आहे. सध्या काँप्युटर प्रोग्रॅमिंग येते म्हणजे शहाणा, नाहीतर वेडा अशी कल्पना आहे भारतात.

एक दोन पिढ्यानंतर पुनः जरा शहाणे होतील. नि ते नाही झाले तर परदेशातील लोक होतील, पण धर्म शिल्लक राहीलच! जगात पुष्कळांची बुद्धि काँप्युटर प्रोग्रॅमिंग सकट त्याच्या पलीकडील विषय समजण्याएव्हढी जास्त असते. असे लोक हिंदू झाले नि बाकीचे नाही तरी बरेच!

गजानन,

१.
>> म्हणजे मुसलमानानी बाया नाचवल्या तर ते वासनेसाठी आणि हिंदुनी नाचवल्या तर ते राजकारणासाठी..
>> चांगले आहे.. चालू द्या...

हिंदू राजांनी राजधर्म सांभाळून बायका नाचवल्या तर काय बिघडलं?

अकबराने राणी दुर्गावातीला ठार मारल्यावर तिच्या लहान बहिणीला आणि सुनेला जनानखान्यात डांबलं होतं (हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल). याउलट हिंदूंनी कधीच स्त्रियांची बेअब्रू केली नाहीये. शिवाजीमहाराजांनी उंबरखिंडीच्या लढाईत कारतलबखान उझबेगच्या सैन्याचा सपशेल पराभव करून केवळ नेसत्या वस्त्रानिशी परत माघारी धाडलं. फक्त एका व्यक्तीला नेसत्या कपड्यांहून अधिक वस्त्रे मिळाली. त्या बाईचं नाव आहे पंडिता रायबाघन! अधिक माहितीसाठी इथे पहा.

वरती लिहिलंय तसा मीनाबाजाराचा रंडीखाना शिवाजीमहाराज अथवा पेशव्यांनी बाळगला होता काय?

२.
>> भारत हा एक देश आहे आणि इथे अनेक धर्म आहेत.. कोणताही एक धर्म म्हणजे राष्ट्र आणि इतर सर्व जाती
>> असे इथे नाही....

तुमचं हे म्हणणं मुळी बकवास आहे. भारत ही धर्मशाळा नाही. हा पूर्वापार हिंदूंचा (म्हणजे वैदिक परंपरा पाळणार्‍यांचा) देश आहे. आणि तो तसाच राहील. इंग्लंड प्रॉटेस्टंट असलं तरी कॅथलिकांना खास सवलती मिळत नाहीत. फ्रान्स कॅथलिक असला तरी प्रॉटेस्टंटांना विशेषाधिकार नाहीत. सबब अहिंदूंना अधिक अधिकार मिळणार नाहीत. त्यांना हिंदूंइतकेच अधिकार मिळतील. कारण हा देश हिंदूंचा आहे. जिथे हिंदू अल्प झाले ते भाग उर्वरित भारतापासून तुटले.

३.
>> आपले कर्तूत्व महत्वाचे. त्याचप्रमाणे माणूस कोणत्या धर्मात जन्मला हे महत्वाचे नाही, त्याचे एक
>> भारतीय म्हणून योगदन महत्वाचे आहे....

हे अगदी खरंय. अर्थात ते तुमच्याकडून शिकायची आमची इच्छा नाही. कारण ते क्लीबाच्या तोंडून शृंगारिक वर्णने ऐकण्यासारखं आहे. त्यात चुकीचं काहीच नाही, मात्र ते अतिशय विनोदी वाटतं. Proud Biggrin Rofl

अब्दुल कलाम यांचं योगदान आम्हाला चांगलं ठाऊक आहे. कोण्या हिंदुत्ववाद्याने त्यांचा द्वेष केलाय? काहीतरी बरळल्याविना चैनच पडत नाही की काय तुम्हाला?

४.
>> दैवायत्ते कुले जन्म मदायत्तं तु पौरूषम्

हेही हिंदूंना सांगायची गरज नाही. चार वेळा पाकिस्तानला चोप दिला आहे. लक्षात आहे ना?

५.
>> चला, आता जोधा अकबर मधली गाणी ऐकायची आहेत..

बरोबर आहे. आपल्या आयाबहिणींची अब्रू वेशीवर टांगल्याखेरीज झोप लागत नसेल ना तुम्हाला!

६.
>> मुसलमानांना वगळून स्वतःच हिंदुत्वाची आणि हिंदुरष्ट्राची व्याख्या करायची आणि वर मुसलमानच समरस
>> होत नाहीत म्हणून बोंबही मारायची

जगात कुठल्या देशात मुस्लिम स्थानिक बिगरमुस्लिमांशी समरस झालेत? हिंदूंनी जरा डोळे उघडून स्वत:ची यथायोग्य व्याख्या केली की लगेच तुमच्या पोटात का दुखू लागतं?

७.
>> मुसलामान, ख्रिश्चन, हिंदु, बौद्ध सगळेच या देशाचे कायदे पाळतात...

मुसलमान नक्की कायदे पाळतात...? सदैव हिंदूंच्या सणासुदीला भांडणं उकरून काढणे म्हंजे कायदा पाळणे नव्हे. जळगावात कसाबसाठी दर्ग्यावर चादरी चढवल्या गेल्या तेव्हा कोण किती समरस आहे ते दिसलं आम्हाला. तुमची ढापणं आमच्या डोळ्यावर कश्याला चढवायची? आम्हाला चांगले डोळे आहेत म्हंटलं!

८.
>> ५००-१००० वर्षे गेली की हा धर्म कोलमडतोच..

१९७१ साली इंदिरा गांधीने (खरं नाव मैमुना बेगम खान) मोठ्या अभिमानाने जाहीर केलं की "आम्हाला ५००० वर्षांची विजयाची परंपरा आहे". ही परंपरा कोणती? इस्लाम स्थापन होऊन उणीपुरी १४०० वर्षे झालीयेत हे ठाऊक आहे ना तुम्हाला? तर मग एका मुस्लिम स्त्रीला मागची हजार वर्षे कोलमडणार्‍या हिंदू धर्माच्या विजयाची भुरळ का पडली बरं?

असो.

जरा वस्तुस्थितीला धरून लिहिलेत तर बरे होईल.

आपला नम्र,
-गामा पैलवान

हिंदू राजांनी राजधर्म सांभाळून बायका नाचवल्या तर काय बिघडलं?

याउलट हिंदूंनी कधीच स्त्रियांची बेअब्रू केली नाहीये

नुस्तं शिवाजी आणि शहाजी म्हणजे संपूर्ण हिंदु राजांचा इतिहास नव्हे.. गोपीचंदी आंघोळ हा शब्दप्रयोग हिंदुत्ववादी नेमके कसे विसरतात नै? द्रौपदीची बेअब्रू करणारा हिंदुच होता ना? सीतेला पळवणारा रावण तर यजुर्वेदी वैदिक ब्राह्मण होता !! Proud राजा म्हटलं की अनेक बायका, तवायफी आल्याच, हे जनता प्रत्येक वेळी कन्सिडर करतच असते.
:फिदी:... फक्त इतिहास हा प्रत्येकजण आपापल्या सोयीने लिहित आणि बघत असल्याने कुणाच्या बायका इतिहासात नोंदल्या जातात, कुणाच्या नाही...
कधीतरी कुठल्या तरी मुसलमान राजाने तवायफी बाळगल्या हे कारण दाखवून स्वतंत्र भारतातल्या सामान्य मुसलमानाना नागरिकत्वाच्या व्याख्येतून वगळणं, यातूनच हिंदुत्ववाल्यांचं शौर्य दिसून येते, नि:शस्त्र गांधीला ज्यानी मारलं असल्या हिंदुत्ववाल्यानी क्लैब्याच्या आणि शौर्याच्या व्याख्या दुसर्‍याना शिकवू नयेत. लोक हसतात. Proud कसाबसाठी चादरी चढवायला 'काही लोक' आलेही असतील, पण याचा अर्थ सगळेच मुसलमान तसे असतात, असे होत नाही. आणि सावरकरानी ही व्याख्या केली आहे तेंव्हा कसाब काय पाकिस्तानही नव्हता... त्या काळात सगळेच अखंड हिंदुस्तानचा भाग होते... असं असताना काही धर्माना वगळायची व्याख्या एखाद्याने का करावी?

मुसलमान समरस झाले नाहीत, म्हणजे नेमकं काय ? मुसलमान रस्त्याने डाव्याच बाजूने जातात, नोकरी व्यवसाय करुन पोट भरतात.. स्वतःचे सण साजरे करतात.. हिंदुनाही वेळोवेळी शुभेच्छा देतात... मुसलमानही तितकाच टॅक्स भरतात.. बस , रेल्वे अशी सार्वजनिक वाहनेही वापरतात.. इतरांप्रमाणे शाळा कॉलेजात त्याच नियमानी प्रवेश घेतात.. सगळं काही ते नागरिक म्हणून इतरांप्रमाणेच करत असतात.. मुसलमान इतर धर्मियांचे चाम्गले मित्रही होऊ शकतात.. मुसलमान भारताचा सैनिक म्हनून काम करत असेल तर सीमेवर प्राणपनाने लढतो.. मुसलमान पोलिस असेल तर तोही इतर पोलिसांप्रमाणेच आपले कर्तव्य बजावतो.. बँकेत असलेला मुसलमान, भाजी विकणारा बागवान, शाळेतला मुसलमान शिक्षक. ... नाही बाबा, आम्हाला तरी यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही.. तेही या देशाचे नागरिकच आहेत... तेदेखील आणि ख्रिस्चनदेखील... सगळे भारतीयच आहेत.

या देशात नागरिक म्हणून रहायचा अधिकार सर्वानाच असल्याने कुठल्यातरी धर्माना नागरिकत्वातून वगळा अशा व्याख्या करणं कायद्याला धरून नाही.. आणि त्याचमुळे हा असला 'शौर्यवादी' लेख दिवाळी अंकाला सिलेक्ट होऊ शकला नव्हता.. त्यातच सगळं काही आलं..

( चला आंघोळीला जाऊया... गोपीचंदाची नसली तरी साधी तरी आंघोळ करुया..:फिदी: )

माझ्या नावाने आंघोळ केलीत? मग आता गोडसेबाबाच्या चितेची राख अंगाला फासा आणि आसिंधुसिंधु..चा महामंत्र जपत बसा..

आपल्या विरोधकाच्या नावाने आंघोळ करणे... हिंदुत्वाच्या शौर्याच्या सरड्याची धाव इथपर्यंतच !! .... Proud

>>> मुसलमान समरस झाले नाहीत, म्हणजे नेमकं काय

समरस झाले असले तर त्यांना इतरांच्यापेक्षा वेगळ्या आणि अन्यायकारक कायद्यांची खिरापत कशासाठी? लादेन व सद्दाम हुसेनच्या समर्थनार्थ मोर्चे कोण काढतात? भारताचा आणि तुर्कस्तानमधल्या खिलाफतीचा काय संबंध आहे? तुर्कस्तानमधली खिलाफत ब्रिटिशांनी रद्द केल्यावर भारतात कोणी मोर्चे काढून दंगल केली होती? केरळमधल्या मोपल्यांनी का दंगल केली होती? मक्केतल्या मशिदीचा ताबा अतिरेक्यांनी घेतल्यावर भारतात कोणी दंगल केली होती? पॅलेस्टाईन मधल्या मुस्लिमांवर अन्याय झाला म्हणून भारतात मोर्चे कशासाठी? भारतातल्या (म्हणजेच काश्मिरमधल्या) हिंदूंवर म्हणजे आपल्याच देशबांधवांवर अन्याय होतोय म्हणून किती मुस्लिमांनी आवाज उठवला? पॅलेस्टाईनमधले मुस्लिम ज्यांना जवळचे वाटतात व ज्या देशात आपण राहतो तिथले हिंदू परके वाटतात, हे समरस झाल्याचे लक्षण आहे का? पॅलेस्टाइन-इस्राईल या संपूर्ण वेगळ्या देशांच्या वादात भारताचा काहिही संबंध नसताना इथल्या ज्यूंवर कोण हल्ले करतात?

>>> जगात कुठल्या देशात मुस्लिम स्थानिक बिगरमुस्लिमांशी समरस झालेत?

पूर्ण सहमत

>>> हिंदूंनी जरा डोळे उघडून स्वत:ची यथायोग्य व्याख्या केली की लगेच तुमच्या पोटात का दुखू लागतं?

याच्याशीही सहमत

>>> अकबराने राणी दुर्गावातीला ठार मारल्यावर तिच्या लहान बहिणीला आणि सुनेला जनानखान्यात डांबलं होतं (हे तुम्हाला कदाचित माहीत नसेल).

निव्वळ बायकांचीच नव्हे तर कारगिल युद्धात हातात सापडलेल्या सौरभ कालिया व इतर ५ सैनिकांच्या प्रेताची पाकड्या सैनिकांनी यथेच्छ विटबंना केली होती. त्यांच्या गुप्तांगावर व शरीरावर अनेक ठिकाणी चटके देऊन छळ करून मारल्याचे शवविच्छेदनात दिसले होते. याउलट १९७१ मध्ये हातात आलेल्या ९०००० पाकड्या सैनिकांशी भारताने कोणताही गैरव्यवहार केला नाही. दोन्ही देशांच्या संस्कृतीत किती जमीनअस्मानाचा फरक आहे, हे लक्षात आलं असेलच. दोन्ही देशांची संस्कृती म्हणजे कोणत्या धर्मांची संस्कृती हे वेगळे सांगायला नको.

>>> या देशात नागरिक म्हणून रहायचा अधिकार सर्वानाच असल्याने कुठल्यातरी धर्माना नागरिकत्वातून वगळा अशा व्याख्या करणं कायद्याला धरून नाही.

तसेच कुठल्यातरी विशिष्ट धर्माला केवळ ते त्या विशिष्ट धर्माचे आहेत म्हणून इतरांपेक्षा वेगळ्या व महिलांवर अन्याय करणार्‍या कायद्यांची खिरापत देणे हे कोणत्या कायद्याला धरून आहे?

माझ्या मते पुष्कळ हिंदूंना आता हिंदू धर्माचा चक्क कंटाळा आला आहे. स्वैराचार, निर्बंध जीवन याची भुरळ पडते. पण तसे कबूल करण्याची लाज.

उगाच शहाणपणा दाखवायचा म्हणून अपवादात्मक उदाहरणे घेऊन तेच नियम असे म्हणायचे! १०० मुसलमानांनी अत्याचार केले नि एक चांगला, असे असले तरी मुसलमान वाईट म्हणायचे नाही, १०० हिंदू चांगले नि एक वाईट असला की हिंदू धर्मच बेक्कार, हिंदू लोकच वाईट असे म्हणायचे ही यांची अक्कल!

शिवाय आजकालच्या भारतात (सॉरी, इन्ड्यात) मुसलमानांचे पाय चाटले, हिंदूंना शिव्या दिल्या की, मते मिळतात, मग सत्ता, पैसे, मग काय विचारता राव! कसला धर्म नि कसले काय!

शिवाय मनात असून मुसलमानांवर टीका करण्याची हिंमत नाही. उगाच काहीतरी 'दैवायत्तं कुले जन्म' असले काहीतरी संदर्भहीन बरळायचे!! यांना त्याचा अर्थहि कळत नाही, नि तसे काहीहि पौरुष वगैरे काही नाहीये. हे भरकटलेले लोक! होतील तेंव्हा होतील शहाणे, यांच्याशी वाद म्हणजे पालथ्या घड्यावर पाणी!

आगाउ सल्ला देतो आहे, पण स्वानुभव आहे. इथे चर्चा करून कधीहि आनंद झाला नाही. भारतीय लोक हुषार असतात अशी आशा होती. तिथेहि इथल्यापेक्षा मूर्ख लोक आहेत, नि टक्केवारी कमी असली तरी संख्येने चक्क दुप्पट असतील.
गामा पैलवान, तुम्ही यांच्या नादी लागू नका, एकाहून एक मूर्खासारखे बरळून तुमचे बीपी वाढवतील उगाच! जगात बरेच लोक शहाणे आहेत, ते यांच्याकडे लक्ष देणार नाहीत, यावर विश्वास ठेवा.

>>>> मुसलमान समरस झाले नाहीत, म्हणजे नेमकं काय ? मुसलमान रस्त्याने डाव्याच बाजूने जातात, नोकरी व्यवसाय करुन पोट भरतात.. स्वतःचे सण साजरे करतात.. हिंदुनाही वेळोवेळी शुभेच्छा देतात... मुसलमानही तितकाच टॅक्स भरतात.. बस , रेल्वे अशी सार्वजनिक वाहनेही वापरतात.. इतरांप्रमाणे शाळा कॉलेजात त्याच नियमानी प्रवेश घेतात.. सगळं काही ते नागरिक म्हणून इतरांप्रमाणेच करत असतात.. मुसलमान इतर धर्मियांचे चाम्गले मित्रही होऊ शकतात.. मुसलमान भारताचा सैनिक म्हनून काम करत असेल तर सीमेवर प्राणपनाने लढतो.. मुसलमान पोलिस असेल तर तोही इतर पोलिसांप्रमाणेच आपले कर्तव्य बजावतो.. बँकेत असलेला मुसलमान, भाजी विकणारा बागवान, शाळेतला मुसलमान शिक्षक. ... नाही बाबा, आम्हाला तरी यांच्याविषयी कोणतीही तक्रार नाही.. तेही या देशाचे नागरिकच आहेत... तेदेखील आणि ख्रिस्चनदेखील... सगळे भारतीयच आहेत.

जर ते इथे समरस झाले असतील, तर त्यांना इतरांपेक्षा वेगळे कायदे, वेगळ्या शाळा इ. कशासाठी हव्यात?

वरील लिहिलेल्या सर्व गोष्टींचा आणि समरस होण्याचा दुरून तरी संबंध आहे का? सौदी अरेबियातल्या भारतीय महिला बुरखा वापरतात, म्हणजे त्या सौदी अरेबिया देशाशी समरस झाल्या म्हणून घालतात की त्यांना नाईलाजाने तिथले नियम पाळावे लागतात?

धर्मशिक्षणासाठी वेगल्या शाळा काढणं यात गैर काहीही नाही... सगळ्याच धर्माच्या अशा शाळा शकतात... फक्त हिंदु धर्मात अशा शाळाम्मध्ये जातीवाद असल्याने तिथे फक्त ३ % असलेल्या ब्राह्मणाना प्रवेश असतो.... इतर धर्मात तसे नसते.. हा शाळांचा मुद्दा का वारंवार विचारलो जातो हे समजत नाही.. हिंदुनीही जातीभेद सोडून सर्वांसाठी धार्मिक शाळा काढून दाखवाव्यात.. त्याना कोणी अडवले आहे का?

जागोमोहनप्यारे,

तुम्हाला कोणता धर्म 'श्रेष्ट' वाटतो....?

आपण कोणत्या विशिष्ट 'धर्म संप्रदायाचे अनुयायी' आहात...?

स्वतःच्या अस्तित्त्वाला आपण कोणत्या 'विशिष्ट दुनियेशी संलग्न' आहात असे समजता..?

कृपया अंगीकारलेलेच उत्तर देणेची तसदी घ्यावी...

वाचतोय... Happy

मी हिंदु ब्राह्मण आहे.. मला जमेल तसा माझा धर्म पाळतो.

आणि मी भारतीय आहे.

या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चनानाही मी भारतीयच मानतो. Happy

हसू का?

(हे अवांतर आहे..)

>>वासनापूर्तीसाठी बाया नाचवणे म्हणजे कलेला दिलेले उत्तेजन देणे नव्हे!<<

Ever wonder why marathi is such a harsh language? मराठी ही इतकी उद्धट भाषा का आहे याचा कधी विचार केलाय??

मराठी जेत्यांची भाषा आहे. फार मोठ्ठा प्रदेश जिंकला होता यांनी. अन फार्र recently. कधीच, कुठेच 'एकत्र' नाचले नाहीत. अगदी उत्तर प्रदेशात कोठ्यावर जाउन सुद्धा! यांनी फक्त नाचवले. अन याच मरह्ट्ट्यांना त्या गर्ब्यात नाचतांना पाहून कीव येते हो..

(गर्बेवाले : तेच ते मोदींचे पूर्वज - जे सोरटी सोमनाथावर मोहम्मद चालून आला तेंव्हा शिव्या शाप देत होते ढिगार्‍यावर उभे राहून. सैन्य होतं कुठे? गरबे नाचायला गेलं असेल.. - अन त्यांचेच भाउबंद, जे तुम्हाला त्यांच्या 'सोसायटीत' येऊ देत नाहीत. अन घरात वाळवी लागली तर पेस्ट कंट्रोल वाल्यांना हाकलतात, पण 'त्यांना' कापून टाकायला पुढे असतात..)

खी: (प्रयत्न करून पण इतकंच हसू येतंय)

मी हिंदु ब्राह्मण आहे.. मला जमेल तसा माझा धर्म पाळतो.
आणि मी भारतीय आहे.
------- जागोमोजी तुम्ही भारतीय आहात म्हणजे नक्की काय आहात? तुमची भारतीय असण्याची व्याख्या काय आहे? कायद्यानुसार भारताचा पासपोर्ट मिळ्वता आला म्हणजे त्याला भारतीय समजायचे का?

या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चनानाही मी भारतीयच मानतो.
------- तुम्ही भले लाख मानाल... (तुमची आणि त्यांची भारतीय असण्याची व्याख्या सारखीच आहे हे गृहित धरले आहे) पण त्यांना ते भारतीय आहेत हे मान्य हवे ना.

हसू का..

हसा की! कोण अडवले आहे का? शास्त्रीय संगीत आणि वासनेसाठी बाया नाचवणे यातला फरकही समजत नाही, असलं गाढव पब्लिक हिंदुत्वाच्या आणि शौर्यत्वाच्या व्याख्या करतय... Proud हसा की जोरात. अजून हसा.

>>> या देशातील मुसलमान आणि ख्रिश्चनानाही मी भारतीयच मानतो.
------- तुम्ही भले लाख मानाल... (तुमची आणि त्यांची भारतीय असण्याची व्याख्या सारखीच आहे हे गृहित धरले आहे) पण त्यांना ते भारतीय आहेत हे मान्य हवे ना.

अनुमोदन

चातका,
तुमचा धर्म कोणता?
माणूसकी हा माझा "धर्म" आहे.
व्याख्या काय तुमची धर्माची?
मोठे व्हा! माझे आशिर्वाद आहेत तुमच्या पाठी.

त्यांना ते भारतीय आहेत हे मान्य हवे ना.

म्हणजे ते स्वतःला भारतीय मानत नाहीत का? तुम्ही किती लोकांचा सर्वे केलाय?

आपण सगळे किती काळ जामोप्या यांच्यासारख्या मानसिक रुग्णाला उत्तर देत बसणार आहात? वेळ जास्त झालाय का?

तेच तर मीही म्हणतोय... गांधीहत्या, सावरकरांचे कालबाह्य विचार असल्या गोष्टींचा उदोउदक्र्रणार्‍या मनोरुग्णांचे कशाला फुकट मनोरंजन करायचे?

हिंदुत्ववाले ५० वर्षत सत्तेच्या जवळपासही पोहोचू शकले नाहीत.

एक दिवस असाही येईल कीत्ते सत्तेतच काय पण विरोधई पक्षही नसतील.. कुठेतरी कोपर्‍यात दोन चार सीट असतील त्यांच्या. ६० वर्षे जनतेने याना नाकारले तरी याचा पी:ळ काही जात नाही.

जोशी,
तुम्हाला प्रतिवाद करता येत नाही म्हणून त्यांना मनोरुग्ण हे तुम्ही कसे म्हणू शकता? Psychology, किंवा psychiatry मधील तुमची योग्यता, पात्रता, अनुभव काय? उग्गं उचल्ली जीभ अन लावली? मान्य करून टाकावं की या माणसाचा प्रतिवाद करता येत नाही.

बाकी इये देशी जितके कर्मठ ब्राह्मण आहेत/होते तितकेच पुरोगामी ब्राह्मण देखिल होऊन गेलेत अन आहेत. हीच आहे या देशाच्या अभ्युदयाची आशा!

वाल्या कोळी | 15 October, 2011 - 22:33 नवीन

तेच तर मीही म्हणतोय... गांधीहत्या, सावरकरांचे कालबाह्य विचार असल्या गोष्टींचा उदोउदक्र्रणार्‍या मनोरुग्णांचे कशाला फुकट मनोरंजन करायचे?

<<
हे काही समजलं नाही.
कोणते मनोरुग्ण उदो उदो करताहेत? अन कसला?

Pages