सानिकाचं "सेल्फ पोर्ट्रेट" : आनंदीआनंद गडे !!

Submitted by maitreyee on 3 September, 2009 - 10:40

"सेल्फ पोर्ट्रेट" !! : आनंदी आनंद गडे!!
सानिका - वय ४
सानिका (तिच्या वयानुसार अन टिपिकल मुलगी असल्यामुळे) कायम स्वप्नांच्या दुनियेतच असते!! तिच्या गोष्टीत, चित्रात अन एरव्हीच्या बोलण्यात पण कायम जादू, पर्‍या, राजकन्या, यांच्याशिवाय कशाची बात नसते! सगळं कसं गोड गोड अन मुख्य म्हणजे दिसायला सुंदर !! तिचं हे चित्र मला आवडलं ते त्यातल्या भयंकर (!) आनंदी मूड मुळे Happy ती मुलगी ( ती म्हणजे ती स्वतः असं तिचं म्हणणं!), फुलं, ते पाखरु , सगळे आपले हसतायत !! Happy
सानिकाच्या चित्रात डीटेलिंग भारी असतं, (ते पर्फेक्ट्ली मिरर इमेज सिग्नेचर चे काय गौडबंगाल करते अधे मधे ते सोडून द्या Wink ) मुलीचे केस, फ्रॉक चा घोळ, हातात टिपिकल "पिन्क, हार्ट शेपचा बलून", "डिझायनर फुलपाखरू" इत्यादि इत्यादि!! ( याबाबतीत डीजेमावशीला टक्कर आहे! Happy )
sanikapic.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

चित्राची खरच जाण आलीय.
दिपस्तंभाची सगळ्यात वरची खिडकी आहे ना, तिच्यावरच्या गॅलरीखालचा भाग अगदी टिप्पिकल आलाय. निरखुन पहा, लक्षात येईल. असे काढणे कठिण असते, पण एवढ्या लहान वयात जमलेय म्हणजे कमाल आहे. तिला अगदी भरभरुन सगळे द्या. ( द्यालच ) नेट + पुस्तके + क्लास यामुळे आताची पिढी अपेक्षीत उंची सहज गाठेल.:स्मित:

बापरे! काय सह्ही रंगवलंय. शेडिंग, रंगसंगती, वातावरण निर्मिती ... अप्रतिमच. नऊ वर्षांच्या मानानं तिची चित्रकला खूपच मॅच्युअर आहे. लेकीला शाब्बासकी, मै. तू तिची पेंटिंग्ज फ्रेम करून घरात लावतेस की नाही? नक्की लाव.

वॉव. मस्त जमलंय वॉटरकलरमधलं हे चित्र.
वॉटरकलर जमणार्‍या सगळ्यांचा मला जाम हेवा वाटतो. आता त्यात सानिका पण आली. Happy

वा, सानिकाची प्रगती पाहून खूप आनंद झाला - अशीच तिची जाण वाढत जावो आणि एक उत्तम चित्रकार म्हणून ती नावारुपाला येवो ही सदिच्छा.

Pages