"अपराजीत" गद्य STY - २

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 00:23

खालच्या डोहाशेजारी "आ" वासून पडलेल्या दोन मगरी पाहून, त्याने थेट धबधब्याखाली अंघोळ करावी असे ठरविले. डोंगरकड्यावरून कोसळणार्‍या त्या धबधब्याखाली अंघोळ करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. तिक्ष्ण बाणांसारखे टोचणारे पाण्याचे थेंब उघड्या शरीरावर झेलत संजय त्याचा पाठीमागच्या आठ दिवसांमधला जिवनमृत्युचा संघर्ष पार विसरून गेला! आठ दिवस त्याने या निर्जन बेटावर स्वतःचे आस्तित्व टिकवून ठेवले होते. स्वप्नांतही त्याने असा कधी विचार केलेला नव्हता की, आपल्याला आयुष्यात हा अनुभव कधी येईल! एक दिवस त्याला जिवंत प्राण्याला मारून खावे लागेल..........!

अंघोळ झाल्यावर त्याने शेजारच्या दगडावर ठेवलेले कपडे उचलले. या आठ दिवसांतच त्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. चिखल, रक्त, अजून कसले कसले डाग होते त्या कपड्यांवर, हे त्यालाही आठवत नव्हते. पण सध्या कपड्यांची गरज फक्त शरीर झाकणे हीच राहीली होती! अन्यथा काल रात्री त्या बेटावरील विषारी डासांनी आणि माशांनी त्याची जी हालत केली होती, ते आठवले कि अजुनही अंगावर शहारे येत होते. त्या माशांमूळे शेवटी त्याला सर्वांगाला चिखल चोपडून झोपावे लागले होते!

आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला...त्याचे पाय कधी त्या पायवाटेवर आले हे त्यालाही कळाले नाही. बर्‍याच वेळाने त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तो एकदम चमकला! या बेटावर मनुष्यवस्ती असल्याची एकही खुण त्याला गेल्या आठ दिवसात दिसली नव्हती. पण ही पायवाट नक्की कुठे जातेय याची त्याला उत्सुकता लागली होती. तो चक्क धावायला लागला.... आसपासच्या झाडावर त्याला पाहून वानरे उड्या मारत होती. तोंडाने विचित्र आवाज करत होती.

शेवटी त्याला दूर टेकडीवर एक झोपडी दिसली..! तो दुरुनच कोणाची चाहूल लागतेय का, हे पाहू लागला. पण बराच वेळ त्या झोपडीतून कसलीही हालचाल दिसली नाही. पुढे जाऊन पहायचे त्याचे धाडस होत नव्हते! त्याने अजुन थोडा वेळ वाट पहायचे ठरविले. एका झाडाआडून तो त्या झोपडीचे निरीक्षण करू लागला. बराच वेळ झाला पण काहीही हालचाल दिसत नव्हती. आता तर जोरात भूकही लागली होती.

आज काय खायला मिळणार, काय खावे लागणार याचा विचार करत त्याचे झोपडीचे निरीक्षण सुरूच होते.

तेव्हढ्यात पाठीमागून त्याच्या डोक्यावर कसलातरी जोरात प्रहार झाला.....आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले. तोंडातून काही आवाज बाहेर पडायच्या आतच त्याला भोवळ आली आणि तो जमीनीवर खाली पडला. डोळ्यासमोर एक अंधूक आकृती हालत होती....ती त्याच्या जवळजवळ येत होती...आणि त्याची शुध्द हरपली...

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पूढे? कसली होती ती आकृती? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) कथेच्या शेवटी नायक बेटावरून परत सुखरूप घरी पोहचला पाहीजे.
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हे पहा उगिच कल्ला करु नका. हे नविन टेक्निक आहे भयकथेचे. वाचकाला संभ्रमावस्थेत सोडून नंतर उलगडा करायचा. तर थोडा धीर धरा मी रुमाल टाकला आहे. पुढच्या भागात तुम्हाला कळेल तिथे नक्की काय झाले होते ते Wink

मी रुमाल घेतला.

खरं तर त्या परग्रहवासी प्राण्यानेच बरीच गडबड गुपचुप पणे केलेली असते. संजय जेंव्हा त्याला त्याच्या खोलीकडे येताना दिसला तेंव्हाच त्याने काहि सिन्ग्न्लस सोडुन संजय ची भूक आणि राजवैद्याचे प्राण हरण केलेले असतात. त्यामुळेच संजयला खूप भूक न लागता आणि दिसेल ते बका बका न खाता तो त्याच्याशी संवाद साधायला लागतो. परग्रहवासी प्राण्यानेच आपल्या सिन्ग्न्लस मुळे मराठी भाषा पण आत्मसात केलेली असते. परग्रहवासी ला तर संजय ची गरज असते त्यामुळे त्याचा जीव वाचतो.

परग्रहवासी संजयची बोम्बलहिन्डेश्वर आणि त्याचे लोक यांपासून सुटका करण्यासाठी सरसावतो आणि हिंडींब मंदीराच्या दिशेने कूच करतो. ईकडे संजयला काय करावे हे सुचत नसते आणि तेव्हड्यात त्याला त्याचा मायबोलीकर मित्र (परग्रहवासी) दिसतो.तो संजयलाच खूणावत असतो. परग्रहवासी आपल्या सिन्ग्न्लस च्या सहाय्याने हिंडींब मंदीरातील सगल्यांना झोपवतो आणि संजयला घेवुन यानाच्या शोधात निघतो. संजय एक अंतराळ शास्त्रज्ञ असतो त्यामुळे परग्रहवासीला खात्री असते कि संजयच त्याला मदत करेल. थोडं अंतर चालून गेल्यावर झाडीं मध्ये ते यान त्याना अडकलेले दिसते. दोघेहि भराभर झाडी दूर सारून यान मोकळया जागेवर घेवुन येतात. परग्रहवासी च्या सिन्ग्न्लस चा प्रभाव आजुनही संजय वर असतो. संजय तबडतोब यान दुरुस्त करण्यास सुरुवात करतो.
----------------------------------------------
ईकडे जॉन जागा झाल्यावर रिचर्ड आणि मधुबालेसह तो संजय च्या शोधात हिंडकारण्यात जातो. त्यांना सुद्धा संजयचे सापडणे महत्वाचे असते. म्हणजे मग त्यांना त्यांची सुटका बेन जॉन्सन पासून करुन घ्यायची असते.

--------------------------------------

लोकहो आता धागा बरोबर जुळवुन आणला आहे. चालू करा सूतकताई..........:):)

पार्नू मी रुमाल टाकला म्हणजे मी लिहिणार. वाचलं नाही का आधी इतरांनी पुढचा भाग लिहायच्या आधी दरवेळी रुमाल टाकलाय ते.

संयोजक माझे पोस्ट लिहून तयार आहे. काय करायचे?

parnu,

STY लिहाताना दोन जणांचे पोस्ट एकाच वेळी येऊन गोंधळ होऊ नये म्हणून नंबर लावायची पध्दत सहभागींनी स्वतःहून सुरु केली आहे. आपल्या आधी hawa_hawai ह्यांनी असा नंबर लावला होता. त्यामुळे आपण लिहिलेली सगळ्यात शेवटची पोस्ट ग्राह्य धरता येणार नाही. hawa_hawai ह्यांनी त्यांचा भाग लिहिल्यानंतर आपण नंबर लावून (म्हणजेच रुमाल टाकून Happy ) पुढचा भाग लिहावा ही विनंती.

hawa_hawai,
आपण आपला लिहून तयार असलेला भाग पोस्ट करून ही गोष्ट पुढे न्यावी ही विनंती.

तर लोकहो हिन्डलता आणि संजय यांना वाजत गाजत हिडिम्बा मंदिराकडे नेण्यात आले हे तुम्ही वाचले.आणि मग लग्नाचे बाजुलाच राहून एकदम हिन्डलता शुद्धिवर येते आणि हिंडकारण्यात सैरभैर फिरू लागते असे वाचल्याने तुमचा गोंधळ उडाला असेल. पण या मधील घटना घडल्या त्या अशा....

संजय आणि हिन्डलता यांना घेऊन वाजत गाजत बोंबलनृत्य करत सगळी जनता मंदिराकडे निघते. संजय शुद्धिवर आल्याने हिन्डलता अतिशय खुशीत असते. पण तरी राजवैद्यांनी जर का संजयचा आजार गंभीर आहे म्हणून सांगितले होते तर हा अचानक बरा कसा झाला? राजवैद्य चुक ठरले का? ही शंका तिच्या मनात असते. तरी त्या कडे दुर्लक्ष करून ती प्रेमाने संजय कडे बघते. संजयला समजतच नसते की ही मिरवणु़क कशाची निघाली आहे. आणि ही बया आपल्याकडे लाजत लाजत का बघतेय. पण तितक्यात ती वरात मंदिरात पोचते. राजा बोंबलहिन्डेश्वर संजयच्या जवळ येऊन त्याच्या हाता मधे मंगळसुत्र ठेवतो आणि हिन्डलतेच्या हातात कुत्र्याचा पट्टा सदृश दिसणारा मंगळपट्टा ठेवतो आणि हे तुम्हाला एकमेकांना बांधायचे आहे अशा अर्थाने खाणाखुणा करतो. संजय हे बघून पुर्णपणे हादरतो. आणि त्याच क्षणी त्याला एकदम पोटात आग आग जाणवू लागते. जॉन आणि रिचर्डच्या गोळीने उशिरा का होईना पण आपला शेवटचा गूण दाखवायला सुरूवात केली असते.

संजय एक जोरदार 'हिंडरकाळी' फोडतो आणि तोंडाने हातभार जिभ बाहेर काढत खायला काय मिळतेय ते बघू लागतो. स्वतःच्या हातात त्याला मंगळसुत्र दिसते. ते तो लगेच तोंडात टाकतो. मग हिन्डलतेच्या हातातला मंगळपट्टा तोही चावून चावून खातो. आणि मग एकमेकांना घालायचे झेन्डूचे हार खाऊन फस्त करतो. तेव्हड्यात त्याला आत मांडवातून अन्नाचा सुग्रास वास येऊ लागतो. तेव्हा तो त्या मागावर जातो. तिथे सर्व हिंड जनतेसाठी लग्ना निमित्त जेवण बनून मोठमोठ्या भांड्यां मधे तयार असते. एक एक करत त्या मोठमोठ्या पातेल्या कढयातले अन्न तो फस्त करू लागतो.

संजयचा हा भयानक अवतार बघून हिन्डलतेला खात्री पटते की याचा आजार पुर्ण पणे बरा झाला नाही. राजवैद्य म्हणाले तेच खरे निघाले. ती संजयला अडवायला पुढे जाते. तर संजय तिलाच एका हातात धरून खाण्यासाठी उचलतो.... पण...पण त्याच क्षणी गोळीचा प्रभाव पुर्णपणे संपतो. आणि आपलेच वजन सहन नं साभाळता आल्याने संजय जमिनिवर कोसळतो. झाल्या प्रकाराने हिन्डलता पण जबर धक्का बसून बेशुद्ध होते.

पुर्ण लग्नाचा या भयानक प्रकारामुळे विचका झालेला बघून हताश होऊन राजा बोंबल्हिन्डेश्वर जनतेला आपपल्या घरी जायला सांगून दोघांनाही राजवाड्यात घेऊन येतो.

थोड्यावेळाने हिंडलता शुद्धीवर येते, पण ती फारच कष्टी होते. राजवैद्य गेल्याने आता संजयला बरे करण्याचा मार्ग खुंटला असे वाटून ती सैरभैर होते. इकडे संजयला जाग आली आहे याचा तिला पत्ताच नसतो! ती हिंडकारण्यात वेड्यासारखी भटकू लागते...

आता सगळे धागे जुळले असे वाटत असेल तर

"रिचर्डची अवस्थाही वेगळी नसते. त्याला तर ती अप्सराच वाटते! .......स्वर्गातील तारका ssss कोण ती रंभा की मेss नका...."

या पुढे लिहा Happy

मधुबालाला दूरून बघताना रिचर्ड आणि जॉन पुरते पागल झाले होते !
हिला म्हणावं तरी काय, रंभा ? उर्वशी ? कि निळ्या पाण्याचय बॅ़ग्राउंड ला दिसणारी जलपरी कि तेजःपूंज केतकी वर्णाची तेजोपरी ??

रिचर्ड आणि जॉन नुसते बघत राहिले पण जस जशी ती बोटीतून उतरून यांच्या दिशेनी जवळ यायला लागली तसा दोघांना काही तरी विचित्र निगेटिव व्हाइब्स यायला लागले !

दूरून दिसलेले तिचे ते तेजोमय सौंदर्य हळुहळु गूढ, निर्जीव वाटायला लागले !
तिचे ते गहिरे डोळे हिरव्या सापा सारखे भयनाक गर्द हिरवे वाटू लागले आणि त्यावर निळा विषारी भासणारा धुसर आय मेक अप.. तिची नजर एखाद्या भकास घुबडा सारखी स्तब्ध आणि तिचे लाल ओठ एखाद्याचे रक्त चाटल्या सारखे विकृत लाल ,तिचा तो दूरून भासलेला केतकी वर्ण अता इतका नि:स्तेज जणु रक्त आटल्या सारखा वाटला !

तिचे केस एलेक्ट्रिक करंट लागल्या सारखे आणि तिची चंदेरी नखं धारेदार हत्यारा सारखी तीक्ष्ण !
तिचे शरीर सुंदर असले तरी एखाद्या mannequin सारखे कडक निर्जिव !
ती जसजशी जवळ येतेय तसा आजु बाजुला अंधार वाढतोय असा भास होउ लागला..

ये रात ये अंधेरा
जली कि चिपकली रात
ना उगली ये जाये ना निगली ये जाये
ये काली जहरीली रात
पल पल बलखाती
पल पल उलझाती
पलके झिपकती ये रात
सन्नाटे कि सेज पे सोयी
साप सी सरकती ये राह
ये रात, ये अंधेरा...

तिच्या या सगळ्या निर्जीव appearance मधे एकच गोष्ट लखलखत होती, तिची हिर्‍याची बेली बटन रिंग !
जस जशी ती जवळ यायला लागली तसा त्या बेली बटन पिअर्सिंग चा हिरा जास्त च शाइन मारायला लागला !

रिचर्ड -जॉन चे डोळे त्या हिर्‍या कडे पाहून दीपून गेले , अशा कॉनकेव्ह बेली असलेल्या पोरी म्हणजे रिचर्ड आणि जॉन चा वीक पॉईंट!!
पण हळुहळु तिच्या बेली बटन डायमंड कडे पहताना तेजःपूंज हिर्‍याच्या प्रकाशानी त्यांना भोवळ येउ लागली.
आपल्याला मायबोलीवर वाटणारी साधी सुधी मधुबाला अशी असेल अशी अजिबात कल्पनाच केली नसती..हळु हळु जॉन आणि रिचर्ड चक्कर येउन जमिनिवर पडले आणि बोटीतून उतरलेली ती त्यांच्या पाशी येउन थंड नजर टाकून हसली आणि निर्विकार पण पुटपुटली ,
"मधुबाला' ??
हाच आय डी होता ना मायबोली वर?
जिच्या विचारपूस मधे आपल्याला इथला पत्ता समजला.
मूर्ख रिचर्ड आणि जॉन , त्यांना माहित नाही त्यांच्या मूर्खपणानी मला किती फायदा झालाय !
कोण त्या मधुबालाला इथे यायचा पत्ता आणि सगळे 'कॉन्फिडेन्शियल मॅटर' प्रायव्हेट मेसेज करायचा सोडून विचारपूस मधे लिहून हे दोघे मोकळे झाले आणि मधुबालाच्या विचारपूशीचा भयानक टी आर पी वाढला!
ज्या मधुबालाची ते वाट पहात आहेत तिची फ्लाइट कधीच अफ्रिकेच्या या किनारी पोचू शकणार नाही !
अता मला 'त्याला' घेउन लवकरात लवकर आमच्या जगात गेलच पाहिजे आणि तमाम मनुष्यांना दाखवून दिलं पाहिजे कि आम्ही पृथ्वीला कधीच "अपराजीत" राहु देणार नाही, खरे अपराजीत कोण ते अता पृथ्वी वासीयांना दाखवायची वेळ आली आहे"

************************************************

तिने तिचा लेदर च जॅकेट काढलं आणि खांद्यावरच्या कंट्रोल पॅनलमधले बटन दाबले. हळूहळू तिच्या चेहर्‍यावरचा स्त्री चा मास्क वितळायला लागला आणि तिने आपले मूळ रूप धारण केले!
आपण मधुबाला नाही याची तिने रिचर्ड्-जॉन ला थोडीही शंका येऊ दिली नव्हती. मायबोली या एका मराठी साईटमुळे शुध्द मराठी बोलता येऊ लागले होते. आता या बेटावरच तिला "तो " आणि ती तबकडी परत मिळणार होती...म्हणजे तीच एक आशा होती. त्याला घेउन आपल्या ग्रहावर परत जायचा मार्ग सोपा होणार होता. इथपर्यंत येण्याचे काम तर झाले होते!
आता "त्याला" आदिवासींच्या तावडीतून सोडवु शकेल अशा एकमेव संजयवर तिची पुर्ण मदार होती.

*************************************************

मंडळी,

आपल्या गणेशोत्सवाची सांगता अमेरीकेतल्या पश्चिम किनार्‍यावरच्या वेळेनुसार गुरुवार दिनांक ३ सप्टेंबर रोजी संध्याकाळी होणार आहे आणि त्याच बरोबर ह्या STY चा शेवट सुध्दा. ह्या STY चा शेवट मायबोलीकर लालू, गणेशोत्सव सांगता होण्याच्या आधी लिहिणार आहेत. ज्यांना घाटातली वळणं, जोरदार धक्के, हास्याचे फवारे किंवा भितीदायक घटना उभ्या करायच्या आहेत त्यांच्यासाठी अजून एक दिवस शिल्लक आहे. तेव्हा करा सुरु सुतकताई, कारण वेळ थोडा आहे !
आणि हो, आपला पोस्ट लिहिण्याआधी रुमाल टाकायला तसेच आधी कोणी रुमाल टाकलेला नाही ना ह्याची खात्री करायला मात्र विसरू नका. Happy

गणपती बाप्पा मोरया !

खंरंतर काय झालं कि मी जेंव्हा "रुमाल घेतला" असे लिहिले त्या वेळेपर्यन्त तरी hawa_hawai चा रुमाल नव्हता. मी ते लिहुन पोस्ट करे पर्यन्त हवा ने रुमाल टाकला. आता लक्शात आले कि रुमाल घेतला तर ते ताबडतोब पोस्ट करावे म्हणजे गोंधळ होणार नाही. Happy Happy

संजय आपले टमटमीत फुगलेलं पोट पकडून कसाबसा उठतो. आसपास विखुरलेलं सामान आणि पोटातून उठणार्‍या कळा यावरून संजयला कळून चुकते कि आपण बरेच अपाचक पदार्थ खाल्लेले आहेत. ते बाहेर पडले नाहीत तर आपण काही जगणार नाही. नक्की हा सगळा त्या गोळीचाच प्रभाव होता . उलट्या काढून तो आपले पोट रिकामे करून घेतो.

हिडींब मंदीरात तो सोडला तर आता कुणीही नव्हतं. मंदीराची रचना फारच चमत्कारिक होती. त्याने कधीच अशा प्रकारची इमारत आधी पाहीली नव्हती. भव्य अंडाकृती छताला आधारासाठी एकही खांब नव्हता.इतके उत्कृष्ट रचना असलेलं मंदीर या आदीवासी लोकांनी कसे बांधले हेच त्याला कळत नव्हते. मंदीराला असलेले काळसर निळे दगड आरशासारके चकाकत होते.जवळ जाउन निरिक्षण केल्यावर संजयच्या लक्षात आले कि दगडांवर ठीकठीकाणी काही आकृत्या कोरलेल्या आहेत. संजय त्या आकृत्यांचा अभ्यास करायला लागला. त्याला अंधारकोठडीत भेटलेल्या त्या गूढ माणसासारखा सुट घातलेले अनेक लोक त्या आकृत्यांमधे होते. प्रत्येक चित्रामधे अशाच सुटातली माणसे होती.एका चित्रासमोर येऊन संजय थबकला.त्या चित्रात असे बरेच लोक सूट घालुन जमलेले होते...आणि त्यांच्यासमोर एक वटवाघळासारखे पंख असलेला विचित्र जीव होता. शेजारच्या एका एका चित्रात काही माणसे होती. सर्व माणसांनी हिंडकारण्यातल्या लोकांसारख्याच गळ्यात कवड्याच्या माळा घातलेल्या होत्या.त्या सर्व माणसांना सूटवाल्या लोकांनी वेढलेलं होतं. आजुबाजुला आकाशात तबकडीसारख्या काही वस्तू हवेत तरंगत होत्या. पुढच्या एका चित्रात एक वटवाघळासारख्या जीवाची आणि माणसांची लढाई दाखविलेली होती.

संजयला हळूहळू सर्व प्रकार लक्षात यायला लागला होता. त्याचे कुतूहल वाढत होते...प्रत्येक चित्राबरोबर ह्रदयाचे ठोके वाढत होते. अंधारकोठडीत भेटलेला तो जीव म्हणजे नक्की मनुष्यच होता की अजुन काही! संजयने तर त्याला इतक्या जवळून पाहीले होते.नाही...नक्कीच काहीतरी भानगड असली पाहीजे!

संजयला आता भीती वाटायला लागली. या चित्रात तर स्पष्टपणे एक वटवाघळासारखा प्राणी त्या सुटामधुन बाहेर येताना दाखविलेला होता. त्याला काही आदीवासी भालेदारांनी घेरलेलं होतं. पुढच्या चित्रात त्या प्राण्याचा छीन्नविछीन्न देह होता. त्याचे पंख छाटलेले होते!

संजयने सगळी चित्रे पाहून घेतली. एका दगडाजवळ येऊन तो थांबला. त्या दगडातून फुटभर बाहेर आलेल्या सुळक्याच्या टोकावर त्या प्राण्याचा मुखवटा कोरलेला होता. दबकतच संजयने तो सुळका हलवला. आणि एकदम किंsssssss असा कर्कश आवाज झाला! संजयला घाम फुटला..काय होतेय ते कळायच्या आत संजयच्या पायाजवळच्या जमीनीला एक चीर पडली. त्यातून निळसर प्रकाशाचा प्रखर झोत बाहेर पडला.करकर आवाज करत ती चीर मोठी झाली आणि आतले दिसायला लागले.
समोर एक उतरता जीना होता. संजयने जीन्याच्या पायर्‍या उतरल्या. खाली उतरल्यावर समोर जे दृष्य दिसले ते पाहून त्याचे डोळे विस्फारले. हिर्‍यांचे ढीग चमचम करत होते. खच्चून भरलेल्या पेटार्‍यांमधुन सुवर्णालंकार बाहेर डोकावत होते! संजयच्या मनातली भिती कुठल्या कुठे पळून गेली. त्याने हिरे हातात घेवून पाहीले...पेटारे उघडून पाहीले.त्याला हा गुप्त खजीना सापडला होता...!

तेव्हढ्यात पुन्हा किंssssssss आवाज झाला आणि करकरकर करत तळमजल्याचे दार बंद झाले. संजयचे धाबे दणाणले. तो धावतच जीना चढून वर गेला. रस्ता बंद झालेला होता!
आता काय करायचे ? असा विचार करत असतानाच संजयच्या पाठीवर पाठीमागुन कोणीतरी हात ठेवला.
दचकुन संजयने वळून पाहीले तर एक आदीवासी त्याच्यासमोर उभा होता.
"तुम्ही कोण ?"
"मी?...मी या हिंडकारण्याचा राजवैद्य!"
"तुम्ही इथे आत कसे आलात्...प्लीज मला बाहेर जायचे आहे....दुसरा काही रस्ता आहे का ?"
"नाही...मीही तेच शोधत आहे..!"
"अरेच्च्या पण तुम्ही मराठी कसे काय बोलताय?"
"कारण मी मराठीच आहे!"
मग राजवैद्याने आपली सगळी कहाणी संजयला सांगीतली. कसे ते खजिन्याच्या शोधात या बेटावर आले..इथे येऊन हिंडकारण्याचे राजवैद्य कसे बनले...आणि आता या तळघरात कसे बंद झाले.

"मला तर काहीच कळत नाहीये वैद्यकाका....हे मंदीर... हा खजिना...तो विचित्र जीव..काय भानगड आहे ही?" संजयने हताश होऊन राजवैद्यांना विचारले.
"सांगतो...मला हिंडकारण्यात येऊन ७ वर्षे झालीत्..त्यामुळे इथल्या बर्‍यापैकी गोष्टी मला समजल्या आहेत. ते विचीत्र जीव परग्रहावरूनच आलेले आहेत. हजारो वर्षांपासुन त्यांचे इथे येणे जाणे चालू होते.
हिंड जनता आणि त्यांचे संबंध आधी मैत्रीचे होते. हे जे हिंडींबमंदीर आहे तेही त्यांनीच बांधलेलं आहे.त्यासाठी वापरलेले सर्व दगड खास त्यांच्या ग्रहावरून आलेत. या दगडांमधे चुंबकासारखीच आकर्षण शक्ती आहे. पण ते फक्त एकमेकांना चिकटतात. लोह धातुला नाही !
इथे तळमजल्यावर त्या परग्रहवासीयांची खास प्रयोगशाळा होती. हा जो खजीना आहे तो त्यांनीच आपल्या ग्रहावरून आणला होता. ज्याची तीथे मातीची किम्मत आहे. पृथ्वीवरची त्यांच्या उपयोगाची एकमेव गोष्ट म्हणजे मीठ! मीठाचे ते नक्की काय करतात ते मला माहीत नाही! पण त्यांचा हा हिंडवासियांसोबत असलेला व्यापार हजारो वर्षांपासुन चाललेला होता. पण बोंबलहिंडेश्वरचा आजोबा फार हलकट मनुष्य होता. त्याच्या हव्यासामुळे हे संबंध बिघडले ! शेवटी या परग्रह वासीयांनी पृथ्वीवरून काढता पाय घ्यायचा निर्णय घेतला. त्यांनी इथल्या लोकांकडचा सारा खजिना हस्तगत केला आणि तो या प्रयोगशाळेत आणुन टाकला. त्यावरून त्यांच्यामधे आणि इथल्या लोकांत मोठी लढाई झाली. अनेक हिंडवासी मेले...इथला राजाही मेला...काही परग्रहवासीही मेले!

जाताजाता त्या परग्रहवासीयांनी इथल्या लोकांचं ब्रेनवॉश केलं आणि त्यांना यातलं काहीच आठवणार नाही असं करून सोडलं! हा खजीना त्यांनी इथे बंदीस्त केलाय ज्याच्या आत मनुष्य येऊ शकतो पण बाहेर जाऊ शकत नाही. याचा कोड बहुतेक अपघाताने इथे आलेल्या त्या परग्रहवासीयालाच माहीत असेल पण आपण त्याला भेटणार कसे ?"
"काहीतरी मार्ग निघेल नक्कीच " असे म्हणत असतानाच संजयची नजर भींतीवर टांगलेल्या परग्रह वासीयांच्या सुटाकडे गेली आणि त्याचे डोळे आनंदाने चमकले!

***
परग्रहावरून आलेल्या त्या स्त्रीने दोघा बेशुद्ध पडलेल्या लोकांच्या डोक्यावर हात फिरवून त्यांचे ब्रेनवॉश करुन टाकले.....ज्यामुळे त्यांना गेल्या २० वर्षात घडलेलं काहीच आठवणार नव्हतं!
मग तीने हिंडकारण्याच्या दिशेनं कूच केलं!

हवे.. करावे तसे भरावे.. सुरूवातीला माझ्या रूमालाआधी घुसलीस ना आता घे.. Happy
असो मस्त लिहिताय लोकहो.

LOL निरजा, पण तू नव्हतीस ना तेव्हा जागी Happy (तु पुढचे लिहीले असतेस तर मी नक्कीच माझे पोस्ट काढून घेतले असते.)
पार्नू तुझे काहीतरी कन्फ्युजन होतय but Lets not get into that any further. तु लिहित्येस का पुढचे?

डिजे, प्रकाश मस्त लिहिलं आहात. एन्ड काहीतरी जबरी हवा हा याचा!!

>>"काहीतरी मार्ग निघेल नक्कीच " असे म्हणत असतानाच संजयची नजर भींतीवर टांगलेल्या परग्रह वासीयांच्या सुटाकडे गेली आणि त्याचे डोळे आनंदाने चमकले!

संजयने घाईघाईने उठून तो पोशाख हातात घेतला आणि तो त्याचे काळजीपूर्वक निरीक्षण करु लागला. तो पोशाख तसा अद्भुतच होता. त्यावर विशिष्ट कलाकुसर केल्यासारखी दिसत होती पण जवळून पहायला गेलं तर ती मंद निळ्या आणि किरमिजी रंगांची किरणे फेकणारी छोटी बटणे होती. त्या सर्व बटणांचा एक विशिष्ट क्रमही होता. संजयने त्यांतल्या एका लांबुळक्या क्रमावर हात फिरवताच तो पोशाख सुळकन् उघडला गेला. राजवैद्य इतका वेळ संजय काय करतोय याचे निरीक्षण करत होते पण अचानक पोशाख उघडला गेल्याचे पाहताच ते पटकन वळून दुसर्‍या दिशेने बघू लागले. का कोण जाणे, पण संजयला त्याच वेळेला त्यांच्या चेहर्‍यावर भितीयुक्त आश्चर्याचे भाव पाहिल्याचा त्याला भास झाला.
**
दांशकाल विचारांत गढून गेला होता. तसं संजयला बघितल्यावरच त्याच्या मनात शंकेची पाल चुकचुकली होती. पण आता मात्र पृथ्वीवरच्या त्याच्या कामाचा शेवट जवळ आला आहे याची त्याला खात्री पटू लागली होती.
**
"अरे नको घालूस तो पोशाख, उगाच काही विचित्र झाले म्हणजे. आण तो इकडे, मी बघून देतो" राजवैद्य असे म्हणतायत तोवर संजयच्या डोळ्यांत एक वेगळ्याच प्रकारचा आत्मविश्वास चमकत होता. राजवैद्य काही करणार त्याच्या आत पटकन् पोशाखाकडे वळून त्याने तो हातात घेतला आणि अंगावर चढवायला सुरुवात केली. आणि अहो आश्चर्य! तो पोशाख जणू काही जिवंत असावा तसा त्याच्याभोवती मोजमापं बदलंत गेला आणि जणू काही दुसरी त्वचा असावी इतपत व्यवस्थित अंगावर बसला. तो पूर्वीचाच क्रम त्याने सहज विरुद्ध दिशेने फिरवताच त्यातली मधली फटही अशी बंद झाली की जणू काही तो कधी त्याच्या शरीरावरून काढलाच नसावा.
"फार हलकं हलकं वाटतंय यात.. " आपल्या अंगावरच्या पोशाखाकडे अभिमानाने बघत थोड्याशा घट्ट असलेल्या आपल्या दंडावरील कलाकुसरीवर हात फिरवत संजय राजवैद्यांकडे वळून म्हणाला. पण अचानक, राजवैद्यांच्या डोळ्यांतले आणि चेहर्‍यावरचे भाव बदलू लागले आणि ते डोळे विस्फारुन संजयकडे बघतच राहिले!

***
उलुपीच्या एका चेहर्‍याने मागे वळून अजूनही बेशुद्ध असलेल्या जॉन रिचर्डकडे बघत हलकसं स्मित केलं, तिच्या त्या भयाण वटवाघळासारख्या चेहर्‍यावर ते स्मित तेव्हाही भयंकरच वाटलं. हिंडकारण्यांत शिरताना तिला आधीचे दिवस आठवले. पृथ्वीवरच्या मिठांत सापडलेल्या अद्भुत गुणधर्मांचा वापर करुन चालवलेल्या प्रचंड यंत्रांतून मिळणारी ऊर्जा कुंभिपाक ग्रहाचे पूर्ण कामकाज चालवत होती. पण हिंडकारण्यवासींशी झालेल्या युद्धात त्यांच्या नेत्याचा, शंखनादाचा, मृत्यु झाल्यानंतर मिठाचा पुरवठा थांबला होता. कुंभिपाक परत एकदा विनाशाच्या उंबरठयावर होता. आता प्रचंड वाढलेल्या तापमानापासून, उकळत्या समुद्रांपासून, ज्वालामुखींपासून रक्षण करण्यासाठी तिथल्या प्रचंड बुद्धिमान रहिवाशांचा शेवटचा आधार शंखनादपुत्र अर्हिताक्ष, तिचा प्रियकर, हाच होता. शंखनादाचा दुसरा मुलगा शंखजय, ज्याला मिळणार्‍या भविष्यांतल्या प्रचंड शक्तीबद्दल म.न.सी ऋषीने भाकीत केले होते, लहानपणीच पृथ्वीवरच्या एका वादळात नाहीसा झाला होता. त्यामुळे आता अर्हिताक्षावर सर्वांची मदार होती खरी, पण तो कमकुवत होता याची उलुपीला पूर्ण कल्पना होती. शास्त्रज्ञांच्या सभेत अर्हिताक्षास मीठ आणण्यास पाठवण्याचा निर्णय घेताना तिने मोठ्या दु:खी अंत:करणाने ऐकले तेव्हां तिच्या तिसर्‍या डोळ्याची चौथी पापणीही किंचित फडफडली होतीच. पण त्याकडे तिने पूर्ण दुर्लक्ष केले आणि त्याचाच तिला आता पश्चाताप होत होता. विश्वातल्या कुठल्याही जलाशयातून दुसर्‍या जलाशयांत मनोवेगाने संचार करु शकत असल्याने आणि इच्छाधारी असल्याने तिने स्वत: पृथ्वीवर जाण्याची तयारी दाखवली होती. पण निष्ठूर शास्त्रज्ञ दांशकाल, जो स्वत: त्या विद्येत आणि विविध औषधींच्या प्रयोगांत प्रवीण होता, त्याने ऐन वेळेस विरुद्ध मतदान केले आणि तिच्या मनसुब्यावर सोमरस ओतला होता. पण ते शेवटचेच! अर्हिताक्ष पकडला गेला हे ऐकताच तिने किंचितही वेळ न गमावता कुंभिपाकावरुन पृथ्वीकडे प्रयाण केले होते.
उलुपीचं एक मस्तक विचारांत पूर्ण गढून गेलं असतानाच दुसर्‍या शिरावरच्या तोंडाने हलकेच शीळ घातली आणि ती भानावर आली. सरपटत ती कधी हिडींब मंदिराबाहेरच्या विस्तिर्ण जलाशयाजवळ पोहोचली ते तिला कळलंही नव्हतं. तिने इकडेतिकडे पहात कोणीही नसल्याची खात्री करुन घेतली आणि त्या "मंदिरा"च्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या एका गोमुखामध्ये आपली सळसळणारी शेपटी सरकवली.

****
रीचर्ड हळूहळू भानावर आला तेव्हा जॉन उठून त्याच्याकडे बघत होता.
"रीचर्ड, रीचर्ड , ऊठ." जॉन एकदम हबकून गेला होता. रीचर्डलाही काही कळत नव्हते. त्याच्या मनगटावरचे घड्याळ बरोब्बर वीस वर्षांनंतरची तारीख, २१-१२-२०१२, अशी दाखवत होते. त्याला आता काहीच समजेनासे झाले. त्याच्या आठवणीप्रमाणे गेल्याच आठवड्यात त्याच्या प्रयोगशाळेमध्ये काम करत असताना एक फोन आला होता. ते प्रयोग करत असलेल्या अटलांटीक महासागरातील हिंडकारण्य नावाने ओळखल्या जाणार्‍या बेटाभोवती सापडणार्‍या मिठाच्या एका प्रकाराबद्दल काही गुप्त आणि अतिमहत्वाची माहिती देण्यासाठी एका व्यक्तीने त्या दोघांना फोन करुन मिशिगन लेकजवळ बोलावले होते. त्या क्षारांमध्ये ऊर्जा निर्माण करण्याची अद्भुत शक्ती आहे हे त्यांना तोवर समजले होते आणि त्या ऊर्जानिर्मितीचे काही प्रयोगही सफल झाले होते. पण त्या मिठाचे साठे वीस वर्षांनी प्रक्रिया घडून विनाशकारी प्रलय घडवून आणतील असं त्या व्यक्तीचं म्हणणं होतं. ते ऐकल्यावर जॉन खूपच चिंताक्रांत झाला होता पण रीचर्डला मात्र त्या व्यक्तीबद्दल शंका होती. स्वत:ला दांशकाल असे विचित्र नाव देणारी व्यक्ती वेडीच असेल असे त्याचे मन म्हणत होते. तो स्वतः एक मोठा वैद्य आहे असे दांशकालाचे म्हणणे होते पण याच्या पुढची काहीही माहिती सांगण्याआधीच एक छोटा कागद हातात देऊन तो तलावात उडी मारुन त्यांच्या डोळ्यादेखत नाहीसा झाला होता. त्या कागदावरची अद्भुत आकडेमोड आणि लिहिलेली काही प्रमेयं बघून मात्र जॉन पूर्णपणे भारुन गेला आणि शेवटी रीचर्डला हिंडकारण्याला येण्यासाठीची तयारी करावीच लागली होती.

****
जगत्कल्याणाच्या "भूमिके"तून मायबोलीवर वावरणार्‍या मधुबालेने हिंडकारण्याच्या किनार्‍यावर पाऊल ठेवले तेव्हा तिथली मऊसूत वाळू तिच्या पायाला गुदगुल्या करुन गेली.
कोणास ठाऊक का, पण तिच्या तिसर्‍या डोळ्याची चौथी पापणी आज फडफडत होती.

कुंभिपाकवाश्यांची अर्हिताक्ष, उलीपी, दांशकाल नावं सही आहेत! Happy क्ष जबरदस्त !! लालूचा २१-१२-२०१२ चा आकडा आता नीट जुळला!
पर्णू क्षनी लिहीलंय ...STY!

"पण निष्ठूर शास्त्रज्ञ दांशकाल, जो स्वत: त्या विद्येत आणि विविध औषधींच्या प्रयोगांत प्रवीण होता, त्याने ऐन वेळेस विरुद्ध मतदान केले आणि तिच्या मनसुब्यावर सोमरस ओतला होता. पण ते शेवटचेच! अर्हिताक्ष पकडला गेला हे ऐकताच तिने किंचितही वेळ न गमावता कुंभिपाकावरुन पृथ्वीकडे प्रयाण केले होते."
--------------------------- आता पुढे..................

अर्हिताक्ष पकडला गेला हे ऐकल्यावर दांशकालाने सुद्धा पृथ्वीकडे प्रयाण केले होते. त्याला अर्हिताक्षाविषयी काहि फार प्रेम वगैरे नव्हते पण अर्हिताक्ष साठी तो गेला नाही तर इतरांना संशय आला असता कि शंखनादाच्या मृत्यु मागे अप्रत्यक्षपणे त्याचाच हात होता आणि म्हणुनच त्याने हिंडकारण्यात जाण्याचा निर्णय घेतला. तसे हिंडकारण्यवासीयांशी झालेल्या युदधा मुळे त्याला आपल्या प्रेयसीला म्हणजेच बोम्बलहिन्डेश्वराची बहिण बोम्बललता हिला हिंडकारण्यातच सोडून यावे लागले होते. बर्याच वर्षांत तिची भेट झाली नव्हती. हिंडकारण्यात पोहोचल्यावर दांशकालाने ताबडतोब बोम्बललतेशी संपर्क साधला आणि बिनबोभाटपणे बोम्बलहिन्डेश्वराच्या राज्यात राजवैद्याचे स्थान पटकावले. अप्रत्यक्ष पणे तो अर्हिताक्षाची सुटका होउ नये यासाठी प्रयत्न करत होता. दांशकालाच्या अश्या वागण्याला अजुन एक कारण होते की त्याची आई बोम्बलहिन्डेश्वराच्या वंशातील होती आणि त्याच्या वडिलांनी तिला फसवुन दांशकालाला तिच्यापासून हिरावुन घेतले होते.

------------------------------------------------

ईकडे रीचर्ड व जॉन प्रयोगशाळेतून बराचकाळ गायब झाल्याने बेन जॉन्सनला संशय येतो की काहितरी गडबड आहे याची. तसेच बरेच दिवसांत त्याचा दांशकालाशी संपर्क झाला नव्हता. त्याच्यासाठी दांशकाल महत्वाचा होता कारण त्यानेच मीठा पासून उर्जानिर्मिती कशी करता येते याचं गुपित सांगितलं होतं. आणि त्यांच्या प्रयोगशाळेतील प्रयोगांच्या यशस्वितेची सगली मदार दांशकालावर होती. बेन हा पूर्वी अमेरिकन राष्ट्रिय रासायनिक प्रयोगशाळेत शास्त्रज्ञ म्हणुन काम करत होता. पण तिथे त्याने त्याच्या एका सहकारी शास्त्रज्ञाचा मह्त्वाचा शोध चोरून स्वतःच्या नावावर खपवला होता. त्यामुळे त्याला तिथुन काढुन टाकले होते. रीचर्ड व जॉन याना त्याने फसवुनच हिंडकारण्यात आणले होते आणि म्हणुन तो त्यांना internet वापरू देत नव्हता. त्यामुळे बेन दांशकाल आणि रीचर्ड व जॉन या तिघांच्या शोधात बाहेर पडला.

---------------------------------------------------
"उलुपीचं एक मस्तक विचारांत पूर्ण गढून गेलं असतानाच दुसर्‍या शिरावरच्या तोंडाने हलकेच शीळ घातली आणि ती भानावर आली. सरपटत ती कधी हिडींब मंदिराबाहेरच्या विस्तिर्ण जलाशयाजवळ पोहोचली ते तिला कळलंही नव्हतं. तिने इकडेतिकडे पहात कोणीही नसल्याची खात्री करुन घेतली आणि त्या "मंदिरा"च्या प्रवेशद्वारापाशी असलेल्या एका गोमुखामध्ये आपली सळसळणारी शेपटी सरकवली."
................................आता पुढे...............

उलुपीची शेपटी गोमुखातुन आंत गेल्यावर तळ्घरातील लाल दिवे उघड्झाप करायला लागतात आणि दांशकालाला कोणीतरी कुंभिपाकवाश्यांपैकी येत आहे असे लक्षात आले. त्याने ताबडतोब तळघराच्या एका अंधार्या कोपरयाचा आधार घेतला लपण्यासाठी. संजय त्या चकचकीत पोषाखा मधे आजीबात ओळखु येत नव्हता. त्यामुळे उलुपीला वाटले कि आपलाच साथीदार आहे. आणि ती कुंभिपाकी भाषेमध्ये त्याच्याशी बोलू लागली. त्या चकचकीत पोषाखाचा एक परिणाम असा झाला की संजयला कुंभिपाकी भाषा समजू लागली.

आता उलुपी संजयला काय सांगते? बेनला दांशकाल, रीचर्ड व जॉन भेटतात का? तसेच अर्हिताक्षाचं काय होतं.....हे कळ्ण्यासाठी चालू करा पुढची सुतकताई..........:) Happy

मला माबो वर type करण्याची सवय नसल्याने आणि बरेच धागे वेगवेगळ्या प्रकाराने जोडायचे असल्याने एक तास लागला Wink Wink

Happy मी अजून वाचले नाही सगळे.
पण एकदा टाकलेल्या भागाच्या कथेत एडिट करुन बदल करु नका, बाकी टायपो दुरुस्ती इ. चालेल. एखाद्याने वाचून पुढचे लिहायला घेतले असेल तर पुन्हा घोळ होईल.

ज्यांना लिहायचे त्यांनी आज संध्याकाळी ७ (US EST)पर्यंत लिहा कृपया. संयोजक, चालेल का हो?

Pages