"अपराजीत" गद्य STY - २

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 00:23

खालच्या डोहाशेजारी "आ" वासून पडलेल्या दोन मगरी पाहून, त्याने थेट धबधब्याखाली अंघोळ करावी असे ठरविले. डोंगरकड्यावरून कोसळणार्‍या त्या धबधब्याखाली अंघोळ करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. तिक्ष्ण बाणांसारखे टोचणारे पाण्याचे थेंब उघड्या शरीरावर झेलत संजय त्याचा पाठीमागच्या आठ दिवसांमधला जिवनमृत्युचा संघर्ष पार विसरून गेला! आठ दिवस त्याने या निर्जन बेटावर स्वतःचे आस्तित्व टिकवून ठेवले होते. स्वप्नांतही त्याने असा कधी विचार केलेला नव्हता की, आपल्याला आयुष्यात हा अनुभव कधी येईल! एक दिवस त्याला जिवंत प्राण्याला मारून खावे लागेल..........!

अंघोळ झाल्यावर त्याने शेजारच्या दगडावर ठेवलेले कपडे उचलले. या आठ दिवसांतच त्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. चिखल, रक्त, अजून कसले कसले डाग होते त्या कपड्यांवर, हे त्यालाही आठवत नव्हते. पण सध्या कपड्यांची गरज फक्त शरीर झाकणे हीच राहीली होती! अन्यथा काल रात्री त्या बेटावरील विषारी डासांनी आणि माशांनी त्याची जी हालत केली होती, ते आठवले कि अजुनही अंगावर शहारे येत होते. त्या माशांमूळे शेवटी त्याला सर्वांगाला चिखल चोपडून झोपावे लागले होते!

आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला...त्याचे पाय कधी त्या पायवाटेवर आले हे त्यालाही कळाले नाही. बर्‍याच वेळाने त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तो एकदम चमकला! या बेटावर मनुष्यवस्ती असल्याची एकही खुण त्याला गेल्या आठ दिवसात दिसली नव्हती. पण ही पायवाट नक्की कुठे जातेय याची त्याला उत्सुकता लागली होती. तो चक्क धावायला लागला.... आसपासच्या झाडावर त्याला पाहून वानरे उड्या मारत होती. तोंडाने विचित्र आवाज करत होती.

शेवटी त्याला दूर टेकडीवर एक झोपडी दिसली..! तो दुरुनच कोणाची चाहूल लागतेय का, हे पाहू लागला. पण बराच वेळ त्या झोपडीतून कसलीही हालचाल दिसली नाही. पुढे जाऊन पहायचे त्याचे धाडस होत नव्हते! त्याने अजुन थोडा वेळ वाट पहायचे ठरविले. एका झाडाआडून तो त्या झोपडीचे निरीक्षण करू लागला. बराच वेळ झाला पण काहीही हालचाल दिसत नव्हती. आता तर जोरात भूकही लागली होती.

आज काय खायला मिळणार, काय खावे लागणार याचा विचार करत त्याचे झोपडीचे निरीक्षण सुरूच होते.

तेव्हढ्यात पाठीमागून त्याच्या डोक्यावर कसलातरी जोरात प्रहार झाला.....आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले. तोंडातून काही आवाज बाहेर पडायच्या आतच त्याला भोवळ आली आणि तो जमीनीवर खाली पडला. डोळ्यासमोर एक अंधूक आकृती हालत होती....ती त्याच्या जवळजवळ येत होती...आणि त्याची शुध्द हरपली...

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पूढे? कसली होती ती आकृती? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) कथेच्या शेवटी नायक बेटावरून परत सुखरूप घरी पोहचला पाहीजे.
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

कुठे आहे पुढचा भाग? किती वेळापासून रुमाल अडवून बसल्यात लाल्वाक्का! तो रुमाल त्या कथा नायकाला द्या लवकर त्याच्या कपड्याच्या चिंध्या झाल्यात!! Proud

लालूनी रूमाल उचलल्याशिवाय मी पण लिहू शकणार नाही. मला वाटलं एव्हाना झालं असेल तिचं म्हणून आले लिहायला.. असो लालूनंतर माझा रूमाल आहेच. लालूला तिचा रूमाल काढून घ्यायचा असेल टेंपरवारी तरी मी तयार... Happy

आता नुसत्या रूमालांनीच सूत कातलं जाणार की काय?

आठवड्याभरापूर्वी...

हिथ्रो वर बोर्डिंगची घोषणा झाली आणि संजय जागेवरुन उठला...
मुंबई ते लंडन प्रवासात झोप अशी नीट झालीच नव्हती, सुट्टी घालवून, सगळ्या मित्र-नातेवाईकाना सोडून परत निघाल्यामुळं थोडं उदास वाटत होतं. लंडनला पोचल्यावर पुढच्या अमेरिकेला जाण्याची फ्लाईट बरीच उशीरा असल्यानं त्यानं विमानतळावरच थोडी झोप काढली. उठून कॉफी घेऊन ताजातवाना झाल्यावर गेटवर वाट पहात बसला होता. घोषणा झाल्यावर त्याने मोजकं सामान असलेली आपली बॅकपॅक पाठीवर अडकवली, लॅपटॉपची बॅग खान्द्यावर अडकवून तो विमानात शिरला. मधल्या एक्झिट्जवळची जरा ऐसपैस पाय ठेवायला मिळणारी जागा बघून खूष झाला.

सुरुवातीचे सोपस्कार झाल्यावर काही वेळात विमानाने हवी ती उंची गाठली आणि प्रवासी रिलॅक्स झाले. संजयचे एक पुस्तक काढून वाचायला सुरवात केली. पण नंतर थोड्याच वेळात हवामान खराब असल्याने सर्वांना बेल्ट लावून जागेवर बसण्याची सूचना आली. "हे तसं नेहमीचंच.. " म्हणून प्रवास अंगवळणी पडलेल्या संजयने फारसे मनावर घेतले नाही. पण जो टरब्युलन्स सुरु झाला तसा त्याने यापूर्वी अनुभवला नव्हता.. मग तो जरा अस्वस्थ होऊन खिडकीबाहेर पाहू लागला क्रू कडून कसलीच सूचना न येता बराच काळ विमान जात राहिले, त्याला वाटलं आपण आकाशात भरकटलो आहोत.. आणि मग त्याला अचानक जाणवले की विमान कमालीच्या वेगाने खाली जात आहे...

***
आपण जिवंत आहोत..कुठे आहोत? एकटेच आहोत का? पुढे काय... या सुरवातीच्या प्रश्नांच्या कल्लोळातून बाहेर पडून दिवस येईल तसा त्याला सामोरं जाण्याची एव्हाना संजयची तयारी झाली होती. जखमा भरु लागल्या होत्या. विमानतल्या विखुरलेल्या थोड्याफार सामानात गरजेच्या वस्तू शोधून वापरत होता. अजून जखमी असल्याने फार फिरु शकत नव्हता पण नजीकच्या परिसरात त्याला कोणी जिवंत व्यक्ती सापडली नव्हती. एका अनोळखी बेटावर त्याच्या मते तो एकटाच होता, त्याच्यासोबत एकमेव परिचित अशी गोष्ट पण जी सध्या निरुपयोगी होती ती म्हणजे त्याचा लॅपटॉप..

***
"द अदर्स" Proud

"जॉन, कम हियर.. " रिचर्ड आनंदाने ओरडला.

झोपडीजवळ अचानक उपटलेल्या बाहेरच्या जगातल्या माणसाजवळ सापडलेला लॅपटॉप दुरुस्त करुन सुरु करण्यात तो यशस्वी झाला होता. बेटावरच्या सिक्रेट प्रयोगशाळेत काम करणार्‍या लोकांपैकी हे दोघे. यांचा बाहेरच्या जगाशी कोणताच संपर्क नव्हता. किंबहुना, तो होऊ न देणे हाच तिथला मुख्य, 'बेन' याचा उद्देश होता. प्रयोगशाळेतल्या कामाबद्दल अत्यंत गुप्तता राखण्यात येत असे आणि तिथे काय काम चालले आहे हे कोणाला कळू नये यासाठी ही खबरदारी घेण्यात येत होती. प्रयोगशाळा अद्यावत असूनही फोन, इन्टरनेट याचा वापर सर्वांना उपलब्ध नव्हता.

बेशुद्ध पडलेल्या माणसाच्या मुसक्या बांधून परत येत असलेल्या जॉनला रिचर्डची हाक ऐकू येते आणि तो धावतच झोपडीत शिरतो. "आता आपल्याला कोणी अडवू शकत नाही, आपण बाहेरच्या जगाशी संपर्क साधू शकतो.." रिचर्ड उत्साहाच्या भरात एक्स्प्लोररची विन्डो उघडतो.. आणि रिचर्ड आणि जॉनला जे होमपेज दिसते त्यावरच्या अगम्य भाषेतल्या मजकुराकडे ते डोळे विस्फारुन पाहू लागतात..

वर अ‍ॅड्रेस दिसत असतो.. "www.maayboli.com"

----
आता एका माबोकराला बेटावरुन परत आणायचे आहे बरं का... Wink

रिचर्ड आणि जॉन मायबोली.कॉम चे पहिले पान उघडतात. तिथे त्यांना दिसते हिंदू एलिफन्ट गॉडचे चित्र.
साईटवरच्या कोपर्‍यातील मायबोलीचा लोगो बघून रिचर्डला अचानक काहीतरी आठवते आणि तो गुहेमधे बेशुद्धीत असलेल्या संजय पाशी जातो. त्याच्या अंगावरील टिशर्ट वर पण तोच मघाशी दिसलेला मायबोलीचा लोगो असतो. "सेम लोगो आहे म्हणजे नक्कीच ह्या कंपनीशी या मनुष्याचा संबन्ध असणार" असा विचार करून रिचर्ड लॅपटॉप पाशी जाऊन आणखी थोडे सर्फ करतो. तेव्हा त्याच्या लक्षात येते की हा एक पब्लिक फोरम आहे. आणि "sanjay" अशा नावाने लॉगीन पण केलेले आहे या व्यक्तिने. तेव्हा रिचर्ड आणि जॉन मिळून ठरवतात की आपण तेच वापरून तिथे मदतीचा संदेश पाठवायचा. अर्थात स्वतः बद्दल माहिती द्यायची त्यांना परवानगी नसल्याने, ते जास्त डिटेल नं देता लिहितात.

"HELP HELP HELP!!!
I am in trouble.
I am seriously injured
and alone on a remote island.
Please reply asap
as you see this message "

आणि "save" चे बटन दाबतात. मेसेज सेव्ह होतो गुलमोहरातील एका कविता बीबी वर आणि
दोनच मिनिटात मेसेजेस यायला सुरूवात होते.

" मस्तय. प्रेमात दुखापत झाल्यावर एकाकी झाल्याची भावना साध्या सोप्या शब्दात सांगितलीत. "
"वा सुरेख कविता ..पण मराठीत लिहिलेत तर आणखी मनाला भिडेल"
"ही कविता आहे? Uhoh
" अहो संजयराव मराठी साईट आहे विसरालात काय? असल्या फडतुस कविता आणि त्याही ईन्ग्लिश मधे पोस्ट करायच्या असतील तर ईतर अनेक साईट आहेत तिथे लिहा."

भराभर ईतके रिप्लाय आलेले पाहून रिचर्ड आणि जॉन खुश होतात पण ती अगम्य भाषा समजत नसल्याने ते आणखी ईकडे तिकडे शोधू लागतात. तर त्यांना ज्योतिष बीबी वर एंग्लिश लिखाण आढळून येते. आनंदाने ते तिथे आपले आधिचा हेल्प हेल्प हेल्प चे पोस्ट करतात. पण त्यामुळे मायबोलीकर चवताळुन ऊठतात आणि आणखी जोराने हल्लाबोल करतात. मग ईन्ग्रजी आणि देवनागरी युद्ध सुरू होते. रिचर्ड आणि जॉन ला काहीच समजत नाही काय सुरू आहे. ते आपले सर्व ठिकाणी आपला इन्ग्रजी मेसेज पोस्ट करू लागतात. आणि तेव्हाच संजयची मायबोलीवरची एक "खास" मैत्रीण असते... जिचा मायबोली आयडी असतो "मधुबाला".. तिला लक्षात येते की संजयचा सेलफोन लागत नाहीये तर तो खरच संकटात असणार! आणि ती या गोष्टि़कडे ईतरांचे लक्ष वेधते. रिप्लाय म्हणून ईन्ग्रजीत लिहिते आणि संजयरुपी जॉन आणि रिचर्ड बरोबर ईन्ग्रजीत संवाद सुरू होतो.

एक एक करत सगळे मायबोलीकर गोळा होतात. जखमांवर लावायला (फोटोंसकट) वनौषधी सुचवल्या जातात. खायला प्यायला म्हणून रानमेव्याच्या झटपट रेसिप्या काही ज्येष्ठ हितगुजकरणी सुचवतात. कपड्याच्या चिंध्या झाल्याचे कळल्यावर झावळ्यांपासून वस्त्र बनवण्याची माहीती तज्ञ लोक स्वत:हून सांगतात. कुणि लगेच ग्रहमान मांडून या संकटातून सुटण्याचे योग संजयच्या नशिबी आहे का नाही ते पाहू लागतात. तर कुणी हा अनुभव हितगुज दिवाळी अंका साठी लिहून पाठवा म्हणून पण तेव्हाच गळ घालतात."

ईतके सारे सल्ले एकदम आल्यामुळे रिचर्ड आणि जॉन गोन्धळून जातात. पण आधी औषधींची माहिती वापरत ते संजयवर उपचार सुरू करतात. आणि उपाय लागू होत संजय शुद्धिवर येतो. पण त्याला काहीही आठवत नसते. टोटल स्मृतीभ्रंश! पुन्हा रिचर्ड आणि जॉन मायबोलीची मदत घ्यायचे ठरवतात. पण यावेळी ते मधुबालाला विश्वासात घेऊन खरी परिस्थिती सांगतात. मधुबालाला संजयची ही परिस्थिती कळल्यावर तीला अतिशय दु:ख होते पण डगमगून नं जाता ती विचार करू लागते की संजयला यातून कसे वाचवता येईल. आणि तिला एक जोरदार आयडिया सुचते.....
ती रिचर्ड आणि जॉनला संजय समोर त्याचा लॅपटॉप धरायला सांगते आणि सुरू करते एका मागोमाग एक संजयनेच आता पर्यंत मायबोलीवर पोस्ट केलेल्या सर्व फोटोंचा "झब्बू!!".
आणि ते बघता बघता बघता बघता बघता बघता संजयची याददाश्त वापस येते. आणि तो आनंदाने ओरडून गाऊ लागतो
"तुझे देख के मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला.
तुने मायबोली का आल्बम जो खोला
डोसकं जागेवर गं आला
बाई बाई फोटोंचा हा... कसा पिसारा फुलाला."

हे बरं नव्हे हवे.. लालूसाठी संपूर्ण दिवस थांबले मी रूमाल टाकून आणि आता तू मधे घुसलीस?
आता माझा रूमाल. दुपारपर्यंत लिहिते. मधे घुसू नका कोणी..

आणि ते बघता बघता बघता बघता बघता बघता संजयची याददाश्त वापस येते. आणि तो आनंदाने ओरडून गाऊ लागतो
"_____________बाई बाई फोटोंचा हा... कसा पिसारा फुलाला."
------------------------------------------------------------------

संजयचं हे नृत्य आणि गायन ऐकून जॉन आणि रिचर्ड आधी दचकले आणि मग त्यांना संशय यायला लागला. भाषा कळत नव्हतीच आणि संजयचा नृत्याविष्कारही असा होता की त्यांना मायबोली ही व्हू डू साइट आणि मधुबाला ही व्हू डू मास्टर वाटायला लागली.
अद्ययावत प्रयोगशाळेत काम करत असले तरी असे अनोळखी बेटावर स्ट्रॅन्डेड असल्याने सध्या त्यांचा कशावरही विश्वास बसत होता. त्यामुळे ते संजयला थोडे घाबरायला लागले त्यांनी आणि त्याच्यापासून त्याचा लॅपटॉप दूर नेला.

इकडे मधुबालाला काही कळत नाही की पलिकडून रिस्पॉन्स का येत नाहीये काही. तीने मायबोलीवर बीबी उघडला 'कुणाशी तरी बोलायचंय' मधे. तिथे सांत्वन, उपाय, हाडतुड अश्या विविध पद्धतीच्या पोस्टींचा पाउस सुरू झाला. अजून जीटॉकवर संजय ऑनलाइन दिसत होता त्यामुळे मधुबाला बर्‍यापैकी शांत होती.

तिकडे पोस्टींचा पाऊस तर इकडे बेटावर खराखुरा पाऊस पडायला लागला. जॉन आणि रिचर्ड दोघेही अचानक घडलेल्या सगळ्या प्रकाराने बावचळून गेलेले होते. त्यामुळे पावसापासून लॅपटॉप वाचवायचा हेही त्यांच्या लक्षात आलं नाही. फाटकन एक आवाज आला आणि लॅपटॉपवर अंधार पसरला. संजय हे सगळं लांबून बघत होता पण त्याला ह्या दोघांची भिती वाटत होती त्यामुळे तो त्यांना पावसाचं काही सांगू शकला नाही आणि जगाशी संपर्क करायचा शेवटचा दुवा आपल्या डोळ्यासमोर तुटताना तो बघत राह्यला.

लॅपटॉप बंद पडल्याच्या धक्क्यातून किंचित सावरल्यावर संजयला पोटातली भूक जाणवायला लागली. तो आपल्या जागेवरून उठला आणि परत झोपडीच्या दिशेने यायला लागला. जॉन ने त्याला अडवले. संजयने भूक लागल्याचे सांगितले. प्रयोगशाळेत अन्न उरलेले नव्हते. संजय एपिसोडमुळे शिकारीला जायला वेळ झाला नव्हता. त्यांच्याकडे भुकेची जाणीव मिटवणार्‍या गोळ्या होत्या. क्वचित ते दोघे त्या गोळ्यांवरही गुजराण करत शिकार न मिळाल्यास. या गोळ्या घेतल्यावर पुढचे २४ तास भुकेची जाणीव होत नसे पण त्या गोळ्यांचे साइड इफेक्टस भयाण होते.

पूर्ण २४ तास माणूस सतत चालत, पळत किंवा काहीतरी हालचाली करत रहात असे. आणि २४ तास संपल्यावर माणूस सलग ८ तास असेल त्या जागी झोपून जात असे. झोपून उठल्यावर मात्र समोर जे काही मिळेल ते स्वाहा करत असे. जॉन आणि रिचर्ड दोघांनाही हे माहीत होते त्यामुळे ते एकमेकांची काळजी घेत. एका वेळेला गोळ्या कधी घेत नसत. एक जण झोपल्यावर दुसरा झोपेनंतर येणार्‍या भुकेसाठी आधीच तयारी करून ठेवत असे.

लॅपटॉप बंद पडल्यामुळे जॉन आणि रिचर्डला संजयचा काही उपयोग नव्हता त्यामुळे हे गोळीपुराण संजयला सांगायचं नाही असं रिचर्डने ठरवलं. ती एक गोळी संजयच्या हातात दिली आणि जॉनकडे बघून डोळा मारला.

गोळी पोटात गेल्यावर ५ मिनिटात संजय ताडकन उठला. आपला बंद पडलेला लॅपटॉप त्याने उचलला आणि ताडताड चालू लागला. त्या वेगाकडे जॉन आणि रिचर्ड बघत राह्यले. संजय दिसेनासा झाल्यावर एकमेकांच्या हातावर टाळी देऊन आपल्या झोपडीकडे परतले.

संजयच्या ताडताड चालण्यामुळे पायाखालचा पाचोळा तुडवला जाऊन प्रचंड आवाज येत होता. प्रत्येक पावलागणिक जंगलाला जाग येत होती. भिती, दम लागणे इत्यादी गोष्टी संजयच्या आसपासही फिरकत नव्हत्या.

संजय न थकता चालत राहीला. चालता चालता त्याने ३-४ डोंगर चढुन उतरले. दोन नद्याही पार केल्या. पण त्याला कसलेच भान नव्हते ! तो चालत राहीला....चालता चालता एका झाडावर टांगलेली कवट्यांची माळही त्याच्या लक्षात आली नाही! गेले २३ तास तो अखंड चालत होता. हातामधे लॅपटॉप आणि जिभेवर फक्त एकच गाणे " कदम कदम बढाये जा !" त्या गाण्यामुळे त्याच्या चालीलाही एक नैसर्गिक लय आली होती....लेफ्ट राईट...लेफ्ट राईट !

थोड्याच वेळात त्याला भाले तिरकमठे घेतलेल्या काही आदीवासी लोकांनी वेढा घातला. त्यांनी संजयला अडवण्याचा प्रयत्न केला. संजयने त्यांच्याकडे ढुंकुनही पाहीले नाही! तो चालत राहीला.....लेफ्ट राईट...लेफ्ट राईट. तो प्रकार पाहुन सर्व आदीवासी लोक घाबरले! तेही त्याच्यामागे त्याच चालीत चालत राहीले. लहान आदीवासी मुले संजयच्या बरोबर चालण्याचा प्रयत्न करत होती. त्यांना हा प्रकार भलताच आवडला होता.
___
सर्व आदिवाश्यांना संजयने हातात घेतलेली पेटी कसली आहे याबद्दल त्यांना प्रचंड कुतुहल होते!
४-५ वर्षापुर्वी त्यांच्या हिंडकारण्य गांवात एक तबकडी सारखी गोष्ट येऊन पडली होती.त्या तबकडी बरोबर आलेला एका विचित्र जिवाला त्यांनी अंधारकोठडीत डांबुन ठेवले होते. फक्त सकाळी कोवळ्या उन्हात त्याला उन खायला दोन तास त्याला बाहेर काढत. तो जीव चित्रविचित्र हरकती करून आणि तोंडातुन चित्कार बाहेर काढुन सगळे हिंडकारण्य डोक्यावर घेत असे. मात्र दोन तास उन्हात ठेवला कि परत गार पडत असे ! दिवसभर तो मग अंधारकोठडीत बसुन त्याच्या सांकेतिक भाषेतली विरहगीते गाई!
मग संजयच्या हातात असलेल्या चपट्या पेटीसारखी पेटी उघडुन काहीबाही करत राही!

या नव्याने आलेल्या मनुष्यप्राण्याच्या हातातही तसलीच चपटी पेटी होती. म्हणजे याला त्या प्राण्याबद्दल नक्की माहीती असणार ! हिंडकारण्याचा राजा "बोंबलहिंडेश्वर" संजयला पाहुन भलताच खुष झाला होता. एकतर बर्‍याच दिवसापासुन त्या विचित्र जीवाविषयी त्याला जाणुन घ्यायचे होते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे त्याची वयात आलेली मुलगी "हिंडलता"! हिंडलताला साजेसा वर शोधण्यासाठी त्याने यत्न यत्न केले होते. स्वयंवरही ठेवले पण हिंडकारण्यातल्या एकाही मुलाला तीने पसंत केल नाही. आज आपल्या डोक्यावरचे जबाबदारीचे ओझे हलके करायची संधी त्याच्याकडे स्वतः होऊन चालत आली होती....
" लेफ्ट राईट्....लेफ्ट राईट !"

रूमाल उचलतेय लोखो..
लिहा ज्याला वाटेल त्याने. परवा सकाळपर्यंत काही वेळ होणार नाहीये लिहायला. माफी द्या..
तुम्ही न्या कथा पुढे परवा सकाळी पहिलं काम इथली सूतकताई..

ओके नीरजा, मी लिहीते.
पण हिंडकारण्यातल्या एकाही मुलाला तीने पसंत केल नाही. आज आपल्या डोक्यावरचे जबाबदारीचे ओझे हलके करायची संधी त्याच्याकडे स्वतः होऊन चालत आली होती....
" लेफ्ट राईट्....लेफ्ट राईट !">>
बोंबलहिंडेश्वर त्याला जवळपास फरपटत घेऊन हिंडलतेच्या महालापाशी आला. तो तिला याच्याविषयी सांगत असतानाच.. हाय रे कर्मा! संजय तेथेच कोसळतो. (त्याला दिलेल्या गोळीचा असर!)कोसळताना त्याच्या हातातला लॅपटॉप हिंडलतेच्या पलंगाखाली जाऊन पडतो. बोंबलहिंडेश्वर आणि हिंडलता भयचकीत होऊन पाहत राहतात. याला काय झालं? हा बेशुध्द्द पड्ला का मेला? काही कळेनासं होतं त्यांना. ताबडतोब बोंबलहिंडेश्वर (स्वतःच्याच)डाव्या खांद्याच्या वर आणि कानाच्या खाली दोन टाळ्या वाजवतो. एक सेवक तत्परतेने आत येतो. तो त्याला हकीमांना घेऊन येण्याची आज्ञा देतो. थोड्याच वेळात अंगात कवट्या कवड्यांची माळ घातलेला, कपाळावर उंच गंध रेखलेला, जटा वाढवलेला, वल्कले नेसलेला एक उंच धिप्पाड मनुष्य अवतरला. याच अवतारात तो एखाद्या पौराणिक मालिकेच्या सेटवर गेला असता तर गळ्यात खोटा नाग आणि माथ्यावर जटांचा बो बांधून पाण्याच्या चिळकांडीचे कारंजे खोचले की झाला शंकर तयार! पण याच्या खांद्यावर एक फाटकी झोळी होती.. राजवैद्य ना तो बोंबलहिंडेश्वराचा.. होम व्हिजीट्ला जायचं तर औषधे नकोत बरोबर?
त्याने संजयची नाडीपरीक्षा केली. (हाताची रे!) आणि तो आभाळाकडे पाहून हातांच्या बोटावर काहीतरी मोजू लागला.त्याची सचिंत मुद्रा पाहून हिंडलता आणि बोंबलहिंडेश्वरही घाबरले. तो खिशातून एकेक डबी काढून त्यातले चूर्ण संजयच्या नाकापुढे नेत होता. कपाळाला फासत होता. पण कशाचाच उपयोग होत नव्हता.शेवटचा उपाय म्हणून त्याने त्या बटव्यातून एका वनस्पतीचे पान काढले आणि संजयच्या नाकापुढे धरले. आणि काय आश्चर्य! पिवळा लिटमसपेपर लाल होतो तसे ते हिरवेगार पान चक्क जांभळे पडले!!
हताशपणे त्याने सगळ्या डब्या, वनस्पतींची मुळे, पाने झोळीत भरली.
बोंबलहिंडेश्वर अधीरपणे म्हणाला,"काय झालंय वैद्यराज?"
राजवैद्य : आता याला दवाची नाही देवाची गरज आहे
बोंबलहिंडेश्वर : आँ? म्हणजे?
राजवैद्य : हा माझ्या औषधांनी वाचू शकणार नाही.
हिंडलता मोठ्याने हंम्बरडा फोडते. नहीsss
बोंबलहिंडेश्वर : असं नका म्हणू वैद्यराज! काहीतरी तोडगा असेल??
राजवैद्य : (खूप विचार करुन) आहे एक उपाय आहे!
हिंडलता ,बोंबलहिंडेश्वर : कोणता?
राजवैद्य : त्याचा उपयोग होणार नाही! कारण आपल्याला याच्या विषयी काहीच माहिती नाही.
हिं, बो. : का?
रा : कारण हा उपाय फक्त याची बायकोच त्याच्यासाठी करु शकेल! आणि याची बायको आहे का नाही, असेल तर कुठे आहे हे आपल्याला काहीच माहिती नाही.
हिं, बो बुचकळयात पडले. पण मनाचा निर्धार करुन हिंडलता उभी राहते.
हिंडलता: मी करेन तो उपाय!
बो.रा: अगं पण त्याच्याशी तुला लग्न करावे लागेल.. आणि त्याचे लग्न आधीच झालेले असेल आणि बरा झाल्यावर त्याने तुला स्वीकारले नाही तर?? तो तुला इथेच सोडून गेला तर??
हिंडलता: पिताश्री, तुम्हाला तर माहितच आहे माझे आराध्य दैवत कोण आहे? देवी हिडिंबा! भीमाने तिच्याशी असंच औटघटकेसाठी विवाह केला होता. पण आजही तिची जगातील श्रेष्ठ पतिव्रतांमध्ये गणना होते. शिवाय तिचा व भीमाचा पुत्र घटोत्कच महापराक्रमी निघाला ज्याने पांडवांना युध्दात मोठी मदत केली! मी लग्न करेन तर यांच्याशीच!!
बोंबलहिंडेश्वर : ठीक आहे, होऊ दे तुझ्या मनासारखे!
आणि राजवाड्यात त्यांच्या विवाहाची तयारी सुरु होते.
राजवैद्यांचा उपाय कोणता? तो हिंडलता सफल करेल का? संजय त्याने बरा होईल का? शुध्दीत आल्यावर तो हिंडलतेचा स्वीकार करेल का?

Pages