"अपराजीत" गद्य STY - २

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 00:23

खालच्या डोहाशेजारी "आ" वासून पडलेल्या दोन मगरी पाहून, त्याने थेट धबधब्याखाली अंघोळ करावी असे ठरविले. डोंगरकड्यावरून कोसळणार्‍या त्या धबधब्याखाली अंघोळ करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. तिक्ष्ण बाणांसारखे टोचणारे पाण्याचे थेंब उघड्या शरीरावर झेलत संजय त्याचा पाठीमागच्या आठ दिवसांमधला जिवनमृत्युचा संघर्ष पार विसरून गेला! आठ दिवस त्याने या निर्जन बेटावर स्वतःचे आस्तित्व टिकवून ठेवले होते. स्वप्नांतही त्याने असा कधी विचार केलेला नव्हता की, आपल्याला आयुष्यात हा अनुभव कधी येईल! एक दिवस त्याला जिवंत प्राण्याला मारून खावे लागेल..........!

अंघोळ झाल्यावर त्याने शेजारच्या दगडावर ठेवलेले कपडे उचलले. या आठ दिवसांतच त्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. चिखल, रक्त, अजून कसले कसले डाग होते त्या कपड्यांवर, हे त्यालाही आठवत नव्हते. पण सध्या कपड्यांची गरज फक्त शरीर झाकणे हीच राहीली होती! अन्यथा काल रात्री त्या बेटावरील विषारी डासांनी आणि माशांनी त्याची जी हालत केली होती, ते आठवले कि अजुनही अंगावर शहारे येत होते. त्या माशांमूळे शेवटी त्याला सर्वांगाला चिखल चोपडून झोपावे लागले होते!

आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला...त्याचे पाय कधी त्या पायवाटेवर आले हे त्यालाही कळाले नाही. बर्‍याच वेळाने त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तो एकदम चमकला! या बेटावर मनुष्यवस्ती असल्याची एकही खुण त्याला गेल्या आठ दिवसात दिसली नव्हती. पण ही पायवाट नक्की कुठे जातेय याची त्याला उत्सुकता लागली होती. तो चक्क धावायला लागला.... आसपासच्या झाडावर त्याला पाहून वानरे उड्या मारत होती. तोंडाने विचित्र आवाज करत होती.

शेवटी त्याला दूर टेकडीवर एक झोपडी दिसली..! तो दुरुनच कोणाची चाहूल लागतेय का, हे पाहू लागला. पण बराच वेळ त्या झोपडीतून कसलीही हालचाल दिसली नाही. पुढे जाऊन पहायचे त्याचे धाडस होत नव्हते! त्याने अजुन थोडा वेळ वाट पहायचे ठरविले. एका झाडाआडून तो त्या झोपडीचे निरीक्षण करू लागला. बराच वेळ झाला पण काहीही हालचाल दिसत नव्हती. आता तर जोरात भूकही लागली होती.

आज काय खायला मिळणार, काय खावे लागणार याचा विचार करत त्याचे झोपडीचे निरीक्षण सुरूच होते.

तेव्हढ्यात पाठीमागून त्याच्या डोक्यावर कसलातरी जोरात प्रहार झाला.....आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले. तोंडातून काही आवाज बाहेर पडायच्या आतच त्याला भोवळ आली आणि तो जमीनीवर खाली पडला. डोळ्यासमोर एक अंधूक आकृती हालत होती....ती त्याच्या जवळजवळ येत होती...आणि त्याची शुध्द हरपली...

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पूढे? कसली होती ती आकृती? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) कथेच्या शेवटी नायक बेटावरून परत सुखरूप घरी पोहचला पाहीजे.
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दोन-तीन दिवसांत जॉन, रिचर्डचे काहीच पोस्ट नसल्याने मधुबाला काळजीत पडते! जॉन, रिचर्ड आणि पर्यायाने संजयशी कसा संपर्क साधावा ते तिला कळेनासे होते. ते नक्की जगाच्या पाठीवर कुठे आहेत, कोणत्या बेटावर आहेत हे सुद्धा तिला माहित नसते. मग ती अ‍ॅडमिनना मेल पाठवते आणि जॉन, रिचर्डची पोस्ट्स कुठून येत आहेत याबद्दल तपास करायला सांगते, तर अ‍ॅडमिन तिला कळवतात की अशी माहिती आम्ही कोणालाही देऊ शकत नाही!

मधुबाला फार दु:खी होते पण धीर सोडत नाही, काहीही करुन संजयचा पत्ता लावायचा आणि त्याला परत आणायचे असा ती चंग बांधते.

***

जॉन आणि रिचर्ड मिळून संजयला गोळी देऊन घालवतात खरे पण परत आल्यानंतर आपला एकमेव सुटकेचा मार्ग आपण सहजासहजी जाऊ दिला, लॅपटॉप दुरुस्त करायचा प्रयत्नही केला नाही या विचाराने त्यांचे मन त्यांना खाऊ लागते. बेनच्या त्रासाने आधीच पिडलेले असतात. तसंच प्रयोगांना यश येत नसल्याने आणि 'डेड्लाईन' जवळ येत असल्याने दिवसेंदिवस बेन अधिकच त्रागा करु लागलेला असतो.

जॉन आणि रिचर्ड विचार करुन पुन्हा संजयच्या शोधात तो गेला त्या दिशेने चालू लागतात..

***

"मेरा बुलबुल सो रहा है, शोरगुल न मचा.. धीरे धीरे आरे बादल...धीरे जा रे.."

हिंडलता आपल्या महालवजा खोलीत गुणगुणत असते. मधूनच संजय झोपलेला असतो तिथे डोकावून जात असते. सगळीकडे तिच्या विवाहाची जय्यत तयारी चालू असते. विवाह उरकून कधी एकदा राजवैद्यांकडून संजयला शुद्धीवर आणण्याचा उपाय समजतो असे तिला होऊन गेलेले असते.

इतक्यात राजा बोंबलहिन्डेश्वरांचा संदेश घेऊन दासी येते, "राजकुमारी, महाराज बोलावत आहेत..." दासीच्या चेहर्‍यावरची चिंता पाहून ती घाबरते. धावतच वडलांकडे जाते.. तर महाराज तिला राजवैद्यांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक बातमी देतात...हिंडलता तिथेच कोसळून पडते..आणि सगळीकडे एकच गडबड उडते.

***

इकडे दिलेला अवधी संपत येऊन संजयला जाग येऊ लागते.. वैद्यांचा मृत्यू आणि राजकुमारीच्या कोसळण्याने माजलेल्या गोंधळात त्याच्याकडे कोणाचेच लक्ष जात नाही. तो भटकत भटकत एका कोठडीजवळ पोचतो.. तीच कोठडी जिथे तबकडीतून आलेला "विचित्र जीव" ठेवलेला असतो. नेहमीप्रमाणेच तो आपल्या सांकेतिक भाषेत "विरहगीते" गात असतो.. आणि कीबोर्डवर क्रमाने थांबून थांबून काहीतरी आकडे टायपत असतो झालं..

संजय प्रथम त्या प्राण्याला आणि त्याच्या हातातल्या आपल्या लॅपटॉपला बघून चक्रावतो. प्रथम त्याला वाटते जॉन, रिचर्डच्या प्रयोगशाळेशी याचा काहीतरी संबंध असावा. मग तो तिथेच बसून काही काळ त्याचं निरिक्षण करतो. ते आकडे.. २८७६, ७८३८, ९५०६, २११२२०१२.. २११२२०१२.. पुन्हा तेच २८७६, ७८३८, ९५०६, २११२२०१२.. २११२२०१२..

तो विचार करु लागतो, कसले आकडे असतील हे? कोड नंबर? तो तिथेच एका दगडाने भिंतीवर ते आकडे लिहितो..मग एका विचारचं त्यालाच हसू येतं.. शेवटचा सोडल्यास माबोच्या नोडच्या आकड्यांसारखे दिसतायत हे आकडे .. 'नोड'नोन्दी.... Happy पण मग २११२२०१२...?

.......

.

हे राम. दुसरा माबोकर ? माबोकरांच्या नशीबात असेच असते काय ? हा हन्त हन्त... Rofl

संजय विचार करू लागतो. २११२२०१२ या आकड्यावर. आपला मायबोलीचा तर्क आठवून त्याला पुन्हा हसायला येते. पण ईथे कुठली मायबोली अन काय असा विचार करून तो विचित्र प्राणी गात असलेली विरहगीते कान देऊन ऐकू लागतो.
आणि अहो आश्चर्यम तो विचित्र प्राणी चक्क मराठी कविता म्हणत असतो. त्याही मायबोलीवरच्या!
त्या ऐकून संजयची खात्री पटते की हा दिसायला परग्रहवासी वाटत असला तरी प्रत्यक्षात मनुष्यप्राणीच आहे. तेव्हा संजय अधिक आत्मविश्वासाने त्या विचित्र प्राण्यासमोर जातो. आणि जोरात म्हणतो,

"सुप्रभात.... वॉस्सप ड्युड... एक भा.प्र. विचारू काय तुला? प्रश्न दिवा घेऊन ऐक. आपण या आधी एखाद्या ए.वे.ए.ठी. मधे भेटलोय का? का कधी माझ्या विपुत? किंवा एखाद्या बा.फ्.वर? यावर ए.ते. न. असे म्हणू नकोस. आणि रच्याकने माहीत असुनही तु याचे उत्तर मायबोलीत दिले नाहीस तर हे अजिबात शो. ना. हो.

संजयच्या या बोलण्याने तो विचित्र प्राणि एकदम दचकतो. पण संजय बोलत असलेल्या मायबोलीच्या सांकेतिक भाषेमुळे त्याला कळून चुकते की आपण मनुष्यच आहोत हे संजयला समजले आहे. त्यामुळे तो
प्राणी संजय समोर येऊन उभा राहतो. आणि म्हणतो,

"होय तू बरोबर ओळखलेस मित्रा! मी कुणि परग्रहवासी नसून तुझ्या सारखाच सामान्य मनुष्यच आहे."
आणि असे म्हणून तो आपल्या अंगावरचा चमचमत्या धातू पासून बनवलेला स्पेससूट सद्र्ष हेलमेट आणि अंगरखा ओढून काढतो. आपला अंदाज बरोबर ठरल्याचे पाहून संजयच्या चेहर्यावर एक स्मितहास्य उमटते. तो पुढे त्याला विचारतो,
"हा सगळा काय प्रकार आहे मला सविस्तर सांगू शकशील काय? तुझे नाव काय? तू ईथे कसा काय पोचलास? हा अवतार का धारण केलास? तु मघाशी टाईप करून बघत असलेले चार चार आकडे मायबोलीचे नोड आहेत हे मला समजले पण २११२२०१२ हा ईतका मोठा नोड अजून मायबोलीवर नाही. तर हा आकडा कसला?"

यावर तो आता विचित्र प्राणी नसलेला मनुष्य ईकडे तिकडे पाहत हळु आवाजात म्हणतो, तुला अर्धवट माहिती मिळालेलीच आहे तेव्हा आणखी जास्त गोन्धळात न पाडता मी ईथे का आणि कसा आलो हे तुला सांगतो.
"मी एक शास्त्रज्ञ आहे. चार वर्षापुर्वी नेटवर सर्फिन्ग करत असतांना २०१२ साली जगबुडी होणार असल्या बद्दलचे अनेक ऐतिहासिक लिखाण मला वाचायला मिळाले. आणखी माहिती मिळवीत गेलो तेव्हा समजले की या जगबुडि बद्दल अगदी आपल्या पुराणात सुद्धा लिहून ठेवले आहे. आणि ते आठ आकडे ती तारिख सांगतात २१-१२-२०१२! या दिवशी एका मोठ्या प्रलयाने जगबुडी होईल आणि त्यातून वाचेल फक्त एकच ठिकाण. हे अज्ञात बेट "हिंडकारण्य".

लोकांना याबद्दल कळावे म्हणून मी माझ्या परिने अनेकांना समजावून सांगण्याची "भुमिका" घेतली. पण सर्व बुप्रा लोकांनी माझी निव्वळ खिल्ली उडवली! तेव्हा तो नाद सोडून देऊन मी सरळ माझा बॉस बेन जॉन्सनला विश्वासात घेतले. आणि आम्ही ईथे येऊन आमची गुप्त प्रयोगशाळा सुरू केली. या प्रलयातून हे बेट वाचले तरी त्या नंतर सलग ३ वर्षे सुर्य दिसणार नाही, हिमयुगा सारखी ईथे परिस्थिती असेल. त्यामुळे या काळात घालायला म्हणून आईसेटिनियम हा नवा धातू शोधून त्या पासून हा स्पेस सूट आम्ही बनवला. उणे २०० डिग्री मधे सुद्धा हा सूट घातला तर मनुष्याला आत काही फरक पडत नाही. फक्त या सूटला सुर्यकिरणांचा स्पर्श व्हायला नको. पण दुर्दैवाने बेन ने फितुरी केली तिपण जगातील सर्वात मोठ्या दहशतवादी संघटनां सोबत. तेव्हा हा स्पेससूट चोरून मी प्रयोगशाळेतून पलायन केले. पण हिंडकारण्याच्या या दुसर्‍या टोकाला येऊन ईथल्या आदीवासिंच्या हाती सापडलो. ईथून पळून जायची योजना मी आखत होतोच. आता तू आलाच आहेस तर एक मायबोलीकर या नात्याने तू मला यात मदत कर."

"मी तुला कसली डोंबल मदत करणार बाबा....मला काहीच कळेनासं झालंय कि काय खरे आणि काय नाही ते! या बेटावर मी आल्यापासुन इतके विचित्र अनुभव आले आहेत कि, कशावर विश्वास ठेवायचा आणि कशावर नाही, तेच कळत नाहीये! मला कसेही करून या बेटावरून बाहेर काढ रे लवकर! ती जगबुडी वगैरे व्हायच्या आत मला लग्न करायचे आहे.....रच्याबाने तुझे नांव काय रे भौ ? "
"अरे सोड ना..... नांवात काय आहे!" असे बोलुन तो मनुष्यप्राणी फक्त गुढ हसला...!
"मला मदत कशी करायची ते मी तुला सांगतो. माझे तबकडी सारखे यान या लोकांनी कुठेशी ठेवले आहे त्याचा शोध घे आणि मला येऊन भेट. ते यानच आपल्याला या हिंडकारण्यातून बाहेर काढु शकते."
"चालेल मी ते यान लवकरच शोधुन काढतो आणि तुला भेटतो."
"पण एक गोष्ट लक्षात ठेव. ते यान सापडल्यावर तिथल्या कोणत्याही गोष्टीला स्पर्श करु नकोस!"
"का? काही खास कारण?"
"सध्या तुला हे सगळं सांगणं महत्वाचं नाहाये. मी फक्त सांगतो ते ऐक आणि तसेच कर!"
त्याच्या आवाजात यावेळी एक अधीकाराची जरब होती. संजयने फक्त होकारार्थी मान डोलवली.
"आणि अजुन एक महत्वाची गोष्ट इथे कोणत्याही आदीवासी माणसाला मी कोण आहे ते कळता कामा नये!"
संजयने पुन्हा काही न विचारता मान डोलावली.संजयला शेकहँड करायला त्याने हात पुढे केला....आणि तेव्हढ्यात अंधारकोठडीच्या दाराजवळ कसलातरी आवाज झाला. त्या माणसाने झटकन आपला स्पेशल सूट घातला!
दोन भालाधारी हिंडवासी धावतच अंधारकोठडीत आले.त्यांच्या पाठोपाठ राजा बोंबलहिंडेश्वर आणि हिंडलताही होते.संजयला जागा झालेला आणि सुखरुप पाहुन बोंबलहिंडेश्वर आणि हिंडलता दोघेही आनंदाने बोंबलायला लागले. त्यापाठोपाठ त्या दोन भालेदार्‍यांनीही बोंबलनृत्य सुरू केलं! एका आदीवाश्याने संजयला उचलुन खांद्यावर घेतले आणि बाहेर आणले. सगळी हिंडवासी जनता बाहेर जमलेली होती आणि त्यांचेही बोंबलनृत्य चालले होते. हिंडलताशी लग्न झाल्यावर संजय आता त्यांचा नवा राजा होणार होता! सर्व हिंडकारण्यात आनंदाचे वातावरण होते. इतक्या दिवसाचे लांबलेलं राजकुमारी हिंडलताचे आज लग्न होते!
****
बाहेर चाललेला गोंधळ त्याला स्पष्टपणे ऐकु येत होता. तो गोंधळ हिंडींब मंदीराच्या दिशेने जात जात बंद झाला. याने लगेच सूट उतरवला आणि खांद्यावरच्या कंट्रोल पॅनलमधले बटन दाबले. हळूहळू चेहर्‍यावरचा माणसाचा मास्क वितळायला लागला आणि त्याने आपले मूळ रूप धारण केले! आपण मनुष्य नाही याची त्याने संजयला थोडीही शंका येऊ दिली नव्हती. मायबोली या एका मराठी साईटमुळे शुध्द मराठी बोलता येऊ लागले होते. आता या संजयच्या मदतीनेच त्याला तबकडी परत मिळणार होती...म्हणजे तीच एक आशा होती. आपल्या ग्रहावर परत जायचा मार्ग सोपा होणार होता. त्याचे एक काम तर झाले होते! आता संजयवर त्याची पुर्ण मदार होती.

हिंडलता शुद्धीवर येते, पण ती फारच कष्टी होते. राजवैद्य गेल्याने आता संजयला बरे करण्याचा मार्ग खुंटला असे वाटून ती सैरभैर होते. इकडे संजयला जाग आली आहे याचा तिला पत्ताच नसतो! ती हिंडकारण्यात वेड्यासारखी भटकू लागते...

संजयला शोधत निघालेले जॉन आणि रिचर्ड हिंडकारण्याजवळ येऊन पोचतात आणि भटकणारी हिंडलता त्यांच्या दृष्टीला पडते. बेटावर काही काळ घालवल्यामुळे या लोकांच्या संपर्कात येऊन त्यांची भाषा जॉनला अवगत झालेली असते. तो हिंडलतेला विचारतो, "तू दु:खी दिसतेस, अशी का भटकते आहेस?" मग हिंडलता त्याला थोडक्यात सगळी घटना सांगते. जॉनच्या लक्षात येते की तो संजयच आहे, मग रिचर्डला सांगून ते दोघे हिंडलतेबरोबर जायला निघतात. पण ते संजयच्या शोधात असल्याबद्दल काहीच तिला सांगत नाहीत. फक्त संजयला बरे करण्यात मदत करण्याचे आश्वासन देतात.

संजयला ठेवलेले असते त्या ठिकाणी हिंडलता त्यांना घेऊन येते, पण तिथून संजय गायब झालेला पाहून ती पुन्हा कोसळते! जॉन आणि रिचर्ड तिला तिच्या महालात घेऊन जातात, तर तिच्या पलंगाखाली पडलेला संजयचा लॅपटॉप त्यांना दिसतो!

तो लॅपटॉप घेऊन ते झोपडीत येतात आणि पुन्हा लॅपटॉप दुरुस्तीची खटपट करु लागतात. अखेरीस त्यांना यश येते आणि त्यांचा पुन्हा माबोवर मधुबालेशी संपर्क होतो. मधुबाला खूश होते. ती जॉन आणि रिचर्डला बेटाचा पत्ता, तिथे कसे जायचे इत्यादी माहिती विचारते. कोणालाही कळू न देण्याच्या अटीवर ते तिला ही माहिती देतात आणि मधुबाला बेटावर जाण्याच्या तयारीला लागते...

**
आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील एका शहरात मधुबालेचे विमान उतरते. तिथून एक मोटरबोट घेऊन मधुबाला एकटीच बेटाच्या दिशेने जाऊ लागते.

जॉन आणि रिचर्ड तिथे तिची वाटच पहात असतात. थोडे काळजीत असतात, नीट पोचेल की नाही. अनेकवेळा बोलून त्यांची तिच्याशी चांगली ओळख झालेली असते. तेवढ्यात मधुबालेची बोट येते आणि त्यातून उतरुन ती समोर येते.. तिला पाहताच जॉन खलास होतो..

तुझे देख के मेरी मधुबाला
मेरा मन ये पागल झाला....

रिचर्डची अवस्थाही वेगळी नसते. त्याला तर ती अप्सराच वाटते!

स्वर्गातील तारका ssss कोण ती रंभा की मेss नका....

लालू , तिकडे हिंडलता चे आन संजयचे लगीन लावले होते ना मी हिंडींबेच्या मंदीरात ! Lol
असो ! हिंडकारण्यात मधुबालेचं स्वागत! पुढे लिवा कि कोणीतरी ! Happy

हे काय अंधारकोठडीत हिंडलता पण येते आणि तिथुन संजयला उचलून लग्नासाठी नेतात लिहिले आहे ना प्रकाशनी.
पुढे कोण लिहीतय आता? उद्या संपणार असेल ना हा एस्टिवाय? संयोजक?

इकडे सन्जय ला काहि समजत नाहि कि हे लोक इतके खुश का आहेत!!! थोड अन्दाज आल्यावर तो चक्क उडतोच... त्याचे अन हिन्डलता चे लग्न???? आता मला मधुबाला चा चेहरा तरि दिसेल काय? माज़ी तिची भेट होइल काय? आता मी त्या माणसाचे यान तरी कसे शोधुन देणार? कि त्यासाटि मला हिन्डलता बरोबर लग्न करावेच लागणार?

छे!!! किति प्रश्न.... मला काहीच मार्ग दिसत नाहीये....
*****
इकडे राजवैद्य कशाने गेले हे अजुन समजत नहिये त्या बोम्बलहिन्डेश्वर ला... ते असे अचानक कसे गेले असतील?
कोणी खुन तर नाही ना केला त्यान्चा????
मुली च्या लग्नाचा आनन्द साजरा करु की हे खुन झाल्याचे जाहीर करु? राजाला सुद्धा भोवळ येवु लागली.......
**********
इकडे राजवैद्याना त्या यान वाल्या प्राण्याचे (की माणसाचे) सगळ्यात important secret माहित झालेले आहे....पण त्याने कसे मारले? अन हे secret काय आहे... ?????

लोक हो तुम्हि च लिहा.... बाबा

लग्न लावले होते का??!! Lol सॉरी, पण असूदे आता. लग्न कॅन्सल. एवढ्या लवकर लग्न वगैरे लावले की मर्यादा येतात. Proud
मी त्या पोस्टमध्ये त्या गूढ प्राण्याबद्दलच वाचले. वेगळा इव्हेन्ट आणि वेगळी पात्रे असतील तर जरा परिच्छेद करुन लिहा म्हणजे निसटणार नाही.

नाही नाही लग्न लागले नव्हते......फक्त त्यांनी हिडींबेच्या मंदीराकडे संजयला नेले होते! Proud
आता पुढे न्यायची कथा म्हणजे कसोटी लागणार खरी ! Happy

हिंडुर्‍या राजवैद्याच्या अशा अकाली मृत्यूचे नक्की काय कारण होते.... ??

हिंडलतेचं अन संजयचे लग्न होते का , हिंडकारण्याला नवा राजा मिळतो का?
त्या हिडींबदेवीच्या मंदीरात नक्की काय प्रकार घडतो ?

संजयला ती तबकडी सापडते का आणि त्या परग्रहवासी प्राण्याचे पुढे काय होते ?

जॉन अन रिचर्ड तर मधुबालेच्याच पाठी पागल झालेत.... अब क्या होगा ?? Uhoh

आता पुढे काय होणार..... कोण लिवताय का ? Proud

मरो तो राजवैद्य! त्याच्यावाचून काय अडत नाही... Proud

संजय, मधुबाला, हिंडलता, जॉन, रिचर्ड, परग्रहवासी आणि फारतर बेन हीच मुख्य पात्रे आहेत अजूनतरी. आणि नियमाप्रमाणे संजय सुखरुप घरी परत पोचला पाहिजे...

कोणी लिहिणार तर लिहा, मी नंतर लिहीन.

माफ करा, पण या सगळ्या मध्ये एक धागा सुटला आहे. जॉन व रिचर्ड यांच्या त्या गोळीने संजयला झोप आलेली असते आणि झोपेतून उठल्यावर तो समोर दिसेल ते बका बका खाणार असे त्या गोळीच्या परिणामा मध्ये सांगितले आहे. पण प्रत्यक्षात गोष्ट पुढे सरकवताना लेखक नेमकी हीच गोष्ट विसरला/विसरली आहे. त्यामुळे तो धागा सुटला आहे. पुढे लिहिणाऱ्याने कृपया तो जोडून घ्यावा. पण सूतकताई छान चालू आहे. Happy

>>समोर दिसेल ते बका बका खाणार
बाप रे, म्हणजे अन्नच असे काही नाही का? मग भयकथाच होणार..

Pages