"अपराजीत" गद्य STY - २

Submitted by संयोजक on 29 August, 2009 - 00:23

खालच्या डोहाशेजारी "आ" वासून पडलेल्या दोन मगरी पाहून, त्याने थेट धबधब्याखाली अंघोळ करावी असे ठरविले. डोंगरकड्यावरून कोसळणार्‍या त्या धबधब्याखाली अंघोळ करणे म्हणजे एक अद्भुत अनुभव होता. तिक्ष्ण बाणांसारखे टोचणारे पाण्याचे थेंब उघड्या शरीरावर झेलत संजय त्याचा पाठीमागच्या आठ दिवसांमधला जिवनमृत्युचा संघर्ष पार विसरून गेला! आठ दिवस त्याने या निर्जन बेटावर स्वतःचे आस्तित्व टिकवून ठेवले होते. स्वप्नांतही त्याने असा कधी विचार केलेला नव्हता की, आपल्याला आयुष्यात हा अनुभव कधी येईल! एक दिवस त्याला जिवंत प्राण्याला मारून खावे लागेल..........!

अंघोळ झाल्यावर त्याने शेजारच्या दगडावर ठेवलेले कपडे उचलले. या आठ दिवसांतच त्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. चिखल, रक्त, अजून कसले कसले डाग होते त्या कपड्यांवर, हे त्यालाही आठवत नव्हते. पण सध्या कपड्यांची गरज फक्त शरीर झाकणे हीच राहीली होती! अन्यथा काल रात्री त्या बेटावरील विषारी डासांनी आणि माशांनी त्याची जी हालत केली होती, ते आठवले कि अजुनही अंगावर शहारे येत होते. त्या माशांमूळे शेवटी त्याला सर्वांगाला चिखल चोपडून झोपावे लागले होते!

आता सुर्यही बराच वर आला होता. आकाशही अगदी निरभ्र होतं. पक्ष्यांची किलबील आणि धबधब्याचा आवाज असला तरीही एक भयानक शांतता होती त्या जागी. पुढच्या परिस्थीतीचा अंदाज घेत संजय चालत राहीला...त्याचे पाय कधी त्या पायवाटेवर आले हे त्यालाही कळाले नाही. बर्‍याच वेळाने त्याच्या ही गोष्ट लक्षात आली आणि तो एकदम चमकला! या बेटावर मनुष्यवस्ती असल्याची एकही खुण त्याला गेल्या आठ दिवसात दिसली नव्हती. पण ही पायवाट नक्की कुठे जातेय याची त्याला उत्सुकता लागली होती. तो चक्क धावायला लागला.... आसपासच्या झाडावर त्याला पाहून वानरे उड्या मारत होती. तोंडाने विचित्र आवाज करत होती.

शेवटी त्याला दूर टेकडीवर एक झोपडी दिसली..! तो दुरुनच कोणाची चाहूल लागतेय का, हे पाहू लागला. पण बराच वेळ त्या झोपडीतून कसलीही हालचाल दिसली नाही. पुढे जाऊन पहायचे त्याचे धाडस होत नव्हते! त्याने अजुन थोडा वेळ वाट पहायचे ठरविले. एका झाडाआडून तो त्या झोपडीचे निरीक्षण करू लागला. बराच वेळ झाला पण काहीही हालचाल दिसत नव्हती. आता तर जोरात भूकही लागली होती.

आज काय खायला मिळणार, काय खावे लागणार याचा विचार करत त्याचे झोपडीचे निरीक्षण सुरूच होते.

तेव्हढ्यात पाठीमागून त्याच्या डोक्यावर कसलातरी जोरात प्रहार झाला.....आणि डोळ्यांसमोर काजवे चमकले. तोंडातून काही आवाज बाहेर पडायच्या आतच त्याला भोवळ आली आणि तो जमीनीवर खाली पडला. डोळ्यासमोर एक अंधूक आकृती हालत होती....ती त्याच्या जवळजवळ येत होती...आणि त्याची शुध्द हरपली...

------------------------------------------------------------------------------------

काय झालं पूढे? कसली होती ती आकृती? त्या बेटावर तो एकटाच होता की अजूनही कोणी होतं? तो त्या बेटावरून सुखरूप माणसांत पोहचला का? कसा?

चला, लिहूया आपणच सर्व- आपली कल्पनाशक्ती पणाला लावून खेळूया सर्व मायबोलीकर हा STY..

तत्पूर्वी, काही अटी:
१) कथेच्या शेवटी नायक बेटावरून परत सुखरूप घरी पोहचला पाहीजे.
२) आपण लिहिलेला प्रसंग आधीच्या प्रसंगाला पुढे नेणारा आणि सुसंगत असावा.
३) आधीच्याने लिहिलेला प्रसंग, 'हे सगळं स्वप्नात झालं' असं पुढच्याने म्हणून त्याची मेहनत वाया घालवू नये. थोडक्यात, स्वप्न पडणार असतील, तर ती अधिकृत ज्याची त्याने स्वतःच्या प्रसंगातच रंगवावी.
४) चारपेक्षा जास्त नवीन पात्रांचा एका प्रसंगात नव्याने परीचय करून देऊ नये.
५) स्थळ, काळ, वेळेचं भान ठेवावं.

चला, करूया सूतकताई या गणेशोत्सवात..

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

-

लोकहो,

लालू ह्यांच्या विनंतीप्रमाणे संध्याकाळी ७ (US EST) पर्यंत STY मधे भरपूर लिहा. लिहीण्याच्या आधी रुमाल टाकायला विसरू नकात.
संध्याकाळी ७ नंतर लालू ह्या कथेचा शेवट करतील.

अचानक संजय ओरडून उटतो.गीतेचे श्लोक म्हणू लागतो. हिंड्लतेला तिच्या पहिल्या प्रियकराची
आटवण येते.ती जंगलात निघून जाते.राजा व्याकुळ होतो व संजयला राज्य सोपवतो.

उलुपीची शेपटी गोमुखातुन आंत गेल्यावर तळ्घरातील लाल दिवे उघड्झाप करायला लागतात आणि दांशकालाला कोणीतरी कुंभिपाकवाश्यांपैकी येत आहे असे लक्षात आले. त्याने ताबडतोब तळघराच्या एका अंधार्या कोपरयाचा आधार घेतला लपण्यासाठी. संजय त्या चकचकीत पोषाखा मधे आजीबात ओळखु येत नव्हता. त्यामुळे उलुपीला वाटले कि आपलाच साथीदार आहे. आणि ती कुंभिपाकी भाषेमध्ये त्याच्याशी बोलू लागली. त्या चकचकीत पोषाखाचा एक परिणाम असा झाला की संजयला कुंभिपाकी भाषा समजू लागली.

<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<<
(पर्नु च्या पोस्ट नंतर पुढे)

त्या भकास कोंदट अंधार्‍या तळघराच्या कुबट वासानी आणि ओलसर शेवळी जमिनीच्या स्पर्शानी उलुपि सुखावली , समोर अपला साथीदार पाहून ती 'कुंभपाकिशॄंगारक्रिडासूत्र' स्टेज मधे जाउ लागली !
अता ती आपले रूप बदलत संजय रुपी तिच्या साथीदाराकडे सरकु लागली !

वाटेत शेजारच्या भींतीवर सरपटत जाणारी पाल एक जीवंत पाखरु खाताना पाहून तिच्या तोंडाला पाणी सुटलं आणि तिनी त्या जीवंत पालीला जीवंत पाखरासकट गिळंकृत केलं !
हे सगळं अनुकुल वातावरण असताना शॄंगारक्रिडेचे नवीन सूत्र इन्व्हेंट न करणे म्हणजे कुंभपाकि जनतेच्या 'कुंभसूत्र' कायद्याच्या विरुद्ध जाणे !

उलुपीचे हे विकृत रूप पाहून संजय ला किळस येउ लागली, त्या 'पोषाखात' असल्यामुळे उलुपीला जराही संशय अला नव्हता आणि ती अधिक च चपळाइनी रूप बदलत संजय कडे सरकु लागली, संजयनी आपली भीती न दाखवण्याचा प्रयत्न करत तसाच उभा राहिला आणि उलुपीने आपले अंतिम शॄंगार रूप धारण केले.
दुतोंडी उलुपीचे एक डोके सर्पिणीचे आणि एक मुंगुसाचे, कंबरेखालचे शरीर मात्र स्त्री चे आणि अर्थातच नाभी मधे एक लखलखता हिरा !

तो हिरा चमकु लागला आणि अख्ख्या अंधार्‍या तळघरात उजेड पडला, उलुपि येउन संजय ला चिकटली तोच अचानक बाजुला तळघराच्या छपरावर एक मोट्ठा अंडाकृति दगड कोसळला.. इतक्या जोरात कि त्याने तळघाराच्या छताला भले मोठे भगदाड पडले आणि ५० फूट उंच मंदिराच्या कळस तळघरातून दिसु लागला.

देवळाच्या अंडाकृति छतावर कोणी एक कारागिर झोपाळ्यावर लटकत आपल्या कोरीव आयुधानी एका भींती चित्राचं कोरीवकाम करत होता, कारागिराचा चेहेरा इतक्या उंचावर असल्यामुळे संजयला दिसला नाही पण उलुपिच्या बेली बटन हिर्‍याच्या लख्ख प्रकाशात कोसळलेल्या दगडावरचे कोरीवकाम स्पष्ट दिसत होते ...एक मनुष्य त्या पोषाखात शिरताना, मग एक सरपटणारा उलुपि सारखा जीव्व तळघरात प्रवेश करताना , एक सर्प्-मुंगुस स्त्री संगम असलेली विकृत स्त्री आणि मग................. त्या विकृत स्त्रीचा आणि मनुष्याचा शृंगार दाखवणारी अजंठा वेरुळ स्टाइल ची कुंभसूत्रे !!

संजय तो दगड पाहून भीतीने कापु लागला , त्यानी वर मान करून कारागिराकडे पाहिले..उलुपीच्या हिर्‍याच्या प्रकाशात अता छतावरच्या कारागिराचा चेहरा स्पष्ट दिसत होता, त्या प्रकाशानी डोळे दीपून कारागिराच्या हतातले कोरीव काम करण्याची छोटी हातोडी पण खाली पडली आणि देवळाच्या छतावऊन आपला हात पन्नास फूट लांबवत त्या राजवैद्य उर्फ कारागिरानी ती हातोडी परत घेतली आणि पुन्हा थंडपणे उरलेले कोरीवकाम करण्यात मग्न झाला !

************************************************

रिचर्ड आणि जॉनने दिलेल्या माहितीनुसार मधुबाला बेटाकडे जाण्यासाठी प्रथम आफ्रिकेच्या पश्चिम किनार्‍यावरील 'डकार'ला जाणार्‍या विमानात बसली. पण तिच्या जागी उलुपीला आपला प्रियकर अर्हिताक्षाच्या शोधात हिंडकारण्यात जायचे असल्याने उलुपी आपल्या शक्तीचा वापर करुन ते विमान 'अतार' कडे वळवले. मधुबालेच्या लक्षात येते की हे काही समुद्रकिनार्‍याचे ठिकाण नाही, मग ती स्थानिक लोकांची मदत घेऊन अतार ते डकार असा प्रवास वेगवेगळ्या वाहनांतून करुन शेवटी डकारला पोचली.

त्यानंतर ठरवल्याप्रमाणे मोटरबोट घेऊन ती हिंडकारण्याकडे जायला निघाली.

....मधुबालेने हिंडकारण्याच्या किनार्‍यावर पाऊल ठेवले तेव्हा तिथली मऊसूत वाळू तिच्या पायाला गुदगुल्या करुन गेली.

****
जॉन आणि रिचर्ड भांबावून गेलेले असतात. आपण कुठे आहोत, इथे कसे आलो का आलो याबद्दल त्यांना काहीच आठवत नसते. दांशकाल नामक व्यक्तीचा फोन आणि त्याने दिलेल्या बेटाची आणि तिथल्या क्षाराची माहिती मात्र अगदी काल मिळाल्यासारखी लक्षात असते. ते थोडावेळ भटकल्यानंतर समुद्रकिनारी पोचतात. त्यांना काही खाणाखुणा पटू लागतात आणि आपण त्या दांशकालने सांगितलेल्या बेटावरच आहोत अशी शंका येऊ लागते. तेवढ्यात... समोर त्यांना एक मोटरबोट दिसते आणि त्यातून उतरणारी मुलगी.. किनार्‍यावर उतरुन ती वाळूवरुन हळूहळू पावले टाकत आणि मंद स्मित करत त्यांच्याच दिशेने चालत येत असते.

"हॅलो जॉन, हॅलो रिचर्ड .. मी मधुबाला. ." ती ओळख करुन देते.

जॉन आणि रिचर्ड चक्रावून जातात.. ही मुलगी आपल्याला कशी ओळखते?

"तुम्ही केलेल्या मदतीबद्दल मी आभारी आहे, माझी इथे पोचण्याची वेळ नक्की नसूनही तुम्ही माझी वाट पहात थांबलात त्याबद्दल आभारी आहे" मधुबाला म्हणते. पण जॉन आणि रिचर्डच्या गोंधळलेल्या चेहर्‍याकडे पाहून तीही गोंधळते.

पण प्रसंगावधान राखून जॉन तिला सगळं सांगायचं ठरवतो. ही आपल्याशी चांगले बोलते आहे, ओळखते आहे तेव्हा हिच्यावर विश्वास ठेवायला हरकत नाही असे समजून ते दांशकाल, बेट, क्षार याबद्दल सर्व काही तिला सांगतात. आणि त्यांची तिच्याशी ओळख कशी झाली, ते बेटावर कसे आले याबद्दल काहीही आठवत नसल्याचे सांगतात. मग मधुबालाच त्यांना त्यांच्या संभाषणातून त्यांच्याबद्दल मिळालेली माहिती देते. तरीही शहानिशा करण्यासाठी ते प्रयोगशाळेचा शोध घ्यायचे ठरवतात.

****
प्रयोगशाळेत बेन अस्वस्थ होऊन येरझार्‍या घालत असतो. प्रत्येक दिवस अत्यन्त महत्वाचा असतो. काहीही करुन दांशकालाला गाठलेच पाहिजे. त्याच्या हे लक्षात आलेले असते की बेटावरच्या ऊर्जेमुळे स्फोट होऊन बेटाला धोका निर्माण होऊ शकतो. इतके दिवस त्यानेच त्रास दिल्यामुळे त्याचे दोन महत्वाचे, हुशार सहकारी त्याला सोडून गेलेले असतात. त्यामुळे त्याला काय करावे सुचत नसते. या ऊर्जेचा उपयोग करुन घेऊन त्यातून प्रचन्ड पैसा कमाण्याचा त्याचा मानस असतो पण हा जीवावरचा धोका तयार होईल याची त्याला कल्पना नसते. त्याला पश्चाताप होऊ लागतो.

तो दांशकालाला शोधायला प्रयोगशाळेबाहेर पडतो तोच त्याचे सहकारी जॉन, रिचर्ड आणि एक मुलगी त्याला प्रयोगशाळेच्या दिशेने येताना दिसतात...

***
जॉन, रिचर्ड, बेन आणि मधुबाला आता एकत्र येऊन बेनच्या मार्गदर्शनाखाली "मंदिरा"च्या दिशेने चालू लागतात. बेनला अर्हिताक्षाबद्दल माहिती असतेच. आपल्या बाजूने होऊ शकणारी अजून एक व्यक्ती (?) अर्हिताक्षच असल्याने ते प्रथम त्याला सोडवण्याचे ठरवतात.
मधुबाला या सगळ्या प्रकाराने बावचळून गेलेली असते पण संजयला सोडवण्याचा आणि वाचविण्याचा हाच मार्ग आहे हे समजून ती बेनच्या मोहिमेत सामिल होते.

सगळे प्रथम अर्हिताक्षाची सुटका करतात. दांशकालाचा काटा काढण्यात अर्हिताक्ष त्याना मदत करायचे ठरवतो पण ते म्हणजे ग्रह सोडून जाताना सगळा उर्जेचा साठा, "मीठ" घेऊन जाऊ देण्याच्या अटीवर..

***
अर्हिताक्ष प्रथम मंदिरात शिरतो... तळघरातून येणारा प्रकाश पाहून तो तळघरात जातो आणि तिथले दृश्य पाहून थबकतो!
त्याची प्रेयसी उलुपी दुसर्‍याच कुणा पोशाखधार्‍याचा अनुनय करत असते.. सहन न होऊन अर्हिताक्ष ओरडतो... उले! उलपे! हे मी काय पहातो आहे ..!!! अचानक आलेल्या परिचित आवाजाने चकित होऊन उलुपी संजयला सोडून चमकून मागे पाहते. तिला अर्हिताक्षाची ओळख पटते... ती कुंभपाकिच्या क्रीडा, कायदे, सूत्रे सगळे विसरते आणि ती धावत येऊन अर्हिताक्षाची क्षमा मागून त्याचा गैरसमज दूर करते.. संजयही मग आपल्या पोशाखातून बाहेर येतो.

एव्हाना जॉन, रिचर्ड, बेन आणि मधुबालाही तळघरात पोचतात. संजयला सुखरुप पाहून मधुबालाला आनंद होतो. छतावर कोरीव काम करणारा दांशकाल या सर्वांना पाहून छद्मी हसतो. आणि आपल्या हातातली हातोडी जोरात छतावर मारणार इतक्यात बेनचे त्याच्याकडे लक्ष जाते, तो सर्वांना इशारा करतो आणि अर्हिताक्ष बरोबर असल्याने सर्वजण धावत तळघराबाहेर येतात.. दांशकालाची हातोडी लागून प्रचंड आवाज करत छत कोसळू लागते आणि तळघराचा दरवाजा बंद होऊन दांशकालासह तो खजिना गाडला जातो.

***
अर्हिताक्ष आणि उलुपी क्षार आपल्या तबकडीत भरुन घेऊन स्फोटाचा धोका टाळतात आणि त्यांना हवी ती गोष्टही मिळते. घेतल्या मीठाला जागून ते कोणाला काही इजा न करता परत जायचे ठरवतात.

हिंडकारण्याच्या राजाला विश्वासात घेऊन ते सगळी माहिती देतात. एक संकट टळल्याने तो सुटकेचा नि:श्वास टाकतो. बेनचे आभार मानतो. विवेकबुद्धी जागृत होऊन शेवटी बेनने केलेल्या चांगल्या कामामुळे हिंडलता त्याच्याकडे आकृष्ट होते. बेनलाही अमेरिकेत परत जाऊन जेलमध्ये जाण्यापेक्षा इथे राहणे बरे म्हणून तो हिंडलतेशी लग्न करुन हिंडकारण्याचा भावी राजा होण्याचे ठरवतो.

अर्हिताक्ष आणि उलुपीला मात्र परत जाण्यापूर्वी एक गोष्ट करायची असते...
उलुपी जॉन, रिचर्ड, मधुबाला आणि संजयला डकारपर्यन्त सोडायला येते. तिथून तिघेही विमानाने लंडन आणि मग अमेरिकेत परत जाणार असतात. डकारहून निरोप देताना ती जॉन, रिचर्डप्रमाणेच संजय आणि मधुबालेचाही स्मृतीभ्रंश करुन टाकते. या बेटासंबंधी आणि त्याच्याशी संबंधित असणारे सर्व लोक आणि घटना, माहिती, तपशील हे सगळंच ते विसरुन जातात. लंडनला जाणार्‍या विमानात बसताना संजय आणि मधुबाला एकमेकांना पूर्ण परके झालेले असतात.....

२१/१२/२०१२ काहीही अमंगळ न घडता पार पडलेला असतो.. जग नेहमीप्रमाणे चालू असते, एक मोठा अनर्थ टळला आहे हे कोणाच्या ध्यानीमनीही नसते..
बेन आणि हिंडलताचे लग्न होऊन दोघे सुखाने नांदू लागतात. जॉन, रिचर्ड आपल्या जुन्या प्रयोगशाळेत परत जातात. मधुबाला प्रोजेक्ट संपल्याने भारतात परत जाते.

****

उपसंहार..

मे २०१३..

संजयने त्याला सापडलेल्या एका इन्टरेस्टिन्ग मराठी साईटवर नुकतेच रजिस्टर केलेले आहे. तो पहिल्यांदाच लॉगिन करतोय.. *****/password
आणि पोस्ट लिहितो..

नमस्कर, मि ईथे नविन आहे. मल सर्वाशी मएत्री करयला आवदेल..

*****

समाप्त.

हुश्श!
कोणाला alternate ending वगैरे लिहायचे तर संयोजकांना विचारुन लिहा. Happy

पर्णू, डिजे झकासच.
लालू शेवट लै भारी!
नमस्कर मि ईठे नविन आहे. मल सर्वशी मएत्री करयला अवदेल !

:स्मितः इथे स्माइली कशी द्यय्ची ? Sad

जबरदस्त! सर्वच महान!! दोन दिवस वाचले नव्हते हे, आताच वाचले. सही पिंजलेय लोकहो. Happy
रॉक अँड रोल चे भयानक अनुभव आले अर्ध्या तासात. आता मला चक्कर येतीये!! Proud

साजिर्‍या, भलत्या ठिकाणी भलत्या रोगाची भलती लक्षणे सांगणे भल्या माणसाचे लक्षण नव्हे. आता ह्यावरुन भलभलत्या गोष्टी आठवतील सर्वांना.

नमस्कर, मि ईथे नविन आहे. मल सर्वाशी मएत्री करयला आवदेल.. >>>>>> Rofl

लालू भारी केलास शेवट.. सगळ्यांनीच मस्त लिहिलय एकदम..

Pages