"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "

zabbu_girls_on_swing.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मस्तच आहेत सगळे फोटो अन सगळी पिल्लं..सिंडे -लाजो पसार्‍याचा खेळ आमच्या घरी अव्याहत चालु असतो...:)
jhabbu61.jpg

हे आमचं विमान निघालं....झुंइइइइइइइइइइइइइइइइइ!!!!

प्रिंसेस, खुप गोड फोटो आहेत दोन्ही. दुसरा तर फारच. एकच की दोन वेगळी बाळे आहेत?

किट्टुची पण दोन्ही बाळे (पहिले पान) खुप गोड आहेत.

हे माझ पिल्लू................... सारख पाण्यातच खेळतishu 119.jpg

धन्यवाद सुनिधी Happy अग मागच्या पानावर आहे तो माझा मुलगा आहे. आणि आता वरती पाण्यात पोहतेय ती मुलगी Happy

निवांत

नकुल, चांगलंय... मुलाच्या नावाखाली स्वतःलापण बसायला मिळतं.. लहान मुलं असण्याचा एक फायदा!
बसलेला तु का फोटो काढणारा तु? फोटो डोकं लाउन काढलाय नाहितर सगळचं फिसकटलं असतं!

princess,कसले गोडाम्बे आहेत तुझी पिल्ल,पहिला फोटो एकदम मस्त !!
कविता,तुझ्या राजकन्येला बघुन एकदम माझ्या भाचीची आठवण आली.

Pages