"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "

zabbu_girls_on_swing.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नाच रे मोरा आंब्याच्या (शिकागोच्या) वनात नाच रे मोरा नाच >>>
कुणी आनंदाच्या भरात शिकागोच्या सिअर्स टॉवरवरून अशी उडी ठोकली आहे का ? Proud

600823622_54ed208a74_b.jpg

लेकाचे हे उद्योग पाहून त्याच्या आईने नक्कीच दोन धपाटे दिले असणार!>>
आमचा लेक नसल्याने धपाटे नाही मिळाले त्याला. Proud

प्रकाश, या खेळाला सारवासारव म्हणतात. Wink

अवघड विषय!! माझ्याकडे नेटवर असा एकही फोटो नाहिये... Sad
मजेदार विषय!! सगळे फोटो बघितल्यावर काम सोडुन बाहेर जाउन खेळावसं वाटतय!!

>>>>केपीकाका सहीये...कोणता खेळ आहे पण हा ?
पक्या, याला नार्‍या खेळ म्हणतांत. काकांनी लिहीलय ना तस वर. Wink

अरे व्वा! तर मग ते बायकापोरीबाळी मिळून तान्दुळाच्या हत्तीभोवती ऐलमा पैलमा गणेश देवा म्हणत रिन्गण धरतात त्याचाही हवा फोटो!
माझ्याकडे आहेत खूप त्याचे, पण इथे नाहीत Sad
झालच तर, गोट्या खेळणारे, पतन्ग उडविणारे, लगोर्/विट्टीदान्डू, पोरवालच्या चारचाक्यामधून फिरणारे........... अरे विषयाला काही सीमाच नाही या तर! Happy

Picture 228.jpg

.

अजय, पहिला फोटो 'कुठे गेला बॉल?' असापण चालला असता!

बरचं शोधल्यावर एक परवाच काढलेला फोटो सापडला!!!
पिसाच्या मनोर्‍यासमोर, तपमान ३०+, संध्याकाळी सगळ्यांनाच पाण्यात भिजायचं होतं, पण...

DSC_0072.JPG

Pages