"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक ६

Submitted by संयोजक on 27 August, 2009 - 18:46

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------
"खेळ मांडियेला "

zabbu_girls_on_swing.jpg

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ही शटलवाली "मिनुची नात" छानच, Wink
पायाचे तळवे किती गुलाबि आहेत?

डॅफॉ, असेच काय? तू क्यामेर्‍यातुन भ्भॉ करुन दाखवले अस्शिल Lol

नाही हो एल्टी.. ते पिल्लू त्या मागच्या खूर्चीवरच्या माउचे डोळे दाखवत आहे. Lol

सही आहेत एकेक फोटो! फार गोड अन् निरागस! Happy
मुलं काय न् कशाशी खेळतील सांगता येत नाही! Lol
केप्या, लेकाचे हे उद्योग पाहून त्याच्या आईने नक्कीच दोन धपाटे दिले असणार! (मी दिलेत माझ्या लेकाला एका मुंजीत असे केल्यानंतर Sad :फिदी:)

नी फोटो जबरी टाकलायंस, अगदी शैशवातलाच वाटतोय.
आता जरा आरसा बघ.... आणि हळहळ... कित्ती बारिक होते मी... म्हणून.. Proud

अगं ट** कशाला नाही नाही त्या गोष्टी करायला सांगतेस? हल्ली मी तोंडापुरत्याच आरश्यात बघते... Happy

झब्बू खेळाचाच आहे .. पण तुम्हा मोठ्या माणसांना कागदाशी खेळता येतं का ?

IMG_1180.JPG

अहाहा काय झब्बूज आहेत एकेक.....!
चौपाटीवर रेतीमधे क्रिकेट खेळलय का कुणी कधी ?? Happy

कविता, माझ्या लहानपणापासूनचा आवडीचा खेळ बर का! मातीत धूळीत खेळणे Happy
कान्द्याच्या फोटोसारखे मात्र कधी करता आले नाही! आमचि आई लग्नी सिन्ह्व राशीचा रवी असलेली, काय बिशाद हे इकडची काडी तिकडे करू घरात? त्यामुळे ते जमलच नाही! न बोलता फटके पडले अस्ते!

सगळेच भन्नाट फोटो!

पुनम कशाला ग धपाटा घातलास? माझी मेहनत घेऊन काढलेली रांगोळी सानुने दोन अडीच वर्षाची असताना अशीच मेहनत घेऊन पसरवलेली नी अंगभर लावलेली Proud मी मस्त फोटो काढुन ठेवलाय तिचा. तिला आधी वाटल मी ओरडेन पण मी हसतच सुटले नी एक झ्याक फोटो काढला तेव्हा काय स्माईल दिल तिने. ती मोठी होईल तेव्हा हेच आठवुन किती भरुन येईल नाही. Happy

चौपाटीवरच खेळायच तर क्रिकेटच कशाला? अस खेळता येईल का आपल्याला?
sanu enjoying in sand 1.jpg

Pages