शाही व्हेज बिर्यानि

Submitted by दिनेश. on 25 August, 2009 - 17:56
प्रत्यक्षात लागणारा वेळ: 
४० मिनिटे
लागणारे जिन्नस: 

भातासाठी : दोन कप बासमती तांदूळ, दोन तीन हिरव्या वेलच्या, दोन लवंगा, एक टेबलस्पून तूप,
मीठ, ( सजावटीसाठी भाजलेले काजू, तळलेला कांदा, चिमुटभर केशर, सर्व ऐच्छीक )

ग्रेव्हीसाठी : ५०० ग्रॅम मिक्स्ड फ़्रोझन भाज्या ( यात गाजर, फ़रसबी, मका असते ), एक टिन
पील्ड टोमॅटो ( नसल्यास चार मोठे लालबुंद टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून सोलून व एक
टेबलस्पून टोमॅटो सॉस ), एक टिन इव्हॅपोरेटेड मिल्क ( तो न मिळाल्यास एक कप सायीसकट
दूध आणि अर्धा कप मिल्क पावडर ), तीन कांदे (उभे चिरुन), दोन टेबलस्पून तूप, एक टिस्पून
जिरे, एक लवंग, एक इंच दालचिनी, दोन चार मिरीदाणे, चार लाल मिरच्या, तीन हिरव्या वेलचीचे
दाणे, एका मसाला वेलचीचे दाणे, मीठ, व चवीपुरती साखर (टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी )

क्रमवार पाककृती: 

एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात गेव्हीचे सर्व मसाले परता. त्यावर कांदा घाला, तो जरा
परता.( तो फ़क्त गुलाबी सोनेरी परतायचा आहे )खमंग वास सुटला, कि टोमॅटो घाला. परतून पाणी आटू द्या. गॅसवरुन उतरुन थंड करा
व मिक्सरमधे ब्लेंड करुन घ्या. ( हे आदल्या दिवशी केले तरी चालेल. )
राहिलेले एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात फ़्रोझन भाज्या घाला. जरा परतून त्यात दुध
घाला. भाज्या शिजू द्या. मग त्यात तयार केलेली ग्रेव्ही घाला. मीठ घाला, साखर घाला, व सर्व
आटू द्या, पण पुर्ण कोरडे करु नका.

भातासाठी : तांदूळ धुवून निथळून घ्या. एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात भाताचा मसाला
घाला. त्यावर चार कप गरम पाणी घाला. मीठ घाला.उकळी आली कि तांदूळ वैरा. ढवळत आठ
मिनिटे शिजू द्या. मग आच मंद करुन, दोन मिनिटे झाकण ठेवून भात शिजवा. मग झाकण काढा
( बासमती तांदूळ दुप्पट पाणी व दहा मिनिटे, याने व्यवस्थित शिजतो ) भात मोकळा हवा.
आता भाजीचे भांडे एका तव्यावर ठेवा. त्यावर हलक्या हाताने भात पसरा. वापरत असाल तर केशर
थोड्या दूधात खलुन, त्यावर शिंपडा. घट्ट झाकण ठेवून दहा मिनिटे, मंद आचेवर तवा ठेवा. अगदी
आयत्यावेळी झाकण काढा. हवा तर वर तळलेला कांदा, भाजलेले काजू पसरा.

चार सहा जणांसाठी पुरेल. सोबत एखादे लोणचे घ्या.

पाककृती प्रकार: 
शब्दखुणा: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

दिपल, उत्तर द्यायला खुपच उशीर झाला. (अजून केली नसल्यास)
हे प्रमाण चार जणांसाठी आहे. त्यामूळे निदान दुप्पट म्हणजे ४ कप तांदळाची करावी लागेल. आणि हा कप म्हणजे आपला नेहमीचा मेझरिंग कप.

मी करून बघितली या रेसिपीने..फारच अप्रतिम झालेली.. Happy
पण दिनेशदा तुम्ही तीन कांदे उभे चिरुन सांगितले आहेत. आणि नंतर ग्रेव्ही ब्लेंड करायला सांगितली आहे.
मग कांदा उभा चिरून उपयोग होत नाही.

मस्त.. पाणी सुटले तोंडाला.... लाजोच्या कोशींबिरीबरोबर मस्त लागेल एकदम.....>>>>>>>>>>>
कोशींबिरीचि लिंक मिळेल का?

चैत्रगंधा,
कापलेल्या आणि परतलेल्या कांद्यापैकीच थोडा वरून सजावटीसाठी वापरता येतो. तसा वापरायचा नसेल तर उभा चिरायची गरज नाही.

दुध सोडलं तर मी बर्‍यापैकी याच प्रकारे व्हेज बिर्यानी बनवतो. Happy
सोबत लोणच्याऐवजी एखादं रायतं असेल तर उत्तम. Happy

हा फोटो.

535358_350228015024346_2027286339_n.jpg

Pages