भातासाठी : दोन कप बासमती तांदूळ, दोन तीन हिरव्या वेलच्या, दोन लवंगा, एक टेबलस्पून तूप,
मीठ, ( सजावटीसाठी भाजलेले काजू, तळलेला कांदा, चिमुटभर केशर, सर्व ऐच्छीक )
ग्रेव्हीसाठी : ५०० ग्रॅम मिक्स्ड फ़्रोझन भाज्या ( यात गाजर, फ़रसबी, मका असते ), एक टिन
पील्ड टोमॅटो ( नसल्यास चार मोठे लालबुंद टोमॅटो उकळत्या पाण्यात टाकून सोलून व एक
टेबलस्पून टोमॅटो सॉस ), एक टिन इव्हॅपोरेटेड मिल्क ( तो न मिळाल्यास एक कप सायीसकट
दूध आणि अर्धा कप मिल्क पावडर ), तीन कांदे (उभे चिरुन), दोन टेबलस्पून तूप, एक टिस्पून
जिरे, एक लवंग, एक इंच दालचिनी, दोन चार मिरीदाणे, चार लाल मिरच्या, तीन हिरव्या वेलचीचे
दाणे, एका मसाला वेलचीचे दाणे, मीठ, व चवीपुरती साखर (टोमॅटोचा आंबटपणा कमी करण्यासाठी )
एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात गेव्हीचे सर्व मसाले परता. त्यावर कांदा घाला, तो जरा
परता.( तो फ़क्त गुलाबी सोनेरी परतायचा आहे )खमंग वास सुटला, कि टोमॅटो घाला. परतून पाणी आटू द्या. गॅसवरुन उतरुन थंड करा
व मिक्सरमधे ब्लेंड करुन घ्या. ( हे आदल्या दिवशी केले तरी चालेल. )
राहिलेले एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात फ़्रोझन भाज्या घाला. जरा परतून त्यात दुध
घाला. भाज्या शिजू द्या. मग त्यात तयार केलेली ग्रेव्ही घाला. मीठ घाला, साखर घाला, व सर्व
आटू द्या, पण पुर्ण कोरडे करु नका.
भातासाठी : तांदूळ धुवून निथळून घ्या. एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात भाताचा मसाला
घाला. त्यावर चार कप गरम पाणी घाला. मीठ घाला.उकळी आली कि तांदूळ वैरा. ढवळत आठ
मिनिटे शिजू द्या. मग आच मंद करुन, दोन मिनिटे झाकण ठेवून भात शिजवा. मग झाकण काढा
( बासमती तांदूळ दुप्पट पाणी व दहा मिनिटे, याने व्यवस्थित शिजतो ) भात मोकळा हवा.
आता भाजीचे भांडे एका तव्यावर ठेवा. त्यावर हलक्या हाताने भात पसरा. वापरत असाल तर केशर
थोड्या दूधात खलुन, त्यावर शिंपडा. घट्ट झाकण ठेवून दहा मिनिटे, मंद आचेवर तवा ठेवा. अगदी
आयत्यावेळी झाकण काढा. हवा तर वर तळलेला कांदा, भाजलेले काजू पसरा.
चार सहा जणांसाठी पुरेल. सोबत एखादे लोणचे घ्या.
दिनेशदा, मस्त आहे पाककृती.
दिनेशदा, मस्त आहे पाककृती. वाचुनच तोन्डाला पाणी सुटलं. ह्या वीकांताचा मेन्यु ठरला तर.
आमच्याकडे नक्की आवडणार ही बिर्याणी.
दिनेशदा मस्त पाककृती. या
दिनेशदा मस्त पाककृती. या बिर्याणी बरोबर कांदा, टॉमॅटो, काकडी ची दही, हिरवी मिरची घालुन केलेली कोशिंबीर मस्त लागेल....
मस्त.. पाणी सुटले तोंडाला....
मस्त.. पाणी सुटले तोंडाला.... लाजोच्या कोशींबिरीबरोबर मस्त लागेल एकदम...
दिनेश छान.. रात्रीचे
दिनेश छान.. रात्रीचे पूर्ण जेवण होइल ...
कालच केली मी ही बिर्याणी.
कालच केली मी ही बिर्याणी. मस्त झाली होती. आम्ही तिघांनी [यात माझा ३ वर्षाचा लेकही आला]
अगदी चाटुन पुसुन साफ केलं पातेल. माझ्या खाण्याच्या बाबतीत अत्यंत नाठाळ असलेल्या मुलाला आवडेल अशी पाककृती दिल्याबद्दल खुप आभार!
मस्त आहे पाककृती...
मस्त आहे पाककृती...
आमच्याकडे नक्की करणार.
ऑर्चिड, यापेक्षा छान
ऑर्चिड, यापेक्षा छान प्रतिक्रिया असूच शकत नाही. !!!
दिनेशदा, अगदी मस्त होते ही
दिनेशदा, अगदी मस्त होते ही बिर्यानी. चव तर अप्रतिम !!! नवरा खुष, लेक खुष. त्यांच्याकडुन तुमचे स्पेशल आभार ही बघा मी बनवलेली बिर्यानी. झाकण घट्ट नव्हते म्हणुन मी दम लावला होता. तुमची ही बिर्यानी आणि पालक रायता...
रायताचा फोटोच अपलोड होत नाहीये
सुंदर फोटो, या बिर्यानिसाठि
सुंदर फोटो, या बिर्यानिसाठि मी बहुतेक तयार मिळाणारे घटकच वापरले आहेत. त्यामुळे तसा व्यापही कमीच असतो.
दिनेश- अतिशय सुंदर झाली ही.
दिनेश- अतिशय सुंदर झाली ही. गेल्या दोन आठवड्यात दोनदा केली.
धन्यवाद.
मी व्हेज बिर्यानी अशिच करते
मी व्हेज बिर्यानी अशिच करते फक्त त्यात दुध नसत. काल तुमच्या पद्धतीने केली. मस्त झालेली.
स्वतःची अक्कल अजिबात न चालवता
स्वतःची अक्कल अजिबात न चालवता जशीच्या तशी बिर्याणी केली आणि खूप सुंदर झाली. चविष्ट, सौम्य आणि खरोखरच 'सुंदर'. 'पोटा'पासून धन्यवाद.
खरं सांगू, हाताशी असलेले घटक
खरं सांगू, हाताशी असलेले घटक वापरुन केलेला हा एक प्रयोग होता. अस्सा फक्कड जमेल, अशी मलाही कल्पना नव्हती.
एवढाई छान पाक् कृती ची
एवढाई छान पाक् कृती ची receipe आहे कुठे?
दिनेशदा , आजच ही बिर्याणी
दिनेशदा ,
आजच ही बिर्याणी केली. अप्रतिम झाली . तुमचे खूप खूप आभार एवढी छान रेसिपी दिल्याबद्दल. मी ही मेघना प्रमाणेच स्वतःची अक्कल अजिबात न चालवता जशीच्या तशी बिर्याणी केली आणि खूप सुंदर झाली.
वाचून जशीच्या तशी आज ही
वाचून जशीच्या तशी आज ही बिर्याणी केली आणि खूपच चांगली झाली.
भातासाठी : तांदूळ धुवून
भातासाठी : तांदूळ धुवून निथळून घ्या. एक टेबलस्पून तूप गरम करुन त्यात भाताचा मसाला
घाला. 'भाताचा मसाला' म्हणजे कळल नाही.... plz help
साहित्यात भातासाठी जो मसाला
साहित्यात भातासाठी जो मसाला दिलाय तो <<<दोन तीन हिरव्या वेलच्या, दोन लवंगा >>>
ग्रेव्हीसाठी वेगळा मसाला दिलाय.
पुदिना आणि कोथिंबीर एकत्र
पुदिना आणि कोथिंबीर एकत्र करून हातानेच चुरडून भाजी आणि भाताच्या थरांमधे पसरावी. बाय द वे, कुठे तरी वाचलेय की वेजी बिर्यानी ला 'तेहरी' म्हणतात..
रेसिपी वाचून तर खरच तोंडाला
रेसिपी वाचून तर खरच तोंडाला पाणी सुट्ले.. करुन बघायला हवी..
पालक रायताची रेसिपी सांगाल का...
रेसिपि अप्रतिम नक्कि करुन
रेसिपि अप्रतिम नक्कि करुन बघेन
दिनेशदा सहीच, ह्या शनीवारी
दिनेशदा सहीच, ह्या शनीवारी नक्की करेन आणी सांगेन तुम्हाला
दिनेश दा मि आजच करुन बघणार
दिनेश दा मि आजच करुन बघणार आहे !
परवा केली होती ह्या पद्धतीने.
परवा केली होती ह्या पद्धतीने. सगळ्यांनी चाटुन पुसुन खाल्ली. धन्यवाद
मी पण केली..मस्त झाली. मी
मी पण केली..मस्त झाली. मी टोम्याटो सॉस घालायला विसरले तरी छान झाली
ह्या शनिवारी आमच्या भावंडांचा
ह्या शनिवारी आमच्या भावंडांचा एकत्र जमायचा बेत आहे.. मी नक्की हिच बिर्याणी करणार...
मी ऑफीसमधल्या हॉलिडे लंच
मी ऑफीसमधल्या हॉलिडे लंच पार्टीला नेली होती ही डिश. मस्त होते अगदी. लेफ्ट ओव्हरसाठी आधीच क्लेम लागले गेले,पण शिल्लक राहीलीच नाही.
इतक्या सुंदर रेसिपीबद्दल धन्यवाद !
आजच केली होती या पद्धतीने.
आजच केली होती या पद्धतीने. खूप मस्त झाली, सर्वांना आवडली. धन्यवाद!
मी हि बिर्याणी BBQ पोटलकला
मी हि बिर्याणी BBQ पोटलकला करणार आहे. १३ मोठे, २ लहान जण असतील. बाकि BBQ चे बरेच items आहेत,पण राइस हा एकच असणार आहे. वर दिलेल्या प्रमाणात केला तर पुरेल का सगळ्यांना? २ कप म्हणजे राईस कुकरचा कप कि नेहमीचा measuring cup?
मी करुन पाहिलीये ही, मस्त
मी करुन पाहिलीये ही, मस्त होते, प्रतिसाद द्यायचा राहून गेला होता. आता लगेच करुन परत खावु वाटतेय
Pages