"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 23:29

एका पेक्षा एक

"तुमचा पिवळा गुलाब.. त्यावर आमचा केशरी गुलाब.. मग तुमचा लाल गुलाब.. आमचा पांढरा गुलाब..
तुमचा केशरी सूर्य आणि पांढुरके ढग.. त्यावर आमचा सोनेरी सूर्य आणि लालसर ढग..
तुमची राजगडावरची सुवेळा माची.. त्यावर आमची तोरण्यावरची झुंजार माची...
तुमचे डोंगर दुरुन साजरे.. आमचे ही डोंगरच, पण जवळूनच सुरेख...
तुमच्या बागेतल्या पपया.. आमच्या मंडईतले आंबे..
तुमचा अटलांटिक.. त्यावर आमचा पॅसिफिक... मग परत तुमचा अरबी समुद.. त्यावर आमचा हिंदी महासागर.. मग तुमचा... "

"अहो.. थांबा, थांबा, थांबा काय तुमचं आमचं करताय ??? हे सगळं तर निसर्गाचं देणं ना ???"

"निसर्गाचं देणं असलं तरी.. कॅमेर्‍यात तुम्ही आम्ही टिपलय ना !!!!"

"..."

चला मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया.... "एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू... !!

--------------------------------------------------------------------------------------

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_coins.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

म्हन्जे काय डीजे? झक्की एकही पैसा देणार नाहीत अस वाटल की काय तुला?
<<< मला वाटल तुम्ही झक्कींचं वय आणि एक पैशाचं वय याचा परस्पर संबंध जोडला कि काय Proud

आहा मजा येतेय पहायला Happy
झक्की एकही पैसा देणार नाहीत अस वाटल की काय तुला? >>> तसं नाय, झक्की तुला एक पैसाही देणार नाहीत अस वाटलं असेल तिला.. Wink

नात्या, अरे ते प्रत्येक स्टेटचे एक नाणे मी पण जमवले होते दीड महिन्यात अमेरिकेत होतो तेव्हा.. मग आल्यावर एका कलीगला दिले.

मला राखी सावंतची का आठवण होतेय ? Proud
पण तो फोटो मी काढलेला नसल्याने इथे टाकत नाही.

ही दोन नाणी, २५ सेंटची. चिरंजीवांनी इतर ५० नाण्यांबरोबर ही पण गोळा केलीत.
chavanni-dc-MB.JPGchavanni-special-MB.JPGchavannies-all-states-mb.JPG

हे घ्या अजुन एक कॉइन वाल्या बेली डान्सर कॉस्चुम चा झब्बु ! Proud
bellydancer.jpg

नकुल,
राखी सावन्त च्या फोटो चा फोटो काढ आणि टाक Happy

काय एकसे एक झब्बु आहेत... सगळेच झकास एकदम..
हे सगळे संपल्यावर हे झब्बु घेउन आपण त्यांची गोळाबेरीज खेळू Happy

From

ही पुतळ्यांची माळ. फोटो सेलमध्ये काढलाय, त्यामुळे खूप काही चांगला नाही जमलाय.

क्रांति हा पुतळ्याच्या माळेचा मॉडर्न अवतार आहे.
एकदम पारंपारीक पद्धतीचे डिझाइन म्हणजे लाल गोफात गाठवलेल्या पुतळ्या. त्या आहेत का कुणाकडे.
तूर्तास मी त्याचे स्केच करायला सुरूवात केलीये. संयोजकांनी परवानगी दिली स्केचला तर टाकीन इथे पूर्ण झाल्यावर.

व्वाह एकसे बढकर एक आहेत सारे फोटो...झब्बुखेळासाठी एवढा चलनी विषय निवडल्याबद्दल संयोजकांचे आभार ! Happy
माझा एक झब्बु ! ही हिमाचली माळ Happy

IMG_4270.JPG

होय नीरजा. ही तुळशीबागेतली इमिटेशनवाली पुतळ्यांची माळ आहे. त्यात खर्‍या पुतळ्या नाहीत, त्याला फारसं वजनही नाही. लेकींना नृत्यप्सर्धेत लागायची, म्हणून आणलेली. तू म्हणतेस तशी जुन्या पद्धतीची पुतळ्यांची माळ आणि लक्ष्मीहार पाहिलेला मात्र आहे पूर्वी.

बी, शिवकालिन नाणे माझ्या खिशात आहे आत्ता, पण स्कॅनर बन्द असल्याने टाकता येत नाहीये Sad
बघू, शेवटपर्यन्त प्रयत्न करीन

pannas.jpg

लालु, तू खूप ईंग्रजी नाणी टाकलीत. आता जरा आपल्याकडची नाणी पण टाकं. बघ असेल घरात एखादा खडकू Happy

चला, हा घ्या माझा एक खणखणीत झब्बू! Wink काढा काय ऑब्जेक्शन काढायच्या त्या Proud
(आयला, किती तो शोध घ्यावा लागला, नशिब, ऑफिसच्या कॉम्प्युटर वर होता हा)
Coin1.JPG

बी, कृपया फक्त स्वतः काढलेले फोटोज झब्बु साठी द्यावेत.
आंतरजालावरचे किंवा इतरत्र प्रकाशित झालेले फोटो चालणार नाहीत.
हा खेळ जरी असला, तरी ह्या खेळामधे तुमचे योगदान हे महत्वाचे आहे.

>>फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
हे लक्षात न राहून तीन फोटो एकत्र पोस्टले. येक डाव मापी करावी!

Pages