एका पेक्षा एक
"तुमचा पिवळा गुलाब.. त्यावर आमचा केशरी गुलाब.. मग तुमचा लाल गुलाब.. आमचा पांढरा गुलाब..
तुमचा केशरी सूर्य आणि पांढुरके ढग.. त्यावर आमचा सोनेरी सूर्य आणि लालसर ढग..
तुमची राजगडावरची सुवेळा माची.. त्यावर आमची तोरण्यावरची झुंजार माची...
तुमचे डोंगर दुरुन साजरे.. आमचे ही डोंगरच, पण जवळूनच सुरेख...
तुमच्या बागेतल्या पपया.. आमच्या मंडईतले आंबे..
तुमचा अटलांटिक.. त्यावर आमचा पॅसिफिक... मग परत तुमचा अरबी समुद.. त्यावर आमचा हिंदी महासागर.. मग तुमचा... "
"अहो.. थांबा, थांबा, थांबा काय तुमचं आमचं करताय ??? हे सगळं तर निसर्गाचं देणं ना ???"
"निसर्गाचं देणं असलं तरी.. कॅमेर्यात तुम्ही आम्ही टिपलय ना !!!!"
"..."
चला मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया.... "एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू... !!
--------------------------------------------------------------------------------------
नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!
--------------------------------------------------------------------------------------
म्हन्जे काय डीजे? झक्की एकही
म्हन्जे काय डीजे? झक्की एकही पैसा देणार नाहीत अस वाटल की काय तुला?
<<< मला वाटल तुम्ही झक्कींचं वय आणि एक पैशाचं वय याचा परस्पर संबंध जोडला कि काय
फोटो नाहीतर नाही मी स्केचच
फोटो नाहीतर नाही मी स्केचच करून टाकते पुतळ्यांचं...
आहा मजा येतेय पहायला झक्की
आहा मजा येतेय पहायला
झक्की एकही पैसा देणार नाहीत अस वाटल की काय तुला? >>> तसं नाय, झक्की तुला एक पैसाही देणार नाहीत अस वाटलं असेल तिला..
एक नंबर.. सगळेच झब्बू भारी
एक नंबर.. सगळेच झब्बू भारी आहेत..
जबरीच आहेत सगळे फोटो. खेळ
जबरीच आहेत सगळे फोटो. खेळ कल्पनाही चान्गली आहे.
आयहाय.. पैसेच पैसे! मज्जा
आयहाय.. पैसेच पैसे! मज्जा आली!
नात्या, अरे ते प्रत्येक
नात्या, अरे ते प्रत्येक स्टेटचे एक नाणे मी पण जमवले होते दीड महिन्यात अमेरिकेत होतो तेव्हा.. मग आल्यावर एका कलीगला दिले.
टण्या, तु कधी येऊन गेलास?
टण्या, तु कधी येऊन गेलास?
हवाई, अलास्का ची नाणी २००८ ला आली.
आणि हा घ्या माझा
आणि हा घ्या माझा झब्बू...
From SLAP
मला राखी सावंतची का आठवण
मला राखी सावंतची का आठवण होतेय ?
पण तो फोटो मी काढलेला नसल्याने इथे टाकत नाही.
ही दोन नाणी, २५ सेंटची.
ही दोन नाणी, २५ सेंटची. चिरंजीवांनी इतर ५० नाण्यांबरोबर ही पण गोळा केलीत.
हे घ्या अजुन एक कॉइन वाल्या
हे घ्या अजुन एक कॉइन वाल्या बेली डान्सर कॉस्चुम चा झब्बु !
नकुल,
राखी सावन्त च्या फोटो चा फोटो काढ आणि टाक
लकी पेनीज..
लकी पेनीज..
हे घ्या ऑस्ट्रेलियन
हे घ्या ऑस्ट्रेलियन पैसे....जरा मोठे मोठे....
काय एकसे एक झब्बु आहेत...
काय एकसे एक झब्बु आहेत... सगळेच झकास एकदम..
हे सगळे संपल्यावर हे झब्बु घेउन आपण त्यांची गोळाबेरीज खेळू
From ही पुतळ्यांची माळ. फोटो
From
ही पुतळ्यांची माळ. फोटो सेलमध्ये काढलाय, त्यामुळे खूप काही चांगला नाही जमलाय.
क्रांति हा पुतळ्याच्या माळेचा
क्रांति हा पुतळ्याच्या माळेचा मॉडर्न अवतार आहे.
एकदम पारंपारीक पद्धतीचे डिझाइन म्हणजे लाल गोफात गाठवलेल्या पुतळ्या. त्या आहेत का कुणाकडे.
तूर्तास मी त्याचे स्केच करायला सुरूवात केलीये. संयोजकांनी परवानगी दिली स्केचला तर टाकीन इथे पूर्ण झाल्यावर.
गुणेश, तुम्ही काढलेला फोटो
गुणेश,
तुम्ही काढलेला फोटो खूपच आवडला..
व्वाह एकसे बढकर एक आहेत सारे
व्वाह एकसे बढकर एक आहेत सारे फोटो...झब्बुखेळासाठी एवढा चलनी विषय निवडल्याबद्दल संयोजकांचे आभार !
माझा एक झब्बु ! ही हिमाचली माळ
आयला काय पब्लिक येड झालय! भर
आयला काय पब्लिक येड झालय! भर गणपतीतच लक्ष्मीपूजन सुरु करून ठेवलय !!
होय नीरजा. ही तुळशीबागेतली
होय नीरजा. ही तुळशीबागेतली इमिटेशनवाली पुतळ्यांची माळ आहे. त्यात खर्या पुतळ्या नाहीत, त्याला फारसं वजनही नाही. लेकींना नृत्यप्सर्धेत लागायची, म्हणून आणलेली. तू म्हणतेस तशी जुन्या पद्धतीची पुतळ्यांची माळ आणि लक्ष्मीहार पाहिलेला मात्र आहे पूर्वी.
बी, शिवकालिन नाणे माझ्या
बी, शिवकालिन नाणे माझ्या खिशात आहे आत्ता, पण स्कॅनर बन्द असल्याने टाकता येत नाहीये
बघू, शेवटपर्यन्त प्रयत्न करीन
(No subject)
लालु, तू खूप ईंग्रजी नाणी
लालु, तू खूप ईंग्रजी नाणी टाकलीत. आता जरा आपल्याकडची नाणी पण टाकं. बघ असेल घरात एखादा खडकू
चला, हा घ्या माझा एक खणखणीत
चला, हा घ्या माझा एक खणखणीत झब्बू! काढा काय ऑब्जेक्शन काढायच्या त्या
(आयला, किती तो शोध घ्यावा लागला, नशिब, ऑफिसच्या कॉम्प्युटर वर होता हा)
बी, कृपया फक्त स्वतः काढलेले
बी, कृपया फक्त स्वतः काढलेले फोटोज झब्बु साठी द्यावेत.
आंतरजालावरचे किंवा इतरत्र प्रकाशित झालेले फोटो चालणार नाहीत.
हा खेळ जरी असला, तरी ह्या खेळामधे तुमचे योगदान हे महत्वाचे आहे.
>>फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत
>>फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
हे लक्षात न राहून तीन फोटो एकत्र पोस्टले. येक डाव मापी करावी!
हे नीधपने सुचवल्याप्रमाणे.
हे नीधपने सुचवल्याप्रमाणे.
गुणेश यांचा आणि हिमाचली माळ
गुणेश यांचा आणि हिमाचली माळ हे फोटो मस्त आहेत!
हिमाचली माळ आणि लक्ष्मीहार
हिमाचली माळ आणि लक्ष्मीहार मस्त.
Pages