"एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू - क्रमांक १

Submitted by संयोजक on 19 August, 2009 - 23:29

एका पेक्षा एक

"तुमचा पिवळा गुलाब.. त्यावर आमचा केशरी गुलाब.. मग तुमचा लाल गुलाब.. आमचा पांढरा गुलाब..
तुमचा केशरी सूर्य आणि पांढुरके ढग.. त्यावर आमचा सोनेरी सूर्य आणि लालसर ढग..
तुमची राजगडावरची सुवेळा माची.. त्यावर आमची तोरण्यावरची झुंजार माची...
तुमचे डोंगर दुरुन साजरे.. आमचे ही डोंगरच, पण जवळूनच सुरेख...
तुमच्या बागेतल्या पपया.. आमच्या मंडईतले आंबे..
तुमचा अटलांटिक.. त्यावर आमचा पॅसिफिक... मग परत तुमचा अरबी समुद.. त्यावर आमचा हिंदी महासागर.. मग तुमचा... "

"अहो.. थांबा, थांबा, थांबा काय तुमचं आमचं करताय ??? हे सगळं तर निसर्गाचं देणं ना ???"

"निसर्गाचं देणं असलं तरी.. कॅमेर्‍यात तुम्ही आम्ही टिपलय ना !!!!"

"..."

चला मंडळी, मायबोली गणेशोत्सवानिमित्त खेळूया.... "एका पेक्षा एक" अर्थातच छायाचित्रांचा झब्बू... !!

--------------------------------------------------------------------------------------

नियम :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
३. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकायचे आहे.
४. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
४. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
५. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

चला, तर सुरू करूया मायबोलीवरचा सध्याचा आवडता खेळ!!!

--------------------------------------------------------------------------------------

zabbu_coins.JPG

Group content visibility: 
Public - accessible to all site users

हवाई, अलास्का ची नाणी २००८ ला आली. >> ही नाणी मिळवायला जरा वेळच लागला.

आता ही जमवायची आहेत.

•District of Columbia
•The Commonwealth of Puerto Rico
•Guam
•American Samoa
•The U.S. Virgin Islands
•The Northern Mariana Islands

लिंबु टिंबु नमस्कार!
चंपक नि सांगितलेय तुमच्याब्द्द्ल!
चिल्लर पाठवुन देते चंप्या सोबत पण त्याच्यासोबत मि हि आले तर चालेल का?!:)

लिंबु टिंबु नमस्कार!
चंपक नि सांगितलेय तुमच्याब्द्द्ल!
चिल्लर पाठवुन देते चंप्या सोबत पण त्याच्यासोबत मि हि आले तर चालेल का?!

लिंबु टिंबु नमस्कार!
चंपक नि सांगितलेय तुमच्याब्द्द्ल!
चिल्लर पाठवुन देते चंप्या सोबत पण त्याच्यासोबत मि हि आले तर चालेल का?!

ही १९०० ची सोन्याची गिन्नी. माझ्या आजोबांनी माझ्या लेकाच्या हातावर पणतू झाला म्हणून ठेवलेली!

005.JPG

त्याच नाण्याची ही दूसरी बाजू...

006.JPG

>>>>>> पण त्याच्यासोबत मि हि आले तर चालेल का?!
यायलाच हवे जोडीने Happy

हार चालतोय का? मग हा मीच केलेला अन मीच फोटो काढलेला
Notes chaa haar.JPG

>>> गुप्तधनातले Lol
लहानपणी हे अस्ले माझ्याकडे पण होते खेळायला दिलेले, पण डब्ब डब्ब वाजायचे म्हणून खोटे आहेत असे आई म्हणायची, नन्तर कुठे तरी ते हरवले
ताम्ब्याचा गोल एक पैसा, भोकाचा पैसा देखिल होता Sad हरवले सगळे!

हे मात्र खरे आहेत.
ताम्ब्याचा गोल एक पैसा, भोकाचा पैसा देखिल होता>>माझ्याकडे आहेत ते पण..
भोकाचा पैसा म्हणजे ढब्बू (दोन पैसे.)

IMG0122A.jpg

मालदीव नाणी... २ रुफिया चे नाण्यावर शन्ख आहे.... दुसरी दोन नाणी १ रुफिया ची आहेत...... १ रुफिया = १०० लारी.. Happy

झब्बूच्या ह्या खेळाला उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल सर्वांचे आभार ! ह्या निमित्ताने अनेक सुंदर प्रकाशचित्रे सगळ्यांना बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद करत आहोत.

Pages