स्तोत्रे, श्लोक, प्रार्थना यांचा संग्रह

Submitted by अश्विनी के on 19 January, 2010 - 03:10

नमस्कार,

लहानपणी शुभंकरोती म्हणताना आपण काही काही स्तोत्रे, श्लोक म्हणत असू. आपल्या ऋषी-मुनींनी तपसाधना करुन अनेक स्तोत्रे, स्तवने सिद्ध केली आहेत. त्यातील काही आपल्या नित्य पठणात असतात तर काही तात्कालीक कारणासाठी उपासना म्हणून म्हटली जातात. ह्या स्तोत्रांमधे बीजमंत्र सामावलेले असतात व त्यांचे जमेल तसे पठण निश्चितच सकारात्मक बदल घडवून आणते, आपल्या विचारात, प्रारब्धात. विचार सात्विक व्ह्यायला लागले की हातून चूका कमी कमी घडू लागतात, मन (जे आपले प्रारब्ध घडवते) आपल्या ताब्यात येऊ लागते. सगळ्यात ओढाळ मनासारखे काहीच नाही. आजच्या पिढीला व पुढच्या मोठे होऊ घातलेल्या पिढीला मनावर ताबा मिळवण्याची खूप गरज आहे. पुढची पिढी दहशतवादी विचारांची बनायला नको आहे.

प्रकाशाचे उपासक हे शुद्ध दैवतांचीच उपासना करतात ज्यामधे स्वतःचे, कुटुंबाचे, समाजाचे, प्रदेशाचे भले व्हावे, रक्षण व्हावे हा हेतू असतो तर अंधाराचे उपासक हे क्षुद्र दैवतांची उग्र प्रकारे उपासना करतात ज्यामधे दुसर्‍याचे वाईट व्हावे हाच मुख्य हेतू असतो, तंत्रविद्येचा, जारण मारणाचा वापर असतो.

इथे शुद्ध दैवतांच्या उपासनांमधे समावेश होऊ शकणार्‍या स्तोत्रं, श्लोक, प्रार्थना शक्य असल्यास कारण व फलितासह लिहिणे अपेक्षित आहे (मायबोलीवर दुसर्‍या प्रकारचे सदस्य असूच शकत नाहीत म्हणा Happy ) जेणेकरुन मायबोलीवर एकेच ठिकाणी सगळे मिळू शकेल, गूगलवर शोधत बसायची आवश्यकता नाही. स्तोत्र, अध्याय, श्लोक मोठे असतील तर लिंकही देण्यास हरकत नाही (अ‍ॅडमिनची हरकत असल्यास तसे कृपया कळवावे व त्यांच्या आदेशानुसार लिंका देऊ नयेत.)

सर्वांना धन्यवाद Happy आतापर्यंत खालील स्तोत्रे इ. जमा झाली आहेत. जसजशी भर पडेल तसतशी यादी अपडेट करायचा प्रयास करेन.

http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php इथे भरपूर स्तोत्रं पीडीएफ मध्ये आहेत.

****************************************************************************************************
(खालील स्तोत्रांच्या लिंक अनुक्रमणिका रुपाने देण्याचे काम शाम भागवत ह्यांनी केले आहे. त्यांना मनःपूर्वक धन्यवाद)

पान १
१) गायत्री मंत्र
२) दत्तबावनी
३) श्लोक
४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक
६) श्री भवानी अष्टक
७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र
९) करुणा त्रिपदी
१०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.
पान २
१२) येई वो विठ्ठले
१३) श्री समर्थ रामदास - लिंक
१४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक
१६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र
पान ३
१८) श्री स्वामी समर्थाष्टक
१९ ) श्रीगणपती स्तोत्र
20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र
२२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी
२३) हनुमंताचा धावा
२४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक
२६) संपूर्ण नवनाग स्तोत्र
२७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक
२९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र
३०) शनी मंत्र
३१) रुद्र
पान ४
३२) संपु���्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र)
३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना
३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट)
४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक
४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४२) पुरुषसूक्त
४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट)
44) दत्तलीला मंत्र
४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट)
४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक
पान ५
४७) स्वामी समर्थ माला मंत्र
४८) सूर्याष्टक
४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट)
४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी
५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट)
५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र
५३) शिवताण्डव स्तोत्र
५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल)
५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट
५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी)
 ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट)
५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट)
५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.
५८) सुंदरकाण्ड ध्वनीरुपात
पान ६
५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी
५९) सूर्यनमस्कार
६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र
पान ७
६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)
६२) श्री दुर्गासप्तशती सार
६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम्
६४) दत्तदशक स्तोत्र
६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र
६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...
पान ८
६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक
६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती
६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम्
७०) रामरक्षा
७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.
पान ९
७२) श्रीरामांची कर्पुरआरती
७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक)
७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट)
७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट)
७६) गणपती स्तोत्र (मराठी)
७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट
पान १०
७८) दयाळू तू देवा खचित आहेसि - संत एकनाथांची रचना
७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्
८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्
८१) सनातनदेवीसूक्त
८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र
८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र
८४) देवीची आराधना
८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद
८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक
८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची"
८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद
पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन
९०) अन्नपूर्णास्तोत्रम्
९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय''
९१) सद्गुरु स्तोत्र
९२) विविध आरत्या महालक्ष्मीची आरती
श्री मंगेशाची आरती
श्री शांतादुर्गेची आरती
अंबेची आरती
विडा
९३) श्री रंग बावनी
९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना
पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी)
९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन
९७) अमोघशिवकवचम
९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर
९९) अंबे जगदोद्धारिणि गे |
१००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी..
१०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक
१०३) सूर्यस्तुती
पान १३
१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट)
१०५) बजरंग बाण
१०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक
१०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम्
*अर्थासहित) न मन्त्रं नो यन्त्रं तदपि च न जाने स्तुतिमहो
१०८) शांतीपाठाचा अर्थ
१०९) शिव आरती
११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला
१११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट)
११२) करुणाष्टकं (रामदास स्वामी)
पान १४
११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक
११४) श्री लिंगाष्टकः
११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट)
११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र
११७) सार्थ दत्तबावनी
पान १५
११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य
११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा
१२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....)
१२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट
१२१) GOD grant me the SERENITY...
१२१) GOD grant me the SERENITY... (मराठीत)
१२२)सर्वसिध्दी मंत्र
१२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा
१२४) श्री शिव मानस पूजा
१२५) शनी स्तोत्र
श्रीगुरुचरित्र (पाळावयाचे सामान्य संकेत)
!!भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे.!!
पान १६
१२६) श्री दत्तात्रेय स्तुती
१२७) नवरात्र अष्टमी होम
१२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी.
१२८) श्रीदेवी उपासना - उपचार पद्धती, श्री गणेशस्तोत्रम , अथ श्री महालक्ष्म्यष्टकम्, अथ तंत्रोक्त देवीसूक्तम्, श्री सरस्वति स्तोत्र, अथ श्री सूक्तम् , श्री गणपतीच्या आरत्या, श्रीदेवीच्या आरत्या, माहुरगडावरी माहुरगडावरी ग तुझा वास, भक्त येतील दर्शनास, श्री महालक्ष्मी आरती - वससी व्यापकरुपे, आरती श्री लक्ष्मी - अंबिके तुझे गे, श्रीयोगेश्वरी (अंबेजोगा‌ई) देवीची आरती, श्रीकरवीरनिवासिनीची (कोल्हापूरची अंबाबा‌ई) आरती, श्री शाकंभरी देवीची आरती, गोंधळाची संबळगीत, श्री देवीचे जोगवा संबळगीत, श्री देवीचे जोगवा, गोंधळ - उदो उदो गर्जुनी , श्रीदेवीची भजने, श्रीदेवीची खेळगाणी, कुंकू,  दंडवत, निरोप आरती, आरती श्री लक्ष्मी - सौम्य शब्दे उदोकारे
१२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.
पान १७
१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ
१३१) श्री देवी कवच
१३२) सिद्धमंगल स्तोत्र
१३३) रघुपति राघव राजा राम - भजन
१३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र
१३५) श्रीपञ्चम���ख हनुमत्कवचमंत्र
पान १८
१३६) श्री महालक्ष्मी माहात्म्य
१३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट)
१३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग
१३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट)
१४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)
पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन
१४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट
१४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र
१४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक)
१४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट
१४०) श्री हनुमान स्तुती
१४७) प्रारंभी विनती करु गणपती...
१४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा
१४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे !
१५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम्
१५१) गजानन बावनी
१५१) गजानन बावनी
पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट)
१५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र
१५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र
१५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः
१५६) श्रीदिनेशस्तवः
१५७) ललितापञ्चरत्नम्
१५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र
१५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र
१६०) श्री विंध्यवासिनी माता आरती
१६१) महिषासुरमर्दिनी स्तोत्रम
१६२) पाण्डुरङ्गाष्टकम
पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना
१६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज
१६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती
१६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा
१६७) एकश्लोकी रामायण
१६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र
१६९) एकश्लोकी भागवत
१७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं
१७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना
१७१) श्रीगजानन विजय ग्रंथ- ऑन लाईन डाउन लोड
१७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक
१७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते
१७४) जिव्हा प्रार्थना
पान २२
१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक
१७६) श्री दत्त अथर्वशीर्ष
१७६) गणेशाने केलेले राधास्तोत्र आणि बरेच काही
१७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक
१७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक
१७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम्
१८०) ज्वरनाशकस्तोत्रः
१८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र
१८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना
१८३) संपूर्ण अच्यु���ाष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट)
१८४) महामृत्युंजय जप
पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम
१८५) सहस्त्र-नाम तत्युल्यं मंत्र
१८५) जय जय त्रिंबकराज गिरीजानाथा गंगाधरा हो
१८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट
१८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र
१८८) कौसल्या सुप्रजा रामा
पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र
१९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक.
१९०) नर्मदाष्टकम् --श्री शंकराचार्य
१९१) श्री रेणुका स्तोत्र
१९२) मानसपूजा (आत्मपूजा)
१९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट)
१९४) श्री दत्त कवच
१९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र)
१९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति
१९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्
पान २५
१९८) नारायण सूक्त
१९९) नारायण कवच
२००) व्यंकटेश स्तोत्र
२०१) श्रीगुरुपादुकाष्टम्
२०१) श्रीमद् शन्कराचार्यविरचितं शिवपञ्चाक्षरस्तोत्रं
२०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती
पान २६
२०३) श्री गुरुगीता
२०४) श्रीहरि स्तोत्र
२०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम्
२०५) सोळा सोमवारचे व्रत कथा
२०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट
२०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक
२०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र
२०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र
२१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती
पान २७
२११) गणेश स्तुती
२१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती
२१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं
२१४) लक्ष्मी सूक्त
२१५) श्री सूक्त
२१६) श्री प्रज्ञावर्धिनी स्तोत्र
२१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः
२१८) अन्नपूर्णास्तुतिः
२१९) श्री बालमुकुन्दाष्टक.
२२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्
पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट)
२२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र
२२३) अर्गला स्तोत्र
२२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र
२२५) निर्भय निर्गुण (संत कबीर)
२२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ)
२२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी
२२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र
२२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति
२३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम
२३०) श्रीबृहस्पति कवचम्
पान २९
२३१) गोविंद नामावली
२३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन
२३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक
२३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक)
२३५) अन्नपूर्णा स्तोत्र
२३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक)
२३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक)
२३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक)
२३८) नारायण स्तोत्र
२३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप
२४०) श्री साईनाथांची अकरा वचने
२४१) शतश्लोकी रामायण
२४२) श्रीरामहृदयम्
२४३) ब्रह्मचिंतन
२४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र
पान ३०
२४५) मृत्युंजय कवचम्
२४६) अनसूयेचे स्तोत्र
२४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.)
२४८) गुरु शरणम्
२४९) लक्ष्मी कवच
२५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम्
२५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र
२५२) श्रीपरशुराम स्तुती
पान ३१
२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र
२५४) श्रीपरशुरामाष्टकम्
२५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम्
२५६) परशुरामस्तोत्रम्
२५७) संस्कृत स्तोत्रं वगैरे असलेली साईट
२५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन
पान ३२
२५९) इंदूकोटी स्तोत्र
२६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक)
२६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र
२६२) गौरीची प्रार्थना
पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग
२६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला
२६५) दत्तात्रेय कवचम

***********************************************************************************

पान १

१) गायत्री मंत्र २) दत्तबावनी ३) श्लोक ४) घोरकष्टोद्धरण स्तोत्र
५) तुळजा भवानी - लिंक ६) श्री भवानी अष्टक ७) श्री साईसच्चरित - लिंक
८) शिवपञ्चाक्षर स्तोत्र ९) करुणा त्रिपदी १०) धन्य धन्य हो प्रदक्षिणा
११) श्री दत्तस्तव स्तोत्र
आणि श्री वासुदेवानंदसरस्वती (टेंबेस्वामी) यांच्याबद्दलची लिंक केदार जोशी यांच्या पोस्टमधे.

पान २

१२) येई वो विठ्ठले १३) श्री समर्थ रामदास - लिंक १४) नव-नाग स्तोत्र
१५) गणपती अथर्वशीर्ष - लिंक १६) नि:शंक हो निर्भय हो मना रे (श्री स्वामी समर्थ तारक मंत्र)
१७) दत्तमाला मंत्र

पान ३

१८) श्री स्वामी समर्थाष्टक १९ ) श्रीगणपती स्तोत्र 20) श्री मारुती स्तोत्र (भीमरुपी महारुद्रा)
२१) नवग्रह स्तोत्र २२) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी २३) हनुमंताचा धावा २४) श्लोक
२५) तीर्थप्राशन, करदर्शन व भूमीवंदन श्लोक २६) संपूर्ण नवनाग स्तो���्र २७) शुभंकरोति कल्याणम
२८) कालभैरवाष्टक २९) श्री गणेश पन्चरत्न स्तोत्र ३०) शनी मंत्र ३१) रुद्र

पान ४

३२) संपुर्ण आरती सन्ग्रह /मनाचे श्लोक/ भगवद गीता - लिंक (गौतम्७स्टार यांची पोस्ट)
३३) श्री आदि शंकराचार्यांनी रचलेली स्तोत्रे - लिंक (चिनूक्स यांची पोस्ट)
३४) जयजयाजी गणपती (गणपती स्तोत्र) ३५) जगन्नाथपंडितांचं गंगालहरी - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३६) प्रार्थना ३७) श्रीसूक्त - लिंक (चिनूक्स पोस्ट) ३८) विविध स्तोत्रं (ऑडियो) - लिंक (चिनूक्स पोस्ट)
३९) गणेश / विष्णू / राम / हनुमान इत्यादींची स्तोत्रे - लिंक्स (मीनल यांचे पोस्ट) ४०) आद्य शंकराचार्य विरचित तुलजाष्टक ४१) सुंदरकाण्ड - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४२) पुरुषसूक्त ४३) http://khapre.org/ (स्तोत्रे / पोथ्या व इतर वाड्मयाचा संग्रह (महेश यांची पोस्ट) 44) दत्तलीला मंत्र ४५) मंगलाष्टके - लिंक (महेश यांची पोस्ट) ४६) लक्ष्मी श्लोक / शारदा स्तवन / गणपती श्लोक

पान ५

४७) स्वामी समर्थ माला मंत्र ४८) सूर्याष्टक ४८) हनुमान चलिसा - लिंक (GauriC यांची पोस्ट) ४९) वदनी कवळ घेता - मातृभूमीसाठी ५०) भगवद्गीता / दासबोध - लिंक (saket यांची पोस्ट) ५१) अष्टलक्ष्मी स्तोत्र - लिंक (GauriC यांची पोस्ट)
५२) शांती मंत्र ५३) शिवताण्डव स्तोत्र ५४) श्रीरामाचा पाळणा (pdf फाईल) ५५) महारुद्र अवतार हा सूर्यवंशी - संपूर्ण - जयवी यांची पोस्ट ५६) श्री समर्थ रामदासकृत मारुती स्तोत्र (राष्ट्राच्या सर्वांगिण रक्षणासाठी) ५७) मेधासूक्त - लिंक (कदंब यांची पोस्ट) ५८) विष्णूसहस्रनाम / भगवद्गीता - लिंक (महेश देशपांडे यांची पोस्ट) ५८) चर्पटपञ्जरिका स्तोत्रम.

पान ६

५८) नुपेक्षी कदा राम दासाभिमानी ५९) सूर्यनमस्कार ६०) नवग्रहपीडाहरस्तोत्र ६१) रुद्राष्टक - लिंक (माधव यांची पोस्ट)

पान ७

६२) श्री दुर्गासप्तशती सार ६३) ॠणमोचनमहागणपतिस्तोत्रम् ६४) दत्तदशक स्तोत्र ६५) श्रीमहिषासूरमर्दिनी स्तोत्र ६६) कैलासराणा शिवचंद्रमौळी...

पान ८

६७) श्रीमहालक्ष्मी नमन अष्टक ६८) आदिमाता महिषासुरमर्दिनी चण्डिकेची आरती ६९) श्रीविष्णो: षोडशनामस्तोत्रम् ७०) रामरक्षा ७१) श्री हनुमंतांच्या उपासनेचे कारण व कार्य.

पान ९

७२) श्रीरामांची कर्पुरआरती ७३) मारुती स्तोत्र आणि त्याचे निरुपण (लिंक) ७४) संगितातल्या विविध रागांमधे गायल्या गेलेल्या दत्तबावनीची लिंक (अभि यांची पोस्ट) ७५) पवमान सूक्त - लिंक (अभि यांची पोस्ट) ७६) गणपती स्तोत्र (मराठी) ७७) गायत्री मुद्रा (व्हिडियो) - अभि यांची पोस्ट

पान १०

७८) दयाळू तू देवा खचित आहे���ि - संत एकनाथांची रचना ७९) श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम् ८०) श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम् ८१) सनातनदेवीसूक्त ८२) शिवषडाक्षर स्त्रोत्र ८३) श्री महालक्ष्मी स्तोत्र ८४) देवीची आराधना ८५) स्वामी समर्थांना स्नान घालताना किंवा स्वामी समर्थांच्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद ८६) श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक ८७) श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित "आरती नर्मदेची" ८८) श्रीदासगणूंनी रचलेले श्रीसाईबाबांवरील पद

पान ११
८९) धर्मराजाचे दुर्गास्तवन ९०) अन्नपूर्णास्तोत्रम् ९१) श्रीवासुदेवानंदसरस्वती विरचित "उद्धरी गुरुराया, अनसूया तनया दत्तात्रेय'' ९१) सद्गुरु स्तोत्र ९२) विविध आरत्या ९३) श्री रंग बावनी ९४) आपल्या मुलांच्या सुखी भविष्यासाठी देवाची प्रार्थना

पान १२
९५ ) दत्तबावनी (मराठी) ९६) नृसिंहसरस्वतीस्वामी महाराजांवरचे एक मराठी कवन ९७) अमोघशिवकवचम ९८) प्रभो बालांचा तू अससि एक मित्र थोर ९९) अंबे जगदोद्धारिणि गे | १००) नृसिंहसरस्वती अष्टक
१०१) सत्राणे उड्डाणे हुंकार वदनी.. १०२) लतादीदीं च्या आवाजातली रामरक्षा - श्रीकांत यांच्या पोस्टमधील लिंक १०३) सूर्यस्तुती

पान १३

१०४) दुर्गाकवच - लिंक (माधव यांची पोस्ट) १०५) बजरंग बाण १०६) प्रज्ञाविवर्धन स्तोत्र - लिंक १०७) श्रीदेवी अपराधक्षमापन स्तोत्रम् १०८) शांतीपाठाचा अर्थ १०९) शिव आरती ११०) या कुन्देन्दुतुषारहार धवला १११) नवनाथ कथा सार - लिंक (माधव यांची पोस्ट) ११२) करुणाष्टकं

पान १४

११३) करुणाष्टकांवर चैतन्य महाराज देगलुरकर यांचे प्रवचन - लिंक ११४) श्री लिंगाष्टकः ११५) व्यंकटेश स्तोत्र - लिंक (हसरी यांची पोस्ट) ११६) ५२ श्लोकी गुरुचरित्र ११७) सार्थ दत्तबावनी

पान १५

११८) श्री अक्कलकोट स्वामी स्तोत्र --- महात्म्य ११९) श्री अक्कलकोट स्वामी मानसपूजा १२०) श्री स्वामी समर्थ स्तवन (नाही जन्म....) १२०) विविध स्त्रोत्रांची लिंक - joshnilu यांची पोस्ट १२१) GOD grant me the SERENITY... १२२)सर्वसिध्दी मंत्र १२३) श्री स्वामी समर्थ मानस पूजा १२४) श्री शिव मानस पूजा १२५) शनी स्तोत्र

पान १६

१२६) श्री दत्तात्रेय स्तुती १२७) नवरात्र अष्टमी होम १२८) देवीची गाणी, संबळ गीत, जोगवा, आरत्या इत्यादी. १२९) श्रीमहिषासुरमर्दिनी स्तोत्र यूट्यूबवर.

पान १७

१३०) श्री ज्ञानदेव हरिपाठ १३१) श्री देवी कवच १३२) सिद्धमंगल स्तोत्र १३३) रघुपति राघव राजा राम - भजन १३४) पंचमुखी श्रीवीरहनुमत्कवच स्तोत्र १३५) श्रीपञ्चमुख हनुमत्कवचमंत्र

पान १८
१३६) श���री महालक्ष्मी माहात्म्य १३७) संस्कृत स्तोत्रांच्या लिंक्स (वरदा यांची पोस्ट) १३८) काकड आरतीच्यावेळचा अभंग १३९) भग्वद्गीता ऑडियो लिंक (monalip यांची पोस्ट) १४०) महालक्ष्म्याष्टक स्तोत्रा - ऑडियो लिंक (भरत मयेकर यांची पोस्ट)

पान १९
१४१) चंदन चावल बेल की पतिया - संत मीराबाईंचे भजन १४२) कालभैरव अष्टकम् (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४३) कुबेर मंत्र (यूट्युब लिंक) - tapasvi यांची पोस्ट १४४) श्रीगजाननमहाराजांचे प्रति २१ नमस्कारांचे स्तोत्र १४५) स्वामी स्वरुपानंद - ज्ञानेश्वरी (mukti यांच्या पोस्टमधील यूट्यूब लिंक) १४६) दत्तलीलामृत आणि सिद्धलीलामृत - लिंक - राधिका यांची पोस्ट १४७) प्रारंभी विनती करु गणपती... १४८) श्रीगुरुचरित्र - अध्याय १४वा १४९) वदनी कवळ घेता, नाव घ्या मातृभूचे ! १५०) श्रीज्ञानेश्वरस्तोत्रम् १५१) गजानन बावनी

पान २०
१५२) स्तोत्रांच्या ऑडियो फाईल्सची लिंक (श्रीकांत यांची पोस्ट) १५३) श्रीवासुदेवानन्दसरस्वतीविरचित गणपतिस्तोत्र १५४) श्रीगणेशकवच : संकटनाशन श्रीगणेशस्तोत्र १५५) श्रीसदाशिवेन्द्रस्तवः १५६) श्रीदिनेशस्तवः १५७) ललितापञ्चरत्नम् १५८) त्रिपुरा सुन्दरि स्तोत्र १५९) विंध्यवासिनीचे स्तोत्र १६०) श्री विंध्यवासिनी माता आरती १६१) मह���षासुरमर्दिनी स्तोत्रम १६२) पाण्डुरङ्गाष्टकम

पान २१
१६३) स्वामी स्वरुपानंद (पावस) यांची रचना १६४) सद्गुरु सुबोध - श्री गोंदवलेकर महाराज १६५) रामदासस्वामी रचित अंबेची नवरात्राची आरती १६६) संत एकनाथ महाराज रचित अंबेचा जोगवा १६७) एकश्लोकी रामायण १६८) एकश्लोकी मारुती स्तोत्र १६९) एकश्लोकी भागवत १७०) श्रीविष्णोषोडशनामस्तोत्रं १७१) वाढदिवसाला म्हणावयाची प्रार्थना १७२) श्री तुळजाभवानी अध्याय व तुळजाभवानी कवच - केदार लसणे याच्या पोस्टमधली लिंक १७३) स्वा.सावरकर रचित स्वतंत्रतादेवी-स्तोत्र : जयोस्तुते १७४) जिव्हा प्रार्थना

पान २२

१७५) श्रीराधाकृतं गणेशस्तोत्रम् - अभी यांची पोस्ट्/लिंक १७६) श्री दत्त अथर्वशीर्ष १७७) एम. एस. सुब्बलक्ष्मी यांच्या आवाजातील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी.लिंक १७८) ए. आर. रेहमान यांच्या अल्बम मधील महिषासुरमर्दिनी स्तोत्र डाउनलोड करण्यासाठी लिंक १७९) दत्तमंगलचण्डिकास्तोत्रम् १८०) ज्वरनाशकस्तोत्रः १८१) दशरथ महाराज रचीत शनैश्चर स्त्रोत्र १८२) श्री गणपती विघ्ननाषना मंगलमुर्ती मुषकवाहना १८३) संपूर्ण अच्युताष्टक - लिंक (अभी यांची पोस्ट) १८४) महामृत्युंजय जप

पान २३
१८५) शनि वज्रपंज्जर कवचम १८६) दासबोध (लिंक) - श्रीकांत यांची पोस्ट १८७) गजेंद्रमोक्ष स्तोत्र १८८) कौसल्या सुप्रजा रामा

पान २४
१८९) कुंजिका स्तोत्र १९०) मंदिरात पादुकांना नमस्कार करतांना म्हणायचा श्लोक. १९१) श्री रेणुका स्तोत्र १९२) मानसपूजा (आत्मपूजा) १९३) गायत्री मंत्राचा अर्थ (शशांक पुरंदरे आणि परब्रह्म यांची पोस्ट) १९४) श्री दत्त कवच १९५) नवग्रह स्तोत्र (पौराणिक आणि वैदिक मंत्रांचे संकलित स्तोत्र) १९६) गुर्वभिन्न गणेश स्तुति १९७) गीतिपूर्वं श्रीगणपतिस्तोत्रम्

पान २५
१९८) नारायण सूक्त १९९) नारायण कवच २००) व्यंकटेश स्तोत्र २०१) श्रीगुरुपादुकाष्टम् २०२) स्वर्णाकर्षण भैरव स्तुती

पान २६
२०३) श्री गुरुगीता २०४) श्रीहरि स्तोत्र २०५) श्रीदुर्गापदुद्धारस्तोत्रम् २०६) समर्थ वाड्मयासाठी लिंक - मी_आर्या यांची पोस्ट २०७) रात्री शांत झोप लागण्यासाठी श्लोक २०८) तुळस तोडतांना म्हणायचा मंत्र २०९) भगवान शिव प्रात: स्मरण स्तोत्र २१०) श्रीदत्तदास नारायण गोविंद उकिडवे विरचित प प टेंबे स्वामींची आरती

पान २७
२११) गणेश स्तुती २१२) रामदास स्वामी रचित संपूर्ण गणपती आरती २१३) ऋण विमोचन नरसिंह स्तोत्रं २१४) लक्ष्मी सूक्त २१५) श्री सूक्त २१६) श्री प्रज्ञावर्धि���ी स्तोत्र २१७) मंत्रमातृकापुष्पमालास्तवः २१८) अन्नपूर्णास्तुतिः २१९) श्री बालमुकुन्दाष्टक. २२०) शाकंभरी (शताक्षी) माहात्म्यम्

पान २८
२२१) आरती भुवन सुंदराची | इंदिरावरा मुकुंदाची - लिंक (माधव यांची पोस्ट) २२२) ऋणविमोचन गणपति स्तोत्र २२३) अर्गला स्तोत्र २२४) श्री हनुमान वडवानल स्तोत्र २२५) निर्भय निर्गुण (संत कबीर) २२६) शुन्य गढ शहर, शहर घर बस्ति, कोन सुता कोन जागे है (गोरक्षनाथ) २२७) कबिर भजन - सुनता है गुरु ग्यानी २२८) लक्ष्मीनृसिंह करावलंबस्तोत्र २२९) शनैस्चर कृत श्री नृसिम्ह स्तुति २३०) कार्थ वीर्यार्जुन द्वादश नाम स्तोत्रम

पान २९
२३१) गोविंद नामावली २३२) श्री अक्कलकोट स्वामी स्तवन २३३) "आरती संग्रह (मराठी)" अ‍ॅन्ड्रॉईड अ‍ॅपची लिंक २३४) गोंदवलेकर महाराजांची प्रवचने (अ‍ॅप्लिकेशन लिंक) २३५) अन्नपूर्णा स्तोत्र २३६) श्रीहनुमदष्टकम्‌, शिवकवच (सम्पूर्ण) (लिंक) २३७) वराह कवच - बाधामुक्तीसाठी (लिंक) २३७) चिदम्बरेश्वर शिव स्तोत्र (लिंक) २३८) नारायण स्तोत्र २३९) सीतानवमीच्या दिवशी म्हणायचा जप २४०) श्री साईनाथांची अकरा वचने २४१) शतश्लोकी रामायण २४२) श्रीरामहृदयम् २४३) ब्रह्मचिंतन २४४) सर्व-कामना-सिद्धि स्तोत्र

पान ३०

२४५) मृत्युंजय कवचम् २४६) अनसूयेचे स्तोत्र २४७) अष्टक १ ले (नवरात्रात रोज म्हणायचे. वृत्त चामर.) २४८) गुरु शरणम् २४९) लक्ष्मी कवच २५०)अन्नपूर्णाष्टकम् स्तोस्त्रम् २५१) व्यंकटेश्वर वज्र कवच स्तोत्र २५२) श्रीपरशुराम स्तुती

पान ३१

२५३ ) परशुरामसहस्रनामस्तोत्र २५४) श्रीपरशुरामाष्टकम् २५५) परशुरामाष्टाविंशतिनामस्तोत्रम् २५६) परशुरामस्तोत्रम् २५७) http://sanskritdocuments.org/sanskrit/by-category/stotra.php २५८) कर्‍हाडच्या कृष्णामाईचं स्तवन

पान ३२
२५९) इंदुकोटी स्तोत्र २६०) इंदूकोटी स्तोत्र (यूट्यूब लिंक) २६१) दारिद्रयदुःखदहन शिवस्तोत्र २६२) गौरीची प्रार्थना

पान ३३
२६३) एकनाथी भागवत - भाग १४ मधील काही भाग २६४) हनुमंता रामदूता वायुपुत्रा महाबला २६५) दत्तात्रेय कवचम

शब्दखुणा: 
Groups audience: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

Satvik Bhavbandhanache nishkam swadarmacharan !

Shree Gurudev Datt............

नमस्कार.
अप्रतिम लेखन व अप्रतिम संग्रह!
मी संत एकनाथांचे 'दयाळू तू देवा' ऐकले आहे. मला जेवढे माहीत आहे तेवढे देत आहे.

दयाळू तू देवा खचित आहेसि ।
राखिले मजसि। सुखरूप ॥
निद्रेमजि मज सांभाळीले देवा।
दावियेला नवा। दिवसाजी ॥
क्रुपेने देवाजी वाचा दिली तुम्ही।
वेचू तुझी आम्ही । तुझ्यापायी ॥
पहात आम्ही आनंदाने राहू ।
तुझे गुण गाऊ । तुझ्याक्रुपे ॥
एका जनार्दनी शरण शरण। एका जनार्दनी शरण शरण॥

Does anybody have full Durga Aarti starting with:

Aarti tuzi ambe ....jagadambe,
Tarak vishwa kutumbe......

नमस्कार,

एक अभंग/आरती आहे
"पंढरीच्या देवा तुला दृष्ट लागली, ओवाळीती तुला रे देवा संतमंडळी"

कुणाला पुर्ण माहिती असल्यास इथे/माझ्या विपु त लिहाल का?

धन्यवाद!

धन्यवाद अभी,

पूर्वी सध्यां करताना व गायत्री मन्त्रांचा जप करतांना असा शास्त्रोक्त करण्याचा प्रघात होता पण कालौघात विस्म्रुतीत गेला.

एकंदर मुद्राविषयी फारच कमी माहीती उपलब्ध आहे. माझ्या अनुभवावरून मी सान्गु शकतो कि मुद्रा ह्या खुपच प्रभावी असतात व त्याचां फरक लगेच जाणवतो.

शुभंकर नवरात्रात (चैत्र नवरात्रात) म्हणण्यासाठी -

श्री आदिमाता शुभंकरा स्तवनम्

आदिमाते वेदमाते भक्तानुग्रहकारिणी |
सर्वत्रव्यापिकेSनन्ते श्रीगायत्री नमोSस्तु ते || १ ||

तालुस्था त्वं सदाधारा बिन्दुस्था बिन्दुमालिनी |
परात्परे वात्सल्यशक्ति: अनसूये नमोSस्तु ते || २ ||

कुकर्म-कुसंग-कुबुद्धि-कुदृष्टिविनाशिनी |
चामुण्डे चण्डमुण्डमथने महिषासुरमर्दिनी नमोSस्तु ते || ३ ||

प्रातर्बाला च मध्यान्हे यौवनस्था भवेत् पुनः |
वृद्धा सायं भगवति महादेव्यै नमो नमः || ४ ||

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ५ ||

अशुभनाशिनी नवरात्रा (अश्विन नवरात्रात) म्हणण्यासाठी -

या नवरात्रातील ५ व्या दिवशी आदिमाता राम रावणाच्या युद्धभुमीवर लीलाविग्रही/ललिता रुपाने प्रगटली होती. अष्टमीलाही तिने जेव्हा युद्धभुमीवर 'श्री रामवरदायिनी' रुपाने अवतरुन रामाला विजयी होशील असा आशिर्वाद दिला, तेव्हा बिभिषणाला रावणाच्या शरिरातील अमृतकुंभाच्या स्थानाचे स्मरण झाले. नंतर रामाने वर्मी शस्त्रप्रहार करुन रावणाला मारले.

श्री आदिमाता अशुभनाशिनी स्तवनम्

प्रणवमाते गतित्राते गयःत्राते भर्गमालिनी |
पापनाशिनी चण्डिके श्रीगायत्रि नमोSस्तु ते || १ ||

त्रिमूर्तिमाते पतिव्रते प्रेमत्राते तपमालिनी |
दु:खनाशिनी चण्डिके अनसूये नमोSस्तु ते || २ ||

भावस्था त्वं नामाधारा नादस्था मन्त्रमालिनी |
अशुभनाशिनी चण्डिके महिषासुरमर्दिनि नमोSस्तु ते || ३ ||

सर्वबाधाप्रशमनं त्रैलोक्यस्य अखिलेश्वरी |
एवमेव त्वया कार्यं अस्मद् वैरिविनाशनम् || ४ ||

पिशाचदैत्यदुर्मान्त्रिकादि-सर्वशत्रुविनाशिनि |
ॐ नमश्चण्डिकायै नमश्चण्डिकायै नमश्चण्डिकायै
रक्ष रक्ष परमेश्वरि || ५ ||

रोगानशेषान् अपहंसि तुष्टा रुष्टा तु कामान् सकलान् अभीष्टान् |
ॐ नमश्चण्डिकायै नमश्चण्डिकायै नमश्चण्डिकायै
क्षमस्व मे परमेश्वरि || ६ ||

त्वां आश्रितानां न विपन्नराणां त्वां आश्रिता ह्याश्रेयतां प्रयान्ति |
ॐ नमश्चण्डिकायै नमश्चण्डिकायै नमश्चण्डिकायै
प्रसीद मे परमेश्वरि || ७ ||

अष्टादशभुजे त्रिधे श्रीदुर्गे सिंहवाहिनी |
भयेभ्यस्त्राहि नो देवि शुभंकरे नमोSस्तु ते || ८ ||

बिभिषण उवाच
पापोSहं पापकर्माSहं पापात्मा पापसंभवः |
त्राहि मां आदिमाते सर्वपापहरा भव || ९ ||

सनातनदेवीसूक्त

या परमेश्वरी सर्वभूतानां या च देवे व्यवस्थिता |
चण्डिकारूपेण सा देवि मम पापं व्यपोहतु || १ ||

नमो देव्यै महादेव्यै शिवायै सततं नमः |
नमः प्रकृत्यै भद्रायै नियता: प्रणता: स्म ताम् || २ ||

दुर्गायै दुर्गपारायै सारायै सर्वकारिण्यै |
ख्यात्यै तथैव कृष्णायै धूम्रायै सततं नमः || ३ ||

अतिसौम्या अतिरौद्रायै नतास्तस्यै नमो नमः |
नमो जगत्प्रतिष्ठायै देव्यै कृत्यै नमो नमः || ४ ||

या देवी सर्वभूतेषु विष्णुमात्रेति शब्दिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ५ ||

या देवी सर्वभूतेषु चेतनेति अभिधीयते |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ६ ||

या देवी सर्वभूतेषु परावाणीरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ७ ||

या देवी सर्वभूतेषु निद्रारुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ८ ||

या देवी सर्वभूतेषु क्षुधारुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ९ ||

या देवी सर्वभूतेषु तृष्णारुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १० ||

या देवी सर्वभूतेषु क्षान्तिरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || ११ ||

या देवी सर्वभूतेषु जातिरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १२ ||

या देवी सर्वभूतेषु शान्तिरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १३ ||

या देवी सर्वभूतेषु ईशस्मृतिरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १४ ||

या देवी सर्वभूतेषु दयारुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १५ ||

या देवी सर्वभूतेषु तुष्टिरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १६ ||

या देवी सर्वभूतेषु तृप्तिरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १७ ||

या देवी सर्वभूतेषु तपश्चर्यारुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १८ ||

या देवी सर्वभूतेषु मातृरुपेण संस्थिता |
नमस्तस्यै नमस्तस्यै नमस्तस्यै नमो नमः || १९ ||

वागादि अगम्या महती त्रिपुरा सर्वकारणम् |
तस्या यत् परमं रुपं सर्वाSन्तरतया स्थितम् || २० ||

योगिश्रेष्ठा विजानन्ति बहिर्देशे नेतरे |
तस्या यत् अपरं रूपं स्थूलं तत् सर्वगोचरम् || २१ ||

सा स्थूलरुपा अष्टादशभुजा सुरम्या सिंहसंस्थाना |
ईहाशून्या अर्थितपदा स्वर्णवर्णा एधमाना || २२ ||

अनुत्तरा अनघा अनन्ता अद्भुतरूपा |
अतिलोकचरित्रा राका अतिशुभ्रप्रदा || २३ ||

सकलचराचरवपुराद्या त्वं स्वाSSश्रितलोका लोकगणा |
नाSन्यत्किञ्चित्तव शरणं स्वं विभवं श्रित्वा ननु भासि || २४ ||

देवि प्रपन्नार्तिहरे प्रसीद, प्रसीद मातर्जगतोSखिलस्य |
प्रसीद विश्वेश्वरि पाहि विश्वं त्वमीश्वरी देवि चराचरस्य || २५ ||

काही श्लोक,

१. कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने
प्रणतः क्लेश नाशाय गोविंदाय नमो नमः|

२. आदौ पांडव द्युत राष्ट्र हननम
लाक्षागृही दहनम्,
द्युत स्त्रि हरणम रणे विचरणम
मत्स्यालया वर्धनम|

३. आदौ भीष्म सुयोधनासी हननम
एतत्य हे भारत
अग्रे रक्षित गोविंद पार्थामाजी धर्नुधरः
उभयता राम लक्ष्मण सव्यसाची धनंजया:
मातश्च कमलादेवी पितादेव जनार्दन
बंधु विष्णु भक्तश्च
भवेद तु भवनन्तः |

४. उपासनेला दृढ चालवावे ,
भुदेव संतांसी सदा नमावे
सत्कर्मयोगे वय घालवावे,
सर्वांमुखी मंगल बोलवावे |

चुक भुल द्यावी घ्यावी.,सुधारणा जरुर कळवाव्यात.

प्लीज कूणाकडे "सदा सर्वदा योग तुझा घडावा " ही प्रार्थना असेल तर प्लीज त्याचे शब्द or audio पोस्ट करा...प्लीज मला urgently हवे आहे...

सखी

सदा सर्वदा योग तुझा घडावा
तुझे कारणी देह माझा पडावा
उपेक्षू नको गुणवंता अनंता
रघुनायका मागणे हेचि आता

thnx a lot पण पूढे काय .........म्हन्जे ते शूकासारिखे पूर्ण वैराग्य ज्याचे...वगैरे.....i think चार कडवी आहेत ...कूणाकडे असेल तर प्लीज सान्गा..........

शिवषडाक्षर स्त्रोत्र !!
ॐकार बिंदू संयुक्तम् नित्यम् ध्यायन्ति योगिनः।
कामदं मोक्षदं चैव ॐकाराय नमो नमः॥

नमन्ति ऋषयो देवो नमन्त्य सरसन्गणा।
नर नमन्ति देवेष नाकार्य नमो नमः॥

महादेवम् महात्मानम् महाध्यानं परायणम्।
महापाप हरं देवम् मकराय नमो नमः॥

शिवम् शन्तम जगन्नाथम् लोकनुग्रःअकारकं।
शिवमेक पदम् नित्यं शिकाराय नमो नमः॥

वाहनम् वृषभो यस्य वासुकी कण्ठभूषणं।
वामे शक्तिधरं देवम् वकाराय नमो नमः॥

यत्र यत्र स्थितो देवाः सर्वव्यापि महेश्वरः।
यो गुरु सर्वदेवानां यकाराय नमो नमः॥

नमः शिवाय नमो नमः। ॐ नमः शिवाय नमो नमः।
ॐ नमः शिवाय नमो नमः॥

Solid Collection आहे!!! मी बरेच दिवस 'पिता माता बंधु तुजविण असे कोण मजला.... कृपा दृष्टी पाहे शरण तुज आहे गणपती' हे गणपती स्तोत्र शोधत आहे. जर कोणाकडे असेल तर please post करा... धन्यवाद.

एक महालक्ष्मी स्तोत्र खाली देत आहे...

|| श्री महालक्ष्मी स्तोत्र ||

सुंदरे गुणमंदिरे करुणाकरे कमलोद्भवे |
सिद्धचारण पूजिती जनवंदिते महावैश्णवे ||१||

त्राहि हो मज पाही हो मज पाही हो महालक्ष्मी |
हेमभावन रत्नकोन्दण हे सिंहासन आसनी ||२||

एक एक विचित्र माणिक जोडिले मुकुटावरी |
त्यासि देखुनी लोपला शशि चालला गगनोदरी ||३||

कुण्डले श्रवणी रवि शशि मंडळासम वर्तुळे |
डोलता सुरनायकावरि हालताती चंचले ||४||

कंचुकी कुचमंडळावर हार चंपक रुळती |
पारिजातक शेवती बटमोगरा आणि मालती ||५||

पिवळा पट तो कटी तटी वेष्टिल्या बरवे परी |
सौदामिनीहुनी तेज अधिक ते शोभते उदरावरी ||६||

कमुकावर मन्मथे शरसज्जिल्या तैशा निर्या |
गर्जती पद पंकजी किती नुपुरे आणि घागर्या ||७||

इंद्र चंद्र महेंद्र नारद पाद पंकज अर्पिती |
कुंकुमागुरु कस्तूरी किती आदरे तुज चर्चिती ||८||

निर्जळे तुज पूजिता बहु शोभिसी कमलासनी |
किती हो तुज वर्णु मी मज पाव हो कुलस्वामिनी ||९||

कोटि तेहतीस देवतांसवे घेऊनी विन्झणे करी |
चामरे चिरपल्लवे तुज ढाळिती परमेश्वरी ||१०||

नामामृत दे निरंतर याचकाप्रती गिरीसुते |
जोडुनी कर विनवितो मज पाव हो वरदेवते ||११||

संकटी तुज वाचुनी मज कोण रक्षिल अम्बिके |
कृष्णकेशव प्रार्थतो मज पाव हो जगदम्बिके ||१२||

|| जय जगदम्ब | उदयोस्तु | अंबे उदयोस्तु ||

देवीची आराधना

ऊँ विधुद्दामसमप्रभां मृगपतिस्कन्धस्थितां भीषणां।
कन्याभि: करवालखेटविलसद्धस्ताभिरासेविताम्।।

हस्तैश्चकृगदासिरखेट विशिखांश्चापं गुणं तर्जनीं
विभ्राणामनलात्मिकां शशिधरां दुर्गा त्रिनेधां भजे।।

(मी त्रिनेत्रधारी दुर्गा देवीची आराधना करत आहे. देवीचे रूप तेजस्वी आहे. सिंहावर ती विराजमान असून तिच्या हातात चक्र, गदा, तलवार, ढाल, धनुष्यबाण आदी शस्त्रे आहेत. आदीशक्तीची सेवा करण्‍यासाठी अनेक कुमारीका तलवार व ढाल हातात घेऊन देवीजवळ उभ्या आहेत. त्यांचेही रूप अग्निसमान तेजस्वी आहे. त्यांच्या माथ्यावर चंद्र दिसत आहे. या आदीशक्ती, चंडीका, अष्टभुजा देवीला म‍ी मनपूर्वक वंदन करतो.)
अशा प्रकारे भगवती आईची आराधना करावी.

एभि: स्तवैश्च मां नित्यं स्तोष्यतें य: समाहित:।
तस्याहं सकलां बाधां नाशर्शयएयाम्यसंशयम्।।

(अर्थात, जो कोणी‍ एकाग्रचित्ताने दररोज वरील स्तुतीने माझे स्तवन करेल त्याच्या जीवनातील बाधा दूर होऊन त्याचे जीवन सफल होईल.)

भगवती आईची वरील स्तुतीच्या माध्यमातून आराधना केल्याने मनातील इच्छा पूर्ण होऊन सुखशांती लाभते. प्रत्येकाने नवरात्रीत देवीची आराधना अवश्य केली पाहिजे. दुर्गा सप्तशतीचे पारायण करावे. पापांचे हरण होऊन मोक्ष प्राप्त होतो.

अष्टम्यां च चतुर्दश्यां नवम्यां चैकचेतस:।
श्रोए‍यन्ति चैव ये भक्त्या गम माहात्यमुत्तमम।।

ने तेषां दुष्कृतं किश्चिद्‍ दुष्कृतोत्था न चापद:।
भविष्यति न दारिद्रयं न चैवेष्टवियोजनम्।।

शत्रुतो न भयं तस्य दस्युतो वा न राजत:
न शस्त्रानलतोयौधात्कदाचित्सम्भविष्यति।।

देवी माहात्म्याचे स्मरण केल्यास दारिद्रय नष्ट होऊन घरी सुखशांती नांदेल. धनसंपत्तीची कधीच कमतरता भासणार नाही. जीवनातील सगळ्या अडचणी दूर होऊन पदरात यश पडेल. मनातील भीती दूर होईल. नेहमी प्रसन्न रहाल. नवदुर्गा उत्सवात दुर्गा मंदिरात देवी महात्म्य अथवा दुर्गा पाठ करणार्‍यास काहीच कमी पडणार नाही. त्याची रखडलेली कामे मार्गी लागतील. धन-धान्याची कमतरता भासणार नाही. निपुत्रिकांना पुत्र प्राप्त होईल.

भगवती आई सांगते-
यत्रेतत्पठयते सम्यङनित्यमायतने मम।
सदा न तद्धिमोक्ष्यामि सानिध्यं तत्र में स्थितम्।।

शरत्काले महापूजा क्रियते या च वार्षिकी।
तस्यां ममैतन्माहत्मयं श्रञत्वा भक्ति समन्वित:।।

आई जगदंबेचे माहात्म्य जो भक्त श्रवण करेल त्याचे सर्व शत्रू नष्ट होतील. त्याचे कल्याण होऊन घर धनधान्याने भरून जाईल. भयानक स्वप्न पडणार्‍यांनी भगवतीची‍ मनोभावे आराधना करावी. देवी माहात्म्याचे नियमित पठण केल्याने समस्या सुटतील.

शांतिकर्मणि सर्वत्र तथा दु:स्वप्रदर्शने।
ग्रहपीडासु चोग्रासु माहात्म्यं भृणुयान्मम।।
उपसर्गा: शमं यान्ति ग्रहपीडाश्च दारूणा:।
दु:स्वप्नं च नृभिदृष्टं सुस्वप्रभुपजायते।।

भगवतीची आराधना केल्याने जगदम्बा त्याला यश, वैभव, शांति प्रदान करते.

ऊँ बालार्कमण्डलाभासां चतुर्बाहुं त्रिलोचनाम्।
पाशाङ्कुशवरा भीतीधरियन्ती शिवां भजे।।

माझ्या सारख्या पारमार्थिक सेवकाला असे वाटते ही भगवान विष्णू यांनी प्रत्येक युगात सत्प्रवृत्तीचे रक्षण करण्यासाठी वेगवेगळे रुपाने अवतार घेतले. आजच्या घडीला जर विचार केला तर मनःचक्षुसमोर उभे राहातात ते भगवान " दत्तात्रेय " ( ब्रह्मा निष्णू महेश ) उत्पत्ती, स्थिती, लय, या तिन्ही दैवी शक्तींनी अनसूया माता व अत्री पिता यांच्या ठिकाणी दत्तात्रेय या नावाने अविनाशी अवतार धारण करुन " जे का रंजले गाजलें, त्यासी म्हणे जो आपुले" अशा प्रकारे लोकाचे कल्याण करुन आपल्या अवताराची समाप्ती न करता अमाजापादून काही काळ दूर राहाण्याच्या दृष्टीने ते गिरनार पर्वतावर गुप्त झाले. पुन्हा काही कालावधीनंतर " श्रीपाद श्रीवल्लभ" नावाने अवतार धारण करुन स्वतःमात्यापित्याना मी दत्तात्रेय अविनाश चैतन्यरुप आहे हे दाखवून जनकल्याणार्थ तीर्थयातत्रेस गेले. काही काळानंतर भगवान दत्तात्रेयांनी "श्री नृसिंह सरस्वती" या नावाने अवतार घेऊन जनकल्याण करुन श्री क्षेत्र गाणगापूर येथे निगुन पादुकांची आपली खूण सर्वाना साक्षीस ठेऊन शैल्य पर्वताकडे तपश्चर्येसाठी गेले.

यानंतर मात्र बर्‍याच कालावधीनंतर श्री समर्थाचे आगमन कर्दळी वनातून झाले. अजानबाहू सगुन मुर्ती अनेक ठिकाणी भ्रमण करीत अक्कलकोटास स्थिरावली व श्री स्वामी समर्थ अक्कलकोट महाराज म्हणून लोकांत प्रसिध्दी झाली. श्री स्वामी समर्थ कोठेही असले तरीही ते मनोवेगाने जात येत असत. यांचे अनेक चमत्कार, अनेक लीला. एक ठिकाणी गुप्त होणे, दुसर्‍या ठिकाणी प्रगट होणे, दर्शनाला येणार्‍या भाविकांच्या मनोकामना पूर्ण होणे अशाप्रकारे समाजामध्ये सत्प्रवृत्ती निर्माण होण्याच्या दृष्टीने कार्य केले. आणि याचमुळे श्री स्वामी समर्थ भगवान दत्तात्रेयांचेच अवतार आहेत हे त्या काळच्या मंडळींना भावले. श्री स्वामी समर्थंकडे अनेक प्रकारची मंडळी त्यामध्ये राव रंक सुध्दा त्यांच्या दर्शनाला येत असत. त्याही सर्वांना योग ते मार्गदर्शन श्री स्वामी समर्थ करत असत.

श्री स्वामी समर्थाच्या पूर्वीचे भगवान दत्तात्रेयांचे अवतार म्हणजे श्री. श्रीपाद श्रीवल्लभ आणि श्री. नृसिंह सरस्वती. यांनाही त्या त्या काळात सर्वाचे भले केले. अविवेकी मंडळींना आपल्या तपोबलाने सन्मार्गाकडे वळविले. आज मात्र विशेषतः गुरुशिष्य परंपरा पाहायला अनुभवायला मिळेल ती समर्थ अक्कलकोट स्वामी महाराजांचीच.

श्री स्वामींचे बरेच शिष्य होते. त्यांनी स्वामींच्या सान्निध्यात राहून स्वामी संप्रदाय निर्माण केला. इतर अवतारापेक्षाही भगवान दत्तात्रेयाचा अवतार हा चिंरजीव असून ब्रह्मा, विष्णू, महेश या त्रिगुणात्मक दैवी शक्ती पुर्णत्वाने शाश्र्वत रुपाने अविनाशी आहेत. आणि म्हणून भगवान दत्तात्रेयांच्यापासून सुरु झालेली ही गुरुशिष्य पंरपरा स्वामी समर्थाच्या काळात मोठ्या प्रमाणात वृध्दिंगत झाली आणि ती आजही कार्यरत आहे. आणि ती पुढेही कार्यरत असणार..

त्यातील एक पद. ( सध्द्गरुना स्नान घालताना किंवा सध्द्गरु च्या पादुकांवर अभिषेक करताना म्हणावयाचे पद )

चला न्हाणुं त्या गुरुराया || वेदादिक ही स्तविति ब्रम्ह तें सगुण होइ जग ताराया ||धृ||

रत्नखचित चौरंगि बसूवुं या || तैल सुवासिक शिरिं घालूं या | उटणिं अत्तरें अंगिं मर्दूया ||

करुं सेवा प्रभु सुखवाया ||१|| उष्ण सुगंधित जल गंगेचें || घालुनि चोळू अंग प्रभुचें ||

निर्मळ करुनी पुसुं या साचें || चरणिं पादुका लेववुं या ||२|| सुवर्णसूत्रहि कटिला विलसें ||

कौपिन छाटी भगवी नेसे || भरजरि शेला पांघरलासे || ध्यान ठ्सो दिनदासीं या ||३||

( सध्द्गरु सिंहासनारोह अथवा पादुका आसनारोहण, भस्मधारण इ...)

रत्नजडित सिंहासन || मृदु सुंदर वरि आसन || त्यावरि देदीप्यमान || स्वामी शोभला ||१||

षडरींतें करुनि भस्म || चर्चियलें अंगिं भस्म || निर्विकार पूर्ण ब्रम्ह || स्वामि शोभला ||२||

संध्या संदेह-हारि || यज्ञोपवितासि धरि || भक्त्-जनांस्तव आचरि || कर्ममार्गहा ||३||

वरिल सर्व पदे आमच्या कडे सन १९२० साला पासून आहेत.
संजिव ( स्वामी भक्त )
अधिक माहिती साठी मिसळपाव वर "सद्धगुरु च्या शोधात" लेख आहेत.

कालच 'नर्मदेSS हर हर' हे श्री जगन्नाथ कुंटे यांचं नर्मदा परिक्रमेवरचं पुस्तक वाचण्याचा योग आला. त्यात दिलेलं 'नर्मदाष्टक' इथे टाकण्याचा मोह आवरला नाही म्हणुन हा प्रपंच!!

श्री श्री नर्मदाष्टक
श्रीमद आद्य शंकराचार्य विरचित नर्मदाष्टक

सबिन्दुसिन्धुसुस्खलत तरड्ग भड्गरन्जितं
द्विषत्सुपापजातक अरिवारि संयुतम |
कृतान्तदूत कालभूत भीतिहारि वर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||१||

त्वदम्बुलीन दीन मीन दिव्य सम्प्रदायकं
कलौमलौघ भारहारि सर्वतीर्थनायकम|
सुम्त्स्यकच्छ नक्रचक्र चक्रवाक शर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||२||

महागभीर नीरपूर पापधूत भूतलं
ध्वनत्समस्त पातकारि दारितापदाचलम |
जगल्लये महाभय मृकण्डुसूनुहर्म्यदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||३||

गतं तदैव मे भयं त्वदम्बु वीक्षितं यदा
मृकण्डुसूनुशौनका सुरारिसेविसर्वदा |
पुनर्भवाब्धि जन्मसम्भवाब्धि दःखवर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||४||

अलक्षलक्ष किन्नरामरासुरादिपूजितं
सुलक्षनीर तीरधीअ पक्षिलकूजितम |
वसिष्ठशिष्ट पिप्पलाद कर्दमादिशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||५||

सनत्कुमार नाचिकेत कश्यपात्रिषटपदै: |
धृतं स्वकीयमानसेषु नारदादिषटपदै: |
रवीन्दुरन्तिदेवदेव राजकर्मशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||६||

अलक्ष-लक्ष-लक्षपाप-लक्षसार-सायुंधं
ततस्तु जीवजन्तुतन्तु भुक्तिमुक्तिदायकम |
विरन्चीविष्णुशंकर स्वकीय धामवर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||७||

अहोSमृतं स्वनं श्रुतं महेशकेशजातटे
किरातसूतवाडवेषु पण्डिते शठे नटे |
दुरन्तपापतापहारि सर्वजन्तुशर्मदे
त्वदीयपादपंकजं नमामि देवि नर्मदे ||८||

इदं तु नर्मदाष्टकं त्रिकालमेव ये सदा
पठन्ति ते निरन्तरं न यान्ति दुर्गतिं कदा |
सुलभ्य देहदुर्लभं महेशधाम गौरवम
पुरर्भवा न वै नरा विलोकयन्ति रौरवम ||९||

इति श्रीमत आद्यशंकराचार्यविरचितं नर्मदाष्टकं सम्पूर्णम |
नर्मदे हर | नर्मदे हर | नर्मदे हर ||

१) बिंदूपासून सिंधूपर्यंत अखंड तरंगाकार प्रवाहाने नटलेल्या आणि दुष्ट पापप्रवृत्तीमुळे प्राप्त होणा-या जन्मपरंपरेचा नाह करणा-या जलाने युक्त अशा तुझ्या चरणकमलांना, कालस्वरुप यमदूतांची भीती हरण करुन रक्षण करणा-या देवी नर्मदे, मी नमन करतो.
२) तुझ्या जलामध्ये विहरणा-या दीनदुबळ्या मत्स्यांना दिव्यता प्रदान करणा-या, कलियुगातील महादोषांचा परिहार करण्या-या सकलतीर्थांमध्ये वरिष्ठ अशा तुझ्या पादपद्मांना, प्रचंड मासे, कासवे आणि मगरींच्या समुदायांचे, तसेच चक्रवाक पक्ष्यांचे कल्याण करणा-या देवी नर्मदे, मी वंदन करतो.
३) महाप्रचंड पुराने भूतलावरील सारी पापे धुऊन काढणा-या आणि घनगंभीर नादाने पातकांच्या राशी आणि पर्वतप्राय संकटे यांचा चक्काचूर करणा-या तुझ्या चरणांबुजांना, प्रलयकालीन महाभयाच्या वेळी मार्कण्डेय ऋषींना आपल्या ठायी आश्रय देणा-या देवी नर्मदे, मी नमस्कार करतो.
४) मार्कण्डेय, शौनक, देवेंद्र ज्यांचे सदैव सेवन करतात, त्या तुझ्या जलाचे नुसते दर्शन होताच माझे भय कुठल्या कुठे पळून गेले. पुनर्जन्म तसेच संसारसागरातील दु:खांपासून कवचाप्रमाणे रक्षण करणा-या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी वंदन करतो.
५) अगणित किन्नर, देव आणि असुर ज्यांची पूजा करतात आणि ज्यांच्या तीरावरील लक्षावधी पक्षिगण जलाशय निरखीत धीटपणे अखंड कूजन करीत असतात, त्या तुझ्या चरणकमलांना, मुनिश्रेष्ठ वसिष्ठ , पिप्पलाद, कर्दमप्रभृतीचे कल्याण करणा-या देवी नर्मदे, मी नमन करतो.
६) सनत्कुमार, नचिकेत, कश्यप, अत्रि, नारदादी भृंगांनी ज्यांना आपल्या अंतःकरणात साठविले आहे, त्या तुझ्या पादपद्यांना, सूर्य, चंद्र, अन्तिदेव, देवराग इंद्र यांच्या सत्कर्मांना विश्वात प्रतिष्ठित करणा-या देवी नर्मदे, मी वंदन करतो.
७) दृष्टादृष्ट लक्षावधी पातकांच्या राशींचा भेद करणा-या, तसेच जीवजंतूंना भोग आणी मोक्ष प्रदान करणा-या तुझ्या चरणांबुजांना, ब्रम्हाविष्णुमहेशांना आपापल्या ठायी सुप्रतिष्ठित करणा-या देवी नर्मदे, मी नमस्कार करतो.
८) भगवान शंकरांच्या जटेतून निघालेल्या नर्मदेच्या तटावरील किरात, सूत, वाडव, पंडित, शठ, नट अशा समस्त जनांच्या मुखी अमृतोपम संजीवक असे नर्मदेचे गुणगानच ऐकू येते. दुस्तर पापतापांचा संहार करुन सकल जीवांचे कल्याण करणा-या देवी नर्मदे, तुझ्या पदकमलांना मी नमन करतो.
९) हे नर्मदाष्टक नेहमी त्रिकाळी जे निरंतर पठण करतात ते कधीही दुर्गतीला जात नाहीत. एवढेच काय, मानवदेहातील अतिदुर्लभ आणि गौरवास्पद असे शिवपद अनायासे प्राप्त झाल्याने ते जन्मबंधनातून मुक्त होतात व रौरवादी नरकांचे त्यांना दर्शनही घडत नाही.

------***------

श्री. प.पू. वासुदेवानंद सरस्वती लिखित
आरती नर्मदेची

जय जय नर्मदे ईश्वरि मेकलसंजाते ||
नीराजयामि नाशिततापत्रयजाते || जय जय ||१||

वारितसंसृतिभीते सुरवरमुनिगीते ||
सुखदे पावनकीर्ते शंकरतनुजाते ||
देवापगाधितीर्थे दत्ताग्रयपुमर्थे ||
वाचामगम्यकीर्ते जलमयसन्मूर्ते ||जय जय ||२||

नन्दनवनसमतीरे स्वादुसुधानीरे ||
दर्शितभवपरतीरे दमितान्तकसारे ||
सकक्षेमाधारे वृत्तपारावारे ||
रक्षास्मानातिघोरे मग्नान्संसारे ||जय जय || ३||

स्वयशःपावितजीवे मामुद्धर रेवे ||
तीरं ते खलु सेवे त्वयि निश्चितभावे |
कृतदुष्कृतदवदावे त्वत्पदराजीवे
तारक इह मेSतिजवे भक्त्या ते सेवे ||जय जय ||४||

आदौ रामतपोवनादिगमनम हत्त्व म्रुगम कान्चनम
वैदेहीहरणम जटायुमरणम सुग्रीवसम्भाषणम |
वालीनिर्दलनम समुद्रतरणम लन्कापुरीदाहनम
पश्चात रावणकुम्भकर्णहननम एतद्धि रामायणम||

अजून एक श्लोक रात्री झोपताना म्हणावा...

जले रक्षतउ वरहः स्थले रक्षतु वामनः |
अटव्याम नार्सिन्व्हश्च सर्वतः पातु केशवः ||
अर्थः - पाण्यात (संकट आल्यास) वराह अवतारातल्या विष्णूप्रमाणे (देवाने) रक्षण करावे. जमिनिवर (प्रुथ्वीवर) वामन अवतरातल्या देवाने रक्षण करावे, अरण्यात न्रुसिन्व्हाप्रमाणे रक्ष्ण करावे, आनि सर्वत्रच केशवाने माझे रक्षण करावे.

मी श्री साईबाबांची भक्त आहे. बर्‍याच वर्षापूर्वी साईलीलेत श्री दासगणू महाराजांचे एक पद छापून आले होते.त्या पदातली एक एक ओळ इतकी अर्थपूर्ण आहे की बाबांची शिकवण त्यातून उमजते.जसे जसे आपण त्या ओळी समजून म्हणायला लागतो,तसा तसा आपला अज्ञानमयी अंधार दूर व्हायला लागतो.अध्यात्म्याच्या वाटेवर सदगुरुची आवश्यकता का जरुरी आहे ते कळते. जसा मला अनुभव आला तसा आपल्यालाही येइल ह्याची खात्री आहे.
जयाची ती रुपे सगुण निर्गूण,ऐसा नारायण वंदू आधी
सगूण सेविता निर्गूण ये हाती,निर्गूणाची प्राप्ती आरंभी ना
आधी मुलं काढी क ख बाराखडी, मग शब्द जोडी झाल्या ज्ञान
गणू म्हणे ऐसी सगुणोपासना,बाराखडी जाणा अध्यात्म्याची (१)
तीही बाराखडी शिकवी जो गुरु,भवाब्धीचे तारू तोच जाणा
गुरुसेवा हीच प्रथम पायरी ,असे टिकण्या भारी अवघड
सदगुरुरायाची कृपा संपादिता,सेवेचि पूर्तता सहज होई
गणू म्हणे केल्या प्रसन्न सविता, प्रभेची न्युनता केवी पडे (२)
सदगुरुरायाची सेवा बहुतांनी केली,ऐसी साक्ष दिधली पुराणांनी
पुर्णब्रम्ह राम जानकीचा कांत,झाला शरणागत वसिष्ठांशी
रुक्मिणीवल्लभे केला सांदिपनी आपणालागी गुरुराय
गणू म्हणे गुरुवाचुनिया नर,तोचि जाणा खरं दो पायांचा (३)
निष्ठावंत भाव हाच देतो फळं,अभक्तिचा मळ निमालिया
चहाड दुतोंड्या ऐसा नारद मुनि,परी झाला तरणी प्रल्हादाते
गोपिचंदे गुरु लिदिसी गाढीला,परी तोची झाला वंद्य त्याते
गणू म्हणे सोने चढे मोलाअंगे,कसोटीच्या संगे जगामाजी (४)
क्षमा शांति दया असे जया ठायी,तैसे ज्ञान पाही संपूर्ण कते
जयाचिये शिरी ईश्वराचा हात,तोच सद्गुरुनाथ करावा हो
बाहेरील सोंगा भुलु नका कदा,पतंगाते दगा दिपापाशी
गणू म्हणे हंस पाण्याते टाकोनि,घेतसे शोधोनि जैसे दूध (५)
हिरे आणि गारा एक्याच खाणीत,तैसे बद्ध मुक्त जगामाजी
पारखी तो येता हिरा घे वेचुनी ,कुक्कुट पायानी कालवी तो
मुमुक्क्षु पारखी चार्वाक कोंबडा, कुक्कुटा उकिरडा गोड वाटे
गणू म्हणे जो का असे भाग्यवंत,तयाचाच हेत गुरुपायी (६)
क्षमा शांतियुक्त भवाब्धिचे जहाज,ऐसा सद्गुरुराज शिरडीमाजी
नानाविधा शोभे जया साई,अनाथांची माई तीच जाणा
अनाथ सनाथ हा न भेद जेथे,सुर्यप्रकाशाते निवड कैची
माझा गुरुनाथ जान्हविचे जळ,गणू अर्पी भाळ तया पायी (७)
अंगकाठी उंच केलीसे धारण, कळावया लीन भक्तजना
उच्च ज्ञान जे का अध्यात्म सजिरे,तेची सेवा सारे कल्याणार्थ
परी नका सोडू ठेंगडी लीनता,न ये थोर बाल्याविण
गणू म्हणे वर्ण तांबूस सावळा,सद्गुरुरायाची लिला अगाधची (८)
सद्गुरुरायाने जला तेल केले,दीप उजळिले लक्षावधी
ठेवुनिया दीप उशा पायथ्याशी,पहुडे फळीसी गुरुमुर्ती
त्यांच्या ह्या कृतिचा हाच आहे अर्थ,कदा अंधारात निजु नये
गणू म्हणे माया दुर्धर अंधार,ज्ञानदीप थोर म्हणून लावा (९)
शिव विष्णु ब्रम्ह आहे बाबा साई,भाव दुजा काही मानु नका
सद्गुरुरायांच्या पायाची जी धूळ,तेच गंगाजल शुद्ध माना
अमृता आगळी मुखींची वचने,तीच माना मने गीता जेवी
गणू म्हणे बाबा वसंत सोज्वळ,भक्तांनो कोकिळ व्हारे तुम्ही (१०)
परमार्थाची आस आहे मनातून,त्याने हे चरण पहावे आधी
ऐहिक सुखाशी देउनिया फाटा,भक्तिच्या त्या वाटा ढुंढाळाव्या
द्वेषाचे सराटे फेकुनिया द्यावे,साईमय पहावे जगालागी
गणु म्हणे तरी तुम्ही त्यांचे भक्त,शोभाल जगात सज्जनांनो (११)
शिर्डीक्षेत्र नोहे पचंबा बाजार्,येथे दुकानदार परमार्थाचा
ऐहिक सुखाचि खेळणी बाहुल्या,समूळ फेकिल्या गुरुराये
काकि तयामाजि किमपी न अर्थ,फसतील पोरे व्यर्थ माझी
गणू म्हणे पोर पचंब्यासि जाते,किरकिरेच घेते आवडीने (१२)
कर्म भक्ति बाजारी या माल,मनी जो वाटेल तोचि घ्यावा
तिघांची किंमत एक आहे जाणा,फळही तिघांना एकची हो
भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी,साईसद्गुरुसी दुजे न लगे
गणू म्हणे भावरुपी नाणेआहे जयापाशी,त्याने बाजारासी तेथे जावे (१३)
फळ ते पाथेय घ्यावे फराळासी,मग पंढरीसी जावे सुखे
बाबाजीने कृपा तुकोबासि केली,तयीच फळली पंढरी त्या
थापटणे गोर्‍याने मारुन नाम्याला,कच्चा ठरविला देवापुढे
गणू म्हणे मग खेचर माऊली,नाम्याने वंदिली कल्याणार्थ (१४)
निवृति ज्ञानेश ईश्वरी अवतार,परी गुरुवर गहिनी केला
गुरुकृपेवीण एकालाही जनी,विठू चक्रपाणी भेटला ना
पंढरीरायाची मनी असलिया आस्,सदगुरुची कास दृढ धरा
गणू म्हणे जया भवाचे ना भय,त्याचे चित्ती पाय सद्गुरुचे (१५)
शुक सनकादि नारद अंबरीश,निवृति ज्ञानेश नामा तुका
दास तुलसी चोख्या जयदेव सावंता,पंत नाथ मेहता कबीर तो
बोधला पवार विसोबा खेचर,गोरोबा कुंभार कुर्मदास
गणू म्हणे त्याच कोटीतला साई,चला त्याच्या पायी लीन होऊ (१६)
जरी या संतांच्या मुर्ती हो लोपल्या,साईरुपे उरल्या पहावया
त्रिभुवनामाजी जे जे कोणी संत,ते ते साईनाथ मजलागी
भेदबुद्धी नुपजो माझी संताठायी,संत शेषषायी प्रत्यक्षची
गणूदास आहे संतांचा अंकित,भेटो पंढरीनाथ त्यांच्या कृपे (१७)
भक्तिरुप गंगा वाहे जया ठायी,तेथे माझा साई राहे उभा
हस्तसंकेताने पालवितो लोका,या हो फिरु नका रानोमाळ
मज ओळखावे आहे मी कोठला,कशासाठी आला शिरडीसी
पंढरीक्षेत्रीचा मीच हो वाटाड्या,गणुच्या त्या उड्या साईबळे (१८)
मज ना विचारिता पंढरीच्या वाटे, जाल तरी काटे रुततील
पंढरीची वाट मोठी अवघड, मोठे मोठे पहाड मार्गामाजी
तयाचे ते वज्र आहे मजपाशी,तसा हृषिकेशी ओळखिचा
गणू म्हणे जन्मोजन्मी नाही तुटी,साईंच्या जगजेठी हृदयात (१९)
म्हणून ही संधी दवडु नका कोणी,पडाल मागुन पस्तावात
दंभाचे हे गाठोडे एकीकडे ठेवा,विकल्प सोडा घातक जो
क्रोधाची ती होळी ज्ञानग्नीने करा,वासनेसी मारा अभ्यासाने
गणु म्हणे ऐश्या व्रतासी जो पाळी,तयासी सांभाळी साई माझा (२०)
करु नका नाश या आयुष्याचा,जन्म मानवाचा पुन्हा नाही
प्रत्येक जन्मात कन्या पोरे घर,मैथुन आहार आणि निद्रा
नरजन्म नाही ऐशा कृत्यासाठी,बांधा खुणगाठी मनामाजी
जोडू जाता जोडे जन्मी या ईश्वर,नरजन्म थोर गणू म्हणे (२१)
लोभ मोहमाया टाकून अवघ्यांची,धरा सदगुरुची पाऊले ती
गुरुपायामाजी आहे सर्व काही, गुरुविण नाही सार्थकता
गुरु कामधेनू गुरु कल्पलता,चिंतेसी वारिता चिंतामणी
गुरुभक्तिठायी जो का एकनिष्ठ,त्रिलोकी तो श्रेष्ठ गणू म्हणे (२२)
गुरुपदी भाव विठुसी अबोला,ऐशा मानवाला मोक्ष नोहे
भोपळा हातात परी धोंडा कंठी,बांधल्या शेवटी घात घडे
गुरुरुपी देह आत्मा पांडुरंग,केल्या येई रंग एक्या ठायी
एक्या अव्हेरिता एक न ये हाता,दोघांची योग्यता सारखीच
गुरु आणी देव यात केल्या तुटी,दुख्खाची नरोटी येई हाता
गणू म्हणे रहा सावध या साठी,गुरु जगजेठी एकरुप (२३)
साईबाबा आणी सद्गुरु वामन ,हे न दोघे भिन्न एकरुप
भाव साधकांनी ठेवा दोघापायी,परी विठाबाई गावी वाचे
साई वामनाचे करावे पूजन,राखावा सन्मान भूपतिचा
परमार्थात भक्ति व्यवहारी नीती,संसारा विरक्ति गणू म्हणे (२४)
गुरुपाठाचे हे अभंग पंचवीस,जपता होय नाश पातकांचा
गुरुचे पवाडे गाता मोक्ष लाभे,नका मरु दंभे निरर्थक
साईमहाराजांचा धरुनीया हात,तरा भवाब्धीत बुडू नका
साईंच्या इच्छेने होते अवघे काही, गणुकडे नाही बोल याचा (२५)

Pages