अंबाडीची पाने-दीड कप, १२ (बारा) हिरव्या मिरच्या, १ मोठा कांदा कापुन, धणे -दीड चमचे, मेथी- पाव चमचा, मोहरी-पाव चमचा, ३ पाकळ्या लसुण ठेचून, २ मोठे चमचे तेल, एक चिमुट हिंग, मीठ चवीनुसार.
१ चमचा तेल फ्राय पॅन मध्ये गरम करा. मोहरी, मेथी, हिंग घालून तडतडल्यावर बाजुला काढून घ्या. धणे आणि मिरच्या त्याच तेलात एक मिनिटासाठी फ्राय करा. बाजुला काढून घ्या. आता पाने घालून shrink होईपर्यंत फ्राय करा.
आधी बाजुस काढलेला मसाला वाटून घ्या. नंतर फ्राय केलेली पाने, कांदा, मीठ घालून चटणी वाटा.
चटणीला मोहरी, लसुण घातलेली फोडणी द्या.
१. धणे आणि लसुण वापरणे ऐच्छीक.
२. कांदा वाटला तरी चालेल किंवा बारीक कापुन मिक्स केला तरी चालेल. लसुणाचे बारीक तुकडे देखील घालता येतील.
३. पाने जास्त आंबट नसतील तर वाटतांना थोडा चिंचेचा कोळ घालावा.
४. वाटतांना पाणी थोडे किंवा अजिबात वापरू नये.
ही दाक्षिणात्य पारंपारिक गोंगुरा पचडी, मल्लिका बद्रीनाथ यांच्या पुस्तकातून लिहीली आहे. वेळ अंदाजे दिला आहे.
पानात घेतांना गरमागरम भात, त्यावर घरी कढवलेले तूप आणि तांदळाचा पापड घ्यावा आणि चाटूनपुसून खावे.
थोडे झणझणीत आणि चवीने खाणार्या हौशी दाक्षिणात्यांना घरी जेवायला बोलावयाचे असेल तर ही पचडी जेवण अगदी अविस्मरणीय करेल यात शंकाच नाही!
ही चटणी
ही चटणी करताना अंबाडीची पाने कोरडी असावीत. जर धुवुन ओलसर झालेली पाने घेतली तर ही चटणी जरा गिळगिळीत होते.
म्हणून पाने धुवुन नीट कोरडी करून घ्यावीत.
कांदा आणि
कांदा आणि चिंचेच्या कोळामुळे ही पचडी कोरड्या चटणीसारखे नसतेच. पण पाणी वापरू नये शक्यतो.
आज केली ही चटणी.मस्त झाली
आज केली ही चटणी.मस्त झाली होती.
खूप भारी लागते ही चटणी धन्स
खूप भारी लागते ही चटणी धन्स चिन्नू रेसिपी टाकल्याबद्दल.
थँक्स पूर्वा आणि फुपा
थँक्स पूर्वा आणि फुपा
भारीच!!! नक्की करणार..
भारीच!!! नक्की करणार..