Submitted by UlhasBhide on 15 September, 2010 - 12:16
पहिले चुंबन
अधीरतेने आज गायिले, थरथरणार्या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने
सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले
....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)
गुलमोहर:
शेअर करा
सर्वांना धन्यवाद.
सर्वांना धन्यवाद.
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता
खुपच सुंदर...
"या ओठांना त्या ओठांचे,
"या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण सवांद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले"
खूप दिवसांनी छान कविता वाचायला मिळाली. श्रुंगारिक असली
तरी कुठेहि उथळपणा नाही.
भरत मयेकरशी मी सहमत आहे.
.
उल्हास जी , एवढा नाजूक विषय
उल्हास जी , एवढा नाजूक विषय अश्लीलतेची झ्हालर न येता इतक्या प्रभावी पणे मांडल्या बद्दल खूप खूप कौतुक . छान लिहिले आहे आपण
खुपच सुंदर !
खुपच सुंदर !
कवितेची शब्दरचना सुरेखच आहे.
कवितेची शब्दरचना सुरेखच आहे. मान्यवरांनी त्याला नावाजलेले आहेच. आवडली मनापासुन आवडली.
उल्हासजी शुभेच्छा !
झ्झ्झ्झ़क्कास ह्ल्ली छंदबध्द
झ्झ्झ्झ़क्कास ह्ल्ली छंदबध्द कवीता दुर्मिळ झाल्यात खूप लेखन करा.
आजकालच्या प्रसार माध्यमांमधून
आजकालच्या प्रसार माध्यमांमधून पहायला मिळणार्या सवंग शृंगार कुठे आणि हे काव्य कुठे!
खरच छान वाटलं.
भिडेजी, आवडला बरं का ! तुमची
भिडेजी,

आवडला बरं का ! तुमची "पहिले चुंबन" ही कविता !
(मी माझ्या बाबतीन आठवण्याचा प्रयत्न करतोय ....)
धन्यवाद ! शतशः आभार ! कविता
धन्यवाद ! शतशः आभार !
कविता आवडली म्हणून भरभरून प्रतिसाद दिलात.
तसच,
कधी काही आवडल नाही तरीदेखील नि:संकोचपणे सांगा.
दादा, मस्तच कविता ! रच्याकने
दादा, मस्तच कविता !
रच्याकने मला माझ्या एका वात्रट मित्राने दातेसाहेबांच्या एक सुंदर गाण्याचे केलेले खास विश्लेषण आठवले...
"स्वरगंगेच्या काठावरती वचन दिले मी तूला.."
स्वरगंगेचे भावचिंब ओले काठ....(स्वरगंगेचे काठ म्हणजे जिथून वाणी बाहेर पडते ते ओठ) वचन दिले मी तूला (ते चुंबन)

अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले
व्वा !! मस्त !!!
छान आहे कविता ... आवडली
छान आहे कविता ... आवडली
छान आहे कविता ... आवडली
छान आहे कविता ... आवडली
व्वाह... अगदी तरल!
व्वाह... अगदी तरल!
सुंदर आणि रसपुर्ण असले हळुवार
सुंदर आणि रसपुर्ण
असले हळुवार अनुभव एवढे तरलपणे सांगताना मर्यादांचा पश्नच रहात नाही.
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले
अप्रतीम!!!!!!!!!
सुंदर, गेयपुर्ण आहे. या
सुंदर, गेयपुर्ण आहे.
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले>>>>>
खूपच आवडले.
सुंदर !!!!!
सुंदर !!!!!
:माबो मोड ऑन:: काका मेलमधून
:माबो मोड ऑन::
काका
मेलमधून थेट खास तुमचं पहिलं चुंबन घ्यायला आलो.
संपादन : पहिलं चुंबन ही कविता वाचायला आलो... :दिवे:
अतिशय तरल आणि सुंदर कविता आहे. शब्दमाधुर्य आहे, गेयता आहे. आणखी काय पाहीजे या कवितेत..पहिलं चुंबन असूनही देवळातच गेल्यासारखं झालं इतकी शालीन कविता आहे..
(नाहीतर असे शब्द आले कि मला लाजल्यासारखं होतं )
आता माझ्यासारख्या आडदांड माणसाला दाखवलीच आहे तर..
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने
या ओळीतल्या शेवटच्या शब्दाचा अर्थ योग्य त्या पधतीने घेतलेला आहे याची नोंद घ्यावी.
:माबो मोड ऑफ::
सह्ह्ही ,,अरे इतकी सुंदर
सह्ह्ही ,,अरे इतकी सुंदर कविता मी कशी काय मिस् केली...
धन्स, किरण ही कविता वर आणल्या बद्दल......
किती सुरेख कविता!! किरण, खरंच
किती सुरेख कविता!! किरण, खरंच खूप धन्यवाद, नाहितर मिसली असती.
काका, खूप मस्त लिहिलीत.
वाह, खुपच छान ! एखादी अप्सरा
वाह, खुपच छान ! एखादी अप्सरा सहजपणे पृथ्वीवर अवतरावी, तशी ही कविता उतरली आहे !
काकांचं चुंबन परत वर आलेलं
काकांचं चुंबन परत वर आलेलं दिसतंय
काका... कसलं भारी चुंबन
काका... कसलं भारी चुंबन आहे.... यावर इतर दहा चुंबनं झक मारली...
जियो काका...... अशीच चुंबने घेत रहा..... आय मिन आम्हाला वाचायला देत रहा
अतिशय सुंदर कविता. हे असे
अतिशय सुंदर कविता. हे असे क्षण आजही जपले गेले तर अशी सुंदर कविता का नाही बाहेर पडणार ?
( आमच्या बाबतीत मात्र हे असं काही असतं हे साफ विसरून गेलोय... खूप प्रयत्न करूनही भांड्यांचे आवाज, रविवारची खेकसाखेकसी आणि मी म्हणून संसार केला ..हेच सारखं का आठवत असावं ?
)
व्वाव !! कसली सुंदर, तरल,
व्वाव !!
कसली सुंदर, तरल, डिसेन्ट कविता आहे.. आणि सतार वगैरेमुळे तर संगीतही वाजायला लागलय कानात !!
( मला दिसली कशी नाही आधी
)
शृंगार रस असूनही फारच तरलतेने
शृंगार रस असूनही फारच तरलतेने भाव व्यक्त झालेत - प्रतिसादही किती छान दिलेत - इथे कविमन व रसिकमनाचा खरा संगम झालेला जाणवतोय....अति दुर्मिळ योग..
कवि व रसिक - दोघांनाही सलाम..
अशी सुसंकारीत चुंबनं आहेत
अशी सुसंकारीत चुंबनं आहेत कुठं हल्ली?
क्या बात है! आजकालच्या टिशू
क्या बात है! आजकालच्या टिशू पेपरसारख्या झालेल्या किस यू कल्चरमधे अशी तरल, निरागस, शालीन चुंबनाची ओठांवरील शब्दसाय! मस्त.
Pages