Submitted by UlhasBhide on 15 September, 2010 - 12:16
पहिले चुंबन
अधीरतेने आज गायिले, थरथरणार्या अधरद्वयाने
शृंगाराच्या मैफिलीतले, पहिले वहिले गीत मुक्याने
सर्वांगी मोहरला काटा, गात्री गात्री गोड शहारे
घुसमटलेल्या श्वासांमधुनी, सतार मनि झिनि झिनि झंकारे
अमृत गोडी अनुभवण्याचे, भाग्य प्रथम अधरांस लाभता
असुयेने हिरमुसून रसना, करी शब्द ना धरी मौनता
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले
....... उल्हास भिडे (१५-९-२०१०)
गुलमोहर:
शेअर करा
<<अशी सुसंकारीत चुंबनं आहेत
<<अशी सुसंकारीत चुंबनं आहेत कुठं हल्ली?>>
बरंच निरीक्षण दिसतंय :). सहमत आहे. अशा चुंबनांची आज देशाला गरज आहे ...
अशा चुंबनांची आज देशाला गरज
अशा चुंबनांची आज देशाला गरज आहे . >>
लई भारी अनिलराव
पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप
पुन्हा एकदा सर्वांना खूप खूप धन्यवाद.
या ओठांना त्या ओठांचे,
या ओठांना त्या ओठांचे, शब्दाविण संवाद उमगले
अर्धोन्मीलित नेत्रांमधुनी, परस्परांनी भाव वाचले >>> व्वा क्या बात है..
ही कविता योग्य वेळी हातात
ही कविता योग्य वेळी हातात पडली असती तर ??????
आता.. पुनश्च हरी ओम
Mast
Mast
छान कविता. आवडली.
छान कविता. आवडली.
"पहिलेवहिले गीत मुक्याने"
"पहिलेवहिले गीत मुक्याने" अतिशय तरल, नाजुक, सुंदर.
सर.... खूप आवडली.... ___/\___
सर....

खूप आवडली....
___/\___
सुंदर
सुंदर
Pages