अटलांटा १३.१

Posted
13 वर्ष ago
शेवटचा प्रतिसाद
13 वर्ष ago

बर्‍याच दिवसांपासून ज्यासाठी तयारी (आणि चर्चा) चालू होती ती अटलांटा १३.१ हाफ मॅरेथॉन आज पार पडली.
दोन ५ के आणि दोन १० के रेसेसमध्ये भाग घेऊन झाल्यावर पुढची पायरी म्हणून हाफ मॅरेथॉन पळायची होती.
जुलै महिन्यातच रजिस्ट्रेशन केलं होतं. अटलांटा कंपूतले राहूल जोग आणि विनायक ह्यांनीपण पळायची तयारी दाखवली. राहूल पण १३.१ रेसमध्ये तर विनायक ५ के मध्ये सहभागी झाला होता. शिवाय आम्हांला चिअर करायला कंपूतले बाकीचे लोक, प्रमुख पाहूणी म्हणून नानबा आणि माझा मित्र रोहित हे पण उपस्थित होते.

१३.१ मैलांचं अंतर मी २ तास ३७ मिनीटांत तर राहूलने २ तास ३८ मिनीटांत पूर्ण केलं. विनायकने त्याची पहिली वहिली ५ के ५० मिनीटांत पूर्ण केली. हवामान एकदम मस्त असल्याने ऊन, प्रचंड घाम, डिहायड्रेशन ह्यांचा त्रास अजिबातच झाला नाही. मी आधी नकाशा पाहून कुठल्या पाणपोईवर थांबायचं हे ठरवून ठेवलं होतं. त्याप्रमाणे पहिला स्टॉप ६.५ मैलांवर तर दुसरा १०.५ मैलांवर घेतला. हे ही पूर्ण स्टॉप नव्हतेच फक्त पाणी पिता पिता थोडावेळ चाललो.

पहिला ६.५ मैलांचा रन एकदम मस्त झाला, पण सातवा, आठवा आणि नववा मैल फारच जाचक होते. नेबरहूड मधून असलेला हा रस्ता खूप चढउतारांचा होता आणि प्रत्येक चढावर बरीच दमछाक झाली. दहाव्या मैलला अचाकन रस्त्याच्या बाजूने शिल्पा, रोहित आणि नानबा हाका मारत आले. ते त्या वेळी रेसच्या ठिकाणी पोचले होते आणि मला पळताना बघून गाडी पार्क करून चिअर करायला आले. Happy नंतर त्यांची आर्जेशी पण भेट झाली.

शेवटचा पाव मैल पण अपहिल होता आणि तिथे फारच वाट लागली. फिनीश लाईन समोर दिसत असून तिथपर्यंत पोचता येत नव्हतं. तो अपहिल नसता तर अडीच तासांचं उद्दिष्ट पूर्ण झालं असतं. असा रूट ठेवल्याबद्दल संयोजकांचा थोडासा निषेध..

रेस पूर्ण झाल्यावर मेडल मिळालं. मला कुठल्याही क्रिडा प्रकारात मिळालेलं हे पहिलच मेडल. Happy
हे बघा.

Medal.gif

रेस दरम्यान झालेल्या दोन गंमती. फिनीश लाईनपाशी विनायक दिसल्यावर शिल्पा एकदम उत्साहात त्याला "All the best !!!!!!!" म्हणाली. तो एकदम confusion होऊन म्हणे "आता झाली की रेस !" त्यावर शिल्पाचं उत्तर "सॉरी सॉरी मला congrats म्हणायचं होतं." Proud
मी रेस दरम्यान आयपॉड ऐवजी फोनवर गाणी ऐकायचं ठरवलं. काल रात्री ऐनवेळी फोनमध्ये गाणी भरली. त्यात काहीतरी गडबड होऊन हिंदी मराठी सगळी गाणी एकत्र झाली. पाचव्या मैलच्या सुरुवातीला एकदम "नीज माझ्या नंदलाला" सुरु झालं.... !!!! त्यामुळे तो मैल पूर्ण करायला मला ११ मिनीटे लागली. Proud हे गाणं मॅरेथॉन धावताना कोणी ऐकतय हे कळलं तर लताबाई धन्य होतील !!!
नंतर मग झुबीडूबी आणि ऑल इज वेल लागल्यावर पुढचा मैल परत ८.५ मिनीटांत झाला. Happy

रेस नंतर सुनीत भावनच्या घरी चहा आणि बाहेर लंच असं आमचं "नानबा गटग" पार पडलं..

रेस पूर्ण झाल्यावर जे समाधान मिळालं त्याचं शब्दांत वर्णन करणं फारच कठीण.. Happy

विषय: 
प्रकार: 

आयला! बराच उत्साह टिकून आहे अजून!
मला वाटलेलं आज काही तुमच्यापैकी कुणाची पोस्ट येणार नाही - अटलांटावर विनायकची पोस्ट आणि इथे तर तुझा आख्खा लेख!! सहीच!
(काका, पहाताय ना! तुम्ही मागे राहू नका!)

विजयी वीरांचा एकत्र काढलेला फोटोपण टाकायचास ना!

मस्तच. तिघांचेही हार्दीक अभिनंदन!

मी ही माबोवरील धावकांकडुन प्रेरणा घेऊन आमच्या इथली ४ माईल धावत/चालत पुर्ण केली जून महिन्यात.

विशेष कौतुक वाटलं रे पराग. रात्रीबेरात्री कामं करुन शिवाय पळालास.
मनःपूर्वक अभिनंदन. Happy

राहुल/विनायक- आपलेही हार्दिक अभिनंदन.

पराग, राहुल आणि विनायक, तुम्हा तिघांचही मनःपूर्वक अभिनंदन!

सगळे व्याप सांभाळून ही धावपळ सोपी नाही.

अरे वा! अभिनंदन. Happy

ऑल द बेस्ट, नंदलाला >>> Lol

बाकी,
अंकसंपादनाच्या कामासाठी जमा केलेली एनर्जी वीकएंडला दुसर्‍याच कामासाठी खर्च करून टाकलीस? आता अजून तब्बल महिनाभर अंकासाठी धावपळ कश्याच्या जोरावर करणार? Proud

gr8!

सहीच रे!! We are proud of you guys!
कसला जबरी आहे ना आपला अटलांटा कंपू!! (मी रेस पळले नाही तरी उगाच आपलं ;))

अभिनंदन पराग, राहुल आणि विनायक. सहीच एकदम.

हे गाणं मॅरेथॉन धावताना कोणी ऐकतय हे कळलं तर लताबाई धन्य होतील >>> Biggrin

शब्बास पठ्ठ्या(नो)!!!! Happy

तिघांचा फुल्ल टू फिनिश लाईन ओलांडतानाचा फोटो वगैरे लावा रे!!

मस्तंच! पराग, राहुल आणि विनायक खरंच कौतुक आहे.
रेसच्या तयारीमुळे आणि प्रत्यक्ष रेसमुळे वजनं किती कमी झाली? Happy
तिघांचे फिनीश लाईनचे फोटो टाकाच.

परत एकदा धन्यवाद सगळ्यांना.. Happy

पण मग एरव्ही तरी कधी ऐकतोस रे पग्या ? >>>> Lol मै, मी नाही ऐकत.. लॅपटॉपवर होतं एका फोल्डरमध्ये. Happy

मुसंबा, फिकर नॉट... एनर्जी वील कम बॅक.. Happy

रेसच्या तयारीमुळे आणि प्रत्यक्ष रेसमुळे वजनं किती कमी झाली? >>> राखी.. हल्ली काहीच फरक पडत नाही पळापळी करून .. Uhoh

जबरी! पराग, राहुल, विनायक अभिनंदन! तयारीबद्दल आधीच कोठे लिहीलेले आहेस का? नसल्यास ते ही लिही.

Pages