शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १०

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:53

कोकणातल्या एखाद्या ओढ्यावरचा लहानसा साकव, जॅपनीज गार्डनमधला एखादा नाजुकसा पूल, गोल्डन गेट ब्रीज, हावडा ब्रिज. नदी, खाडी, ओहोळ ओलांडून पलिकडे जाण्यासाठी बनवलेले हे पूल आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले असतात. तर अशा या पूलांचे फोटो हा आहे आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - पूल (ब्रिजेस)

कोणत्याही प्रकारच्या पूलाचे टिपलेले छायाचित्र इथे टाकता येईल.

2010_MB_Jhabbu_Bridge.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

गोल्डन गेट ला गोल्डन गेटचा झब्बू Happy

IMG_0009.JPG

डोळ्याचं पारणं फिटलं एकेक फोटो पाहून! काय सुरेख फोटो आहेत या झब्बूचे!

मिनोती सहि. हा ब्रिज वाटतच नाहिए. ती माणसं उडत जातायेत आणि त्यांचा ट्रेल दिसतोय अस काहिस वाटतंय

ऋषिकेषचा लक्ष्मण झूला. खूप गडबडीत काढलेला. (साईझ फारच छोटी करावी लागली. मोठा कसा टाकावा :विचारात पडलेली बाहुली:
DSC03468scape.jpg

अरे वा! लक्ष्मण झूला मस्तच! कॅपिलानो आणि बिक्सबी पण सही. इंद्रधनुष्य, ती बांद्रा-वरळी सी लिंक आहे का? छानच आहे फोटो!

हा जॅपनीज गार्डन मधला

DSC01617.JPG

गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.

Pages