शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १०

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:53

कोकणातल्या एखाद्या ओढ्यावरचा लहानसा साकव, जॅपनीज गार्डनमधला एखादा नाजुकसा पूल, गोल्डन गेट ब्रीज, हावडा ब्रिज. नदी, खाडी, ओहोळ ओलांडून पलिकडे जाण्यासाठी बनवलेले हे पूल आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले असतात. तर अशा या पूलांचे फोटो हा आहे आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - पूल (ब्रिजेस)

कोणत्याही प्रकारच्या पूलाचे टिपलेले छायाचित्र इथे टाकता येईल.

2010_MB_Jhabbu_Bridge.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

bridge in Amsterdam.jpg
अ‍ॅमस्टरडॅम येथील कालव्यावरील एक पूल. इथे पोचताच, "One of the famous canal sights in Amsterdam : the lineup of seven consecutive bridges that can be seen" असं tour guide
ने सांगितल्यावर पलीकडे एका ओळीत दिसणार्या सात पुलांचे चित्र कॅमेर्याच्या डोळ्यात पकडायची
एकच गडबड होते. या गोंधळात, स्वतःच्या डोळ्यांनी ते दॄष्य नीट पहायच्या आधीच आपली बोट त्या
spot पासून पुढे सरकलेली असते!

...

सॅम, Happy

Kansas City, MO - Bridge/ Glass walkway connecting Hyatt Regency hotel to nearby mall

Kansas-City.jpg

सायो Happy आमचे आपले इथले अमेरिकेमधलेच... पण कोकणातले आणि युरोपातले काही फोटो किती सुंदर आहेत! तुझ्याकडे जपानमधले आणि आता इथलेही असतील; टाक ना ग...

नंद्या - नुसतं रॉक्स काय! फोटू टाक आणखी... Lol
काल टाकलेला लुईविल डाऊनटाऊन चाच फोटो पण त्यातल्या पूलासाठी...

louisville_bridge.jpg

Pages