कोकणातल्या एखाद्या ओढ्यावरचा लहानसा साकव, जॅपनीज गार्डनमधला एखादा नाजुकसा पूल, गोल्डन गेट ब्रीज, हावडा ब्रिज. नदी, खाडी, ओहोळ ओलांडून पलिकडे जाण्यासाठी बनवलेले हे पूल आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले असतात. तर अशा या पूलांचे फोटो हा आहे आजच्या झब्बूचा विषय.
हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.
आजचा विषय - पूल (ब्रिजेस)
कोणत्याही प्रकारच्या पूलाचे टिपलेले छायाचित्र इथे टाकता येईल.

स्वातंत्र्यवीर सावरकर सेतु
स्वातंत्र्यवीर सावरकर सेतु ज्याला काँग्रेजांनी राजीव गांधी सेतु असे नाव दिले.

मायबोलीकर तोच तो आमच्या गावचा
मायबोलीकर तोच तो आमच्या गावचा राई-भातगाव पूल. मी, योगेश आणि सॅमने टाकलेला.
पुढचा पूल... तवसाळकडून
पुढचा पूल...
तवसाळकडून हेदवीकडे किंवा उलट जाताना लागणारा पूल. तवसाळ-रोहिले गावाच्या इथला.
योगेश, पुळे-हेदवी वाटेवर हा पण येतो बरंका जर तुम्ही रा-भा पूल-- अबलोली -- तळी-- मोडका आगार असं करून न येता भातगावच्या वरच्या वाडीकडून तवसाळहून गेलात तर.
एलिझाबेत पूल
एलिझाबेत पूल (बुडापेस्ट-हंगेरी)
अजून गोल्डन गेट आला नाही
अजून गोल्डन गेट आला नाही इथे?
कुणाकडे प्रसिद्ध हावडा ब्रिज आहे का?
आणि वरळी सी लिंक अजून छान आहे का?
आणि तो लंडनचा कुठला ब्रिज जो ओपन होतो तो वर जाताना असा फोटो आहे का कुणाकडे?
धुक्यात हरवलेला कात्रजचा
धुक्यात हरवलेला कात्रजचा दरीपुल

दौलताबाद (औरंगाबाद) च्या
दौलताबाद (औरंगाबाद) च्या किल्ल्यातला हा खंदकावरचा पूल. खंदक पार करायला खाली दिसतायत त्या पायर्या वापरात होत्या आधी. परंतु पावसाळ्यात त्या पायर्या पाण्याखाली जातात त्यामुळे आता हा पूल बांधला असून खालच्या पायर्या आता वापरात नाहीत - इति आमचा गाईड.
अल्ची मॉनेस्ट्रीकडे जाणारा
अल्ची मॉनेस्ट्रीकडे जाणारा सिंधू नदीवरील पूल
वा सहीच प्राची.. कसलं वेगळंच
वा सहीच प्राची.. कसलं वेगळंच आहे हे!! तो उजवीकडचा रॉक म्हणजे एखादं प्राचीन कालीन प्रचंड मांजर दगडात बंदिस्त करून ठेवल्यासारखा दिसतोय...
नीधप, गोल्डन गेटचा पहिलाच
नीधप, गोल्डन गेटचा पहिलाच फोटो आहे.
आणि नुसते प्रतिसाद काय... फोटो कुठेत?
हा माझा अजुन एक, Zaanse Schans (हॉलंड),
पॅनगॉग त्सो (सरोवर) च्या
पॅनगॉग त्सो (सरोवर) च्या रस्त्यावरील आर्मीने बांधलेला पूल.
मस्तच
मस्तच
@आऊटडोअर्स.. सही फोटो..जाम
@आऊटडोअर्स.. सही फोटो..जाम आवडला..
रॉक गार्डन, चंडीगड मधील
रॉक गार्डन, चंडीगड मधील पूलावर पूल
सिमला-काल्का रेल्वे रुट्वरचा
सिमला-काल्का रेल्वे रुट्वरचा एक पुल.. ही भारतातली सर्वात जुनी मिनी ट्रेन आहे व हा रुट हेरिटेज साईट्स मध्ये गणला जातो.

कोल्हापूरचा पूल
कोल्हापूरचा पूल

(No subject)
तेल अवीव मधील दोन इमारतींना
तेल अवीव मधील दोन इमारतींना जोडणारा पूल
गोविंदघाट - उत्तरांचल
गोविंदघाट - उत्तरांचल

राई-भातगाव पूलाचा अजून एक
राई-भातगाव पूलाचा अजून एक झब्बू
राई-भातगाव पूल भलताच फेमस
राई-भातगाव पूल भलताच फेमस दिसतोय !
तो गेल्या १० वर्षात झालेला
तो गेल्या १० वर्षात झालेला आहे. आणि तो पूल झाल्यापासून गुहागर - रत्नागिरी खूप सोपं झालेलं आहे. हायवेपर्यंत बाहेर यायला लागत नाही. त्यामुळे एकतर सोय म्हणून, परत इतका मोठा पूल आसपास नाहीये म्हणून, त्याची जागा आणि बांधकाम दोन्हीमुळे तो खूप छान दिसतो म्हणून.... इत्यादी... यामुळे आमच्या गावचा पूल फेमस झालेला आहे..
शंतनु, हा भातगावातून काढलायस का?
सॅम, नुसती बडबड करत नाहीये हं. हा घे फोटो...

माणगाव, सिंधुदुर्ग इथला निर्मला नदीवरचा (खरंतर कर्ली नदी पण माणगाव भागात निर्मला नदी म्हणतात) पूल.
फ्लोरिडा वेस्ट कोस्ट.
फ्लोरिडा वेस्ट कोस्ट.
वा!! हा घ्या आमचा आपला एक
वा!!

हा घ्या आमचा आपला एक साधा चालण्यासाठीचा लोखंडी साकव!
गोल्डन गेट
गोल्डन गेट
Natchez Trace, Nashville
Natchez Trace, Nashville
वा!! एक से एक! आडो, लय
वा!! एक से एक!
आडो, लय भारी!!!
आता, सावली यायच्या आत मी जपानमधले दोनतीन फोटु टाकतो
रेनबो ब्रिज @ ओदाईबा, टोक्यो.
बे ब्रिज, योकोहामा From
बे ब्रिज, योकोहामा
मस्त आहेत फोटो. सगळे 'राई
मस्त आहेत फोटो.
सगळे 'राई भातगाव' पूल छान आहेत.
मी संध्याकाळी घरी जाऊन टाकेन.
हा आणखी एक Natchez Trace मधला
हा आणखी एक Natchez Trace मधला पूल...
Pages