शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:35

घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भांडी

तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?

2010_MB_Zabbu-Bhandi-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

मल्लिनाथ सुंदरच केलेत पॉट.
स्वरुप , कुठ आहे ती नर्सरी? एकदा नक्की भेट देईन भारतात गेले कि. फार सुंदर आहेत तिथले नमुने.

आज शेवटच्या दिवशी सर्व बीबी वर एक तरी झब्बू द्यायचाच म्हणून,
पळीपंचपात्रः
palee.jpg(खाली असलेला क्रोशाचा कोस्टर मी केलाय)

गणेशोत्सवातल्या ह्या लोकप्रिय खेळाला दिलेल्या भरघोस प्रतिसादाबद्दल सर्व मायबोलीकरांचे आभार ! ह्या निमित्ताने सगळ्यांना घरबसल्या तुम्ही काढलेली प्रकाशचित्रे त्याबरोबरच अनेक ठिकाणेही बघायला मिळाली. गणेशोत्सवाच्या सांगतेबरोबरच हा धागा आता बंद होत आहे.

Pages