शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:35

घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भांडी

तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?

2010_MB_Zabbu-Bhandi-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हि स्वःनिर्मीत परडी आहे. हे जॅपनीज jomon style coil art आहे. हे सहसा रंगवत नाही पण मी आवडीने रंगवलीय. पुर्ण काम फक्त मातीच्या कॉइल बनवून केले जाते. एका जपनीज म्युझियम मध्ये मी पाहिले व मी घरी येवून करायला लागले स्वःताच. शिकले असे नाहीये. Happy

paradi-1.jpg

(स्वगतः अशी स्पर्धा आही माहिती असती तर माझ्या पॉटस,पणत्या वगैरे कुंभारकामाचे फोटो जपून ठेवले असते. शोधून टाकतेच आता..)

थॅक्यु संपदा.
हा माझा पुढचा झब्बू. ह्याला जॅपनीजमध्ये काय म्हणतात ते लक्षात नाही पण जपानी श्राईन्स, मंदिराबाहेर नक्की बघायला मिळतं. त्या हंड्यात नळाद्वारे पाणी पडतं. सोबत दिसणार्‍या बांबूत जमा होतं आणि बांबू पाण्याने भरला की खालच्या दगडावर 'टण्ण' असा आवाज करुन आपटतो. हे असं सतत चालू असतं.

japanese pot 1.jpg

साकेसेट खूप सुंदर आहे सायो. आता क्लोजअपमधे डिझाइनपण छान दिस्तंय. धन्यवाद!

डॅफोडिल्स, वारली पेंटिंग्जचे मग्ज खूऽप आवडले. कृपया इथे मायबोलीवर वारली आर्टचे वर्ग घ्या. (मी आत्ताच नाव नोंदवते.)

एकसे एक झब्बु आहेत इथे.
सगळ्यांची भांडी मस्त.

रुनी, मृ, डॅफो, मिनोती, तुमची कलाकारी बेष्ट Happy आर्च ची चकाकती भांडी नजर लागण्यासारखी Proud
बाकी राजवाड्यांमधली, निरनिराळ्या देशांमधली आणि आपापल्या घरातील भांडी, कुंडी पण मस्त. Happy

मृ ला अनुमोदन .. मलाही शिकायचय वारली. डॅफो, खरच वर्ग घे. नाव नोंदणीत माझंही नाव.

बेजिंगच्या फॉरबिडन सिटीमधले सम्राटांच्या महालासमोरचे प्राचीन अजस्त्र धूपपात्र. सोन्याने मढवलेले असायचे म्हणे एकेकाळी.

Copy of DSC00639_0.JPG

डॅफो वारली मग मस्तच आहेत, खूप आवडले. कसे केले ते लिही. एक कार्यशाळाच घे खरे तर आमच्यासाठी.
लालू भातुकली मस्त. शर्मिला ते धुम्रपानाच भांड, सायो ते जपानमधले पाण्याच भांड, वाईन्सचे बुधले, काहील सगळच फार आवडले. झब्बू मुळे काय काय मस्त बघायला मिळतय.
ही माझी अजून एक स्वनिर्मिती
VarBlueJarandSquareBowl1.jpg

काय अफलातून भांडी केली आहेस रुने!

कढई, धूपपात्र आणि काँट्रास्टिंग आकाराचा भातुकलीचा सेट हे फोटो फारच आवडले.

रुनी, झाकणाची भांडी बनवणं ट्रिकी असेल नाही? बरोबर आकार आणि साईज व्हायला पाहिजे. किती सफाई आहे तुझ्या भांड्यात.

आर्च , काय सुंदर भांडी आहेत गं. क्लासच.
स्वनिर्मित भांडी करणारे , रंगवणारे सुरेख आहेत भांडी.
सायो अप्रतिम आहे तो साके सेट.

Pages