शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. ४

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:35

घागरींची लावलेली उतरंड असो वा म्युझियममधे ठेवलेली एखादी सुरई असो त्यात स्पष्ट जाणवतो तो त्या भांड्याचा एक विशिष्ट आकार. काचेचा बाऊलसेट असो वा आज्जीची रोजच्या वापरातली सुंदर वाटी, त्याचा आकार मोहवून टाकतोच. तर अशा या भांड्यांच्या फोटोंचा हा झब्बू.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - भांडी

तुमच्याकडे असलेल्या किंवा तुम्ही पाहिलेल्या सुंदर भांड्याचा (मग ते कोणत्याही प्रकारातले असो. वाटी, चमचा, ताट, इत्यादी) नमुना छायाचित्रात टिपलेला असावा. बघा बरं एखादा कमनीय आकार असलेली अत्तरदाणी किंवा अगदी वेगळ्या आकाराचा आईसक्रीम बोल मिळतोय का?

2010_MB_Zabbu-Bhandi-Final.jpg

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सायो - साके सेट मस्त आहे.

मिनोती - तुझ्याकडून स्वनिर्मीत भांड्यांचे आणखी फोटू हवेत... वरचे छान आहेतच Happy

ही माझी एक serving platter

Maayboli_20.jpg

काय सुंदर सुंदर भांडी आहेत सगळ्यांचीच. मस्तच.
मिनोती स्वनिर्मित मस्तच गं. कस करतेस हे? लिहिना त्याबद्दल.

एक जपानी कलाकुसर

ही आईने खास गावच्या तांबटाकडून करून घेतलेली तांब्याची ठोक्याची भांडी. घंगाळ काय सुरेख केलं आहे न?

GhangaL.jpg

आर्च, ती आधीची (एव्हढी मोठाली) कळशी, पातेली वगैरे घेऊन आलीस भारतातून? Happy

मस्त फोटो, esp. स्वतः निर्मिती आणि कलाकुसर केलेल्या सगळ्यांचं खुप खुप कौतुक .. Happy

आर्च तु हि भांडी लिव्हिंग रुम मधे ठेवतेस ना? एवढी चकचकीत कशी काय ठेवतेस? आणि साफसफाई कशी आणी कधी करतेस?

सशल, हो. आणि तुला तपेली म्हणायच आहे का? Happy

सवाली, पीतांबरी. महिन्यातून एकदा घासते. पाणी नाही लागलं की छान रहातात.

हवा ड्राय असेल तर फारसा प्रॉब्लेम नसावा का? तरीसुद्धा असा सगळा ससंसार मेंटेन करणं येरागबाळ्याचं काम नाही हेच खरं!

हो, हो तपेली, घागरी जे जे काही आहे ते .. Happy

वा वा मिनोती छान आहेत.
आर्च सहि आहेस, महिन्यातुन एकदा घासतेस हे सगळं!!
आणि मला घरातली जेवणाची भांडीच घासायचा कंटाळा येतो.

सखीप्रिया, कुठला फोटो हा? तगडीतुगडी दगडी भांडी आहेत. जात्याचेच किती प्रकार! रब्बु गोटा आणि उखळ पण मस्तच.

आर्च, पितांबरीच्या जाहिरातीत तुला घ्यायला हवं. काय चकचकीत भांडी आहेत! आणि केवढा उरक आहे तुला बॅगेत घालून हे सगळं उरीपोटी घेऊन येण्याचा! सुंदर आहेत भांडी.

मिनोती आणि रुनी या मायबोलीच्या एक्स्पर्ट कुंभारणी आहेत. अफलातून भांडी बनवतात. ग्लेझेस आणि बाकी रंगरंगोटी पण खूप सुंदर करता तुम्ही दोघी.

मृ, लिहायचा आळस करत होते.. ही दगडी भांडी, पहिल्या फोटोतली चुलीवरचे मडकी आणि हे खालच्या फोटोतलं भांडं, चेन्नईजवळ महाबलीपुरम मध्ये 'दक्षिणचित्र' नावाचं ग्रामप्रदर्शन आहे, तिथली आहेत.

Picture 295.jpg

थॅन्क्यु ज्यांनी झब्बू टाकले त्यांना.
हा माझा चायनिज टी सेट.

chinese tea set 002-small 1.jpgchinese tea set 001 small 2.jpg

संयोजक, ह्या अशा इमेजेस एकाच मेसेज मध्ये चालतील का?

सखीप्रिया, तुझी पहिल्या फोटोपासूनची भांडी मस्त आहेत एकदम.
रुनी,मिनोती, मस्तच.
सावली, तुझाही बोल छान आहे.
आणि आर्च, सरतेशेवटी तुला _/\_

सखी, ते appliances झाले की. Wink
सगळ्यांची भांडी मस्त आहेत. सायो, सेट गोड आहे.

सूप सेट मधली बरणी, वर चिली ठेवलेले जे भांडे आहे ते याच्याबरोबर येते. Happy

zsoup.jpg

मिनोती आणि रुनी या मायबोलीच्या एक्स्पर्ट कुंभारणी आहेत <<< अगदी खरे.

काय वैविध्याने येतायत भांडी सगळ्यांकडून. Happy

east meets west ग बाई अगदी >> Lol
आडो जाउदेत ग, नाही येणार मला भांडी घासायला कधीच
(आणी मला दुखः नाहि हो त्याच अज्जिबात) Lol
पण खरच आर्च कमाल आहे तुझी Happy आणि बाकिच्या सगळ्या मातीकाम करणार्‍या कलाकारांचीपण

Pages