शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १०

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:53

कोकणातल्या एखाद्या ओढ्यावरचा लहानसा साकव, जॅपनीज गार्डनमधला एखादा नाजुकसा पूल, गोल्डन गेट ब्रीज, हावडा ब्रिज. नदी, खाडी, ओहोळ ओलांडून पलिकडे जाण्यासाठी बनवलेले हे पूल आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले असतात. तर अशा या पूलांचे फोटो हा आहे आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - पूल (ब्रिजेस)

कोणत्याही प्रकारच्या पूलाचे टिपलेले छायाचित्र इथे टाकता येईल.

2010_MB_Jhabbu_Bridge.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सगळे फोटो सुरेखच. मला ह्या वर्षीची झब्बू सिरिजच खूप आवडली. किती मस्त विषय निवडले आहेत. आणि सगळ्यांना भाग घेता येण्यासारखे विषय. गणेशोत्सव मंडळाचे कौतुक.

Overseas Highway, Route 1 मायामी ते की वेस्ट समुद्रावरचा पूल.

zroute1.jpg

झब्बू विषय खरंच छान. फोटो मुद्दाम शोधावे/काढावे लागत आहेत आणि एकदम युनिक गोष्टी बघायला मिळत आहेत. Happy

हा लंडन मधील हाउसेस ऑफ पार्लीयामेंट जवळचा वेस्टमिनस्टर ब्रिज (चितळे मास्तर हा ब्रिज आवर्जून बघायला सांगतात)
a.JPG

पुलांचा झब्बू तर कलेक्शन करून ठेवावेत इतका मस्त आहेत.
अगदी बारक्याश्या वॉकवे पासून प्रचंड मोठ्या ब्रिजपर्यंत.... एकसे एक...

आमोण्याच्या ब्रिज मस्तच दिनेश. माझ्याकडे त्या ब्रिजवरून काढलेले फोटो आहेत. ब्रिजचा नाहीये पण. दुरंगी मधे त्यातलाच एक टाकलाय. इंडस्ट्री, मायनिंगमुळे उडणारी लाल धूळ आणि गोव्याच्या सौंदर्याची लागलेली वाट आणि तरीही अपरिहार्यपणे कुठे कुठे दिसत रहाणारा सुंदर निसर्ग असं सगळं त्या एका आमोण्याच्या ब्रिजवरून दिसतं.

परदेशातले काही पूल इतके खास दिसतायत की जावसं वाटावं तिथे... Happy
नंद्या सहीच!!

हा आमचा परत एका आडगावातला पूल...
Mulade-(6).jpg

नीधप, भारतातले पूल बघुन मला तिकडे यावसं वाटतय!!
नंद्या, धबधबा सही आलाय!
सावली, घराची जागा सही आहे!
विनायक, मस्त फोटो. कुठला पूल?
हा... Pont d'Iéna, Paris, France (आयफेल टॉवर वरुन काढलाय)

खरच, या झब्बू खेळात अनेक छुपे कलाकार पुढे आले. कुठलाही एक सरस
म्हणता येणार नाही, असे सगळे एकापेक्षा एक, आहेत.
नीधप, तो फ़ोटो, अमोण्याच्या ब्रिज वाहतुकीसाठी खुला झाला, त्यावेळचा आहे.
आता कदाचित ते चमकदार रंग उरले नसतील. गोवा सोडल्यानंतर तिथे परत
जायचे धाडसच होत नाही.

Pages