सकल कलांचा तू अधिनायक : अगो

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 00:47

2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg

महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगलदायक -धॄ-

तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरु झाल्या रागरागिणी
तुजसी शरण मी साधक गायक -१-

नादब्रह्म तू, तू सुखदाता
स्वरतालांचा आश्रयदाता
वर सॄजनाचा दे गणनायक -२-

कै.श्री.सरला भिडे ह्या माझ्या आईच्या गुरु. त्यांनी साधारण तीस-बत्तीस वर्षांपूर्वी हे गाणं आईला शिकवले. मात्र गाण्याचे धॄवपद आणि पहिले कडवेच शिकवले गेले होते. हे गाणं आम्हाला शिकवताना आईने दुसरे कडवे स्वत: रचून त्याला चाल लावली. ह्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार कोण हे आम्हाला माहित नाही आणि सरलाबाईंनी शिकवल्यावर इतक्या वर्षांत ह्याची रेकॉर्डही कधी ऐकलेली नाही.

हे गाणे मी अगदी घरगुती स्वरुपात फक्त इलेक्ट्रॉनिक तानपुरा लावून गायले आहे.

गणरायाच्या कॄपेनेच लाभलेलं हे स्वरपुष्प त्याच्या चरणी अर्पण करते !


Group content visibility: 
Public - accessible to all site users

सही आहे गाणं अगो !
तुझा आवाज एकदम शास्त्रीय गायिकेसारखा आहे. जोरदार, दमदार Happy

इथे एक वाद्यवृंद सेक्शन काढून तू, मो, झारा, स्वाती, योग वगैरे मंडळींची गाणी रेग्युलरली अपलोड केली पाहिजेत. Happy

अहाहा! श्रवणीय! अगो, नवीन गाणं इतकं सुंदर ऐकवलंस त्याबद्दल धन्यवाद. आईने रचलेले दुसरे कडवेही सुरेख. व्वाह!

अतिशय सुरेल आणि गोऽऽड गायलंय!
केवळ तानपुर्‍याच्या साथीत गाऊनही कुठे काही कमी नाही वाटलं.
अगो, तुझ्या आवाजात जादू आहे.

Pages