सकल कलांचा तू अधिनायक : अगो

Submitted by संयोजक on 31 August, 2010 - 00:47

2010_MB_Ganesha2_small_rspac.jpg

महागणपती वरद विनायक
मंगलमूर्ती मंगलदायक -धॄ-

तुझ्या चरणीच्या गोड पैंजणी
घुंगरु झाल्या रागरागिणी
तुजसी शरण मी साधक गायक -१-

नादब्रह्म तू, तू सुखदाता
स्वरतालांचा आश्रयदाता
वर सॄजनाचा दे गणनायक -२-

कै.श्री.सरला भिडे ह्या माझ्या आईच्या गुरु. त्यांनी साधारण तीस-बत्तीस वर्षांपूर्वी हे गाणं आईला शिकवले. मात्र गाण्याचे धॄवपद आणि पहिले कडवेच शिकवले गेले होते. हे गाणं आम्हाला शिकवताना आईने दुसरे कडवे स्वत: रचून त्याला चाल लावली. ह्या गाण्याचे गीतकार आणि संगीतकार कोण हे आम्हाला माहित नाही आणि सरलाबाईंनी शिकवल्यावर इतक्या वर्षांत ह्याची रेकॉर्डही कधी ऐकलेली नाही.

हे गाणे मी अगदी घरगुती स्वरुपात फक्त इलेक्ट्रॉनिक तानपुरा लावून गायले आहे.

गणरायाच्या कॄपेनेच लाभलेलं हे स्वरपुष्प त्याच्या चरणी अर्पण करते !


Group content visibility: 
Public - accessible to all site users

ह्या वर्षीचं गाणं ऐकून अगोचं गेल्यावर्षीचं गाणंही शोधून ऐकल..
इच्छुकांना लाभ घेता यावा म्हणून वर आणतोय.. >>>> +१०००....

हे पण फारच सुरेल, श्रवणीय, नादमधुर........

महा सुंदर..
अगो, अगं, किती सुरेल शास्त्रीय बैठकीचा आवाज आहे... सगळी गायकी "आ"कारात...
खूप सुंदर चाल आहे... मला समोर तबला ओढून घेऊन ठेका लावायची भयंकर सुरसुरी आली... ऑफिसात बिन्धास्त टेबलावर वाजवलं...
जियो!

रागदारीवर आधारीत चाल असली की भक्तीगीताला खास रंग येतो असं अनुभवायला येतं!
आज परत हे गीत ऐकलं. सगळ्या बारकाव्यांसहित छान गायलंय. भीमपलास + धानी वेगळाच गोडवा
घेऊन आलाय. दादची दाद मिळाली आता कृतकृत्य वाटलं असेल अश्विनी तुला!

Pages