आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2010 - 05:31

आपली भारतीय संस्कृती विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत मग देवही आलेच. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं मानतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, परंतू असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. बाकी देवांवर श्रद्धा असली तरी याच्याकडे थोडा जास्तच ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक नां अनेक.

2010_MB_AamchyakaDachaaGanapatee.jpg

सगळ्या मायबोलीकरांच्या सूचनांचा विचार करून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी हा कार्यक्रम ठेवला आहे. इथे तुमच्या घरच्या, सोसायटीतल्या, मंडळातल्या किंवा कॉलनीतल्या गणेशोत्सवाबद्दल लिहा. पण इथवरच न थांबता पर्यावरणातील संभाव्य धोक्यांचा विचार करून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही स्वागतार्ह बदल केलेत कां? उदाहरणार्थ - गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आणायला सुरुवात केली किंवा गणेशमूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यासाठी मूर्तीचा आकार कमी केला किंवा मखर करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करणं बंद केलं इ.इ. असे बदल केले असतील तर ते इथे आवर्जून लिहा जेणेकरून इतर मायबोलीकरांना प्रेरणा मिळेल.

तसंच तुमच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील बघण्यासारखे देखावे, गणपती याबद्दलही इथे लिहा ज्यायोगे इतर मायबोलीकरांनाही त्याची माहिती मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सुंदरच! एकदम प्रसन्न. बाजूची सजावट एकदम सुंदर रेखीव आहे अगदी टेबल्क्लॉथ आहे ना घातलेला तिथपासून ते सर्वच.

फक्त एकच प्रश्ण पडला.. गणपतीची रोज सकाळची पूजा कशी काय केली.. समोर एवढी सुंदर रांगोळी असताना.. उभे रहायला जागा नाही ना...

सगळ्यांचे बाप्पा मस्त आहेत. ज्यांनी मुर्ती घरी केल्या आहेत त्यांना मानलं , काय सुरेख आहेत सगळ्या मुर्ती. मला पत्रावळींची आरास पण खुप आवड्ली. वेगळीच कल्पना आहे.
मायबोली गणेशउत्सवातल्या बर्‍याच गोष्टी बघायच्या राहुन जाताएत. कारण काय बघु आणि काय नको ( नको असं काहीच नाहिये.) असं झालयं.

हि बाप्पाच्यापुढची रांगोळी
DSC00506_0.JPG
आणि ह्या दारापुढच्या रांगोळ्या ( वेगवेगळ्या दिवशींच्या)
DSC00529.JPGDSC00503.JPGDSC00532.JPGDSC00541.JPG

जय गणेश

सगळ्यांचे बाप्पा मस्त.

रांगोळ्या काय सही आहेत गं धनुडी Happy

हे आमचे बाप्पा.

IMG_0242.JPGIMG_0181.JPGIMG_0213.JPGIMG_0210.JPG

इथे विसर्जन करता येत नाही म्हणुन आम्ही मखरात चंदनाचा गणपती ठेवतो आणि चांदीच्या गणपतीची पुजा करतो.

हे थर्माकोलचे मखर मी ५ वर्षांपुर्वी बनवले आहे. टेबलाच्या पॅकिंग बरोबर आलेल्या थर्माकोल आणि किचन पेपरच्या पुठ्ठ्याच्या नळ्या वापरुन केले आहे.

सगळ्यांना धन्यवाद!
मनू, अगं गणपतीपुढे हिच रांगोळी रोज नव्हती, रोज फुलांचीच वेगवेगळी पण छोटी रांगोळी काढलेली Happy
हा फोटो गौरीपुजनाच्या दिवशी घेतला.

सगळ्यांचे बाप्पा, महालक्ष्म्या खूप सुंदर .

सगळ्यांचे बाप्पा मस्तच...

ऑफिसमधून फोटो टाकता येत नाहिये, घरी गेलो की टाकतो माझ्या घरच्या बाप्पाचा फोटो..

माझ्याघरी १९९५ पासून कायमची मूर्ती आहे, एरवी ती काचेच्या केस मधे असते, गणेशोत्सवात मखरात बसवतो... प्रतिष्ठापना समोर सुपारीचा गणपतीची ठेऊन त्याची करतो आणि नंतर त्याचंच विसर्जनही घरीच बादलीत करतो...

सगळ्यांचे गणपती सुरेख Happy
हिम्या, पुण्यातल्या गणपतींचे दर्शन ह्यावेळी हुकले होते, तुझ्यामुळे घ्यायला मिळाले Happy हडपासरचे गणपतीही छान.
मला रांगोळी नाही दिसली भाग्य..

सगळ्यांचे गणपती आणि आरास सुरेखच आहेत. धनुडी, सहीच.
घरबसल्या पुण्यातल्या गणपतींसाठी हळहळणार्‍यांना सगळ्या प्रमुख गणपतींचं दर्शन करुन दिल्याबद्दल हिम्स्कूल चे विशेष आभार ! खूपच प्रसन्न वाटलं नेहेमीचे गणपती बघून.

Pages