आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2010 - 05:31

आपली भारतीय संस्कृती विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत मग देवही आलेच. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं मानतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, परंतू असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. बाकी देवांवर श्रद्धा असली तरी याच्याकडे थोडा जास्तच ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक नां अनेक.

2010_MB_AamchyakaDachaaGanapatee.jpg

सगळ्या मायबोलीकरांच्या सूचनांचा विचार करून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी हा कार्यक्रम ठेवला आहे. इथे तुमच्या घरच्या, सोसायटीतल्या, मंडळातल्या किंवा कॉलनीतल्या गणेशोत्सवाबद्दल लिहा. पण इथवरच न थांबता पर्यावरणातील संभाव्य धोक्यांचा विचार करून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही स्वागतार्ह बदल केलेत कां? उदाहरणार्थ - गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आणायला सुरुवात केली किंवा गणेशमूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यासाठी मूर्तीचा आकार कमी केला किंवा मखर करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करणं बंद केलं इ.इ. असे बदल केले असतील तर ते इथे आवर्जून लिहा जेणेकरून इतर मायबोलीकरांना प्रेरणा मिळेल.

तसंच तुमच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील बघण्यासारखे देखावे, गणपती याबद्दलही इथे लिहा ज्यायोगे इतर मायबोलीकरांनाही त्याची माहिती मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

इथे माझा एक गोड अनुभव लिहावासा वाटला म्हणून लिहितेय. लिखाणात चुका असतीलच कारण असा लेख लिहिण्याची पहिलीच वेळ आहे. तरीही कौतुकाने लिहितेय... आवडेल अशी आशा आहे.

मनःस्विनी

--------------------------------------------------------------------
बाप्पाची मला भारी आवड. रोज पुजा पाठ ,उपास वगैरे करत नसले तरी बाप्पा वर श्रद्धा पहिल्यापासून. घरी तर गणेशोत्सव साजरा होतोच. आई पप्पा तर भारतातच जावून साजरे करतात. पुढे जस जसे शिक्षणात गुंतले तसा सहभाग कमी झाला व तसेही लांब जावे लागले आधी शिक्षणामुळे मग नोकरीमुळे जावुच शकले नाही १० वर्षात घरच्या गणपतीला.
तेव्हाच्या आठवणी खूपच खोल अश्या मनात आहेत. सांगायचे म्हणजे लहानपणापासून गणेशोत्सव म्हटला की मला मजा वाटायची. बाप्पा येण्याच्या आधी तर घरभर सजावटीचे सामान. भाउ त्यात लीड असायचा. माझा सहभाग हा असायचाच. आता घरी एक से बढकर एक कलाकार, मी त्यांच्याइतकी नसले तरी होते/आहे बर्‍यापैकी. त्यामुळे चित्रे काढून द्या, रंगवा अशी लहानांच्या योग्य(मोठ्यांच्यांमते) मी काम करायची सजावट सुरु झाली की. त्यात मला मातकाम खूप आवडे. ह्याची तर अजुन एक गोष्ट आहे की मला मातकाम कसे आवडायला लागले. ते पुढे कधीतरी लिहेन. पण मातकाम ज्यावेळी सुरु केले ते ही पप्पांकडून हट्टाने माती मागितली व पहिले काय केले असेन तर हत्ती. हत्ती तसाही माझा आवडता प्राणी. तर हे इतके कौतकाने सांगायचे कारण की ह्यावेळी गणपती आणायचाच ठरले. गेल्यावर्षी पासून मी स्वःताच्या घरी गणपती साजरा करायला लागले पण ते काही ठरवून असे न्हवते, त्यामुळे तयारी काहीच न्हवती. ह्यावर्षी मुर्ती घरीच करायचे ठरले.
पण नक्की होत न्हवते. कारण चार पाच महिन्यापुर्वीच अपघाताने कंबर व गुडघा खूप दुखावला. दोन तासाच्या वर न बसवत ना चालवत. जे काही काम ते दोन दोन तासात उरका व झोपून रहा. पण जिद्द हि होतीच. व जिद्द असली की काहिही करु शकता तुम्ही, हा अनुभव माझा होताच. बुधवारपर्यंत ठरत न्हवते. घरी कोणीच ना हि हो ही म्हणत न्हवते. पण एकंदरच ना होते. एक आठवडा राहिला तसा मी मुर्ती बनवतेय अशी स्वप्न रंगवायची, शेवटी नवर्‍याला बुधवारी रात्री माती आणायला सांगितलीच.
तर असे घडवले बाप्पा,
पुर्ण ४ तासात काम केले. दोन दोन तास विभगाले दोन दिवसात. मुर्ती बुधवारी दोन तासात बनवली. गुरुवारी पहिला रंगाचा थर दिला. मग रात्री एक व शुक्रवारी एक असा थर दिला. water color वापरला. त्रास खूप झाला पायाला पण असो. बाप्पा असेल तर सर्व काही ठिक.
हे फोटो बाप्पा घडवतानाचे,

murti-before_0.jpgmurti-b-5.jpgpaint-1.jpgfg_0.jpg

सगळ्यांचे बाप्पा आवडले.

गेल्या वर्षीपासुन मी घरीच मुर्ती बनवायला सुरुवात केली. आता असा कॉन्फिडंस आलाय कि पुढल्या वर्षी देशात पण घरीच मुर्ती बनवायचा प्लॅन केलाय. Happy
आरासही कागदांची घरी केली आहे.

हे आमच्या कडचे बाप्पा. पुजे आधी.

ganpati.jpg

हे पुजे नंतर Happy

ganpati1.jpg

अरे भारी आहात तुम्ही. आता यावेळी जाऊदे पण पुढच्या वेळी मलापण आवडेल घरी बाप्पा बनवायला. अमृता कसले गोड बाप्पा जमले आहेत तुला. एकदम बालपणीचा गणेश.
बढीया. पुढच्या वर्षी तुझ्याकडून टीप्स घेतो मुर्ती बनवायला. आणि हो मनस्विनीकडूनही.

पर्यावरणासाठी यावर्षी असे नाही पण आम्ही निर्माल्य नदीत टाकणे केव्हाच बंद केले. गेली कित्येक वर्षे आम्ही बागेत खड्डा खणून त्यात टाकतो. आमच्याकडे दगडूशेठ गणपती हे आराध्यदैवत त्यामुळे दरवर्षी तीच मुर्ती आणतो. पण त्यातल्या त्यात पर्यावरणाचा विचार करून मी विसर्जन बंद करायचा निर्णय घेतला होता. विसर्जनाऐवजी एका छानश्या खोक्यात नीट पॅकबंद करून ठेवला आणि पुढच्या वर्षी तीच मुर्ती वाजत गाजत आणली. पण काही उत्साही लोकांनी असे करू नका, संकटे येतात असे काहीबाही भरवून आई-वडीलांना घाबरवले. यावर काय करता येईल?

सगळ्यांकडचे बाप्पा आणि आरास एकदम सुरेख, मन अगदी प्रसन्न झालं Happy
अमृता आणि मनु, बाप्पा एकदम मस्त जमलेत, छान दिसत आहेत Happy

मूर्ताकडून अमूर्ताकडे असा आपला प्रवास असतो. म्हणून मूर्तीचे विसर्जन करावे.
केलेली मूर्ती दहा दिवस नीट टिकावी, ती प्रसन्न दिसावी यादृष्टीने नवनवीन माध्यमे शोधायला हवीत आता.
निसर्गात अनेक रंग उपलब्ध आहेत, तेच वापरायला हवेत.

आम्ही पर्यावरणाचा विचार करुन सुपारीची प्रतिष्ठापना करतो. समोर पूजेत मोठी मूर्ती ठेवतो पण प्रतिष्ठापना सुपारीची करतो आणि विसर्जनही सुपारीचंच करतो.

मनु,रेशीम,अमृता सुरेख झाल्या आहेत मुर्ती.
बाकी सगळ्यांचे गणपती पाहून मन प्रसन्न झाल. Happy
मोरया. Happy

आमची यावर्षीची घरी बनवलेली 'इको फ्रेंडली' मुर्ती. मुर्ती माझ्या "अहोंनी" बनवली आहे. (पहिल्यांदाच) . मी नॉन टॉक्सिक रंगानी रंगवली आहे.
Optimized-DSC08102.JPG

रंगवलेली मुर्ती (स्वतंत्र , पुजा करण्या अगोदरचा फोटो काढायला विसरले.)

Optimized-DSC08135.JPG

सीमा, एकदम मस्तच मुर्ती बनवलीय तुझ्या 'अहोंनी' आणि तुझं रंगकाम पण छानच Happy
विशेषत: डोळे सुंदरच आलेत !!!!

सीमा, क्लोजअप टाकना शक्य असेल तर दुसर्‍या मुर्तीचा. तुझ्या 'अहोंनी' मुर्ती मस्त बनवलीय.(तुमच्यात नाव घेत नाहीत वाटतं ह्या काळात सुद्धा ;))

सगळ्यांचे बाप्पा सुंदर. आमच्याकडे पुढच्यावर्षी टेक्सासहून गणपती मागवायचा विचार आहे Happy
मायबोलिवरून ऑर्डर घ्याल का सीमातै ?

सगळ्यांच्या स्वतः/घरच्यांनी बनवलेल्या मूर्त्या सुंदर आहेत. पुढच्या वर्षी प्रयत्न करुन बघावा वाटतोय. Happy

मोरया!

सहीएत सगळे बाप्पा.

मी तीन वर्षांपासुन घरीच गणपती करतेय. बराच छोट्या आकाराचा पण करते. डेकोरेशनसाठी पडदे, फुलं, लायटिंग, खुप सारे दिवे ह्यांचा वापर करते.

ह्या वर्षीचे बाप्पा!!

DSC_0439.jpgDSC_0549.jpgDSC_0550.jpg

हा आम्ही घरी बनवलेला गणपती..

IMG_0195.jpgIMG_0225.jpgIMG_0230.jpg

पर्यावरणाचा विचार करुन खालील गोष्टी केल्या:
१. मुर्ती घरी मातीने (इकडे Natural Clay मिळतो त्याने) बनवली.
२. विसर्जन बादलीत करुन ते पाणी घराभोवतीच्या झाडांना घालणार आहोत.

गणपतीच्या मूर्तीचे शक्यतो दरवर्षी विसर्जन करावे.... त्यासाठी उत्तम उपाय म्हणजे शाडूच्या मातीपासून बनवलेलीच मूर्ती आणावी आणि घरच्या घरी बादलीत विसर्जन करावे... पुण्यात खात्रीलायक शाडूच्या मातीच्या मूर्ती ग्राहक पेठेत नक्कीच मिळतात.. साधारण दोन दिवसांत पूर्ण मूर्ती पाण्यात विरघळते आणि मग ती माती इतर ठिकाणी वापरता येते..

हा माझा बाप्पा..

पुजेआधी.

Y006.jpg

पुजेनंतर.

Y007.jpg

मोबाईलने फोटो काढल्याने रिझोल्युशन तितकंस नीट नाहीय.

हे आमचे बाप्पा...
मुर्ती शाडुची आहे...

100_5375 MB.jpg

सजावट करताना पत्रावळी आणि द्रोण यांचा वापर केला आहे. वेळेच्या अभावी लाकडाची फ्रेम बनवता आली नाही म्हणुन थर्माकोलचा वापर केला आहे. त्यावर हँडमेड पेपर चिकटवुन त्यावर पत्रावळ, द्रोण आणि रंगीत कागद वापरले.

100_5387 MB.jpg

'गणपती बाप्पा मोरया....... " Happy

वाह.... सगळ्यांचे गणपती अतिशय सुंदर....
सजावटपण अगदी मस्त, सुंदर, साजेशी... Happy

तुमच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील बघण्यासारखे देखावे, गणपती याबद्दलही इथे लिहा ज्यायोगे इतर मायबोलीकरांनाही त्याची माहिती मिळेल.

Pages