आमच्याकडचा गणपती

Submitted by संयोजक on 19 August, 2010 - 05:31

आपली भारतीय संस्कृती विविध भाषा, प्रथा व चालीरिती यांनी परिपूर्ण आहे. या विविधतेत मग देवही आलेच. हिंदू धर्मात ३३ कोटी देव आहेत असं मानतात. वेगवेगळ्या राज्यांत वेगवेगळ्या देवांची पूजा करतात, परंतू असं असलं तरी आपला गणपती बाप्पा हा सगळ्यांचाच लाडका आहे. बाकी देवांवर श्रद्धा असली तरी याच्याकडे थोडा जास्तच ओढा आहे. महाराष्ट्रात तर गणेशोत्सव साजरा करण्याचं प्रमाण सगळ्यात जास्त. घरचा गणपती, सोसायटीचा गणपती, मंडळाचा गणपती असे एक नां अनेक.

2010_MB_AamchyakaDachaaGanapatee.jpg

सगळ्या मायबोलीकरांच्या सूचनांचा विचार करून दरवर्षीप्रमाणेच याहीवर्षी हा कार्यक्रम ठेवला आहे. इथे तुमच्या घरच्या, सोसायटीतल्या, मंडळातल्या किंवा कॉलनीतल्या गणेशोत्सवाबद्दल लिहा. पण इथवरच न थांबता पर्यावरणातील संभाव्य धोक्यांचा विचार करून तुम्ही हा गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही स्वागतार्ह बदल केलेत कां? उदाहरणार्थ - गणेशमूर्ती शाडूच्या मातीची आणायला सुरुवात केली किंवा गणेशमूर्तीची विसर्जनानंतर होणारी विटंबना टाळण्यासाठी मूर्तीचा आकार कमी केला किंवा मखर करण्यासाठी थर्मोकोलचा वापर करणं बंद केलं इ.इ. असे बदल केले असतील तर ते इथे आवर्जून लिहा जेणेकरून इतर मायबोलीकरांना प्रेरणा मिळेल.

तसंच तुमच्या शहरातील सार्वजनिक गणेशोत्सवातील बघण्यासारखे देखावे, गणपती याबद्दलही इथे लिहा ज्यायोगे इतर मायबोलीकरांनाही त्याची माहिती मिळेल.

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

हा माझा गणपति..

maza bappa.jpg

साध्या काचेपासून बनवलेला आहे. कोल्हापूरला गणेश आर्ट मधे घेतला. फोटो उगवत्या सूर्यासमोर, ठेवून काढला आहे.

सगळ्यांचे बाप्पा न आरास...खुपच छान आहेत..शुभंकरा च्या दर्शना ने मन प्रसन्न झाले..

कालच आमच्याकडे श्री गणपतीचे आगमन झाले.............

तो विघ्नहर्ता आपणा सर्वांना आरोग्य, सुख, समाधान व समृद्धी देवो !!!!!!

IMG_0544A.JPGIMG_0540.JPG

गणपती बाप्पा मोरया !!!!!

सगळ्यांच्या बाप्पांना बघून मन प्रसन्न झालंय.

हा आमच्या घरचा यंदाचा बाप्पा...
DSC06484_1.JPG

हा मुख्य बाप्पा...
DSC06485_1.JPG

आणि हे सगळे आरास म्हणून असलेले बाप्पा....
DSC06486_1.JPG

यंदा आरास करताना थर्माकोलचा वापर कमीतकमी करायचा प्रयत्न केलाय.. मुख्य गण्पतीच्या मागचे चक्र पण नव्हतेच ठेवायचे पण घरच्यांच्या मते गणपतीच्या मागे काही तरी पाहिजे त्यामुळे ते ठेवावे लागले.. बाकी आरास करण्यासाठी पुस्तक वापरली आहेत बैठक म्हणून..

मंगलमूर्ती मोरया!!

हे आमचे घरीच बनवलेले इको-फ्रेंडली बाप्पा! आरास म्हणून शेजारी त्यांचच चित्र काढलयं.

DSC00942.JPGDSC00948.JPG

इथे तुमच्याकडचा गणपती तर आवर्जून लिहाच पण त्याबरोबर पर्यावरणाचा संभाव्य धोका लक्षात घेऊन तुम्ही तुमच्याकडच्या गणेशोत्सव साजरा करण्याच्या पद्धतीत काही बदल केले असतील तर ते इथे जरूर लिहा.

Pages