शेरास सव्वाशेर - प्रकाशचित्रांचा झब्बू क्र. १०

Submitted by संयोजक on 1 September, 2010 - 10:53

कोकणातल्या एखाद्या ओढ्यावरचा लहानसा साकव, जॅपनीज गार्डनमधला एखादा नाजुकसा पूल, गोल्डन गेट ब्रीज, हावडा ब्रिज. नदी, खाडी, ओहोळ ओलांडून पलिकडे जाण्यासाठी बनवलेले हे पूल आज आपल्या रोजच्या जगण्याचा भाग झालेले असतात. तर अशा या पूलांचे फोटो हा आहे आजच्या झब्बूचा विषय.

हे लक्षात ठेवा :
१. ही स्पर्धा नाही. हा खेळ आहे.
२. ह्या खेळात सहभागी होण्यासाठी आपल्याला 'मायबोली गणेशोत्सव २०१०' ह्या ग्रूपचे सभासद होणे गरजेचे आहे.
३. रोज एक नवीन छायाचित्र झब्बूसाठी दिले जाईल.
४. दिलेल्या छायाचित्रावर झब्बू म्हणून एका वेळेस एकच छायाचित्र टाकावे.
५. झब्बूचे छायाचित्र हे स्वत: काढलेले असावे.
६. झब्बूचे छायाचित्र संयोजकांनी दिलेल्या छायाचित्रातल्या विषयाशी सुसंगत असावे.
७. एक आयडी एका दिवसात कितीही वेळा झब्बू देऊ शकतो/ते, फक्त सलग दोन झब्बू देऊ शकत नाही.

आजचा विषय - पूल (ब्रिजेस)

कोणत्याही प्रकारच्या पूलाचे टिपलेले छायाचित्र इथे टाकता येईल.

2010_MB_Jhabbu_Bridge.jpg
विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

सहीच! एकाआड एक झब्बू खेळू शकेन इतके फोटो आहेत. पण अर्ध्याहून अधिक फोटो लोकेशन रेकीचे.. त्यामुळे टाकता नाही येणार इथे.. Sad

असो श्वास मधली एक फ्रेम आहे पण मी काढलेला नाहीये तो फोटो. टाकावी काय?

आरोंद्याचा बांधकाम सुरू असलेला पूल. सिंधुदुर्ग आणि गोवा जोडणारा अजून एक पूल. सागरी महामार्गाचा एक भाग. आरोंद्यातून थेट पेडण्यात शिरता येईल या पुलावरून.

Aronda-khadi-(33).jpg

राई साईडने काढलाय ना?
कस्ला मस्त दिसतो हा पूल. आमच्या वाडीतून निघाल्यावर रस्त्यावर आलं की हळू हळू दिसायला लागतो पूल ते तर इतकं सही दिसतं की बस्स...

राई साईडने काढलाय ना?>>>>येस्स्स, गणपतीपुळ्याहुन हेदवीला जात असताना काढलायं.
मी बर्‍याच वेळा गेलोय या रस्त्याने, सकाळच्या वेळेस धुक्यातुन जाताना मस्त वाटतं Happy

म्हणजे समोर दिसतंय ते आमचं भातगाव. तिसंग भातगाव उजवीकडे आणि वरती डावीकडे रस्ता जातोय तो मेन भातगावकडे.

Pages