कान्ह्याची बासुरी

Submitted by अरुंधती कुलकर्णी on 11 September, 2010 - 10:49

पावसाच्या आठवांत
माझा जीव चिंब झाला
निथळत्या अंगणात
गंध दरवळ ओला

तगमग झाली शांत
तृष्णा धरेची भागली
काळी वसुंधरा माय
बीजे तृप्त हुंकारली

सृष्टी झाली झाली दंग
गान वृक्षांचे आगळे
साज मोत्यांचे लेऊन
उभे पूजेला ठाकले

असे भिजले गं मन
जशा श्रावणाच्या सरी
काया झाली हलकीशी
निळ्या कान्ह्याची बासुरी....

--- अरुंधती

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

अकु, कविता पण !!
चांगली जमलीय, पण पुन्हा कामाला लागली, हि ओळ जरा विसंगत वाटतेय.

छान Happy