रान संपत्ती

Submitted by जागू-प्राजक्ता-... on 1 September, 2010 - 02:56

पावसांच्या सरी चालू झाल्या की निसर्ग आपली ही संपत्ती उधळायला सुरुवात करतो. त्या संपत्तीपैकीच ही काही रान फुले व झाडे. निसर्गाकडू आपल्याला ही संपत्ती विनामुल्य, विनाकष्ट मिळत असते. ही छोटी मोठी रानफुले, झाडे आपल्या नजरेला, मनाला अगदी गारवा देउन जातात. मनाचा, शरीराचा थकवा ह्यांच्या सहवासाने कुठे दुर पळतो त्याचा पत्ता लागत नाही. फक्त आपण त्यांच्याकडे डोळसपणे पाहील पाहीजे. निसर्गाने दिलेल्या ह्या संपत्तीची नजरेने लूट करुन पहा.

हे गोंडे नेहमीच कोणत्याही रानात, रस्त्यावर स्वागतासाठी ताठ सज्ज झालेले असतात.
ran.JPG

तेरडा हा तर सगळ्यांच्याच परिचयाचा. नेहमीच हसत उभे असलेले हे फुल. पिठवरीला ह्या झाडाला पुजेचा मान मिळतो. ह्याची फळ खुप गमतीशिर असतात. लहानपणी ही तयार झालेली फळ तोडायची आणि हलकेच हाताने दाबायची मग हे फळ फुटून त्याचा आकार किडीप्रमाणे होतो. मग ते किडीच्या आकाराचे फळ कोणाच्यातरी अंगावर फेकून घाबरवायचे असा गमतीशीर खेळ असायचा.
ran1.JPG

ही आहे कोरांटी. माझ्या रानभाज्यांच्या सिरिजमधली भाजी. हे तिचे आलेले फुल. ही फुले आलेली झाडे जिथे मोठ्या संख्येने असतात तेथे काश्मिर असल्याचा भास होतो. लहान असताना आमच्या समोरच्या पडीक जागेत ही झाडे मोठ्या प्रमाणात होती. सगळे त्याला काश्मिरच म्हणायचे. ह्या फुलांमध्ये मधही असते. लहानपणी ही फुले काढून त्याची मध चोखण्याचाही टाईमपास चालु असायचा. तसेच ह्या फुलांचे गजरेही करायचो आम्ही.
ran2.JPGran3.JPG

अळू हा सुद्धा सगळ्यांच्याच परिचयाचा. त्याला आलेले हे फुल केवड्याच्या पातीसारखे भासते.
ran4.JPG

हे निसर्गाचं एक इटूकल पिटूकल बाळ अगदी बाळबोधपणे आपल्या बाललिला करत डोलत असत.
ran5.JPG

निसर्गाच्या ह्या पांढर्‍या फुलांचा अविष्कार अगदी नजर खिळवुन ठेवतो.
ran6.JPG

हे रोपट पहा कस तोर्‍यात मिरवतय. खाली पसरलेल्ल्या कवळ्याच्या रोपांना सांगत आहे माझी पान तुमच्यापेक्षा लांब आणि रंगित आहेत अगदी मोरपिसासारखी.
ran7.JPG

निसर्गाने ह्या रोपट्याला पहा कस रंगवुन टाकलय. निसर्गाच्या ह्या वरदानाने हे रोपट स्वतःला आकर्षीत करुन घेत आहे.
ran8.JPG

गुलमोहर: 
शब्दखुणा: 

रानातील संपत्ती म्हणून रानातील नॉर्मल फ्लोरा / फाऊना विचारात घेऊन आढळणारी पाने, फुले, फळे, प्राणी, पक्षी, किटक व त्यांचे उपयोग यांच्याबद्दल लिहिलंस तर अजून उत्तम लेख होईल.

छानच.
अळूला आलेलं फूल प्रथमच पाहिलं. Happy

ती पांढरी फुले आहेत ती म्हणजे पेवाची. ('पेव फुटणे' मधले पेव. त्याच्या फांदीवरची पानांची स्पायरल रचना सर्व पानांना सूर्यप्रकाश मिळावा म्हणून असते. फोटोत तशी एक फांदी दिसते आहे.)

अश्विनी हो ग खर आहे ते. निसर्गाने एवढी संपत्ती दिलेली आहे. अगदी डोंगर, पशू, पक्षी, समुद्र, तलाव, जंगल कितीही लिहील तरी त्याला पुर्णत्व नाही येणार.

लले किती छान सांगितलस तु रचनेबद्दल.

वा!!जागू..खूप सुरेख फोटो.. मीपण अळूचं फूल पहिल्यांदाच पाहिलं.. मला तर माहितच नव्हतं अळूला फुलं येतात ते!!
लले..तुलापण धन्स..
रस्त्याच्या कडेने जाताना, गवताच्या पातींमधे उगीचच इकडे तिकडे फुललेली बिन नावाची पांढरी,पिवळी,निळी,जांभळी इवली इवली फुलं सुद्धा डोळ्यांना किती आनंद देऊन जातात नै?

मला तर माहितच नव्हतं अळूला फुलं येतात ते!! >> अय्या मला पण नव्हतं माहीत. >> मला पण .. मला पण Happy

जागू मस्तच ग सगळे फोटो Happy

छान हिरवं गार वाटलं फोटो बघुन. Happy शेवटुन दुसरा फोटो बघताना मला मिनीएचर ड्रॉईंग बघत असल्यासारखं वाट्लं, ती छोटी छोटी पानं बघुन.

मला तर माहितच नव्हतं अळूला फुलं येतात ते!! >> अय्या मला पण नव्हतं माहीत. >>>>>

+१+१+१+१

पहिल्या प्रचितल्या गोंड्यांच्या झाडाला कोंबडा किंवा आघाडा (की केना?) म्हणतात असे आठवते. गणेशाला/हरतालिकेला लागणार्‍या पत्रींमधे याचा समावेश होतो.

तेरड्याची फळे हिरवी असतांनाच (खरेतर काहीशी सुकून पिवळसर झाल्यावर) बोटांच्या साध्या इशार्‍यांनीही टचकन उलगडून आतील काळसर बिया सैरावैरा उडतात, तर हिरव्या आवरणाची तत्काळ वळकटी वळली जाते. लहानपणी यांच्याशी खूप खेळल्याची स्मृती अजूनही ताजी आहे.

जागू. हा लेख त्यातल्या प्रचिंसकट खूप आवडला. बिते हुए दिन ... याद आले.

अरुंधती, स्मिता, नरेंद्र धन्यवाद.
नरेंद्र त्याला कोंबडा म्हणतो आम्ही. ह्यात अजुन एक प्रकार गोल डार्क गुलाबी रंगाचा प्रकार असतो. त्याची लागवड करतात.

जागू, आत्ताच हे सगळे बघून आलो. तेरड्याच्या काही वेगळ्या प्रकारांचा झब्बू देतो उद्या.
तेरड्याच्या जाड देठाचा, पाटी पुसण्यासाठी छान उपयोग होतो. त्याच्या बियांपासून तेल निघते आणि ते खाद्य असते.
पेव फूटणे, हा शब्दप्रयोग हळदीसाठी वापरतात. जमिनीत मोठे खड्डे करुन त्यात हळद ठेवतात. (असे केल्याने हळदीला तो स्वाद आणि रंग येतो.) त्या खड्ड्यांना पेव म्हणतात.

तूमच्याकडे धायटी नाही का ? आपल्या सगळ्या घाटांत, लगतच्या उभ्या भिंतीवर हे झुडूप आहे.
त्याची काही पाने लाल असतात. आणि फूले लालभडक असतात.
घाटात वाया जाणारे हे फूल, तोळ्यावर विकले जाते एवढे ते किंमती आहे.
द्राक्षासव सारखी औषधे करण्यासाठी ते लागते.

जुई, दिनेशदा, आशुतोष धन्यवाद.

दिनेशदा धायटी कस असत ? कदाचित मी पाहील असेल पण नावाने ओळखत नाही.

त्याची काही पाने लाल असतात. आणि फूले लालभडक असतात.

दिनेश फोटु टाका ना.. आणि एवढे तोळ्यावर विकले जाणारे काय असते त्यात तेही सांगा..

जागू, तो पहिला फोटु आहे ना, (त्याला कुर्डू म्हणतात बहुतेक, दिनेशबरोबरच माझी चर्चा चालु होती त्याबद्दल Happy ) त्याच्याच एका जातीबद्दल तु लिहिलेस, गोल असतो म्हणुन.. माझ्याकडे त्याचे रोप होते बरीच वर्षे. त्याचे इंग्रजी नाव काहीतरी होते आता आठवत नाही, पण माझ्या बाईने त्याचे लोकल नाव गोलबंद म्हणुन सांगितलेले. ते गोळे एकदम मस्त दिसतात. डार्क गुलाबी रंगाचे होते माझ्याकडे, पण राणीबागेतल्या प्रदर्शनात ते लाल्भडक, पांढरे आणि केशरीही पाहिले होते.

तुझी कोरांटी मला चटकन ओळखीची वाटत नाहीये. म्हणजे तशी ओळखीची वाटतेय, रानात ही रोपे बघितलीय, ज्यांना पेरापेरावर फुले येतात अशी.. पण मी जिला कोरांटी म्हणुन ओळखते ती ही नाही बहुतेक. ती फक्त फुलेवाली आहे आणि ती फुलेही अबोलीची कशी टोकाला येतात तशी येतात. १५-२० वर्षांपुर्वी बायका त्याचा गजरा करुन घालायच्या (खरेतर गजरा हा शब्द चुकीचा आहे या प्रकारच्या फुलासाठी, तिथे वळेसार हाच शब्द पाहिजे). अबोलीच्या वळेसारापेक्षाही हा भरगच्च आणि भारी दिसायचा. शिवाय रंगांमध्येही वैविध्य. वर तु दिलेला रंग तर असायचाच, सोबत अबोलीही असायचा. आता बाकीचे रंग आठवत नाहीत... (मी तर सांताक्रुझमध्येही कोप-याकोप-यावर कोरांटी पाहिलेली, आता अशक्य गोष्ट झालीय ही Happy )

साधना ह्या कोरांटीचा पांढरा कलरही असतो. ही कोरांटी माझ्या रानभाज्यांच्या सिरिजमध्ये आहे. त्यावर मी तिथे जास्त माहीती टाकली आहे.

साधना ते गोल फुलांचे बी मिळत असेल. पुर्वी आमच्या गावी घराघरात असायचे ते गोंडे.

हे खास जागूसाठी, (साधनासाठी धायटी पण टाकतोय.)
निसर्गात, पांढरा, गुलाबी आणि फिक्कट जांभळा रंग दिसतो. अगदी छोटा गुलाबी आणि मोठा जांभळट गुलाबी, ढाल तेरडा दिसतो.
बागांमधे डबल तेरडा दिसतो. त्यात तर अनेक रंग असतात. (तेरड्याच्या फूलाच्या मागे एक नांगी सारखा भाग असतो.) ढाल तेरडाच तेवढा पूर्ण उमलतो. बाकीचे पूर्ण उमलत नाहीत.
ही तेरड्याची सुधारीत वाणं. फूल, रंग, आकार सगळेच देखणे.

terada.jpg

हि आहे धायटी. पार्श्वभुमीवर लाल पिवळी पाने अंधुक दिसताहेत. हा फोटो पावनखिंडीजवळ घेतला होता. शिवनेरी वर पण दिसली होतीच. बहुतेक सर्व घाटात. रस्त्याजवळच्या उभ्या कड्यावर हि असतेच. द्राक्षासव वगैरे करताना, हि फूले अल्कोहोल निर्मितीचे काम करतात. (म्हणून एवढा भाव हो.) तशी नुसती खाल्ली तरी गोड लागतात. (पण किती तोळे खाल्ल्यावर विमान उडायला लागते, ते माहित नाही. )

pawan khind may 07 030.jpg

धायटी बघितल्याचे आठवत नाही Sad मला पाहताच एकदम डाळिंबच वाटले. तशीच लहान पाने व फुल.. Happy

पण किती तोळे खाल्ल्यावर विमान उडायला लागते, ते माहित नाही

जेवल्यावर खायची पाचसहा तोळे, पोटात होईल अल्कोहोल निर्मिती, आणि आपोआप विमान ३५००० फुट वर गेल्याचा भास होईल Happy

धन्यवाद दा Happy

मला पाहताच एकदम डाळिंबच वाटले. तशीच लहान पाने व फुल.. >>>>अगदी अगदी, मलापण ते डाळिंबाचेच फुल वाटले.

Pages