मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

नवनीत सुपिरिया अँकर रेलिगेर या जाहिराती मला का दिसत नाहीत? कोणत्या कार्यक्रमांच्या दरम्यान येतात. या जाहिरातींसाठी मी त्या मालिका एकदा जरूर पाहिन.

त्या १८+ आणि Axe च्या जाहिराती क्रिकेट मॅच मधे दर ओव्हरनंतर दाखवतात. लहान मुलांना अजिबात पाहण्यासारख्या नाहीत. मुळात जाहिरातीही फालतू आहेत. तशीच ती एक एकदम भंगार जाहिरात - कसलातरी मास्क वाला डान्स चालू असतो आणि लिफ्ट मधून ती हीरॉइन कोणाचा तरी पाठलाग करते.

तशीच ती कोणत्यातरी कार ची जाहिरात आहे. १०-१२ वर्षांचा मुलगा एका मुलीकडे पाहून शीळ घालतो. आणि ती ही कौतुकाने पाहात जाते. मग त्याच्या ४-५ वर्षांचा भाउ तेच करायचा प्रयत्न करतो आणि ती कार दिसल्यावर आपोआप शिट्टी येते वगैरे.

या जाहिराती क्रिकेट मॅच च्या मधे दाखवायची कल्पना कोणाच्या सडक्या डोक्यातून आली असेल कोणास ठाऊक!

भारतात टीव्हीवर एक दूरदर्शन सोडले (तेथेही दारू विकणार्‍या कंपन्यांच्या जाहिराती असतात, पण त्यांच्या सोड्याच्या. सांकेतिक जाहिरात म्हणायला पाहिजे) तर अमेरिकेसारखी नेटवर्क, केबल आणि प्रिमियम चॅनल असा प्रकार नाही. त्यामुळे काहीच सेन्सॉरशिप दिसत नाही.

सर्वात महान म्हणजे इंटरव्यू ला आलेला उमेदवारच उलटे प्रश्न विचारतो आणि स्वत:ला सिलेक्ट करून घेतो. चेहर्‍यावरचा आत्मविश्वास दाखवणारा भाव म्हणजे आपल्याला काहीही झेपत नसताना येथे आपले कोणीही वाकडे करून शकत नाही हे ठाउक असेल तरच येतो तसा.

आणि हे सर्व तो कोणतेतरी क्रीम लावल्याने ३-४ दिवसांत गोरा झाल्याने झाले - ही जाहिरात!

फारेण्ड अगदी अगदी वाट्टेल ती जाहिरात आहे.. Angry
असं थोबाडाला फेर अ‍ॅण्ड लभली फासून नोकर्‍या मिळतात का? त्रुंगात घातलं पायजे या झायरातवाल्यांना..

>>आणि तोंडावरून तर इतका गाढव दिसतो त्याची बायको असली

अगदी अगदी बरोबर. तो त्या बाईचा नवरा वाटतच नाही. मला तर वाटतंय ज्या माणसाने ह्या अ‍ॅडची कल्पना काढली त्याने त्या मॉडेलला पाहून नवर्‍याचं काम स्वत:च करायचं ठरवलं असेल Happy

रच्याकने,ही सुपीरिया साबणाची अ‍ॅड लागते कधी? मी तरी अजूनपर्यंत पाहिली नाहिये.

स्वप्ना, भरत नित्य नियमाने dd1 आणि dd सह्याद्री पहा सध्या सुपिरीयाने दूरदर्शनला विकतच घेतले आहे जणू..वॉ वॉ वॉ खाली न येतो (मराठीतले जिंगल)करून येतेच ती अ‍ॅड प्रत्येक वेळी
पहायच्या असतील तेर सुपीरिया दम दमादम(गुरु संध्या ७:३०), सुपीरिया नन्हीसी कली मेरी लाडली(सोम ते गुरु रात्री ९ वा)या सिरियल्स पहा DD1 वरच्या कमी मनस्ताप होतो बाकी सिरीयल्सपेक्षा..करमणूक नक्कीच होते कारण लो बजेट असतात ना मजा येते पहायला ..

स्वप्ना धन्यवाद! Happy

Bajaj Allianz ची अ‍ॅड पण मस्त आहे. तो बॅन्केतला माणूस काहीबाही बडबडत असतो आणि तो छोटा मुलगा आ वासून त्याच्याकडे पहात असतो ती.

हो ना... किटकॅट्ची ती खारुताई आणि दादाची!!! Wink तो खारुदादा आय लव यु म्हणत कसला गोड नाचतो!!! Happy ऑल्वीन अँड चिपमंक्सची आठवण झाली.......!! Happy

मला तर त्या माणसाचे एक्स्प्रेशन्स पण आवडतात, कसला डोळे फाडफाडून बघत असतो. शेवटी ती खार काय म्हणते ते नाही कळलं मात्र.

शेवटी ती खार काय म्हणते ते नाही कळलं मात्र.>>>> किटकॅट ब्रेक बनता है...... Happy म्हण्ते ती

जाहिरात मस्त. लेकीलाही आवडली.

भरत, प्राची धन्स Happy मला Volkswagen ची अ‍ॅड पण आवडली - ती एका गाडीतून दुसरी गाडी काढतात ती.

असं थोबाडाला फेर अ‍ॅण्ड लभली फासून नोकर्‍या मिळतात का? त्रुंगात घातलं पायजे या झायरातवाल्यांना..>>> Lol
कायच्या काय दावतात, इत्के दिवस सुंदर दिसल्यानेच बायकांचा फायदा होणार असं मुर्खासारखे सांगत होते आता पुरुषांच्या मागे लागलेत!

कॅडबरीची नविन नीना कुलकर्णींची जीन्सची अ‍ॅड खुपच छान आहे.

मध्ये एक सलमानची आचरट अ‍ॅड लागायची, ३ शिंगांच्या गायीची.... बरं झालं हल्ली ती बंद झालीय.

>>मध्ये एक सलमानची आचरट अ‍ॅड लागायची, ३ शिंगांच्या गायीची.... बरं झालं हल्ली ती बंद झालीय.

Proud क्लोरमिन्टची होती ती. त्यात ती गाय तीनपैकी एक शिंग सलमानला पोटात भोसकेल तर बरं अस्संच वाटायचं दर वेळी पहाताना. तरी बरं ह्यावेळी तो सोहेल नव्हता त्याच्याबरोबर. बाय वन गेट वन फ्री स्कीम संपली असेल. Happy

कॅडबरीची नविन नीना कुलकर्णींची जीन्सची अ‍ॅड खुपच छान आहे. >>> खूप वर्षांनी सतीश पुळेकर दिसतात यात. मस्त आहे जाहिरात Happy

>>>कायच्या काय दावतात, इत्के दिवस सुंदर दिसल्यानेच बायकांचा फायदा होणार असं मुर्खासारखे सांगत होते आता पुरुषांच्या मागे लागलेत! >>

पुरुषांसाठी खास ब्लीच आले आहेत. काही वर्षांनी 'खास पुरुषांसाठी' अशी एखादी कॉस्मेटिक्सची रेंज लाँच होईल.

Champions League 2020 ची अमिताभ आणी सायमंड्सची अ‍ॅड अतिशय बकवास आहे .
सायमंड्स टब-बाथ काय घेतो , गाण काय म्हणतो , आणी अमिताभ कसले आचरट हावभाव करतो .

>>आणी अमिताभ कसले आचरट हावभाव करतो

अगदी अगदी. मला वाटतं त्याला मोकाट सोडून दिलं असावं की काय पाहिजे ते कर. अजिबात शोभत नाही.

उजाला- स्टिफ अ‍ॅन्ड शाईनची ची अ‍ॅड: सचिन आता वशिगं पावडर सुध्धा विकणार?? हा पण अमिताभ च्या वळणावर जायला लागलाय.. काय मिळेल ते घ्या
cinderella-022007-38.gif

अरे आज काल शाहरुख आणि सलमानला काय पिक्चर मिळत नाहित की फालतुचा स्टंट चालु आहे? सलमान त्या व्हील आणि क्लोरमिंटच्या आणि शाहरुख त्या टुथपेस्टच्या अ‍ॅड्मध्ये दिसतात. अरे काम नाहित तर घरी बसा लेको. उगाच लोकांच्या मेंदुला कशाला त्रास तुम्हाला लक्षात ठेवायचा??? Angry

Champions League 2020 ची अमिताभ आणी
>>
अमिताभचा आणि टी२० चा संबंधच काय...
उगाच कैपण...

त्यानी बोललं की विकलं जातं म्हणून काहीही विकायला लावतात त्याला... आणि तो ही पैशासाठी काहीही करतो...

सलमान त्या व्हील >>>>>>सलमान त्या अ‍ॅडमधे प्राची देसाई समोर किती विचीत्र नाचतो,
त्याच वय काय ... करतोय काय.....
Abu-Monkey-Aladdin-1.gif

सलमान त्या व्हील >>>>>>
त्याच वय काय ... करतोय काय.....
>>
व्हील चा एकूणच सेन्स गंडलेला आहे...

पूर्वी त्यांच्या अ‍ॅड मधे गोंद्या आणि विद्या माळवदे असायचे...

सचिनची ती अ‍ॅड पाहिली मी काल. कैच्या कै. मला हे सेलेब्रिटी एनडॉर्समेन्टचं गणितच कधी कळलेलं नाहिये. सचिन विकतोय म्हणून मी वॉशिंग पावडर का घेईन?

असो. शाहरूख टूथपेस्टच्या अ‍ॅडमध्ये म्हणजे अति आहे. सक्कळी सक्काळी दात घासताना त्याचा चेहेरा डोळ्यासमोर आला तर माझा तरी दिवस वाईट जाईल. आय होप त्या टूथपेस्टवर त्याचा चेहेरा नाहिये Proud

सलमान आणि अमिताभ ह्या दोघांबद्दल न बोललेलंच बरं. अमिताभ बहुतेक बच्चनांच्या पुढच्या १० पिढ्यांच्या चरितार्थाची सोय करतोय.

'पागलपन्ती छाए' ची जाहिरात डोक्यात जाते. जेनेलिया सारखी हि बाई पण चीड आणते आता.

इथे आधी कुणी लिहिलय कि 'जाहिरात लक्षात रहते पण प्रॉडक्ट नाही हे ते जहिरातीचे अपयश आहे'. काही अंशी ते बरोबर आहे पण ह्या jingles किती तरी लोक discuss करतात आणि त्यांचा (आणि प्रोडक्ट चा पण) आपसूक प्रचार होतो.

Pages