मला आवडलेल्या / न आवडलेल्या जाहिराती

Submitted by saavni on 21 July, 2008 - 02:20

तुम्हाला खास वाटलेल्या / न आवडलेल्या जाहिरातींबद्दल ईथे लिहा.

Group content visibility: 
Public - accessible to all site users

गेल्या आठवड्यात एका शॉपिंग मॉलमधे गेलो होतो, तिथे चहा घेताना एक लहान मुलगी तिच्या मम्मीला म्हणाली, "छी ममी, ती छक्क्यांची चहा नको घेऊ."
त्याचा अर्थ मला काल कळाला... नाव सुचवा by सचिन पिळगावकरrollingonthefloor.gif

'रोझ डार्लिंग हम कल खाना खाने कहां गये थे?' Proud
सिग्रॅम 'म्युझिक सीडी'ची ही अ‍ॅड मला प्रचंड आवडते. सुमित राघवनचा अफलातून अभिनय, मागे वाजणारी 'कछू याद न आए' ही बंदिश, आणि शेवटचा ट्वीस्ट. एकदम जमलेला प्रकार.

अगदी खरंय भरतजी! आणि जेंव्हा त्या जाहिराती मराठीतून पाहते, तेंव्हा तर त्या जास्तच अनाकलनीय होतात...
"टेढा हैं, पर मेरा हैं" हे लयीतही बसतं आणि अर्थातसुद्धा! पण "वाकडा आहे पण माझा आहे" हे म्हणजे Uhoh
पण मला राजsss माsss वाली राजमा फ्लेवरची कुरकुरेची जाहिरात त्यामानाने बरी वाटली होती. Happy

भरत अगदी हेच लिहायला आले होते मी इथे. ती नवी नवर्‍यामुलाची वरातीची अ‍ॅड एकदम बकवास आहे. हिंदी जाहिरातींच्या मराठी रुपड्याविषयी तर न बोललेलंच बरं. Sad

फेअर अ‍ॅन्ड लव्हलीची त्या सायकल चालवणार्‍या मुलीची अ‍ॅड आणि लेनोव्होची अ‍ॅड तद्दन बकवास आहेत.

अनुमोदन स्वप्ना
कोणती कंपनी इतकी मुर्ख असेल, की एका फोटोग्राफरच्या एका फोन कॉल वर त्या मुलिला ब्रँड अम्बॅसिडर बनवेल? Angry

एका वॉशिंग पावडरच्या अ‍ॅडमधे लिम्बु आणि चंदनयुक्त असे म्हणुन दाखवतात पण खाली does not contain lemon and chandan असे लिहीतात . याचा अर्थ काय?

ते लिंबू चंदन प्रकरण बरेच चिघळलेले आहे, त्याच्या प्रतिस्पर्धी ब्रँडने कोर्टात जाऊन तो खालचा इशारा द्यायला लावला. रिन आणि टाइड ?

अँकर टुथपेस्टच्या जाहिरातीबद्दल आधी इथे वाचले होते, मग दिसली एकदाची टीव्हीवर. आधी वाटले की पाटा किंवा जाते म्हणून वापरायचा केक बनवणार्‍या बाईच्या घरात शिरलेल्या सेल्समनने का तो केक खाल्ला. परत पाहिले तर सेल्समन बरोबर तिचा फोटु दिसतोय. म्हणजे नवराच.
बहुधा तिच्या हातचे पदार्थ खाता येतील असा नवरा तिच्या आईवडिलांनी शोधून दिला असावा. राखी /राहुल का स्वयंवर टाइप काहीतरी स्पर्धा ठेऊन.

तो लिंबू चंदन हा फक्त फ्रॅग्रन्स वापरला आहे. खरे चंदन काहीच नाही. त्या कॉस्ट ला लिंबू पण परवड्णार नाही. लो प्राइस पॉइंटची पावडर आहे.

एका जाहिरातीत सलमान आहे पण त्याला पैसे देण्याऐवजी साबणाच्या रॉमटेरिएअल वर फ्रेग्रन्स वर खर्च केले असते तर जास्त दर्जेदार उत्पादन देता आले असते. पण असा विचार कोण करतो.

मला मॅन काइंड कंपनीच्या कोणत्याही उत्पादनांच्या जाहिराती आवड्त नाहीत. बिभत्स वाट्तात.

जाहिराती पण अशा असतात न कि ते पण छोटे छोटे सिन्स विसरतात टोयोटाची नवीन गाडी आली आहे न त्यात पण तो डोक्याचे मास्क खाली काढून फेकतो आणि दुसर्याच सीन मध्ये ते मा
स्क तेथून गायब ):)
Happy

पानी का डॉक्टर... Angry
लहान मुलांना काय डोंबल पडलंय असल्या गोष्टींचं? उगाच लहान मुलांच्या तोंडी प्रौढ डायलॉग्ज देऊन एमोशनल ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न करतात..

आता ८:३० संध्याकाळी एन्डीटीव्ही प्रॉफिट वर ऑल अबाउट अ‍ॅड्स हा कार्यक्रम पाहिला. त्यात शेवटी काही विदेशी जाहिराती दाखविल्या....त्यातली एक तर चक्क दीड दोन मिनिट चालली...ती पहाण्यासारखीच आहे...वर्णन केल्यास मजा जाईल.
आणखी एक गंमतीशीर माहिती कळली...स्कॅम अ‍ॅड्स बद्दल : क्लाएंटला न दाखवलेल्या/क्लाएंटने न सांगितलेल्या जाहिराती, अ‍ॅड एजन्सीने पूर्ण स्वत:च्या खर्चाने काढलेल्या जाहिराती, काल्पनिक क्लाएंटसाठी बनवलेल्या जाहिराती,फक्त एखाद्या वेळी प्रकाशित/एअर होणार्‍या जाहिराती....
हे सगळे कशासाठी तर क्रिएटीव्हीटी दाखवायला आणि अ‍ॅवॉर्ड्स मिळवायला!
ऑल अबाउट अ‍ॅड्स चे फेसबू़क पेज पण आहे. तिथे पण छान अ‍ॅड्स दिसतात.

इथे अभिषेक आणि ऐश्वर्याच्या लक्स वर चर्चा झाली का नाही माहित नाही पण मला तरी ती अ‍ॅड अतिशय बकवास वाटते. ऐश्वर्या मऊ लुसलुषीत आहे हे अख्या जगाला माहितीय तरीही डोळे बंद केल्यावर द्रुष्टीबरोबर आकाराचेही ज्ञान गायब होते हे मला आजच कळले....एवढ्या जाड्या बाईला हा हणम्या ऐश म्हणून पकडतो? येह बात कुछ हजम नही हुई...

परवा अ‍ॅनिमल प्लॅनेट वर Save Energy संदर्भात एक फार महान जाहिरात बघितली...

एक पोलर बेअर पुस्तक वाचत बसलंय.. त्याच्या डोक्यावर एक दिवा आहे.. तो दिवा लागण्यासाठी एक पेंग्विन सायकल चालवून उर्जा निर्माण करतोय.. आणि सायकल चालवण्यासाठी पोलर बेअर पेंग्विनला एक एक मासा टाकतोय... मासा खाल्ला की पेंग्विन जोरात सायकल चालवून मस्त दिवा लागतोय.. तेव्हढ्यात तो दिवाच राम म्हणतो... बदलून नविन दिवा energy efficient लावला जातो... आणि मग पेंग्विन अगदी आरामात सायकल चालवून पण दिवा मस्त उजेड देतोय...

प्रत्यक्ष बघताना तर आधी कळतच नव्हतं नक्की काय आहे.. कार्टून आहे.. का कुठल्या कार्यक्रमाची जाहिरात आहे की आणखी काही... पण जो शेवट होता तो फारच मस्त वाटला.. आणि त्या नंतरच ती जाहिरात होती हे कळाले.. बघायला मिळाली तर नक्कीच बघा..

हिम्सकूल Happy अतिशय मस्त वर्णन केलंय... मी ही जाहिरात आधी पाहिली नव्हती. वर्णन वाचून उत्सुकता चाळवली गेली. युट्युब वर सापडली. ही पाहा.
खरंच छान आहे. सुपीक डोक्याची कमाल!!! Happy

व्होडाफोनची we are the blackberry boys अगदी मस्त.

शाहरुखने टुथपेस्टच्या एका जाहिरातीत अमिताभच्या ऑरोची टिंगल/नक्कल केलीय असे वाटते. तो मुलाला समजावतो, की एका मुलाचे दात न घासल्याने कसे किडले आणि त्याच्या तोंडाचं कसं बोळकं झालं, तेव्हा हात आणि तोंड अगदी ऑरोसारखे.

दबंग मधल्या त्या गाण्याने झंडु बामचा खप वाढला म्हणे! (म्हणजे दबंग बघून लोकाना डोकेदुखी जडतेय तर). आधी झंडुबाम वाले त्या जाहिरातीविरुद्ध कोर्टात गेले, मग ते गाणे जाहिरातीसाठी वापरायला तयार झाले. आधीच फुकट एवढी पब्लिकशिट्टी मिळाल्यावर जागे झाले.
गेल्याकाही वर्षांपासून चित्रपटात अशा गुपचुप जाहिराती बघायला मिळायच्या..म्हणजे नायक नायिका एखादे विशिष्ट पेय पितात वगैरे. आणि त्यासाठी त्या वस्तूंचे उत्पादक चित्रपटनिर्मात्याला पैसे पण द्यायचे. दबंगच्या निर्मात्यानी (अरबाझ?) असे आधीच पैसे का नाही घेतले?
आता तर टीव्ही मालिकांतून पण अशा जाहिराती दिसतात.
परवा मि & मिसेस शर्मा मधे एका कारची जाहिरात, तर काल सगेंफु मधे कोलगेटची.

एन्डीटीव्हीवर सकाळी 'हिंदूस्तान टाइम्स'च्या जाहिराती लागतात. एकसे एक आहेत. Happy

>>>> "वाकडा आहे पण माझा आहे" <<<< आँ???/ (दचकलेला चेहरा) Proud
"वाकडा आहे पण"(माझा) लाडका आहे" अस नस्त का चाल्ल? Wink

वी आर ब्लॅकबेरी...
खरच मस्त आहे जाहिरात. Happy
केरळच्या पर्यटन खात्याने केलेली नवीन जाहीरात मस्त इम्पॅक्ट करते.
बरीच मोठी आहे.

मारुती सुझुकीची अ‍ॅड बकवास. तो मुलगा मुलाखत घेणार्‍याला विचारतो की ही मुलाखत मला काय येतं हे पहाण्यासाठी होती का काय येत नाही हे पहाण्यासाठी. मुलाखतीचा एक उद्देश उत्तर येत नसलेले प्रश्न उमेदवार कसे हाताळतो हे बघणं हाही असतो, नाही का? आत्ताच एक अ‍ॅड सेन्टर फ्रेश च्युंइंग गमची पाहिली त्यात तो माणूस तो गम खाऊन काहीतरी वस्तू जिभेवर बाहेर काढतो. बघून किळ्स आली.

>> तो माणूस तो गम खाऊन काहीतरी वस्तू जिभेवर बाहेर काढतो. बघून किळ्स आली.
>>>
सेम पिंच.

ती एक 'एसी चाललाय' अशी इन्वर्टरची अ‍ॅड येते ती पण बकवास आहे.

Pages