प्रवेशिका - २४ ( prasad_mokashi - कुणास सांगू गीता... )

Submitted by kaaryashaaLaa on 6 October, 2008 - 22:51


कुणास सांगू गीता कृष्णा सुचतच नाही
अर्जुन कोणी लायक येथे दिसतच नाही

कसा पुरावा लपवावा अपुल्या भेटीचा?
श्वासातिल प्रणयाचे अत्तर उडतच नाही

या दोघांची गाठ कुणी अन कशी बांधली?
मनामागुनी शरीर दुबळे, पळतच नाही!

पडझड चालू झाली की मी शोधत असतो
भूकंपाचे केंद्र कधीही मिळतच नाही

हास्य होवुनी ओठांवरती येतो , जातो
तो अश्रू जो डोळ्यांमधुनी गळतच नाही

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही

मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही

फक्त लावती अंगारा भक्तीने भाळी..
कुणी उभ्याने उदबत्तीसम जळतच नाही

काय बिनसले तिचे नि माझे, तिलाच ठावे
आरशातली व्यक्ती हल्ली हसतच नाही!

Group content visibility: 
Public - accessible to all site users

>>काय बिनसले तिचे नि माझे, तिलाच ठावे
आरशातली व्यक्ती हल्ली हसतच नाही!

Happy ६ गुण.

सुंदर गजल आहे.
भूकंप शेरात वृत्त बरोबर आहे?
माझे ६
-----------------------------------------------------
फिर मुझे दीद-ए तर याद आया
दिल, जिगर तश्न-ए फरियाद आया

छान आहे गजल. पण पहिला शेर योग्य वाटला नाही. माझ्याकडून ९ गुण.

दाद,

टंकताना चूक झाली. दुरुस्त केली आहे.

==
मज आयुष्याचा माझ्या, कळलेला आशय नाही
जगतो हा तर्कच आहे, आलेला प्रत्यय नाही

kaaryashaalaa08@maayboli.com

मन - शरीर, दु:खाचा सगासोयरा आवडले.
भूकंपाचा ऊकार बदलावा लागेल. काही म्हणा, पण हे असे 'च' चे काफिये खटकतातच..
माझे ५ गुण.

सर्वच शेर छान आहेत...
१० पैकी १० ..

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही
व्वा!!!!!!
बराच वेळ मनात घोळत राहिला हा शेर..
शेवटचा शेरही ठाव घेणारा---मस्त
८ गुण

एकदम मस्त

७ गुण

मतला सोडता बाकी सर्व शेर मस्त जमले आहेत.

पडझड चालू झाली की मी शोधत असतो
भूकंपाचे केंद्र कधीही मिळतच नाही

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही

मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही

हे खूपच आवडले. "प्रणयाचे श्वासातले अत्तर" ही कल्पनाही छान आहे. 'उदबत्ती...' चा शेरही छान. 'आरशा'च्या शेराची कल्पना नवी नसेल तरी मांडणी छान आहे.
माझ्या मते ८ गुण.
-सतीश

तुझी आठवण; काळजातल्या तुळशीपुढला -
मंद दिवा जो वादळातही विझतच नाही
>>> इथे मला तरी विझतच मधला 'च' चूक वाटत आहे. नुसता 'विझत' असता तर अर्थ सुरेख असता. 'च' नी उलटा अर्थ येतोय असं मला वाटतं..

बाकी गझल जबरी आहे. ८ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

>>> इथे मला तरी विझतच मधला 'च' चूक वाटत आहे. नुसता 'विझत' असता तर अर्थ सुरेख असता. 'च' नी उलटा अर्थ येतोय असं मला वाटतं..

psg शी सहमत

पण बाकी सगळीच मस्त

८ गुण

क्या बात है...
संपूर्ण आवडली.

तुळशीपुढला दिवा अति उत्तम.

वादळ दिवा विझवायचा प्रयत्न करते पण त्याच्या प्रयत्नांनी सुद्धा तो विझतच नाही असा अर्थ मी घेतला.
त्यामुळे उलट अर्थ लागतोय असे मला तरी नाही वाटलं.

सगळेच शेर जानलेवा आहेत.
गुण १०

वा वा! काय गझल आहे!
मतला आणि एक्-दोन र्‍हस्व/दीर्घाच्या तडजोडी सोडल्या तर सगळे काही १०० नंबरी सोने आहे!
सगासोयरा, उदबत्ती, मन्-शरीर -- क्या बात है!
माझे - ९. (मतला थो..डा आणखी सशक्त असता तर नक्की पैकीच्या पैकी होते!)

नवीन कल्पना. ७ गुण.

या दोघांची गाठ कुणी अन कशी बांधली?
मनामागुनी शरीर दुबळे, पळतच नाही!
हा शेर आवडला..५ गुण..

सुंदर....
केवळ सुंदर....
माझे गुण ८...
अश्रू, आठवण, दु:ख. हे शेर खूप आवडले...

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

मस्त गझल
कसा पुरावा लपवावा अपुल्या भेटीचा?
श्वासातिल प्रणयाचे अत्तर उडतच नाही

या दोघांची गाठ कुणी अन कशी बांधली?
मनामागुनी शरीर दुबळे, पळतच नाही!>>>> हे दोन जास्त आवडले.

पूनमशी सहमत....विझतच नाही म्हणजे विझायला हवाय तरी विझत नाहिये असा अर्थ निघतोय (cbdg) म्हणजे बाकिच्या शेरांचा चा संदर्भ लक्षात घेता असं वाटतय.

वाह! बरेचसे शेर आवडले. मतला मात्रा नाही.

परागकण

मिठीत घ्यावे दुःखालाही खुल्या दिलाने
त्याला कोणी सगासोयरा असतच नाही

हा विशेष भावला.

गुणः ८

अभिनंदन रे मोक्या!:)
_________________________
-A hand that erases past can create a new begining.

प्रसाद अभिनंदन !!! Happy

अभिनंदन प्रसाद.... Happy

Pages