एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे?

Submitted by मदत_समिती on 31 March, 2009 - 14:36

गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो. पूर्णपणे काढण्यासाठी तो लेख खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, संपादनात त्या लेखाची स्थिती अपूर्ण ठेवून लेख अप्रकाशित करावा. डिलीट करण्यासाठी प्रशासकांना सांगणे गरजेचे आहे.

इतर विभागातील लिखाण काढून टाकण्यासाठी प्रशासकांशी संपर्क साधावा.

प्रकाशित लिखाण काढून टाकण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात गेल्यावर सगळ्यात खाली डीलीट असा पर्याय उपलब्ध आहे तो वापरावा. अप्रकाशित लेखन [अपूर्ण] डिलीट करता येत नाही.

कुठल्याही विभागात दिलेला प्रतिसाद डिलीट करण्यासाठी किंवा प्रतिसादात बदल करण्यासाठी त्याच प्रतिसादाखाली असलेल्या संपादन या दुव्याचा उपयोग करावा.

एकदा दिलेला प्रतिसाद संपूर्ण काढून टाकता येत नाही पण त्यातला मजकुर काढून टाकून तिथे रिकामी प्रतिसादाची चौकट ठेवता येते.

स्वतःचे लिखाण शोधण्यासाठी 'माझे सदस्यत्व' मध्ये पाऊलखुणा बघावे.
[माझे सदस्यत्व --> पाऊलखुणा --> लेखन]

नमस्कार अतुल देशमुख
तुम्ही हा आयडी वापरला नाही तर काही दिवसांनी आपोआप सदस्यत्व रद्द केले जाते. त्याआधी आपल्याला सभासद खाते रद्द करायचे असेल तर प्रशासकांशी संपर्क साधावा.

नमस्कार admin

मी "आपल्या घराची व तदनुषंगाने घरातल्यांची सुरक्षितता कशी जपावी?" हे लेखन चुकून "गप्पांचे पान" ह्यावर केले होते.
http://www.maayboli.com/node/13941

ते मला गप्पा ह्या स्वरुपात ठेवायचे नाहीये कारण त्यामध्ये "लास्ट इन फर्स्ट आउट" असे होते,
सर्वांनी लिहिलेल्या सगळ्या प्रतिक्रिया दिसाव्यात (बा.फ.) (पान १, २, ३ शेवटी) अशा स्वरूपात मला ते कसे बदलता येईल?

i want to delete my article. i cant find delete button.
my article is still not completed.
please delete it.
name - linux : prastaavanaa
please delete it as early as possible

अमित जी:
तीन महिने वापरला नाही तर बंद होतो. तुम्ही मा. अ‍ॅडमिन यांना त्यांच्या विपूत सांगून तो त्वरित बंद करू शकता.

अभि_नवः
मा. अ‍ॅडमिन यांना कळवले आहे.

i want to delete my article. i cant find delete button.
my article is still not completed.
please delete it.
NAME : संघर्ष in katha section

मयुरी_कुलकर्णी :

>>गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो.

तुम्हाला त्याच कथेच्या संपादन विभागात जाउन ते अप्रकाशित करता येईल. पूर्ण झाल्यावर परत प्रकाशित करायचे.

मी काही लिखाण केले होते पण ते अपूर्ण असल्याने अजुन अप्रकाशित ठेवण्याचा पर्याय निवडला होता. आत ते लिखाण मी पुढे सुरु करणार आहे तर ते कसे शोधायचे?{कथा विभाग}

सुनिल जोग,
याच पानावर लिहीलेले हे आपण वाचले असे ना?

स्वतःचे लिखाण शोधण्यासाठी 'माझे सदस्यत्व' मध्ये पाऊलखुणा बघावे.
[माझे सदस्यत्व --> पाऊलखुणा --> लेखन]

रूनी, माझं एक अप्रकाशित लेखन आहे. मला ते काढून टाकायचे आहे. पण तसा काही पर्याय संपादन अथवा लेखन प्रक्रिया विभागात दिसला नाही. ते कसे काढायचे?

रूनी,
मी एक पाककृती लिहीली आहे. त्या लिखाणात बदल केले तरी पाककृतीपुढे 'बदलून' किंवा 'नवीन' असं काही दिसत नाही. असं का होतं?

नंद्या, मी बदल करून साठवले (संपादन केले) आणि पेज रिफ्रेश केले. तरीही 'बदलून' किंवा 'नविन' दिसत नाही.

तू ब्राऊझरची कॅश उडवून बघितलीस का?>>> हो.
[कुठल्या पानासाठी येते आहे असे?] >>> पाककृतींसाठी.

नंद्या, अंजली,
लेखकाला स्वतःला स्वतःचा लेख बदलून किंवा नवीन दिसत नाही ना, इतरांना दिसतं तसे फक्त.

बरोबर आहे गजानन. मीही पाहिले, अपूर्ण, अप्रकाशित लेखन डिलीट करता येत नाहीये.
संपूर्ण, प्रकाशित लेखन असेल तर वर नंद्याने दिलेले ऑप्शन दिसत आहेत. त्यामुळे प्रकाशित लेखन 'अप्रकाशित' अथवा संपूर्णपणे काढून टाकता येते, पण अपूर्ण लेखन तसेच रहातेय..

Pages