एकदा केलेले लिखाण कसे बदलायचे किंवा काढून टाकायचे?

Submitted by मदत_समिती on 31 March, 2009 - 14:36

गुलमोहर किंवा रंगीबेरंगी विभागात एकदा केलेल्या लिखाणात बदल करण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात जाऊन हवा तो बदल करता येतो. पूर्णपणे काढण्यासाठी तो लेख खालील चित्रात दाखवल्याप्रमाणे, संपादनात त्या लेखाची स्थिती अपूर्ण ठेवून लेख अप्रकाशित करावा. डिलीट करण्यासाठी प्रशासकांना सांगणे गरजेचे आहे.

इतर विभागातील लिखाण काढून टाकण्यासाठी प्रशासकांशी संपर्क साधावा.

प्रकाशित लिखाण काढून टाकण्यासाठी त्या लिखाणाच्या संपादनात गेल्यावर सगळ्यात खाली डीलीट असा पर्याय उपलब्ध आहे तो वापरावा. अप्रकाशित लेखन [अपूर्ण] डिलीट करता येत नाही.

कुठल्याही विभागात दिलेला प्रतिसाद डिलीट करण्यासाठी किंवा प्रतिसादात बदल करण्यासाठी त्याच प्रतिसादाखाली असलेल्या संपादन या दुव्याचा उपयोग करावा.

एकदा दिलेला प्रतिसाद संपूर्ण काढून टाकता येत नाही पण त्यातला मजकुर काढून टाकून तिथे रिकामी प्रतिसादाची चौकट ठेवता येते.

स्वतःचे लिखाण शोधण्यासाठी 'माझे सदस्यत्व' मध्ये पाऊलखुणा बघावे.
[माझे सदस्यत्व --> पाऊलखुणा --> लेखन]

आणि एक नवीन प्रतिसाद द्या तुम्हीच. मग दिसेल.
शीर्षकं कॉफी पेंटिंग्स - १, - २ अशी करा. म्हणजे झाले.

माहिति हवि आहे या विभागात मि चुकुन एक धागा दोनदा उघडला आहे. 'मदत हवि आहे' नावाचा. प्लिज प्रतिसाद नसलेला एक धागा डिलिट करता का? धन्यवाद.

मला माझे लिखाण अप्रकाशित करायचा कोणताही पर्याय दिसत नाहीये… कोणी सांगू शकेल का कसे करायचे ते???

आंतरजालातील काही समस्यांमुळे बऱ्याच वेळा प्रतिसाद दोनतीन वेळा प्रकाशित होतात.. ते काढून नाही का टाकता येत???

नमस्कार मायबोली टीम, मला असे विचारायचे होते कि माझे मायबोली वर केलेले लिखाण जर मला दुसऱ्या कोणत्या नियतकालिकेत अथवा पुस्तकात प्रसिद्ध करावयाचे असेल तर मायबोलीकडून विशिष्ट परवानगीची गरज लागेल का? कृपया लवकर कळवावे.

नमस्कार

बर्याच दिवसापासून माझे धागे मला संपादीत करता येत नाही आहेत. धागा उघडल्यावर संपादन हा पर्यायच दिसत नाही .
कृपया मार्गदर्शन करावे .

सुप्रिया

@सुप्रिया जाधव धागा संपादनासाठी आता एक महिन्याचा काळ निश्चित करण्यात आलेला आहे त्यामुळे जुने धागे संपादित करता येणार नाहित. ती सोय काढून टाकण्यात आली आहे.

मला माझे लिखाण, 'वारस' ह्या कथेचे चारही भाग काढून टाकायचे आहेत, पण माझ्या लिखाणाखाली 'संपादन' किंवा delete असले कोणतेही पर्याय येत नाहीयेत तेव्हा कृपया काय करू सांगा? धागे जुने असल्यामुळे कदाचित अडचण येत आहे. कृपया ऍडमिन माझे हे लिखाण काढून टाकू शकाल का?

<<मला माझे लिखाण, 'वारस' ह्या कथेचे चारही भाग काढून टाकायचे आहेत, पण माझ्या लिखाणाखाली 'संपादन' किंवा delete असले कोणतेही पर्याय येत नाहीयेत तेव्हा कृपया काय करू सांगा? धागे जुने असल्यामुळे कदाचित अडचण येत आहे. कृपया ऍडमिन माझे हे लिखाण काढून टाकू शकाल का?>>
ऍडमिन, परत एकदा विनंती करतो! माझे लिखाण कृपया काढून टाकण्यात यावे...

<<मला माझे लिखाण, 'वारस' ह्या कथेचे चारही भाग काढून टाकायचे आहेत, पण माझ्या लिखाणाखाली 'संपादन' किंवा delete असले कोणतेही पर्याय येत नाहीयेत तेव्हा कृपया काय करू सांगा? धागे जुने असल्यामुळे कदाचित अडचण येत आहे. कृपया ऍडमिन माझे हे लिखाण काढून टाकू शकाल का?>>
ऍडमिन, परत एकदा विनंती करतो! माझे लिखाण कृपया काढून टाकण्यात यावे...

Pages