Submitted by suryakiran on 28 April, 2010 - 02:33
आमचा खंड्या.. पावसानी गारठलेला..
वर्षभर राबून अखेर पिक घेवून घरलां निघालेली गाडी - अखेरची खेप !
मावळतीचे रंग.. माझ्या शेतातून.
चारही बाजूस डोंगरांच्या कुशीतली माझी शेती..
पुन्हा मावळतीचे रंग...
क्षितीजावर अलगद निजताना ...
नभ उतरू आले...
शेताला वेढलेल्या ढोंगरात जूनी एक दगडाची खाण...
सरोवर रिसॉर्टजवळचा हा फोटो.. १५ मि. अंतरावर असलेलं हे ठिकाण..
पिरंगुट घाटातून घेतलेलं हे चित्र, घाटाच्या उजव्या बाजूला आमचं शेत, अन डाव्या बाजूचा हा फोटो.माझ्या शेतात उभा राहून घेतलेले लेटेस्ट फोटो... आभाळ भरून येताना.. अन दिलखुलास मोकळं होताना..
पॅनोरमा view...
आखाड नैवेद्य... नॉनव्हेज पार्टी भर पावसात...
आमच्या गाईला वासरू झालं तेव्हा... ( आजोबांनी एकच आरोळी टाकली... गाईला "घोरा" झाला )
काही म्हशी वळताना मी ....
काही भातलावणी झालेली खाचरे..

गुलमोहर:
शेअर करा
dhanyawad, mobilevarun
dhanyawad, mobilevarun maayboli access kartoy mhanun ha juna id, saglyana dhnyawad. Arati21 hoy pawsacha kal mhanje majhya shetat hiravya sonyacha kal asato.Manushi, to khandya nuktach palala ahe hya adhi sultan hota, baila asali ki malkachi garaj lagat nhavti sultan astana. Pan vay zala hota tevha gela to. Mag khandya palala, khandya he nav majhya bhachyane theula ahe. Vatsala bailgadit basaychi an phiraychi majha kahi aurach ahe. 2mha sarvana majhya gavcha khas nimantran asel. Bas kahi mahinyatach.
नमस्कार सुर्यकिरणजी, तुमचे
नमस्कार सुर्यकिरणजी,
तुमचे गाव पिरगुट आहे?, मी भरे ह्या गावचा आहे. पण सध्या तैवान मध्ये असतो. बरे वाटले कोणीतरी गावाकडचा मायबोली वर बघुन.
सुकि मस्तच आहेत फोटो. एकदम
सुकि मस्तच आहेत फोटो.
एकदम गावाकडची आठवन झालि.
आत्ता दिसले सर्व फोटो..छानैत
आत्ता दिसले सर्व फोटो..छानैत रे.. मला बैलगाडीत बसायचय
एखाद गटग ठरवा अन या माझ्या
एखाद गटग ठरवा अन या माझ्या गावाला
खुपच गोड फोटो, सुकी
खुपच गोड फोटो, सुकी
तू काही काम करतोस की नाही
तू काही काम करतोस की नाही तुझ्या शेतात का नुसताच फोटोग्राफर??
मंजे.. ह्या रविवारी फेरफटका
मंजे.. ह्या रविवारी फेरफटका मारून बघ दिसेल तूला मी काय काय कामं करतो ते.
फोटो आणि गाव दोन्ही आवडले .
फोटो आणि गाव दोन्ही आवडले .
सगळंच मस्त ! पण " माझा गांव व
सगळंच मस्त ! पण " माझा गांव व माझं शेत " असं छाती काढून म्हणायचं तुमचं भाग्य खरंच हेवा वाटण्यासारखं !
[ धामणी घाटातला रस्ता पूर्ण होण्याआधी मी पिरंगुट ते मुळशी धरण या भागात कामानिमित्त बराच फिरलो होतो. पुण्यासारख्या शहराच्या इतक्या जवळ इतका छान परिसर पाहून आनंदलोही होतो. फोटो पाहून खूप बरं वाटलं. ]
फोटो पाहून गावची आठवण
फोटो पाहून गावची आठवण आली...
आता खरच मुकलोय...
भाऊ, पिरंगुट ते मूळशी परीसर
भाऊ, पिरंगुट ते मूळशी परीसर अजूनही काही प्रमाणात तसाच्या तसाच आहे. पावसाळ्यात सुंदर अन सहज वाटावा असाच अगदी.
अमित.. कशाला मूकतोयस.. माझा देश हाच माझा गाव.. अमित माझ्या गावात गटग ठरला कि नक्की ये
"माझं गाव" नाही "आपल गाव"
"माझं गाव" नाही "आपल गाव" बोल.
नुसते फोटो काय दाखवतोस, मला खरखुरं घेऊन जा कि तिथे
सुक्या, कधी नेतोस तुझ्या
सुक्या, कधी नेतोस तुझ्या शेतात?
लै भारी सुकी! एकदा यायला
लै भारी सुकी!
एकदा यायला पाहिजे तुझ्या शेतात!
मी पिरंगुट च्या एका मंगल कार्यालयात फेब २००९ ला एका एन एस एस शिबिराला मार्गदर्शन
करायला गेलो होतो.
पिरंगुट ला P I B M पासुन
पिरंगुट ला P I B M पासुन किती लांब आहे रे तुझे शेत?
चंपक, दौलत लॉन्समधे किंवा
चंपक, दौलत लॉन्समधे किंवा तिकडे पिरंगूटच्या पुढे एक मंगल कार्यालय आहे. मुलींच्या सैनिकी स्कूलच्या जवळच. तिथे आला असेल तू. भारतात आलास कि एकदा येवून सहपरिवार आमच्या गावी अन गावच्या घरी.
सुकि .........नाय सुखि मित्रा
सुकि .........नाय सुखि मित्रा मस्त च .......
ती बाभळ लय भारी माझ्या घरा जवळ अशिच होती एक मि नक्कि येनार शेताकड.....
सुखी खरच खुप छान आहेत फोटो.
सुखी खरच खुप छान आहेत फोटो. गाव पाहुनच मन सुखावत.
सुकि, फोटो खासच ! या
सुकि,
फोटो खासच !
या सिमेंटच्या जंगलात हे असल पाहीलं की बरं वाटतं !
मी पौडाला बरेच वेळा जातो,
मी पौडाला बरेच वेळा जातो, लिम्बीचे आजोळ ते, हिन्जवडीतुन पुढे माणमारुन्जीतून पिरन्गुटच्या पुढे रस्ता मिळतो, तिकडून पौड, पिरन्गुटच्या अलिकडून देखिल तिरका शॉर्टकट आहे पौडकरता, पिरन्गुट टाळता येते.
ते मुलिन्चे सैनिकी स्कुल माहिते, तिथे आल्यावर कुठे जायचे? गुगल म्याप वरुन म्यापची इमेज टाक रे भो
लिम्ब्या,तुमचं ठरलं कि सरळ
लिम्ब्या,तुमचं ठरलं कि सरळ मला फोन कर मग मीच येईन तुमच्या सोबत
मी गुगल मॅप टाकतो उद्या परवा.
भाऊ, मस्तच हाय कि र तुझ गाव
भाऊ, मस्तच हाय कि र तुझ गाव आनी शेत.
काही पावसातली चित्रे, माझ्या
काही पावसातली चित्रे, माझ्या शेतातली..
सह्हीच रे किरणा यायलाच
सह्हीच रे किरणा

यायलाच पाहिजे तुझ्या शेतावर, हुरडा खायला
सुक्या मस्तरे , छानच आहेत
सुक्या मस्तरे , छानच आहेत फोटो. नशिबवान आहेस गड्या. इतक्या जवळच आहे तुझं शेत. आमचं शेत मुंबईहून जवळ जवळ ५५० किमी पडतं
खूप छान!!!
खूप छान!!!
सुकि, खरच सुखी आहेस बाबा,
सुकि, खरच सुखी आहेस बाबा, शेत तेही पुण्याजवळ ..! कल्पनाच मस्त वाटते.. तु तर प्रत्यक्ष अनुभवतोस.. नशीबवान आहेस...
छानच आहेत फोटो.
छानच आहेत फोटो.
सिमेंटच्या रानातल्याना खर्या
सिमेंटच्या रानातल्याना खर्या रानाची सफर. फोटो तर फारच छान. काळीची सेवा करायला मिळणारे खरेच नशीबवान. शेती सर्वात श्रेष्ठ त्यावरच तर मानवासह सारे प्राणीजगत जगते. पुण्यवान माणसांना अशी सेवा करण्याची संधी मिळते.
Pages