प्रवेशिका - ७ (praaju - माझे मलाच पटले नाही...)

Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 00:03

मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....

माझे मलाच पटले नाही
कोडे अजून सुटले नाही

या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही

होकार तुझा मिळून गेला
'होय' जरी तू म्हटले नाही

असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही

जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही

तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही

सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

ठीक आहे, माझ्या मते ४ गुण.
-सतीश

वावावा!! बहोत खूब!
लयदार आहे गझल.

माझे गुणः ६

४/१०

तारु आणि वस्त्र आवडले.

~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

आशयात नाविन्य नाही पण रचना ओघवती आहे, सहजता आहे. माझे ४ गुण

छान आहे.
माझेही ५ गुण.

Pages