Submitted by kaaryashaaLaa on 30 September, 2008 - 00:03
मित्रहो,
ठरल्याप्रमाणे कार्यशाळेत निर्दोष ठरलेल्या प्रवेशिका तुमच्यासमोर सादर करत आहे.
तुमच्या अभिप्रायांचं स्वागत आहेच, पण आणखी एक जबाबदारीही आहे तुमच्यावर.
प्रत्येक गझलला तुम्ही १० पैकी गुण द्यायचे आहेत.
हे गुणांकन तुमच्या अभिप्रायातच नोंदवायला हरकत नाही.
तर सादर आहे आजची प्रवेशिका....
माझे मलाच पटले नाही
कोडे अजून सुटले नाही
या आधी ना भेटलो कधी
कसे मला हे पटले नाही
होकार तुझा मिळून गेला
'होय' जरी तू म्हटले नाही
असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही
जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही
तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही
सोडुन तू गेलीस तरीही
प्रेम जराही घटले नाही
विषय:
शब्दखुणा:
Groups audience:
Group content visibility:
Public - accessible to all site users
शेअर करा
वा!! सगळीच
वा!! सगळीच गझल आवडली !! मतला फारच छान.
५ गुण
आवडली
आवडली गझल.
गुण? - मीच शिकायला आत्ता कुठे सुरुवात केली आहे...
पुढील गझलेसाठी शुभेच्छा!
'सोडून' की
'सोडून' की 'सोडुन'?
१) गझलेचा आशय - १
२) शैली - २ गुण
३) शब्दरचना - १ गुण
४) प्रवाह - २ गुण
५) शेर - १ गुण
============
ऐकूण - ७ गुण
....... छाने :
....... छाने :
मतला
मतला आवडला.
जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही
वस्त्र,
वस्त्र, तारू, होकार मस्तच आहेत अगदी. बी शी सहमत. सोडुन की सोडून?
माझे ४
-----------------------------------------------------
जान दी, दी हुई उसी की थी
हक तो यह है, के हक अदा न हुआ
सहज झालीये
सहज झालीये
(म्हणजे त्यात किती कष्ट घेतलेत, हे नक्कीच माहितीये, पण गझल उतरलीये सहज! :))
पहिले दोन शेर द्विरुक्ति वाटली मला.
५ गुण
-----------------------------------------------
कपटी मित्रापेक्षा दिलदार शत्रू बरा!
PSG ला
PSG ला अनुमोदन.. अगदी सहज उतरलिये!
३,४,५,६ मधील अर्थ थोडाफार का होईना पण सारखाच वाटतोय.
होकाराचा शेर आवडला!
>> असंख्य
>> असंख्य झाले वाद तरीही
नाते अपुले तुटले नाही
मला आवडलेला शेर.
एकूण गुण ६
'सोडुन' बहुतेक मात्रा सांभाळायला केलेले दिसतंय !
वाह... सुंदर
वाह...
सुंदर गझल...
ही मात्रावृत्तातली गझल आहे ना?
प्रत्येक मिसर्यात -गुरुंची बेरीज तेवढीच (=१६) आहे...
माझे गुण - ६
*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||
गुण
गुण ५
==================
अहिंसा....
जय जवान जय किसान....
जीर्ण
जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही
आवडलं.
गुण - ४
ठिक आहे
ठिक आहे गझल..
गुण - ४
प्राजु
एक शंका
एक शंका आहे. तुटले, पटले असा काफिया असेल तर इथे अलामत 'अ' आहे की 'उ'? आणि विटलेमध्ये तर 'इ' येते. माझी समजण्यात चूक होते आहे का?
होकार,
होकार, वस्त्र आणि तारू हे शेर छान आहेत!
अश्विनी - अलामतीतली सूट मतल्यातच घेतली आहे. (या कार्यशाळेत अलामतीतली सूट चालणार नव्हती अशी माझीही कल्पना होती...)
माझे गुण -६
अश्विनी, चा
अश्विनी,
चांगला प्रश्न आहे.
याला मतल्यात अलामत भंग केली असं म्हणतात.
सर्व यमकांमध्ये अलामत सारखी असावी या नियमाला काही वेळा घेतली जाणारी ही एक 'सूट' आहे.
अर्थात तशी सूट घेण्यालाही पुन्हा नियम आहेत.
१. त्यासाठी मतल्यातच अलामत भंग करावी लागते.
(म्हणले'उदा. : मतल्यात 'पटले' आणि 'वटले' अशी यमकं आली तर मग अलामत 'अ' ठरेल आणि पुढे 'विटले' / 'तुटले' चालणार नाहीत.
पण मतल्यातच अलामतीचा भंग केला - जसा इथे केला आहे - तर पुढे कोणताही लघु स्वर अलामतीच्या जागी आलेला चालतो.)
२. अशी सूट शक्यतो घेऊच नये, पण अगदीच घेतली तर लघु स्वरातच घ्यावी.
(म्हणजे उदा. 'हेच नाही' / 'पोच नाही' / 'तीच नाही' / 'हाच नाही' - असं वापरू नये.)
>> जीर्ण
>> जीर्ण जाहली किनार त्याची
वस्त्र तरीही विटले नाही
मस्त आहे. बाकी ठीक..
स्वाती
स्वाती --
धन्यवाद ... ही नवीनच माहिती मिळाली 'अलामत' भंग करण्याबद्दल
स्वाती,
स्वाती, धन्यवाद.
बाकी गझलेला गुण देणं हे गझल लिहीण्यापेक्षा कठिण वाटतय. तेंव्हा ते जाणकारांवरच सोपवलेलं बरं.
व्रूत्त
व्रूत्त एकदम सोप्प घेतलय त्यामूळे सहज वाटत्ये...
गझल पण वाचायला, म्हणायला इतकी सोपी सहज असू शकते ह्याचं उदाहरण आहे..
७ गुण..
मस्त
मस्त गझल...simple and sweet ५ गुण
तुफान वारा
तुफान वारा भिडून गेला
तारू हे भरकटले नाही
हे आवडले. ५ गुण.
व्याकरण
व्याकरण एवढं अजुन निटसं उलगडलेलं नाही पण माझे गुण ५.
आवडेश. सहज सोप्पी .
अलामत भंग
अलामत भंग करणं म्हणजे काय हे छान समजलं.
गझल ही छानच.
गुणः ६
७ गुण...
७ गुण...
३ गुण
३ गुण
मस्तचं दिस
मस्तचं
दिसलीस तू...फुलले ॠतू..................
अलामत भंग
अलामत भंग न करता झाली असती तर बरं झालं असतं असं वाटल.. अर्थाच्या दृष्टीनेही फारसे नवीन विचार मांडलेत असे वाटले नाही. चूभूद्याघ्या. माझ्याकडून सहजपणासाठी ४ गुण.
ठीक आहे. ४
ठीक आहे. ४ मार्क्स
फ्लो छान
फ्लो छान आलाय. आपसूकच अवतरली असावी असे वाटते, खटाटोपाशिवाय.
छान.
Pages