देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"

Submitted by जिप्सी on 5 July, 2010 - 03:15

मी आजपर्यंत महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागांची भटकंती केली आहे तेथील देवळांची प्रकाशचित्रे मायबोलीवर ४ भागात प्रदर्शित करण्याचा मानस आहे.

==================================================
मालिकेतील पहिले शिल्पपुष्प "अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर".
==================================================

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख. याच राकट आणि दगडांच्या देशात असलेली नाजुक कलाकुसरीची आणि महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत असलेली मंदिरे पाहिल्यावर "देवळांच्या देशा" अशीही याची ओळख होऊ शकते. कोल्हापुरचे खिद्रापुर, यवतचे भुलेश्वर, सिन्नर येथील गोंदेश्वर, नाशिक येथीले गोदावरील तटावरच्या मंदिराप्रमाणेच शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".

युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत समावेश झालेले अंबरनाथचे हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार राजा मुम्वाणी याने १० जुलै १०६० रोजी बांधण्यात आले असल्याचे एका शिलालेखात आढळते. म्हणजेच हे मंदिर येत्या १० जुलै रोजी ९५०व्या वर्षात पदार्पण करणार आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना "अंबरनाथ" हे तिसरे स्थानक आणि येथेच वसले आहे सांस्कृतिक वारसा असलेले हे शिल्पवैभव. आपल्यापैकी बरेच जण अंबरनाथ येथुन जात येत असतील, पण ज्यांनी येथे येऊन खास हे आरसपानी सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्राकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. मला तर लांबुन पाहिले असता जगन्नाथाच्या डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या एका नदी (???)वरील छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावले केलेले शिल्पकांम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असुन खाली उतरायला पायर्‍या आहेत. गाभार्‍यात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्‍यात दोन शिवलिंग आहेत (कदाचित यामुळेच प्रवेशद्वारावर दोन नंदी असावेत). तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे.

मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे. बाहेरील
बाजुस असलेली शिल्पे निवांतपणे पाहण्यासाठी किमान एक/दिड तास तरी अवश्य राखुन ठेवावा. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्‍यावरील भाव ठळकपणे दिसुन येतो. महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते. लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारने २६ फेब्रुवारी १९९९ रोजी हे "तीर्थक्षेत्र" म्हणुन घोषित केले आहे. त्यामुळेच कि काय पण इतर तीर्थक्षेत्राजवळ आढळणारा गचाळपणा येथीही थोड्याफार प्रमाणात आढळतो.

सुदैवाने जागतिक पातळीवर या "शिल्पनक्षत्राची" नोंद घेतली आहे, पण आपण अजुनही याची खरी किंमत ओळखु शकलो नाही. ९५० वर्षे ऊन-वारा-पाऊस यांचे आघात सहन करत, आपले सौंदर्य जपत उभे असलेल्या ह्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन त्याची शिल्पश्रीमंती अवश्य पहा. नाहीतर वेरूळ-अजिंठाशी नाते सांगणारे आणि मुंवई-पुण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणारे हे भव्य शिल्प पहायला इतकी वर्षे का उशीर केला याची चुटपुट लागुन राहायची.
==================================================
==================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४
शिवलिंगाचे दर्शन घेण्याअगोदर या गणेशाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१

प्रचि ५२

प्रचि ५३

प्रचि ५४

प्रचि ५५

प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

पुढिल शिल्पपुष्प - मानस मंदिर (आसनगाव येथील "जैन मंदिर")

गुलमोहर: 

सदर मंदिराला भेट दिल्यावर, त्यातील कलाकुसर पाहिल्यावर अक्षरशः वेड लागल्यासारखे होत होते. भारावल्यासारखे फोटो काढत सुटलो. प्रत्येक कोनातुन हे मंदिर व त्यावरची शिल्पे वेगवेगळी भासत होती.
एकुण १५० पेक्षा जास्त फोटो काढले, त्यातील निवडक फक्त ५८ (!!!) फोटो Happy येथे देत आहे.
एव्हढ्या सुंदर कलाकृतींच्या प्रचिवर स्वत:चे नाव कोरायला (वॉटरमार्क टाकावयास) मन धजावत नव्हते, पण नाईलाजाने टाकत आहे.
या शिवमंदिराबद्दल अधिक जाणुन घ्यायला आवडेल तरी जाणकारांनी अवश्य माहिती द्यावी हि विनंती.

फक्त ५८ (!!!) >> जल्ला ती पुर्ण दिसायला माझ्या पिसीने ५ मिनीटे काढली !!! शिल्पपुष्पबाबत जास्ती गोडी नसली तरी पण संयम राखला... !! नि खरच शेवटी मनासारखे झाले.. अतिशय सुंदर फोटो !!! वेगवेगळ्या कोनातुन काढलेले हे फोटो निव्वळ अप्रतिम मित्रा !!! लगे रहो ! Happy

अप्रतिम फोटो योगेश. इथे हे लिहायला खरंतर लाज वाटतेय...डोंबिवलीला राहात असूनही मी अजून हे मंदिर बघितलेलं नाही. हे इतकं भव्य आहे याची खरंच कल्पना नव्हती कधीच.

मस्त फोटोग्राफ्स! Happy मी लहान असताना ह्या मंदिरात जाऊन आले आहे. पण तुझ्या कॅमेर्‍यातून ते मंदिर अजूनच सुंदर भासलं. अनेक मूर्ती तेव्हा माझी उंची फार नसल्याने नीट दिसल्या नव्हत्या. आज बघायला मिळाल्या! Happy धन्स रे!

सुं--द--र!!!
मलाही लाजायला झालं,इतकं जवळ असूनही मी एक्दाही तिथे गेले नाही!आता नक्कीच पहाणारच.
तुमची फोटोग्राफी कमालच, सगळे फोटो खुप देखणे आहेत,प्रत्येक फ्रेम अगदी लाजवाब! विशेषता: खालून वरच्या शिल्पांचा काढलेला फोटो मस्तच आलाय!

या देवळाबद्दल वाचले आणि ऐकले होते. आज तूझ्यामूळे दर्शन झाले.
या देवळामागे "नवसाला पावणारा" वगैरे काहि कथा नाही, म्हणुन दुर्लक्षित राहिले.

मी फक्त ऐकून होतो कि अंबरनाथला शिवाचे एक प्राचिन मंदीर आहे. आज चित्र पाहिले.. खरेचं किति जुने आहे हे मंदीर!!!!

अप्रतिम कोरीव काम, अफलातुन फोटोग्राफी... काळ्या फत्तरात अशी शिल्पे खोदणे म्हणजे कर्म - कठीण काम...
आणि ते सौंदर्य तु ईतक्या छानपणे टिपले म्हणुन तुझे त्रिवार अभिनंदन...
ईथली शिल्पकला पाहुन मला दिलवाडा, जैसलमेर आणि खजुराहोंच्या शिल्पांची प्रकर्षाने आठवण झाली.

योगेश...खरच अप्रतिम फोटो... खरच सुन्दर आले आहेत. तु एवढया बिझि लाईफ मध्ये सुधा तु तुझे छन्द जोपासतो य बद्दल तुझे कौतुक वाटते.

प्रसाद कुलकर्णी

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे आभार!!!

खरंच एकदा तरी अवश्य भेट द्या या मंदिराला. जर शक्य असेल तर भर पावसात जा आणि शिल्पांचे निथळणारे सौंदर्य पहा.

त्या अज्ञात शिल्पकारांना "सलाम"!!!!!.

आडोला अनुमोदन, एवढ्या जवळ हे एवढं पुरातन मंदीर आहे????????खरंच ठाऊक नव्हतं आता नक्की जाणार बघायला.

धन्यवाद योगेश

फारच छान !!

ह्या मंदिराला चारी बाजुने शिव दर्शनाची सुविधा आहे. (चार छिद्रे) त्यातून शिवाची पिण्डी चे व्यवस्थित दर्शन होते.

वा खुपच सुंदर. एकमुखी दत्ताच्या बाजुलाही एक असेच शिवमंदीर आहे. पुर्ण कोरीव काम केलेल.

खतरनाक आहे यार हे मंदिर, वेड लावेल अशी कलाकुसर आहे. धन्यवाद योगेश, पहिल्या फोटोपासूनच डोळ्यांना मेजवानी मिळत गेलीय. Happy

वा!!
काय अप्रतिम मंदिर आहे. फोटो सुद्धा इतके सुंदर आहेत की मंदिराची प्रदक्षिणा घडल्याचे पुण्य पदरी पडले तुझ्यामुळे आज (आज सोमवार).
धन्यवाद

धन्यवाद!!!

ह्या मंदिराला चारी बाजुने शिव दर्शनाची सुविधा आहे. (चार छिद्रे) त्यातून शिवाची पिण्डी चे व्यवस्थित दर्शन होते.>>>> अगदी खरंय प्रफुल्ल. हे मीही ऐकले होते. जमिनीपासून दीडएक फुटावरून एका शिल्पाच्या छिद्रातुन थेट गर्भगृहातील शिवपिंडीचे दर्शन होते. पण फोटो काढण्यात इतका मग्न झालो होतो कि हि गोष्ट पार विसरून गेलो :(.
पुन्हा जाण्यास काहितरी निमित्त Wink

एकमुखी दत्ताच्या बाजुलाही एक असेच शिवमंदीर आहे.>>>>जागू, कुठे आहे हे मंदिर??? सासवडजवळ नारायणपुरला??

खुपच सुंदर फोटोज. माझ माबोच्या अ‍ॅडमिनना एक सजेशन आहे . लोनलि प्लॅनेट किंवा तत्सम चॅनेलचि जशि स्वतःचि माणसे असतात तशि आपण योगेश व चंदन ह्यांना घेऊन जगभरातिल उत्तमोत्तम ठिकाणाचे ह्यांच्याकडुन फोटो काठुन घ्यावेत . आमचे डोळे व मन नक्किच तृप्त होइल.

लहानपणी बहूतेक ह्या देवळात गेलो आहे. आम्ही डोंबिवलीला असताना आई कधी कधी जायची.. पण इतकं ऐतिहासिक वगैरे आहे हे माहित नव्हतं..
मस्त आहेत फोटो !! Happy

योगेश मी अंबरनाथकर.
कसल मस्त वाटल फोटू बघून.खरच फार सूंदर मंदिर आहे हे.
आम्ही नेहमी जातो.
पण सरकारी अनास्थेमूळे फार अस्वचता आहे आसपास.
खूप धन्यवाद.

Pages