मी आजपर्यंत महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागांची भटकंती केली आहे तेथील देवळांची प्रकाशचित्रे मायबोलीवर ४ भागात प्रदर्शित करण्याचा मानस आहे.
==================================================
मालिकेतील पहिले शिल्पपुष्प "अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर".
==================================================
राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख. याच राकट आणि दगडांच्या देशात असलेली नाजुक कलाकुसरीची आणि महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत असलेली मंदिरे पाहिल्यावर "देवळांच्या देशा" अशीही याची ओळख होऊ शकते. कोल्हापुरचे खिद्रापुर, यवतचे भुलेश्वर, सिन्नर येथील गोंदेश्वर, नाशिक येथीले गोदावरील तटावरच्या मंदिराप्रमाणेच शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".
युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत समावेश झालेले अंबरनाथचे हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार राजा मुम्वाणी याने १० जुलै १०६० रोजी बांधण्यात आले असल्याचे एका शिलालेखात आढळते. म्हणजेच हे मंदिर येत्या १० जुलै रोजी ९५०व्या वर्षात पदार्पण करणार आहे.
मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना "अंबरनाथ" हे तिसरे स्थानक आणि येथेच वसले आहे सांस्कृतिक वारसा असलेले हे शिल्पवैभव. आपल्यापैकी बरेच जण अंबरनाथ येथुन जात येत असतील, पण ज्यांनी येथे येऊन खास हे आरसपानी सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्राकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. मला तर लांबुन पाहिले असता जगन्नाथाच्या डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या एका नदी (???)वरील छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावले केलेले शिल्पकांम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असुन खाली उतरायला पायर्या आहेत. गाभार्यात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्यात दोन शिवलिंग आहेत (कदाचित यामुळेच प्रवेशद्वारावर दोन नंदी असावेत). तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे.
मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे. बाहेरील
बाजुस असलेली शिल्पे निवांतपणे पाहण्यासाठी किमान एक/दिड तास तरी अवश्य राखुन ठेवावा. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्यावरील भाव ठळकपणे दिसुन येतो. महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते. लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारने २६ फेब्रुवारी १९९९ रोजी हे "तीर्थक्षेत्र" म्हणुन घोषित केले आहे. त्यामुळेच कि काय पण इतर तीर्थक्षेत्राजवळ आढळणारा गचाळपणा येथीही थोड्याफार प्रमाणात आढळतो.
सुदैवाने जागतिक पातळीवर या "शिल्पनक्षत्राची" नोंद घेतली आहे, पण आपण अजुनही याची खरी किंमत ओळखु शकलो नाही. ९५० वर्षे ऊन-वारा-पाऊस यांचे आघात सहन करत, आपले सौंदर्य जपत उभे असलेल्या ह्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन त्याची शिल्पश्रीमंती अवश्य पहा. नाहीतर वेरूळ-अजिंठाशी नाते सांगणारे आणि मुंवई-पुण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणारे हे भव्य शिल्प पहायला इतकी वर्षे का उशीर केला याची चुटपुट लागुन राहायची.
==================================================
==================================================
प्रचि १
प्रचि ४
शिवलिंगाचे दर्शन घेण्याअगोदर या गणेशाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे.
पुढिल शिल्पपुष्प - मानस मंदिर (आसनगाव येथील "जैन मंदिर")
























































माणकेश्वर मंदिर: झोडगे या
माणकेश्वर मंदिर: झोडगे या जिप्सीच्या ताज्या चित्रलेखात सुरुवातीलाच अंबरनाथ मंदिराच्या धाग्याची लिंक दिसली. धागा २०१० सालातला आहे. त्यानंतर २०१३ साली डॉक्टर कुमुद कानिटकर यांनी या मंदिरावर ' अंबरनाथ शिवालय' या नावाचे एक अत्यंत माहितीपूर्ण असे पुस्तक प्रसिद्ध केले आहे. हा खरे तर त्यांचा प्रबंध होता आणि तो आंतरराष्ट्रीय स्तरावर खूप नावाजला गेला. अनेक पुरस्कार त्याला मिळाले. नंतर त्यांनी तो इंग्लिश आणि त्याचे मराठी भाषांतर अशा दोन भाषांत प्रसिद्ध केला. ही पुस्तके ॲमेझॉन .कॉम वर आणि sahyaadribooks आणि इतर काही स्थळांवर होती. आता कदाचित आउट ऑफ प्रिंन्ट असावीत. कुणाला मिळाली तर जरूर वाचा. मुंबई महानगराच्या या सुंदर आणि अभिमानास्पद अलंकाराविषयी प्रत्येक मुंबईकराला आणि इतरांनाही माहिती असलीच पाहिजे.
एव्हढ्यासाठीच हा इतका जुना धागा वर काढला आहे.
मी हा धागा बघितला नव्हता.
मी हा धागा बघितला नव्हता. किती सुंदर फोटो! मी अंबरनाथ ची बरीच वेळेस गेले आहे लहानपणी; पण तेव्हा शिल्प वैगेरे कळायचं वय नव्हतं. इथे आवडलं म्हणून एक वर्षत दोन वेळेस बेलूर-हलेबीड वैगेरे होयसळ देवळांची ट्रिप केली. बेलवडी राहिलं तर नुकताच त्या देवळाचा शिवाजीशी संबंधित इतिहास कळला. बघूया! कधी योग येतो ते! वरचे फोटो पण तसेच वाटत आहेत.
Pages