देवळांच्या देशा – "अंबरनाथचे शिवमंदिर"

Submitted by जिप्सी on 5 July, 2010 - 03:15

मी आजपर्यंत महाराष्ट्राच्या ज्या ज्या भागांची भटकंती केली आहे तेथील देवळांची प्रकाशचित्रे मायबोलीवर ४ भागात प्रदर्शित करण्याचा मानस आहे.

==================================================
मालिकेतील पहिले शिल्पपुष्प "अंबरनाथ येथील प्राचीन शिवमंदिर".
==================================================

राकट देशा, कणखर देशा, दगडांच्या देशा अशी आपल्या महाराष्ट्राची ओळख. याच राकट आणि दगडांच्या देशात असलेली नाजुक कलाकुसरीची आणि महाराष्ट्राच्या कलापूर्ण वारशाची साक्ष देत असलेली मंदिरे पाहिल्यावर "देवळांच्या देशा" अशीही याची ओळख होऊ शकते. कोल्हापुरचे खिद्रापुर, यवतचे भुलेश्वर, सिन्नर येथील गोंदेश्वर, नाशिक येथीले गोदावरील तटावरच्या मंदिराप्रमाणेच शिल्पवैभवाची साक्ष देत वर्षानुवर्षे उन-पाऊस आणि काळाचा आघात सहन करत असलेले स्थापत्यशास्त्राचे एक उत्कृष्ट उदाहरण म्हणजे "अंबरनाथचे शिवमंदिर".

युनेस्कोने जाहीर केलेल्या २१८ कलासंपन्न वास्तूत समावेश झालेले अंबरनाथचे हे प्राचिन शिवमंदिर शिलाहार राजा मुम्वाणी याने १० जुलै १०६० रोजी बांधण्यात आले असल्याचे एका शिलालेखात आढळते. म्हणजेच हे मंदिर येत्या १० जुलै रोजी ९५०व्या वर्षात पदार्पण करणार आहे.

मध्य रेल्वेच्या कल्याण स्थानकावरून पुण्याकडे जाताना "अंबरनाथ" हे तिसरे स्थानक आणि येथेच वसले आहे सांस्कृतिक वारसा असलेले हे शिल्पवैभव. आपल्यापैकी बरेच जण अंबरनाथ येथुन जात येत असतील, पण ज्यांनी येथे येऊन खास हे आरसपानी सौंदर्य बघितले असतील ते नक्कीच हरखुन गेले असणार. खडकात भव्य प्राकार खोदून त्याच्यामध्ये हे मंदिर उभारले आहे. मला तर लांबुन पाहिले असता जगन्नाथाच्या डौलदार रथ उभा असल्यासारखे वाटले. तेथे असलेल्या एका नदी (???)वरील छोट्या पुलावरून प्रांगणात आल्यावर मंदिरावले केलेले शिल्पकांम पाहुन थक्क व्हायला होते. पायापासुन शिखरापर्यंत हे मंदिर अगदी नखशिखांत आरसपानी सौंदर्याने नटलेले आहे. प्रवेशद्वारातुन आत जाताना दोन नंदी दिसतात. मंदिराचा गाभारा एखाद्या खोल विहिरीसारखा असुन खाली उतरायला पायर्‍या आहेत. गाभार्‍यात शिरताच कमालीचा थंडावा जाणवतो. गाभार्‍यात दोन शिवलिंग आहेत (कदाचित यामुळेच प्रवेशद्वारावर दोन नंदी असावेत). तेथे उभे राहुन वर पाहिले असता शिखराच्या बोगद्यातुन निळ्या आकाशाचे दर्शन होते. शिखराला जाळी लावलेली आहे.

मंदिराच्या बाहेरून तुम्ही फोटो काढु शकता पण आतल्या बाजुने फोटो काढण्यास मनाई आहे. बाहेरील
बाजुस असलेली शिल्पे निवांतपणे पाहण्यासाठी किमान एक/दिड तास तरी अवश्य राखुन ठेवावा. विविध पौराणिक कथा, नृत्यात मग्न असलेली शिल्पे, हातात आयुधे घेतलेली शिल्पं, विविध देवी-देवतांची शिल्पं याच्या चेहर्‍यावरील भाव ठळकपणे दिसुन येतो. महाशिवरात्री, श्रावणी सोमवारी येथे भाविकांची गर्दी उसळते. लोकभावनेचा आदर करून महाराष्ट्र सरकारने २६ फेब्रुवारी १९९९ रोजी हे "तीर्थक्षेत्र" म्हणुन घोषित केले आहे. त्यामुळेच कि काय पण इतर तीर्थक्षेत्राजवळ आढळणारा गचाळपणा येथीही थोड्याफार प्रमाणात आढळतो.

सुदैवाने जागतिक पातळीवर या "शिल्पनक्षत्राची" नोंद घेतली आहे, पण आपण अजुनही याची खरी किंमत ओळखु शकलो नाही. ९५० वर्षे ऊन-वारा-पाऊस यांचे आघात सहन करत, आपले सौंदर्य जपत उभे असलेल्या ह्या मंदिराला एकदा तरी अवश्य भेट देऊन त्याची शिल्पश्रीमंती अवश्य पहा. नाहीतर वेरूळ-अजिंठाशी नाते सांगणारे आणि मुंवई-पुण्यापासुन हाकेच्या अंतरावर असणारे हे भव्य शिल्प पहायला इतकी वर्षे का उशीर केला याची चुटपुट लागुन राहायची.
==================================================
==================================================
प्रचि १

प्रचि २

प्रचि ३

प्रचि ४
शिवलिंगाचे दर्शन घेण्याअगोदर या गणेशाचे दर्शन घ्यावे असा प्रघात आहे.

प्रचि ५

प्रचि ६

प्रचि ७

प्रचि ८

प्रचि ९

प्रचि १०

प्रचि ११

प्रचि १२

प्रचि १३

प्रचि १४

प्रचि १५

प्रचि १६

प्रचि १७

प्रचि १८

प्रचि १९

प्रचि २०

प्रचि २१

प्रचि २२

प्रचि २३

प्रचि २४

प्रचि २५

प्रचि २६

प्रचि २७

प्रचि २८

प्रचि २९

प्रचि ३०

प्रचि ३१

प्रचि ३२

प्रचि ३३

प्रचि ३४

प्रचि ३५

प्रचि ३६

प्रचि ३७

प्रचि ३८

प्रचि ३९

प्रचि ४०

प्रचि ४१

प्रचि ४२

प्रचि ४३

प्रचि ४४

प्रचि ४५

प्रचि ४६

प्रचि ४७

प्रचि ४८

प्रचि ४९

प्रचि ५०

प्रचि ५१

प्रचि ५२

प्रचि ५३

प्रचि ५४

प्रचि ५५

प्रचि ५६

प्रचि ५७

प्रचि ५८

पुढिल शिल्पपुष्प - मानस मंदिर (आसनगाव येथील "जैन मंदिर")

गुलमोहर: 

योगेश मी मुळची अंबरनाथकर. इथे आमच्या मंदिराचे एवढे छान फोटो दिल्याबद्दल धन्यवाद! आम्ही खूप वेळा जायचो मंदिरात. पण ह्या शिल्पांविषयी फारशी माहिती कुणालाच नाहिये. शिवाजी महाराज कल्याणला येत तेव्हा इथे यायचे असं खूप जण सांगतात.

मंदिराच्या मंदपातील उत्तरेकडील द्वारावरील तुळईवरील शिलालेखानुसार उत्तर कोकणावर राज्य करणार्‍या शिलाहार घराण्यातील छित्तराज याने हे शिवालय उभारण्यास सुरुवात केली व त्याच्या धाकट्या भावाच्या - मुम्मुणीराजाच्या कारकिर्दीत इ.स. १०६०-६१ मध्ये हे बांधकाम पूर्ण झाले. एकूण २५ वर्षे बांधकाम चालू होते.
... म्हणजेच मंदिराला बरोब्बर ९५० वर्षे पुर्ण होत आहेत.. आणि याच मंदिराची संपूर्ण माहिती देणारा मौल्यवान ग्रंथ महाराष्ट्र साहित्य परिषद, अंबरनाथ शाखेतर्फे 'कलाकौस्तुभ- शिवमंदिर अंबरनाथ' नांवाने याच वर्षी प्रकाशित झाला आहे.

योगेशजी, ४ भागातच का? चारच मंदिरे आहेत की आणखी? या लेखातील फोटो मस्तच.. बाकीच्या मंदिरांचेही फोटो असेच भरपूर येऊ द्या..

योगेश यांस,
अप्रतिम छायाचित्रांबद्दल आपले कौतूक करावे तेवढे थोडेच.
सुमारे ५० वर्षांपुर्वी मी अंबरनाथला अनेकदा सहलीना जात असे. शिवमंदिराच्या बरेच पुढे एक निसर्गरम्य तळे रेल्वे तळे म्हणून ते ओळखले जात असे. आता ते अस्तित्वात आहे कि नाही माहीत नाही. सहलीसाठी सुरेख स्थळ असुनही तेथे गर्दी नसे. अंबरनाथच्या अनेक रहिवाशांनाही त्याबद्दल माहिती नसे. जाताना व परत येताना आम्ही त्या देवळात शिरत असू. आत अतिशय शांत व समाधान वाटे. अनेकदा तेथे पुजारीही नसे. एकदा एकाने त्या देवळाचा इतिहास सांगून ते हेमाडपंती मंदिर असल्याचे म्हटले होते.
त्यावेळी मी तेथील बाहेरील तसेच आतीलही शिल्पांचे फोटो काढले होते. ४० वर्षांपुर्वी मी मुंबई सोडली तेव्हा
काही निवडक फोटो सोबत घेऊन बाकी फोटो व सर्व निगेटीव्हज तेथेच सोडले. सध्या माझ्याकडे त्यापैकी जे थोडे फोटो अजून आहेत त्यांत या मंदिराच्या आतील शिल्पापैकी रोमँटीक गणपतीच्या शिल्पाचा एक फोटो आहे.
शक्य झाल्यास त्याची एक स्कॅन प्रत तुम्हाला पाठवीन.
रविंद्र प्रधान,
सेलम, तमिळनाडू,

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन धन्यवाद!!!!

सुन्या, मस्त आहे फोटो, पावसात भिजलेले मंदिर अजुनच सुंदर दिसले असेल ना?

रविंद्र, जर तुम्हास शक्य झाल्यास नक्कि स्कॅन प्रत पाठवा. मंदिराच्या आतील भागातले फोटो काढ्ण्यास बंदी होती Sad

योगेश, मी अंबरनाथ च्या शिवमंदिराच्या अंतर्भागातील एका शिल्पाचा ४४ - ४५ वर्षांपुर्वी काढलेला फोटो सोबत पाठवत आहे. प्रिंटही तेवढाच जुना आहे. या शिल्पात श्रीगणेशराया एका अनोखी रोमँटीक अवस्थेत दिसत आहेतphoto71.jpg. photo71.jpg

योगेश, मी अंबरनाथ च्या शिवमंदिराच्या अंतर्भागातील एका शिल्पाचा ४४ - ४५ वर्षांपुर्वी काढलेला फोटो सोबत पाठवत आहे. प्रिंटही तेवढाच जुना आहे. या शिल्पात श्रीगणेशराया एका अनोखी रोमँटीक अवस्थेत दिसत आहेतphoto71.jpg. photo71.jpg

फार छान!!!!!!!!
आणि तुला एक सजेशन आहे
यवतच्या भुलेश्वर मंदिराला भेट दिल्यावर, त्यातील कलाकुसर आणि कोरीव काम हे बरोबर मंदिराच्या दोन्हि बाजुला समान्तर आहे अगदि तन्तोतन्त

प्रतिसादाबद्दल सगळ्यांचे मनापासुन आभार!!!!
रविंद्रजी इतका जुना फोटो आवर्जुन शेअर केल्याबद्दल खरंच आभार!!!

केवळ अप्रतिम योगेश. पुर्वी या मंदिराच्या आजुबाजुला आंबराई होती व त्यातील हे शिवनाथ म्हणुन `अंबरनाथ' असे कल्याणातील जुने लोक सांगतात. मंदिर घडवणार्‍या कलाकारांना तर सलामच परंतु ते आमच्यापर्यंत पोहचवल्याबद्दल तुलाही सलाम. कल्याणजवळच फारसे प्रसिद्ध नसलेले परंतु सुंदर कोरीव काम केलेले समुहशिल्प `लेनाड सूर्य मंदिर' आहे. तुझ्या तिसर्‍या डोळ्याला मेजवानीच मेजवानी. वेळ मिळाला की नक्की कळव. रविंद्र प्रधानांचे चित्र दिसत नाही?

प्रतिसादाबद्दल धन्यवाद!!!
पुर्वी या मंदिराच्या आजुबाजुला आंबराई होती व त्यातील हे शिवनाथ म्हणुन `अंबरनाथ' असे कल्याणातील जुने लोक सांगतात>>>>किशोर, अधिक माहितीबद्दल आभार. हे माहितच नव्हते.

रविंद्र प्रधानांचे चित्र दिसत नाही?>>>बहुतेक त्यांनी फोटो डिलीट केले असावेत.

योगेश
फोटो अप्रतीम... मी मुळचा अंबरनाथचा आहे.... अनेक वेळा पहिलय हे मंदीर.... शिल्पकलेचा अप्रतिम नमुना आहे खरच...
पुण्यच्या जवळ अशी बरीच मंदीर आहेत अस ऐकून आहे... त्यातल एक म्हणजे सासवडचं चांगवटेश्वराचं मंदीर (वळू फेम...) अप्रतिम स्थान आहे आणि मंदीरातला नंदी तर भव्य अणि अत्युत्तम. मंदीराची रचनाच एकाद्या लहान गढीसारखी वाटली मला...
पुन्हा एकदा धन्यवाद...

आनंद
सिन्नरचे शिव मंदिर्-गो,न्देश्वर असेच आहे-पण एवढ्या सुस्थितीत नाही.
मी नुकतेच जऊन आलो.
फोटो अपलोड केलेत

Pages