प्रवेशिका - १३ ( sumedhap - तत्व माझे फार काही थोर नाही......)

Submitted by kaaryashaaLaa on 2 October, 2008 - 23:48


तत्व माझे फार काही थोर नाही
मी कुणा राजादिकाचा पोर नाही

सांगणे माझे जगाला हेच आहे
वाटतो मी फक्त,हेकेखोर नाही

सारखी धास्ती रुढींची, बंधनांची
हाय, जगणे येथले बिनघोर नाही

गुंतलो ध्यानी तुझ्या इतका सखे मी
सोडवाया ह्या मनाला जोर नाही

जीवनाशीही न काही बंध उरला
मृत्युशीही जोडणारा दोर नाही

Group content visibility: 
Public - accessible to all site users

मतला छान आला आहे. रुढी, सखे, हे शेरही आवडले.
'रुढींची' 'मृत्युशीही' या शब्दांमधे र्‍हस्व दीर्घाची सवलत घेतली आहे म्हणून जरा खटकलं वाचताना.
माझ्या मते ५ गुण.
-सतीश

सर्वच शेर आवडले!!!
७ गुण...

छान प्रयत्न.. ६ गुण.

सांगणे माझे जगाला हेच आहे
वाटतो मी फक्त,हेकेखोर नाही

यानंतर काही काळ तरी काहीच वाचू नये असं वाटलं!! ग्रेटच!!!

६ गुण
-----------------------------------------------------------------------------
अव्यक्ताचे धुके दाटता.....व्यक्त साठते दवबिंदूसम !

क्या बात है! १,२,३ आवडले, त्यातही ३ फारच मस्त

२ रा आणी शेवटचा शेर छान----६ गुण

२ रा आणी शेवटचा शेर छान----६ गुण

सगळेच शेर छान आणि सहज! काफिये मस्त अन थोडे वेगळे आलेत.
सखे मध्ये थोडी connectivity कमी पडली असं वाटून गेलं.

तरीही 'हेकेखोर' खासच! Happy

छानच. राजादिकाचा- सहज शब्द. हेकेखोर, बिनघोर आणि दोर, बेदम आवडले.
माझे ६
-----------------------------------------------------
वह सुबह का अहसान हो या मेरी कशिश हो
डूबा हुआ खुर्शीद सर्-ए-बाम तो आया

जीवनाशीही न काही बंध उरला
मृत्युशीही जोडणारा दोर नाही
एक नंबर!!!

सांगणे माझे जगाला हेच आहे
वाटतो मी फक्त,हेकेखोर नाही
माझे गुण - ५

*********************
वयाबरोबर वाढत जावी तुझी नि माझी मैत्री
मनाबरोबर वयात यावी तुझी नि माझी मैत्री ||

गझल बरी आहे. अवघड काफिया छान सांभाळला आहे. शेर अजून अर्थपूर्ण हवे होते असे वाटले. माझ्याकडून ५.

मतल्यामधे दोन्ही मिसर्‍यांमधे काय कनेक्शन आहे हे समजले नाही.
'हेकेखोर' छान Happy
४ गुण
--------------------------------
जलो, मगर दीप जैसे!

राजादिकाचा पोर नाही .... मस्तच

बाकिचीही छान आहे

५ गुण

३ आणि ५ आवडले. दोन मधला अर्थ कळतोय. पण तशी रचना बरोबर वाटत नाही. (मी हेकेखोर वाटतो पण तसा नाही .. )
४/१०
~~~~~~~~~
~~~~~~~~~
Happy

पहिले ५ बेफाम :-). माझ्यामते ५ गुण

मतला आवडला. दुसरा शेर चांगला आहे पण सानी मिस-यातील मांडणी तितकीशी नीट वाटत नाहीये.
बाकीचे शेर ठिक आहेत.
माझे ५ गुण.

आय हाय ... शेर क्र. ३,४,५ .... जियो !

परागकण

छान गझल!
हेकेखोर आवडला.
मतल्यातल्या २ ओळींमधला संबंध अजून स्पष्ट व्हायला हवा होता.
"मृत्यु/त्यू" तडजोड असूनही शेवटचा शेर लक्षात राहणारा आहे!
माझे ६ गुण.

काही ठिकाणी अर्थाच्या बबतीत confusion झालं... ५ गुण..

सगळेच शेर छान.. शेवटचा जास्त आवडला.. ७गुण..

फक्त शेवटचा शेर ठाव घेणारा. गुण ४

३रा आणि शेवटचा शेर छान आहेत. ५ गुण...

छान आहे
सुरूवात मस्तच

६ गुण

Pages