केसांचे आरोग्य

Submitted by मंजूडी on 26 June, 2008 - 05:56

केसांच्या समस्या, त्यांची कारणे आणि त्यावरचे उपाय ह्याविषयी सविस्तर चर्चा करण्यासाठी हा धागा...

विषय: 
Group content visibility: 
Public - accessible to all site users

चकाकी साठी जास्वंदाचे जेल / तेल पण लाउन बघा Happy

उष्ण प्रक्रुती असेल तर अंड लाउ नये. उषण्ता वाढल्यावरही केस गळतात.

साधना, पूनम अगदी. मुळातच केस व वाढ असावी लागते. माझे केस जेमतेम आहेत त्यामुळे नेहमी कापते पण माझ्या १२ वर्षाच्या लेकीचे केस कंबरेच्या खाल जवळजवळ गुडघ्यापर्यंत आहेत. मी आळ्शी काहीही काळजी घेत नाही. तेल नाही, नेहमी शँपू वापरते नहायला तरीही जाड आणि लांब आहेत.

दोन्ही फेटून लावलं, किंवा मेंदीत घालून लावलं तरी भयंकर वास येतो Sad
अर्थात कुछ पाने के लिये कुछ खोना पडता है...

<<दोन्ही फेटून लावलं, किंवा मेंदीत घालून लावलं तरी भयंकर वास येतो >> खरच खुप वास येतो.
अंड्याचा फक्त पांढरा बलक लावावा, अजिबात वास येत नाही.
असा पांढरा बलक कंडिशनर म्हणून देखील वापरतात. मी स्वतः तरी वापरते.
केस व्यवस्थित धुतल्यानंतर पांढरा बलक आणि थोडेसे कोमट पाणी घेउन व्यवस्थित मिक्स करून केसांच्या टोकांना लावावे , पाच दहा मिनिटांनी फक्त पाण्याने केस धुवावे.

मला एका ब्युटीशियनने हे सांगितलं होतं. रात्रभर मेथ्याचे दाणे पाण्यात भिजवुन ठेवायचे आणि सकाळि शॅम्पू केल्यावर हे पाणी डोक्यावरुन घ्यायचं. केस naturally condition होतात याने. मी केलेलंही आहे तेव्हा ते. खरचं छान condition झाले होते केस. उपायही एकदम सोप्पा. पण मला मेथ्याची दाणे आणि पाणि यांचं प्रमाण आठवत नाहिये. शिवाय, हे मेथ्याचे पाणि डोक्यावरुन घेतल्यावर पुन्हा साध्या पाण्याने केस धुवायचे का नाही? कोणाला काहि माहित आहे का याबाबतीत.

मुलींनो जरा मदत करा. माझ्या १० महिन्यांच्या बाळाला डोक्याला कोंडा, खपल्या झाल्या आहेत. काय करु म्हणजे कमी होतील?

ज्ञाती डॉ लाच विचार. माझ्या मैत्रीणीच्या बाळाला सेम प्रॉबलेम साठी सेलसन ब्ल्यु वापरायला सांगितला होता.

ज्ञाती माझ्या मुलीला ( ९ महिने) हाच प्रॉब्लेम आहे आता. मागच्या व्हिजीट ला डॉ ने बेबी अ‍ॅलोव्हिरा जेल लावायला सांगितलं होतं ते मी लावते आहे. त्यामुळे डोक्यावरच्या ड्राय खपल्या कमी झाल्या आहेत. पण अजूनही कोंडा दिसतो.
आधीच मुलगी टकलू आहे Sad त्यात या ड्राय स्कल्पमुळे अजून खपल्या दिसतात.
उद्या डॉकडे जायचं आहे परत विचारते,

ते मेथी दाण्यांचं प्रमाण सांगा कोणीतरी माहीत असेल तर...

कोंड्यावर मेथी हा प्रभावी उपाय आहे असं ऐकलं होतं.... आमच्या इंजिनिअरिंग कॉलेज जवळ BAMS कॉलेज होतं त्यातील मुलींनी सांगितलं होतं की मेथीचे दाणे (६-७) कोरफडीच्या एका पानाला चिर देऊन त्यात पेरून ठेवावे... १-२ दिवसांनी त्यांना (मेथीदाण्यांना) कोंब येतो... मग ते मेथी दाणे आणि कोरफडीचा गर एकत्र वाटून डोक्याच्या स्काल्पला लावून ठेवायचा तास -दीड तास, नंतर धुवून टाकायचा..

पण यात मेथी दाण्यांचे कण राहतात... म्हणून सुप्रिया१९ यांनी सांगितलेला उपाय छान वाटतोय... डिटेल्स माहीत असेल तर सांगा कसं वापरायचं ते...

मला कोंड्याचा प्रॉब्लेम वारंवार होतो. स्काल्पला खाज येते... केस खूप गळतात आणि पांढरेही व्हायला लागलेत... कोंड्यासाठी कापूर किंवा हेड अँण्ड शोल्डर्स वगैरे वापरून केस गळतात फार... आता जैनचं जास्वंद जेल आणलेय... वापरतेय... बघूया काही फायदा होतोय का...

केस धुतल्यानंतर कंडिशनर लावूनही भुरभुरीत आणि चमकहीन दिसतात काय करावे बरं?

माझाही तोच प्रॉब्लेम आहे ग ड्रीमगर्ल! चिवट कोन्डा कित्येक दिवस पाठच सोडत नाहीये.
मलाही मेथी दाण्याचा उपाय करुन बघावासा वाटतोय.
मगे ईथे मेंदी बीटाच्या पाण्यात भिजवायला सांगितले होते.त्यात बीट कच्चे किसावे की उकडुन किसावे?

अगं पोरींनो कोंड्यासाठी नारळाचं दूध आणि लिंबू हा उपाय बेस्ट आहे.
लिंबू मात्र सहा-सात महिन्यातून एकदाच.
नारळाचं दूध अगदी रेग्युलर केलंत तरी चालेल.
तपशीलांसाठी मागे ३-४थ्या पानावर बघा बरं.

ऑर्किड, बीट कच्चेच किस आणि त्याचा रस गाळून त्यात मेंदी भिजव. मस्त रंग येतो. २ - ३ वेळा अशी मेंदी लावली कि केस खुपच छान दिसतात. पण जर पांढ-या केसांचे प्रमाण जास्त असेल तर जरा जपून नाहितर ते खुपच ऑड दिसेल.

नारळाचं दूध आणि लिंबू हा उपाय बेस्ट आहे.>> हो हो अज्जुका तुम्ही मागे दिलेला हा उपाय वाचून करून पाहीला होता... पण एकदाच... Sad
दुध काढण्याचा कंटाळा... आता मात्र सिरियसली करायलाच पाहीजे... धन्यवाद आठवण करून दिल्याबद्द्ल... Happy

सखी थान्क्यु ग! पुढच्या वेळी नक्की करीन हा प्रयोग.
नीधप, परवा तुमची आठवण काढत लावल नारळाचं दुध, नंतर शिकाकाईनी न्हायले.
डोक तेल चोपडल्यासारखं चप्प झाल आणि स्काल्प ला अशक्य खाज सुटली.[हे शिकाकाईमुळे झाल असेल का? कधीकधी शिकाकाईनी पण कोंडा वाढ्तो अस ऐकलंय.] त्यापुर्वी एकदा प्रयोग केला तेव्हा छान ईफेक्ट आलेला. पण त्यानंतर काय लावल[शाम्पु की शिकाकाई ] तेच आठवत नाहीये. Uhoh

मला सल्ला द्या. मुलीचे केस खूप सुळसुळीत आहेत. शाळेत जाताना मी सकाळी तिच्या वेण्या घालून देते पण
त्या मधल्या सुट्टी परेन्त सुटून येतात. वेणी घालून शेवटी रबर लावते दोन वेढे अन मग रिबिन, ते रिबिन वेणीत गुंफून घालतात ना ते कसे करावे? का रिबिनीचे जास्त वेढे द्यावेत? मध्ये भांग पाडून दोन वेण्या घालते.

तिला ड्ब्बल वेणी आवड्त नाही. अन मी जन्मभर बॉयकट वाली Happy

नारळाच्या दुधानंतर शिकेकाईने धुतल्यावर चिकटपणा जाणारच नाही. खाज सुटणं अगदीच ऑब्व्हियस आहे.
नारळाचं दूध धुवून टाकायला माइल्ड शांपू हवाच. पर्याय नाही.

मामी,
मी कधी वेणी घातली नाही, केस बांधले नाहीत त्यामुळे यातला सल्ला नाही देउ शकणार पण शॉर्ट हेअरकट नाही आवडत का लेकीला Happy ?
फक्त हेअरबॅन्ड नी मॅनेज होतील एवढीच लेंथ ठेवायची.
जस्ट मानेवर रुळाणारा सिंपल ब्लंट कट आवडेल का तिला ?

दीपा, मला आवडेल ग पण तिला हवेत ना लांब केस. कॉलेजात जाईपरेन्त कमरे परेन्त लांब वाढवायचे असा प्लॅन आहे. शाळेत अगदी शॉर्ट नाहीतर वेण्या हेच दोन ऑप्शन. तिला फॅशनेबल कट केला ना तर सगळे केस एका वेणीत मावणार नाहीत झिपर्‍या सुट्तील. बस मधून पोहोचे परेन्तच. शी इज मोर फेमिनाइन दॅन मी.

मामी थोडे तरी तेलकट असल्याशिवाय वेण्या टिकणार नाहीत.
माझे होते लांबसडक आणि सुळसुळीत केस. वेण्या वरती बांधलेल्या. कमाल बावळट दिसायचे मी.
वेणीच्या शेवटच्या काही पेडांच्यात वेणीच्या पेडांमधेच रिबिनी गुंतवून मग शेवटाला रिबिनीची गाठ घालायची आणि मग ती वर घ्यायची. हव्या त्या लेव्हलवर रिबिनीचं फूल.

Pages